الجن

تفسير سورة الجن

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ قُلْ أُوحِيَ إِلَيَّ أَنَّهُ اسْتَمَعَ نَفَرٌ مِنَ الْجِنِّ فَقَالُوا إِنَّا سَمِعْنَا قُرْآنًا عَجَبًا﴾

१. (हे मुहम्मद स.
) तुम्ही सांगा की मला वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जिन्नांच्या एका समूहाने (कुरआन) ऐकले आणि म्हटले की आम्ही मोठे आश्चर्यकारक कुरआन ऐकले आहे.

﴿يَهْدِي إِلَى الرُّشْدِ فَآمَنَّا بِهِ ۖ وَلَنْ نُشْرِكَ بِرَبِّنَا أَحَدًا﴾

२.
जो सत्य मार्ग दाखवितो आम्ही तर त्यावर ईमान राखले, (आता) आम्ही कधीही आपल्या पालनकर्त्याचा दुसऱ्या एखाद्याला सहभागी बनविणार नाही.

﴿وَأَنَّهُ تَعَالَىٰ جَدُّ رَبِّنَا مَا اتَّخَذَ صَاحِبَةً وَلَا وَلَدًا﴾

३.
आणि निःसंशय, आमच्या पालनकर्त्याची शान (महानता) अति उच्च आहे, त्याने ना कोणाला (आपली) पत्नी बनविले आहे आणि ना संतती.

﴿وَأَنَّهُ كَانَ يَقُولُ سَفِيهُنَا عَلَى اللَّهِ شَطَطًا﴾

४. आणि निःसंशय, आमच्यातला मूर्ख, अल्लाहविषयी खोट्या गोष्टी बोलत होता.

﴿وَأَنَّا ظَنَنَّا أَنْ لَنْ تَقُولَ الْإِنْسُ وَالْجِنُّ عَلَى اللَّهِ كَذِبًا﴾

५. आणि आम्ही तर हेच समजत राहिलो की मनुष्य आणि जिन्न अल्लाहविषयी कधीही खोटे बोलणार नाहीत.

﴿وَأَنَّهُ كَانَ رِجَالٌ مِنَ الْإِنْسِ يَعُوذُونَ بِرِجَالٍ مِنَ الْجِنِّ فَزَادُوهُمْ رَهَقًا﴾

६. वस्तुतः काही माणसे, काही जिन्नांकडे शरण मागत होते, ज्यामुळे जिन्नांच्या उदंडतेत अधिकच भर पडली.

﴿وَأَنَّهُمْ ظَنُّوا كَمَا ظَنَنْتُمْ أَنْ لَنْ يَبْعَثَ اللَّهُ أَحَدًا﴾

७.
आणि (मानवां) नी देखील जिन्नांप्रमाणे हे गृहीत धरले होते की अल्लाह कधीही कोणाला पाठविणार नाही (किंवा कोणाला दुसऱ्यांदा जिवंत करणार नाही).

﴿وَأَنَّا لَمَسْنَا السَّمَاءَ فَوَجَدْنَاهَا مُلِئَتْ حَرَسًا شَدِيدًا وَشُهُبًا﴾

८.
आणि आम्ही आकाशाचे निरीक्षण करून पाहिले तेव्हा ते सक्त पहारेकऱ्यांनी आणि प्रखर अग्नि-शिखांनी (ज्वालांनी) भरलेले आढळले.

﴿وَأَنَّا كُنَّا نَقْعُدُ مِنْهَا مَقَاعِدَ لِلسَّمْعِ ۖ فَمَنْ يَسْتَمِعِ الْآنَ يَجِدْ لَهُ شِهَابًا رَصَدًا﴾

९.
आणि याच्यापूर्वी आम्ही गोष्टी (बोलणे) ऐकण्याकरिता आकाशात ठिकठिकाणी बसत असू, आता जो देखील कान लावतो, त्याला एक ज्वाला आपल्यावर टपून असल्याचे आढळते.

﴿وَأَنَّا لَا نَدْرِي أَشَرٌّ أُرِيدَ بِمَنْ فِي الْأَرْضِ أَمْ أَرَادَ بِهِمْ رَبُّهُمْ رَشَدًا﴾

१०.
आणि आम्ही नाही जाणत की धरतीवर राहणाऱ्यांशी एखाद्या वाईट गोष्टीचा इरादा केला गेला आहे की त्यांच्या पालनकर्त्याचा इरादा त्यांच्याशी भलाईचा आहे.

﴿وَأَنَّا مِنَّا الصَّالِحُونَ وَمِنَّا دُونَ ذَٰلِكَ ۖ كُنَّا طَرَائِقَ قِدَدًا﴾

११. आणि हे की (निःसंशय) आमच्यापैकी काही तर नेक सदाचारी आहेत आणि काही त्याच्या विपरीत आहेत. आम्ही अनेक प्रकारे विभागलेलो आहोत.

﴿وَأَنَّا ظَنَنَّا أَنْ لَنْ نُعْجِزَ اللَّهَ فِي الْأَرْضِ وَلَنْ نُعْجِزَهُ هَرَبًا﴾

१२.
आणि आम्हाला (आता) पूर्ण खात्री झाली की आम्ही अल्लाहला धरतीत कधीही विवश करू शकत नाही आणि ना आम्ही पळून जाऊन त्याला परास्त करू शकतो.

﴿وَأَنَّا لَمَّا سَمِعْنَا الْهُدَىٰ آمَنَّا بِهِ ۖ فَمَنْ يُؤْمِنْ بِرَبِّهِ فَلَا يَخَافُ بَخْسًا وَلَا رَهَقًا﴾

१३.
आणि आम्ही मार्गदर्शनाची गोष्ट ऐकताच तिच्यावर ईमान राखले आणि जो देखील आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखेल, त्याला ना एखाद्या हानीचे भय आहे ना अत्याचारा (व दुःखा) चे.

﴿وَأَنَّا مِنَّا الْمُسْلِمُونَ وَمِنَّا الْقَاسِطُونَ ۖ فَمَنْ أَسْلَمَ فَأُولَٰئِكَ تَحَرَّوْا رَشَدًا﴾

१४.
आणि आमच्यापैकी काही मुस्लिम आहेत तर काही अन्यायी आहे, तेव्हा जे मुस्लिम झाले, त्यांनी सन्मार्ग शोधून घेतला.

﴿وَأَمَّا الْقَاسِطُونَ فَكَانُوا لِجَهَنَّمَ حَطَبًا﴾

१५. आणि जे अत्याचारी आहेत, ते जहन्नमचे इंधन बनले.

﴿وَأَنْ لَوِ اسْتَقَامُوا عَلَى الطَّرِيقَةِ لَأَسْقَيْنَاهُمْ مَاءً غَدَقًا﴾

१६. आणि हे की जर हे लोक सरळ मार्गावर दृढपणे राहिले असते, तर अवश्य आम्ही त्यांना भरपूर पाणी पाजले असते.

﴿لِنَفْتِنَهُمْ فِيهِ ۚ وَمَنْ يُعْرِضْ عَنْ ذِكْرِ رَبِّهِ يَسْلُكْهُ عَذَابًا صَعَدًا﴾

१७.
यासाठी की आम्ही यात त्यांची परीक्षा घ्यावी आणि जो मनुष्य आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणापासून तोंड फिरविल, तर अल्लाह त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकील.

﴿وَأَنَّ الْمَسَاجِدَ لِلَّهِ فَلَا تَدْعُوا مَعَ اللَّهِ أَحَدًا﴾

१८. आणि हे की मस्जिद केवळ अल्लाहच्याचकरिता (खास) आहेत. तेव्हा अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला पुकारु नका.१

﴿وَأَنَّهُ لَمَّا قَامَ عَبْدُ اللَّهِ يَدْعُوهُ كَادُوا يَكُونُونَ عَلَيْهِ لِبَدًا﴾

१९.
आणि जेव्हा अल्लाहचा दास (उपासक) त्याच्या उपासनेसाठी उभा राहिला तेव्हा निकट होते की ते जमावाजमावाने त्याच्यावर तुटून पडावेत. १

﴿قُلْ إِنَّمَا أَدْعُو رَبِّي وَلَا أُشْرِكُ بِهِ أَحَدًا﴾

२०.
(तुम्ही) सांगा की, मी तर केवळ आपल्या पालनकर्त्यास पुकारतो आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी बनवित नाही.

﴿قُلْ إِنِّي لَا أَمْلِكُ لَكُمْ ضَرًّا وَلَا رَشَدًا﴾

२१. सांगा, मला तुमच्या बाबतीत कसल्याही लाभ-हानीचा अधिकार नाही.

﴿قُلْ إِنِّي لَنْ يُجِيرَنِي مِنَ اللَّهِ أَحَدٌ وَلَنْ أَجِدَ مِنْ دُونِهِ مُلْتَحَدًا﴾

२२.
सांगा की मला अल्लाहपासून कधीही कोणी वाचवू शकत नाही, आणि मी कधीही त्याच्याखेरीज एखादे आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही.

﴿إِلَّا بَلَاغًا مِنَ اللَّهِ وَرِسَالَاتِهِ ۚ وَمَنْ يَعْصِ اللَّهَ وَرَسُولَهُ فَإِنَّ لَهُ نَارَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا﴾

२३.
तथापि (माझे काम) तर केवळ अल्लाहची वाणी आणि त्याचा संदेश (लोकांना) पोहचविणे आहे (आता) जो देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करील तर त्याच्यासाठी जहन्नमची आग आहे, जिच्यात असे लोक सदैव राहतील.

﴿حَتَّىٰ إِذَا رَأَوْا مَا يُوعَدُونَ فَسَيَعْلَمُونَ مَنْ أَضْعَفُ نَاصِرًا وَأَقَلُّ عَدَدًا﴾

२४.
येथेपर्यंत की, जेव्हा ते तिला पाहून घेतील, जिचा त्यांना वायदा दिला जात आहे, तेव्हा निकट भविष्यात जाणून घेतील की कोणाचा सहाय्यक कमजोर आणि कोणाचा समूह (संख्येने) कमी आहे.

﴿قُلْ إِنْ أَدْرِي أَقَرِيبٌ مَا تُوعَدُونَ أَمْ يَجْعَلُ لَهُ رَبِّي أَمَدًا﴾

२५.
(तुम्ही) सांगा की मला नाही माहीत की ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की माझा पालनकर्ता त्याकरिता लांबची मुदत निर्धारित करील.

﴿عَالِمُ الْغَيْبِ فَلَا يُظْهِرُ عَلَىٰ غَيْبِهِ أَحَدًا﴾

२६. तोच परोक्ष ज्ञाता आहे आणि आपल्या परोक्ष (ज्ञाना) ने तो कोणालाही अवगत करवित नाही.

﴿إِلَّا مَنِ ارْتَضَىٰ مِنْ رَسُولٍ فَإِنَّهُ يَسْلُكُ مِنْ بَيْنِ يَدَيْهِ وَمِنْ خَلْفِهِ رَصَدًا﴾

२७.
मात्र त्या रसूल (पैगंबरा) खेरीज, ज्याला तो पसंत करील,१ यासाठी की त्याच्याही पुढे - मागे पहारेकरी (संरक्षक) तैनात करतो.

﴿لِيَعْلَمَ أَنْ قَدْ أَبْلَغُوا رِسَالَاتِ رَبِّهِمْ وَأَحَاطَ بِمَا لَدَيْهِمْ وَأَحْصَىٰ كُلَّ شَيْءٍ عَدَدًا﴾

२८. यासाठी की हे कळून घ्यावे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहचविलेत. अल्लाहने त्यांच्या निकटच्या गोष्टींना घेरून ठेवले आहे आणि प्रत्येक गोष्टीची गणना करून ठेवली आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: