الغاشية

تفسير سورة الغاشية

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْغَاشِيَةِ﴾

१. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे?

﴿وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ﴾

२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील.

﴿عَامِلَةٌ نَاصِبَةٌ﴾

३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील.

﴿تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً﴾

४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील.

﴿تُسْقَىٰ مِنْ عَيْنٍ آنِيَةٍ﴾

५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल.

﴿لَيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِنْ ضَرِيعٍ﴾

६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल.

﴿لَا يُسْمِنُ وَلَا يُغْنِي مِنْ جُوعٍ﴾

७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील.

﴿وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَاعِمَةٌ﴾

८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील.

﴿لِسَعْيِهَا رَاضِيَةٌ﴾

९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील.

﴿فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ﴾

१०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील.

﴿لَا تَسْمَعُ فِيهَا لَاغِيَةً﴾

११. जिथे कोणतीही असभ्य निरर्थक गोष्ट ऐकणार नाहीत.

﴿فِيهَا عَيْنٌ جَارِيَةٌ﴾

१२. जिथे (शीतल) झरे वाहत असतील.

﴿فِيهَا سُرُرٌ مَرْفُوعَةٌ﴾

१३. (आणि) त्या (जन्नतीं) मध्ये उंच उंच आसने असतील.

﴿وَأَكْوَابٌ مَوْضُوعَةٌ﴾

१४. आणि प्याले ठेवलेले (असतील).

﴿وَنَمَارِقُ مَصْفُوفَةٌ﴾

१५. आणि एका रांगेत लावलेले तक्के असतील.

﴿وَزَرَابِيُّ مَبْثُوثَةٌ﴾

१६. आणि मऊ मखमली गालिचे पसरलेले असतील.

﴿أَفَلَا يَنْظُرُونَ إِلَى الْإِبِلِ كَيْفَ خُلِقَتْ﴾

१७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे?

﴿وَإِلَى السَّمَاءِ كَيْفَ رُفِعَتْ﴾

१८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे.

﴿وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ﴾

१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत.

﴿وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ﴾

२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे.

﴿فَذَكِّرْ إِنَّمَا أَنْتَ مُذَكِّرٌ﴾

२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात.

﴿لَسْتَ عَلَيْهِمْ بِمُصَيْطِرٍ﴾

२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत.

﴿إِلَّا مَنْ تَوَلَّىٰ وَكَفَرَ﴾

२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील.

﴿فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ﴾

२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल.

﴿إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ﴾

२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे.

﴿ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا حِسَابَهُمْ﴾

२६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: