الحاقة

تفسير سورة الحاقة

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الْحَاقَّةُ﴾

१. सिद्ध होणारी.

﴿مَا الْحَاقَّةُ﴾

२. काय आहे सिद्ध होणारी?

﴿وَمَا أَدْرَاكَ مَا الْحَاقَّةُ﴾

३. आणि तुम्हाला काय माहीत की ती सिद्ध होणारी काय आहे?

﴿كَذَّبَتْ ثَمُودُ وَعَادٌ بِالْقَارِعَةِ﴾

४. त्या खडकाविणारीला समूद आणि आदच्या लोकांनी खोटे ठरविले.

﴿فَأَمَّا ثَمُودُ فَأُهْلِكُوا بِالطَّاغِيَةِ﴾

५. (परिणामी) समूद तर अतिशय तीव्र (आणि भयंकर जोराच्या) चित्काराद्वारे नष्ट केले गेले.

﴿وَأَمَّا عَادٌ فَأُهْلِكُوا بِرِيحٍ صَرْصَرٍ عَاتِيَةٍ﴾

६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले

﴿سَخَّرَهَا عَلَيْهِمْ سَبْعَ لَيَالٍ وَثَمَانِيَةَ أَيَّامٍ حُسُومًا فَتَرَى الْقَوْمَ فِيهَا صَرْعَىٰ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ خَاوِيَةٍ﴾

७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे!

﴿فَهَلْ تَرَىٰ لَهُمْ مِنْ بَاقِيَةٍ﴾

८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे?

﴿وَجَاءَ فِرْعَوْنُ وَمَنْ قَبْلَهُ وَالْمُؤْتَفِكَاتُ بِالْخَاطِئَةِ﴾

९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले.

﴿فَعَصَوْا رَسُولَ رَبِّهِمْ فَأَخَذَهُمْ أَخْذَةً رَابِيَةً﴾

१०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले.

﴿إِنَّا لَمَّا طَغَى الْمَاءُ حَمَلْنَاكُمْ فِي الْجَارِيَةِ﴾

११. जेव्हा पाण्यात पूर आला तर त्या वेळी आम्ही तुम्हाला नौकेत चढविले.

﴿لِنَجْعَلَهَا لَكُمْ تَذْكِرَةً وَتَعِيَهَا أُذُنٌ وَاعِيَةٌ﴾

१२.
यासाठी की त्यास तुमच्यासाठी बोध उपदेश (आणि स्मारक) बनवावे, आणि (यासाठी की) स्मरण राखणाऱ्या कानांनी त्यास स्मरणात राखावे.

﴿فَإِذَا نُفِخَ فِي الصُّورِ نَفْخَةٌ وَاحِدَةٌ﴾

१३. तर जेव्हा सूर (शंखा) मध्ये एक फुंक मारली जाईल.

﴿وَحُمِلَتِ الْأَرْضُ وَالْجِبَالُ فَدُكَّتَا دَكَّةً وَاحِدَةً﴾

१४. आणि धरती व पर्वत उचलून घेतले जातील आणि एकाच प्रहारात कण-कण (चुरेचूर) बनविले जातील.

﴿فَيَوْمَئِذٍ وَقَعَتِ الْوَاقِعَةُ﴾

१५. त्या दिवशी घडून येणारी घटना (कयामत) घडून येईल.

﴿وَانْشَقَّتِ السَّمَاءُ فَهِيَ يَوْمَئِذٍ وَاهِيَةٌ﴾

१६. आणि आकाश विदीर्ण होईल तर त्या दिवशी फार कमजोर होईल.

﴿وَالْمَلَكُ عَلَىٰ أَرْجَائِهَا ۚ وَيَحْمِلُ عَرْشَ رَبِّكَ فَوْقَهُمْ يَوْمَئِذٍ ثَمَانِيَةٌ﴾

१७.
आणि त्याच्या किनाऱ्यांवर फरिश्ते असतील आणि तुमच्या पालनकर्त्याचे आसन (अर्श) त्या दिवशी आठ फरिश्ते आपल्यावर उचलून घेतलेले असतील.

﴿يَوْمَئِذٍ تُعْرَضُونَ لَا تَخْفَىٰ مِنْكُمْ خَافِيَةٌ﴾

१८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही.

﴿فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ فَيَقُولُ هَاؤُمُ اقْرَءُوا كِتَابِيَهْ﴾

१९.
तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा.

﴿إِنِّي ظَنَنْتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ﴾

२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे.

﴿فَهُوَ فِي عِيشَةٍ رَاضِيَةٍ﴾

२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल

﴿فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ﴾

२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये.

﴿قُطُوفُهَا دَانِيَةٌ﴾

२३. जिची फळे खाली झुकलेली असतील.

﴿كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا أَسْلَفْتُمْ فِي الْأَيَّامِ الْخَالِيَةِ﴾

२४.
(त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत.

﴿وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِشِمَالِهِ فَيَقُولُ يَا لَيْتَنِي لَمْ أُوتَ كِتَابِيَهْ﴾

२५.
परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते.

﴿وَلَمْ أَدْرِ مَا حِسَابِيَهْ﴾

२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे.

﴿يَا لَيْتَهَا كَانَتِ الْقَاضِيَةَ﴾

२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते)

﴿مَا أَغْنَىٰ عَنِّي مَالِيَهْ ۜ﴾

२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही.

﴿هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ﴾

२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले.

﴿خُذُوهُ فَغُلُّوهُ﴾

३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका.

﴿ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ﴾

३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका.

﴿ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ﴾

३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका.

﴿إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ﴾

३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता.

﴿وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ﴾

३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता.

﴿فَلَيْسَ لَهُ الْيَوْمَ هَاهُنَا حَمِيمٌ﴾

३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे

﴿وَلَا طَعَامٌ إِلَّا مِنْ غِسْلِينٍ﴾

३६. आणि ना पू खेरीज त्याचे एखादे भोजन आहे

﴿لَا يَأْكُلُهُ إِلَّا الْخَاطِئُونَ﴾

३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही.

﴿فَلَا أُقْسِمُ بِمَا تُبْصِرُونَ﴾

३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता

﴿وَمَا لَا تُبْصِرُونَ﴾

३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही.

﴿إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ﴾

४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१

﴿وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ۚ قَلِيلًا مَا تُؤْمِنُونَ﴾

४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता.

﴿وَلَا بِقَوْلِ كَاهِنٍ ۚ قَلِيلًا مَا تَذَكَّرُونَ﴾

४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता.

﴿تَنْزِيلٌ مِنْ رَبِّ الْعَالَمِينَ﴾

४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे.

﴿وَلَوْ تَقَوَّلَ عَلَيْنَا بَعْضَ الْأَقَاوِيلِ﴾

४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता.

﴿لَأَخَذْنَا مِنْهُ بِالْيَمِينِ﴾

४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता.

﴿ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِينَ﴾

४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती.

﴿فَمَا مِنْكُمْ مِنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ﴾

४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता.

﴿وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِلْمُتَّقِينَ﴾

४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे.

﴿وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنْكُمْ مُكَذِّبِينَ﴾

४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत.

﴿وَإِنَّهُ لَحَسْرَةٌ عَلَى الْكَافِرِينَ﴾

५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे.

﴿وَإِنَّهُ لَحَقُّ الْيَقِينِ﴾

५१. आणि निःसंशय, हे अगदी खात्रीचे सत्य आहे.

﴿فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ﴾

५२. तेव्हा तुम्ही आपल्या महिमावान (महामहीम) पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान करा.

الترجمات والتفاسير لهذه السورة: