المنافقون

تفسير سورة المنافقون

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ إِذَا جَاءَكَ الْمُنَافِقُونَ قَالُوا نَشْهَدُ إِنَّكَ لَرَسُولُ اللَّهِ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ إِنَّكَ لَرَسُولُهُ وَاللَّهُ يَشْهَدُ إِنَّ الْمُنَافِقِينَ لَكَاذِبُونَ﴾

१.
दांभिक (मुनाफिक) जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही या गोष्टीस साक्ष आहोत की निःसंशय, तुम्ही अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहात आणि अल्लाह जाणतो की तुम्ही निःसंशय त्याचे रसूल आहात. आणि अल्लाह साक्ष देतो की हे मुनाफिक (दांभिक) निश्चितपणे खोटारडे आहेत.

﴿اتَّخَذُوا أَيْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوا عَنْ سَبِيلِ اللَّهِ ۚ إِنَّهُمْ سَاءَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

२.
त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या मार्गापासून थांबले, निःसंशय फार वाईट आहे ता काम जे हे करीत आहेत.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ آمَنُوا ثُمَّ كَفَرُوا فَطُبِعَ عَلَىٰ قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَفْقَهُونَ﴾

३.
हे या कारणास्तव की हे ईमान राखून पुन्हा काफिर झाले, तेव्हा त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली आता त्यांना काहीही समजत नाही.

﴿۞ وَإِذَا رَأَيْتَهُمْ تُعْجِبُكَ أَجْسَامُهُمْ ۖ وَإِنْ يَقُولُوا تَسْمَعْ لِقَوْلِهِمْ ۖ كَأَنَّهُمْ خُشُبٌ مُسَنَّدَةٌ ۖ يَحْسَبُونَ كُلَّ صَيْحَةٍ عَلَيْهِمْ ۚ هُمُ الْعَدُوُّ فَاحْذَرْهُمْ ۚ قَاتَلَهُمُ اللَّهُ ۖ أَنَّىٰ يُؤْفَكُونَ﴾

४.
आणि जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तेव्हा त्यांची शरीरे तुम्हाला मनमोहक वाटतील आणि जेव्हा हे बोलू लागतील तेव्हा त्यांच्या गोष्टी (ऐकण्या) साठी कान लावाल, ज्याप्रमाणे ही लाकडे आहेत भिंतीच्या आधारे लावलेली (ते) प्रत्येक (उंच) आवाजाला आपल्याविरूद्ध समजतात. तेच वास्तविक शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, अल्लाह त्यांचा सर्वनाश करो. कोठे भरकटत जात आहेत?

﴿وَإِذَا قِيلَ لَهُمْ تَعَالَوْا يَسْتَغْفِرْ لَكُمْ رَسُولُ اللَّهِ لَوَّوْا رُءُوسَهُمْ وَرَأَيْتَهُمْ يَصُدُّونَ وَهُمْ مُسْتَكْبِرُونَ﴾

५.
आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की, या, अल्लाहच्या पैगंबराने तुमच्यासाठी क्षमा याचनेची प्रार्थना करावी, तेव्हा आपल्या माना फिरवतात आणि तुम्ही त्यांना पाहाल की ते गर्व (घमेंड) करीत थांबतात.

﴿سَوَاءٌ عَلَيْهِمْ أَسْتَغْفَرْتَ لَهُمْ أَمْ لَمْ تَسْتَغْفِرْ لَهُمْ لَنْ يَغْفِرَ اللَّهُ لَهُمْ ۚ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ﴾

६. तुम्ही त्यांच्याकरिता माफीची प्रार्थना करणे आणि न करणे सारखेच आहे. अल्लाहच्यांना कधीही माफ करणार नाही. निःसंशय, अल्लाह अशा दुराचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.

﴿هُمُ الَّذِينَ يَقُولُونَ لَا تُنْفِقُوا عَلَىٰ مَنْ عِنْدَ رَسُولِ اللَّهِ حَتَّىٰ يَنْفَضُّوا ۗ وَلِلَّهِ خَزَائِنُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَلَٰكِنَّ الْمُنَافِقِينَ لَا يَفْقَهُونَ﴾

७.
हेच ते लोक होत जे म्हणतात की जे लोक अल्लाहच्या पैगंबरासोबत आहेत, त्यांच्यावर काही खर्च करू नका, येथे पर्यंत की ते इतस्ततः व्हावेत वस्तुतः आकाशांचे आणि जमिनीचे सर्व खजिने अल्लाहच्याच मालकीचे आहेत, परंतु या दांभिकांना हे समजत नाही.

﴿يَقُولُونَ لَئِنْ رَجَعْنَا إِلَى الْمَدِينَةِ لَيُخْرِجَنَّ الْأَعَزُّ مِنْهَا الْأَذَلَّ ۚ وَلِلَّهِ الْعِزَّةُ وَلِرَسُولِهِ وَلِلْمُؤْمِنِينَ وَلَٰكِنَّ الْمُنَافِقِينَ لَا يَعْلَمُونَ﴾

८. हे म्हणतात की जर आम्ही आता परतून मदीना येथे गेलो तर प्रतिष्ठा बाळगणारा, अपमानितास तेथून बाहेर काढील.
(ऐका) मान-प्रतिष्ठा तर केवळ अल्लाहकरिता आणि त्याच्या पैगंबराकरिता व ईमान राखणाऱ्यांकरिता आहे, तथापि हे दांभिक (मुनाफिक) जाणत नाहीत.

﴿يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تُلْهِكُمْ أَمْوَالُكُمْ وَلَا أَوْلَادُكُمْ عَنْ ذِكْرِ اللَّهِ ۚ وَمَنْ يَفْعَلْ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ﴾

९.
हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या धनसंपत्ती व संततीने तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफील न करावे१ आणि जे असे करतील, तेच लोक नुकसान उचलणारे (तोट्यात राहणारे) आहेत.

﴿وَأَنْفِقُوا مِنْ مَا رَزَقْنَاكُمْ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ فَيَقُولَ رَبِّ لَوْلَا أَخَّرْتَنِي إِلَىٰ أَجَلٍ قَرِيبٍ فَأَصَّدَّقَ وَأَكُنْ مِنَ الصَّالِحِينَ﴾

१०.
आणि आम्ही जे काही तुम्हाला प्रदान केले आहे, त्याच्यातून (आमच्या मार्गात) खर्च करा, यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याला मरण यावे, तेव्हा म्हणू लागले की, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला थोड्या उशिराची सवड का नाही देत? की मी दान-पुण्य करावे आणि नेक व सदाचारी लोकांपैकी व्हावे.

﴿وَلَنْ يُؤَخِّرَ اللَّهُ نَفْسًا إِذَا جَاءَ أَجَلُهَا ۚ وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ﴾

११.
आणि जेव्हा एखाद्याची निर्धारित वेळ येऊन पोहोचते, मग अल्लाह त्याला काहीच सवड देत नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

الترجمات والتفاسير لهذه السورة: