التحريم

تفسير سورة التحريم

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ يَا أَيُّهَا النَّبِيُّ لِمَ تُحَرِّمُ مَا أَحَلَّ اللَّهُ لَكَ ۖ تَبْتَغِي مَرْضَاتَ أَزْوَاجِكَ ۚ وَاللَّهُ غَفُورٌ رَحِيمٌ﴾

१.
हे पैगंबर! ज्या गोष्टीला अल्लाहने तुमच्यासाठी हलाल (वैध) केले आहे, तिला तुम्ही हराम (अवैध) का ठरविता? (काय) तुम्ही आपल्या पत्नींची प्रसन्नता प्राप्त करू इच्छिता, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा दयाळू आहे.

﴿قَدْ فَرَضَ اللَّهُ لَكُمْ تَحِلَّةَ أَيْمَانِكُمْ ۚ وَاللَّهُ مَوْلَاكُمْ ۖ وَهُوَ الْعَلِيمُ الْحَكِيمُ﴾

२.
निःसंशय, अल्लाहने तुमच्यासाठी (अशा) शपथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निर्धारित केला आहे, आणि अल्लाह तुमचा कार्यसाधक (मित्र) आहे आणि तोच (पूर्ण) ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे.

﴿وَإِذْ أَسَرَّ النَّبِيُّ إِلَىٰ بَعْضِ أَزْوَاجِهِ حَدِيثًا فَلَمَّا نَبَّأَتْ بِهِ وَأَظْهَرَهُ اللَّهُ عَلَيْهِ عَرَّفَ بَعْضَهُ وَأَعْرَضَ عَنْ بَعْضٍ ۖ فَلَمَّا نَبَّأَهَا بِهِ قَالَتْ مَنْ أَنْبَأَكَ هَٰذَا ۖ قَالَ نَبَّأَنِيَ الْعَلِيمُ الْخَبِيرُ﴾

३.
आणि (स्मरण करा) जेव्हा पैगंबरांनी आपल्या काही पत्नींना गोपनीयतेत एक गोष्ट सांगितली तर जेव्हा तिने त्या गोष्टीची वाच्यता केली, आणि अल्लाहने आपल्या पैगंबराला त्याबाबत अवगत केले, तेव्हा पैगंबरांनी काही गोष्ट तर सांगितली आणि काही सांगायचे टाळले, मग जेव्हा पैगंबरानी आपल्या त्या पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली, याची खबर तुम्हाला कोणी दिली? सांगितले, सर्व काही जाणणाऱ्या, पूर्ण खबर राखणाऱ्या अल्लाहने मला याची खबर दिली आहे.

﴿إِنْ تَتُوبَا إِلَى اللَّهِ فَقَدْ صَغَتْ قُلُوبُكُمَا ۖ وَإِنْ تَظَاهَرَا عَلَيْهِ فَإِنَّ اللَّهَ هُوَ مَوْلَاهُ وَجِبْرِيلُ وَصَالِحُ الْمُؤْمِنِينَ ۖ وَالْمَلَائِكَةُ بَعْدَ ذَٰلِكَ ظَهِيرٌ﴾

४. (हे पैगंबराच्या दोन्ही पत्नींनो!) जर तुम्ही अल्लाहकडे माफी मागाल (तर फार चांगले आहे).
निःसंशय, तुमची हृदये झुकली आहेत आणि जर तुम्ही पैगंबराच्या विरोधात एकमेकांची मदत कराल तर निःसंशय, त्यांचा मित्र संरक्षक अल्लाह आहे आणि जिब्रील नेक ईमान राखणारे आणि त्याच्याखेरीज फरिश्तेही मदत करणारे आहेत.

﴿عَسَىٰ رَبُّهُ إِنْ طَلَّقَكُنَّ أَنْ يُبْدِلَهُ أَزْوَاجًا خَيْرًا مِنْكُنَّ مُسْلِمَاتٍ مُؤْمِنَاتٍ قَانِتَاتٍ تَائِبَاتٍ عَابِدَاتٍ سَائِحَاتٍ ثَيِّبَاتٍ وَأَبْكَارًا﴾

५.
जर तो (रसूल) तुम्हाला तलाक देऊन टाकील तर लवकरच त्यांना, त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्याऐवजी तुमच्यापेक्षा चांगल्या पत्न्या प्रदान करील, ज्या इस्लाम (धर्म) बाळगणाऱ्या, ईमान राखणाऱ्या, अल्लाहसमोर झुकणाऱ्या, माफी मागणाऱ्या, उपासना करणाऱ्या, रोजे (व्रत) राखणाऱ्या असतील विधवा आणि कुमारिका.

﴿يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا قُوا أَنْفُسَكُمْ وَأَهْلِيكُمْ نَارًا وَقُودُهَا النَّاسُ وَالْحِجَارَةُ عَلَيْهَا مَلَائِكَةٌ غِلَاظٌ شِدَادٌ لَا يَعْصُونَ اللَّهَ مَا أَمَرَهُمْ وَيَفْعَلُونَ مَا يُؤْمَرُونَ﴾

६.
हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही स्वतः आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना त्या आगीपासून वाचवा,१ जिचे इंधन मानव आणि दगड आहेत, जिच्यावर कठोर हृदयाचे सक्त फरिश्ते तैनात आहेत.
ज्यांना अल्लाह जो आदेश देतो, त्याची ते अवज्ञा करीत नाहीत, किंबहुना जो काही आदेश दिला जातो त्याचे पालन करतात.

﴿يَا أَيُّهَا الَّذِينَ كَفَرُوا لَا تَعْتَذِرُوا الْيَوْمَ ۖ إِنَّمَا تُجْزَوْنَ مَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

७.
हे इन्कारी लोकांनो! आज तुम्ही (विवशता आणि) बहाणा दाखवू नका, तुम्हाला केवळ तुमच्या दुष्कर्मांचे प्रतिफळ दिले जात आहे.

﴿يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا تُوبُوا إِلَى اللَّهِ تَوْبَةً نَصُوحًا عَسَىٰ رَبُّكُمْ أَنْ يُكَفِّرَ عَنْكُمْ سَيِّئَاتِكُمْ وَيُدْخِلَكُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ يَوْمَ لَا يُخْزِي اللَّهُ النَّبِيَّ وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ ۖ نُورُهُمْ يَسْعَىٰ بَيْنَ أَيْدِيهِمْ وَبِأَيْمَانِهِمْ يَقُولُونَ رَبَّنَا أَتْمِمْ لَنَا نُورَنَا وَاغْفِرْ لَنَا ۖ إِنَّكَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ﴾

८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहपुढे (खरी आणि) निखालस माफी मागा. संभवतः तुमच्या पालनकर्त्याने तुमची दुष्कर्मे मिटवावित. आणि तुम्हाला अशा जन्नतमध्ये दाखल करावे जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्या दिवशी अल्लाह पैगंबराला आणि ईमान राखणाऱ्यांना, जे त्यांच्यासोबत आहेत अपमानित करणार नाही. त्यांचे दिव्य तेज (नूर) त्यांच्या पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल.
हे दुआ (प्रार्थना) करत असतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला संपूर्ण तेज (नूर) प्रदान कर आणि आम्हाला क्षमा कर. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.

﴿يَا أَيُّهَا النَّبِيُّ جَاهِدِ الْكُفَّارَ وَالْمُنَافِقِينَ وَاغْلُظْ عَلَيْهِمْ ۚ وَمَأْوَاهُمْ جَهَنَّمُ ۖ وَبِئْسَ الْمَصِيرُ﴾

९. हे पैगंबर! काफिरांशी आणि मुनाफिक (दांभिक) लोकांशी जिहाद करा आणि त्यांच्यावर सक्ती (कठोरता) करा. त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.

﴿ضَرَبَ اللَّهُ مَثَلًا لِلَّذِينَ كَفَرُوا امْرَأَتَ نُوحٍ وَامْرَأَتَ لُوطٍ ۖ كَانَتَا تَحْتَ عَبْدَيْنِ مِنْ عِبَادِنَا صَالِحَيْنِ فَخَانَتَاهُمَا فَلَمْ يُغْنِيَا عَنْهُمَا مِنَ اللَّهِ شَيْئًا وَقِيلَ ادْخُلَا النَّارَ مَعَ الدَّاخِلِينَ﴾

१०. अल्लाहने काफिर लोकांकरिता नूहच्या आणि लूतच्या पत्नींचे उदाहरण दिले आहे. या दोघी आमच्या दासांपैकी दोन नेक सदाचारी दासांच्या कुटुंबात होत्या.
मग त्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला, तेव्हा ते दोन्ही (दास) त्यांच्यापासून अल्लाहच्या (कोणत्याही शिक्षा - यातनेला) रोखू शकले नाहीत आणि आदेश दिला गेला की (स्त्रियांनो!) जहन्नममध्ये जाणाऱ्यांसोबत तुम्ही दोघीही जा.

﴿وَضَرَبَ اللَّهُ مَثَلًا لِلَّذِينَ آمَنُوا امْرَأَتَ فِرْعَوْنَ إِذْ قَالَتْ رَبِّ ابْنِ لِي عِنْدَكَ بَيْتًا فِي الْجَنَّةِ وَنَجِّنِي مِنْ فِرْعَوْنَ وَعَمَلِهِ وَنَجِّنِي مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ﴾

११. आणि अल्लाहने ईमान राखणाऱ्यांकरिता फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण सांगितले.
जेव्हा तिने दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी आपल्या जवळ जहन्नतमध्ये एक घर बनव आणि मला फिरऔनपासून व त्याच्या कर्मांपासून वाचव आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.

﴿وَمَرْيَمَ ابْنَتَ عِمْرَانَ الَّتِي أَحْصَنَتْ فَرْجَهَا فَنَفَخْنَا فِيهِ مِنْ رُوحِنَا وَصَدَّقَتْ بِكَلِمَاتِ رَبِّهَا وَكُتُبِهِ وَكَانَتْ مِنَ الْقَانِتِينَ﴾

१२.
आणि (उदाहरण दिले) इमरानची कन्या मरियमचे जिने आपल्या शील-अब्रूचे रक्षण केले, मग आम्ही आपल्यातर्फे तिच्यात प्राण (आत्मा) फुंकला आणि (मरियम) ने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे आणि त्याच्या ग्रंथांचे समर्थन केले आणि ती उपासना करणारीं पैकी होती.

الترجمات والتفاسير لهذه السورة: