الإنسان

تفسير سورة الإنسان

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ هَلْ أَتَىٰ عَلَى الْإِنْسَانِ حِينٌ مِنَ الدَّهْرِ لَمْ يَكُنْ شَيْئًا مَذْكُورًا﴾

१. निश्चितच माणसावर काळाचा एक समय असाही आला आहे, जेव्हा तो काहीच उल्लेख करण्यायोग्य नव्हता.

﴿إِنَّا خَلَقْنَا الْإِنْسَانَ مِنْ نُطْفَةٍ أَمْشَاجٍ نَبْتَلِيهِ فَجَعَلْنَاهُ سَمِيعًا بَصِيرًا﴾

२. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि त्याला ऐकणारा पाहणारा बनविले.

﴿إِنَّا هَدَيْنَاهُ السَّبِيلَ إِمَّا شَاكِرًا وَإِمَّا كَفُورًا﴾

३. आम्ही त्याला मार्ग दाखविला मग तो कृतज्ञ बनो किंवा कृतघ्न.

﴿إِنَّا أَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ سَلَاسِلَ وَأَغْلَالًا وَسَعِيرًا﴾

४. निःसंशय, आम्ही काफिर (इन्कारी) लोकांकरिता शृंखला आणि जोखंड व धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.

﴿إِنَّ الْأَبْرَارَ يَشْرَبُونَ مِنْ كَأْسٍ كَانَ مِزَاجُهَا كَافُورًا﴾

५. निःसंशय, नेक (सदाचारी) लोक त्या प्याल्याने पितील, ज्यात कापूराचे मिश्रण आहे.

﴿عَيْنًا يَشْرَبُ بِهَا عِبَادُ اللَّهِ يُفَجِّرُونَهَا تَفْجِيرًا﴾

६. जो एक झरा आहे, ज्यातून अल्लाहचे दास पितील, त्याचे प्रवाह (पाट) काढतील (जिकडे इच्छितील)

﴿يُوفُونَ بِالنَّذْرِ وَيَخَافُونَ يَوْمًا كَانَ شَرُّهُ مُسْتَطِيرًا﴾

७. जे नवस पूर्ण करतात१ आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट चारी बाजूंना पसरणार आहे.

﴿وَيُطْعِمُونَ الطَّعَامَ عَلَىٰ حُبِّهِ مِسْكِينًا وَيَتِيمًا وَأَسِيرًا﴾

८. आणि अल्लाहच्या प्रेमाखातर गरीब, अनाथ आणि कैद्यांना जेवू घालतात.

﴿إِنَّمَا نُطْعِمُكُمْ لِوَجْهِ اللَّهِ لَا نُرِيدُ مِنْكُمْ جَزَاءً وَلَا شُكُورًا﴾

९. आम्ही तर तुम्हाला केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी जेवू घालतो, तुमच्याकडून ना मोबदला इच्छितो, ना आभार.

﴿إِنَّا نَخَافُ مِنْ رَبِّنَا يَوْمًا عَبُوسًا قَمْطَرِيرًا﴾

१०. निःसंशय, आम्ही आपल्या पालनकर्त्यातर्फे त्या दिवसाचे भय राखतो जो मोठा दुःस्थितीचा आणि कठोरतापूर्ण असेल.

﴿فَوَقَاهُمُ اللَّهُ شَرَّ ذَٰلِكَ الْيَوْمِ وَلَقَّاهُمْ نَضْرَةً وَسُرُورًا﴾

११. तेव्हा अल्लाहने त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचविले. आणि त्यांना तजेलता व आनंद प्रदान केला.

﴿وَجَزَاهُمْ بِمَا صَبَرُوا جَنَّةً وَحَرِيرًا﴾

१२. आणि त्यांना त्यांच्या धीर - संयमाच्या मोबदल्यात जन्नत आणि रेशमी वस्त्र प्रदान केले.

﴿مُتَّكِئِينَ فِيهَا عَلَى الْأَرَائِكِ ۖ لَا يَرَوْنَ فِيهَا شَمْسًا وَلَا زَمْهَرِيرًا﴾

१३. ते तिथे आसनांवर तक्के लावून बसतील, त्यांना तिथे ना सूर्याची प्रखर उष्णता जाणवेल, ना सक्त थंडीची तीव्रता.

﴿وَدَانِيَةً عَلَيْهِمْ ظِلَالُهَا وَذُلِّلَتْ قُطُوفُهَا تَذْلِيلًا﴾

१४.
आणि त्यांच्या (जन्नतच्या) सावल्या त्यांच्यावर झुकलेल्या असतील आणि त्यांचे (मेवे) आणि गुच्छे खाली लोंबकळत असतील.

﴿وَيُطَافُ عَلَيْهِمْ بِآنِيَةٍ مِنْ فِضَّةٍ وَأَكْوَابٍ كَانَتْ قَوَارِيرَا﴾

१५. आणि त्यांच्या दरम्यान चांदीची भांडी आणि काचेचे प्याले ये - जा करतील.

﴿قَوَارِيرَ مِنْ فِضَّةٍ قَدَّرُوهَا تَقْدِيرًا﴾

१६. काचही चांदीची असेल, ज्यांना (पिणाऱ्यांनी) अनुमानाने मापून ठेवले असेल.

﴿وَيُسْقَوْنَ فِيهَا كَأْسًا كَانَ مِزَاجُهَا زَنْجَبِيلًا﴾

१७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल.

﴿عَيْنًا فِيهَا تُسَمَّىٰ سَلْسَبِيلًا﴾

१८. जन्नतच्या एका प्रवाहातून ज्याचे नाव सलसबील आहे.

﴿۞ وَيَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُخَلَّدُونَ إِذَا رَأَيْتَهُمْ حَسِبْتَهُمْ لُؤْلُؤًا مَنْثُورًا﴾

१९. आणि त्यांच्या चोहीकडे ती अल्पवयीन बालके हिंडत-फिरत असतील. जे नेहमी (बालक) राहणारे आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तर कल्पना कराल की ते (जणू) विखुरलेले (अस्सल) मोती आहेत.

﴿وَإِذَا رَأَيْتَ ثَمَّ رَأَيْتَ نَعِيمًا وَمُلْكًا كَبِيرًا﴾

२०. आणि तुम्ही तिथे, जिकडे पाहाल तिकडे पूर्ण ईशदेणग्या आणि महान राज्यसत्ता दिसून येईल.

﴿عَالِيَهُمْ ثِيَابُ سُنْدُسٍ خُضْرٌ وَإِسْتَبْرَقٌ ۖ وَحُلُّوا أَسَاوِرَ مِنْ فِضَّةٍ وَسَقَاهُمْ رَبُّهُمْ شَرَابًا طَهُورًا﴾

२१. त्यांच्या (शरीरा) वर हिरवे मौल्यवान आणि जाड रेशमी वस्त्रे असतील.
आणि त्यांना चांदीच्या कांकणाचा दागिना घातला जाईल आणि त्यांना त्यांचा पालनकर्ता स्वच्छ शुद्ध (पाक) मद्य पाजेल.

﴿إِنَّ هَٰذَا كَانَ لَكُمْ جَزَاءً وَكَانَ سَعْيُكُمْ مَشْكُورًا﴾

२२. (फर्माविले जाईल) हा आहे तुमच्या कर्मांचा मोबदला आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली.

﴿إِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا عَلَيْكَ الْقُرْآنَ تَنْزِيلًا﴾

२३. निःसंशय, आम्ही तुमच्यावर कुरआन हळू हळू (क्रमाक्रमाने) अवतरित केले.

﴿فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تُطِعْ مِنْهُمْ آثِمًا أَوْ كَفُورًا﴾

२४.
तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका.

﴿وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ بُكْرَةً وَأَصِيلًا﴾

२५. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करा.

﴿وَمِنَ اللَّيْلِ فَاسْجُدْ لَهُ وَسَبِّحْهُ لَيْلًا طَوِيلًا﴾

२६.
आणि रात्रीच्या वेळी त्याच्या समोर सजदे करा आणि रात्रीच्या दीर्घ भागापर्यर्ंत त्याचे पावित्र्यासह गुणगान करा.

﴿إِنَّ هَٰؤُلَاءِ يُحِبُّونَ الْعَاجِلَةَ وَيَذَرُونَ وَرَاءَهُمْ يَوْمًا ثَقِيلًا﴾

२७.
निःसंशय, हे लोक लवकर प्राप्त होणाऱ्या जगाची इच्छा धरतात, आणि आपल्या मागे एक मोठ्या भारदस्त दिवसाला सोडून देतात.

﴿نَحْنُ خَلَقْنَاهُمْ وَشَدَدْنَا أَسْرَهُمْ ۖ وَإِذَا شِئْنَا بَدَّلْنَا أَمْثَالَهُمْ تَبْدِيلًا﴾

२८.
आम्ही त्यांना निर्माण केले आणि आम्हीच त्यांचे जोड (सांधे) मजबूत केले आणि आम्ही वाटेल तेव्हा त्यांच्या बदल्यात त्यांच्यासारखे दुसऱ्यांना बदलून आणू.

﴿إِنَّ هَٰذِهِ تَذْكِرَةٌ ۖ فَمَنْ شَاءَ اتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِ سَبِيلًا﴾

२९. निःसंशय, हा तर एक उपदेश आहे. तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग प्राप्त करावा.

﴿وَمَا تَشَاءُونَ إِلَّا أَنْ يَشَاءَ اللَّهُ ۚ إِنَّ اللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمًا﴾

३०. आणि तुम्ही इच्छा न कराल परंतु हे की अल्लाहच इच्छिल. निःसंशय, अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे.

﴿يُدْخِلُ مَنْ يَشَاءُ فِي رَحْمَتِهِ ۚ وَالظَّالِمِينَ أَعَدَّ لَهُمْ عَذَابًا أَلِيمًا﴾

३१.
ज्याला इच्छिल, आपल्या कृपेत सामील करून घेईल आणि अपराधी (अत्याचारीं) करिता त्याने दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: