عبس

تفسير سورة عبس

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ عَبَسَ وَتَوَلَّىٰ﴾

१. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले.

﴿أَنْ جَاءَهُ الْأَعْمَىٰ﴾

२. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला.

﴿وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ﴾

३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता.

﴿أَوْ يَذَّكَّرُ فَتَنْفَعَهُ الذِّكْرَىٰ﴾

४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता.

﴿أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ﴾

५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो.

﴿فَأَنْتَ لَهُ تَصَدَّىٰ﴾

६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात.

﴿وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ﴾

७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही.

﴿وَأَمَّا مَنْ جَاءَكَ يَسْعَىٰ﴾

८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो.

﴿وَهُوَ يَخْشَىٰ﴾

९. आणि तो भीत (ही) आहे.

﴿فَأَنْتَ عَنْهُ تَلَهَّىٰ﴾

१०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता.

﴿كَلَّا إِنَّهَا تَذْكِرَةٌ﴾

११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे.

﴿فَمَنْ شَاءَ ذَكَرَهُ﴾

१२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा.

﴿فِي صُحُفٍ مُكَرَّمَةٍ﴾

१३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे.

﴿مَرْفُوعَةٍ مُطَهَّرَةٍ﴾

१४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत.

﴿بِأَيْدِي سَفَرَةٍ﴾

१५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे.

﴿كِرَامٍ بَرَرَةٍ﴾

१६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत.

﴿قُتِلَ الْإِنْسَانُ مَا أَكْفَرَهُ﴾

१७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे.

﴿مِنْ أَيِّ شَيْءٍ خَلَقَهُ﴾

१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले.

﴿مِنْ نُطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ﴾

१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला.

﴿ثُمَّ السَّبِيلَ يَسَّرَهُ﴾

२०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला.

﴿ثُمَّ أَمَاتَهُ فَأَقْبَرَهُ﴾

२१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले.

﴿ثُمَّ إِذَا شَاءَ أَنْشَرَهُ﴾

२२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील.

﴿كَلَّا لَمَّا يَقْضِ مَا أَمَرَهُ﴾

२३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही.

﴿فَلْيَنْظُرِ الْإِنْسَانُ إِلَىٰ طَعَامِهِ﴾

२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे.

﴿أَنَّا صَبَبْنَا الْمَاءَ صَبًّا﴾

२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले.

﴿ثُمَّ شَقَقْنَا الْأَرْضَ شَقًّا﴾

२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले.

﴿فَأَنْبَتْنَا فِيهَا حَبًّا﴾

२७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले.

﴿وَعِنَبًا وَقَضْبًا﴾

२८. आणि द्राक्ष व भाजीपाला.

﴿وَزَيْتُونًا وَنَخْلًا﴾

२९. आणि जैतून व खजूर.

﴿وَحَدَائِقَ غُلْبًا﴾

३०. आणि घनदाट बागा.

﴿وَفَاكِهَةً وَأَبًّا﴾

३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला).

﴿مَتَاعًا لَكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ﴾

३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता.

﴿فَإِذَا جَاءَتِ الصَّاخَّةُ﴾

३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल.

﴿يَوْمَ يَفِرُّ الْمَرْءُ مِنْ أَخِيهِ﴾

३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून.

﴿وَأُمِّهِ وَأَبِيهِ﴾

३५. आणि आपल्या माता व पित्यापासून.

﴿وَصَاحِبَتِهِ وَبَنِيهِ﴾

३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून.

﴿لِكُلِّ امْرِئٍ مِنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ﴾

३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल.

﴿وُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُسْفِرَةٌ﴾

३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील.

﴿ضَاحِكَةٌ مُسْتَبْشِرَةٌ﴾

३९. (जे) हसत आणि आनंदित असतील.

﴿وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ﴾

४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील.

﴿تَرْهَقُهَا قَتَرَةٌ﴾

४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल.

﴿أُولَٰئِكَ هُمُ الْكَفَرَةُ الْفَجَرَةُ﴾

४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील.

الترجمات والتفاسير لهذه السورة: