القمر

تفسير سورة القمر

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ اقْتَرَبَتِ السَّاعَةُ وَانْشَقَّ الْقَمَرُ﴾

१. कयामत जवळ आली आणि चंद्र दुभंगला.

﴿وَإِنْ يَرَوْا آيَةً يُعْرِضُوا وَيَقُولُوا سِحْرٌ مُسْتَمِرٌّ﴾

२.
हे जेव्हा एखादा मोजिजा (चमत्कार) पाहतात, तेव्हा तोंड फिरवितात, आणि म्हणतात ही तर पहिल्यापासून चालत आलेली जादू आहे.

﴿وَكَذَّبُوا وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ ۚ وَكُلُّ أَمْرٍ مُسْتَقِرٌّ﴾

३. आणि त्यांनी खोटे ठरविले व आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले. आणि प्रत्येक कार्य निश्चित वेळेवरच निर्धारित आहे.

﴿وَلَقَدْ جَاءَهُمْ مِنَ الْأَنْبَاءِ مَا فِيهِ مُزْدَجَرٌ﴾

४. निःसंशय, त्याच्याजवळ त्या वार्ता येऊन पोहचल्या आहेत, ज्यात तंबी - ताकीदी (ची शिकवण) आहेत.

﴿حِكْمَةٌ بَالِغَةٌ ۖ فَمَا تُغْنِ النُّذُرُ﴾

५. आणि पूर्ण बुद्धिकौशल्याची गोष्ट आहे, परंतु या भयभीत करणाऱ्या गोष्टींनीही काही लाभ दिला नाही.

﴿فَتَوَلَّ عَنْهُمْ ۘ يَوْمَ يَدْعُ الدَّاعِ إِلَىٰ شَيْءٍ نُكُرٍ﴾

६. (तेव्हा, हे पैगंबर!) तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवा, ज्या दिवशी एक पुकारणारा अप्रिय गोष्टीकडे बोलाविल.

﴿خُشَّعًا أَبْصَارُهُمْ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ كَأَنَّهُمْ جَرَادٌ مُنْتَشِرٌ﴾

७. हे झुकलेल्या नेत्रांनी कबरीमधून अशा प्रकारे उठून उभे राहतील की जणू इतस्ततः पसरलेला टोळ थवा.

﴿مُهْطِعِينَ إِلَى الدَّاعِ ۖ يَقُولُ الْكَافِرُونَ هَٰذَا يَوْمٌ عَسِرٌ﴾

८. पुकारणाऱ्याकडे धावत जात असतील आणि काफिर म्हणतील की हा दिवस तर मोठा कठीण आहे!

﴿۞ كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ فَكَذَّبُوا عَبْدَنَا وَقَالُوا مَجْنُونٌ وَازْدُجِرَ﴾

९. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहानेही आमच्या दासाला खोटे ठरविले होते. आणि वेडा दर्शवून झिडकारले होते.

﴿فَدَعَا رَبَّهُ أَنِّي مَغْلُوبٌ فَانْتَصِرْ﴾

१०. तेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की मी तावडीत सापडलेलो आहे. तू माझी मदत कर.

﴿فَفَتَحْنَا أَبْوَابَ السَّمَاءِ بِمَاءٍ مُنْهَمِرٍ﴾

११. तेव्हा आम्ही आकाशाचे दरवाजे मुसळधार पावसाने उघडले.

﴿وَفَجَّرْنَا الْأَرْضَ عُيُونًا فَالْتَقَى الْمَاءُ عَلَىٰ أَمْرٍ قَدْ قُدِرَ﴾

१२.
आणि जमिनीतून झरे प्रवाहित केले, तेव्हा त्या कार्यासाठी जे भाग्यात लिहिले गेले होते, (दोघेही) पाणी एकत्रित झाले.

﴿وَحَمَلْنَاهُ عَلَىٰ ذَاتِ أَلْوَاحٍ وَدُسُرٍ﴾

१३. आणि आम्ही त्याला अशा नौकेत चढविले, जी तक्ते आणि मेखा असलेली होती.

﴿تَجْرِي بِأَعْيُنِنَا جَزَاءً لِمَنْ كَانَ كُفِرَ﴾

१४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता.

﴿وَلَقَدْ تَرَكْنَاهَا آيَةً فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

१५. आणि निःसंशय, आम्ही या घटनेला निशाणी बनवून बाकी राखले तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ﴾

१६. तेव्हा (सांगा) कसा होता माझा प्रकोप आणि माझी भयपूर्ण तंबी.

﴿وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

१७. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला समजण्याकरिता सोपे केले आहे१ तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿كَذَّبَتْ عَادٌ فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ﴾

१८. आदच्या जनसमूहानेही खोटे ठरविले तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझी भयपूर्ण तंबी.

﴿إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا صَرْصَرًا فِي يَوْمِ نَحْسٍ مُسْتَمِرٍّ﴾

१९. आम्ही त्यांच्यावर सतत वेगाने वाहणारी हवा (वादळी वारा) एका सततच्या अशुभ दिवशी पाठविली.

﴿تَنْزِعُ النَّاسَ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ مُنْقَعِرٍ﴾

२०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत.

﴿فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ﴾

२१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे.

﴿وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

२२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿كَذَّبَتْ ثَمُودُ بِالنُّذُرِ﴾

२३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.

﴿فَقَالُوا أَبَشَرًا مِنَّا وَاحِدًا نَتَّبِعُهُ إِنَّا إِذًا لَفِي ضَلَالٍ وَسُعُرٍ﴾

२४.
आणि म्हणाले की, काय आमच्यापैकीच एका माणसाचे आम्ही अनुसरण करू लागावे? मग तर आम्ही अवश्य वाईटपणात आणि वेडेपणात पडलेले असू.

﴿أَأُلْقِيَ الذِّكْرُ عَلَيْهِ مِنْ بَيْنِنَا بَلْ هُوَ كَذَّابٌ أَشِرٌ﴾

२५. काय आम्हा सर्वांमधून फक्त त्याच्यावरच वहयी (प्रकाशना) अवतरित केली गेली? तेव्हा तो खोटारडा, घमेंडी आहे.

﴿سَيَعْلَمُونَ غَدًا مَنِ الْكَذَّابُ الْأَشِرُ﴾

२६. आता सर्व जाणून घेतील की उद्या कोण खोटारडा व घमेंडी होता.

﴿إِنَّا مُرْسِلُو النَّاقَةِ فِتْنَةً لَهُمْ فَارْتَقِبْهُمْ وَاصْطَبِرْ﴾

२७.
निःसंशय, आम्ही त्यांच्या कसोटीकरिता सांडणी पाठवू तेव्हा (हे स्वालेह!) तुम्ही त्यांची प्रतीक्षा करा आणि धीर संयम राखा.

﴿وَنَبِّئْهُمْ أَنَّ الْمَاءَ قِسْمَةٌ بَيْنَهُمْ ۖ كُلُّ شِرْبٍ مُحْتَضَرٌ﴾

२८. आणि त्यांना खबर द्या की पाण्याची त्याच्यात वाटणी आहे. प्रत्येक आपल्या पाळीवर हजर होईल.

﴿فَنَادَوْا صَاحِبَهُمْ فَتَعَاطَىٰ فَعَقَرَ﴾

२९. तेव्हा त्यांनी आपल्या साथीदाराला बोलविले, ज्याने (सांडणीवर) हल्ला केला आणि (तिच्या) घोडनसा कापून टाकल्या.

﴿فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ﴾

३०. तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझे भयभीत करणे.

﴿إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ صَيْحَةً وَاحِدَةً فَكَانُوا كَهَشِيمِ الْمُحْتَظِرِ﴾

३१.
आम्ही त्यांच्यावर एक भयंकर चित्कार पाठविला तेव्हा ते असे झाले, जणू कुंपण बनविणाऱ्याची तुडविलेली घास (चारा).

﴿وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

३२. आणि आम्ही बोधप्राप्तीकरिता कुरआनाला सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ بِالنُّذُرِ﴾

३३. लूतच्या जनसमूहाने देखील खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.

﴿إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ حَاصِبًا إِلَّا آلَ لُوطٍ ۖ نَجَّيْنَاهُمْ بِسَحَرٍ﴾

३४. निःसंशय, आम्ही त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करणारी हवा पठविली, लूत (अलै.) यांच्या कुटुंबियांखेरीज, त्यांना प्रातःकाळी आम्ही सुरक्षा (मुक्ती) प्रदान केली.

﴿نِعْمَةً مِنْ عِنْدِنَا ۚ كَذَٰلِكَ نَجْزِي مَنْ شَكَرَ﴾

३५. आपल्या कृपेने प्रत्येक कृतज्ञशील (दासा) ला आम्ही अशा प्रकारे मोबदला देतो.

﴿وَلَقَدْ أَنْذَرَهُمْ بَطْشَتَنَا فَتَمَارَوْا بِالنُّذُرِ﴾

३६.
निःसंशय, त्या (लूत) ने त्यांना आमच्या पकडीचे भय दाखविले होते, परंतु त्यांनी भय दाखविणाऱ्यांबाबत शंका धरून वाद घातला.

﴿وَلَقَدْ رَاوَدُوهُ عَنْ ضَيْفِهِ فَطَمَسْنَا أَعْيُنَهُمْ فَذُوقُوا عَذَابِي وَنُذُرِ﴾

३७. आणि लूत (अलै.
) यांना त्यांच्या अतिथींच्या संदर्भात फूस लावू इच्छिले तेव्हा आम्ही त्यांचे डोळे आंधळे केले (आणि सांगितले), माझ्या शिक्षा - यातनेची व भयपूर्ण तंबीची गोडी चाखा.

﴿وَلَقَدْ صَبَّحَهُمْ بُكْرَةً عَذَابٌ مُسْتَقِرٌّ﴾

३८. आणि निश्चित आहे की त्यांना सकाळीच एका ठिकाणी धरणाऱ्या निर्धारित अज़ाब (ईशशिक्षे) ने नष्ट करून टाकले.

﴿فَذُوقُوا عَذَابِي وَنُذُرِ﴾

३९. तेव्हा माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबीचा स्वाद चाखा.

﴿وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

४०. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला बोध आणि उपदेशाकरिता सोपे केले आहे. तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿وَلَقَدْ جَاءَ آلَ فِرْعَوْنَ النُّذُرُ﴾

४१. आणि फिरऔनच्या लोकांजवळही खबरदार करणारे आले.

﴿كَذَّبُوا بِآيَاتِنَا كُلِّهَا فَأَخَذْنَاهُمْ أَخْذَ عَزِيزٍ مُقْتَدِرٍ﴾

४२.
त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटे ठरविले तेव्हा आम्ही त्यांना मोठ्या जबरदस्त आणि शक्तिशाली पकडणाऱ्याप्रमाणे पकडले.

﴿أَكُفَّارُكُمْ خَيْرٌ مِنْ أُولَٰئِكُمْ أَمْ لَكُمْ بَرَاءَةٌ فِي الزُّبُرِ﴾

४३.
(हे मक्काच्या लोकांनो!) काय तुमच्या समुदायातील काफिर त्या समुदायांच्या काफिरांपेक्षा श्रेष्ठ आहेत की तुमच्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुटका लिहिलेली आहे?

﴿أَمْ يَقُولُونَ نَحْنُ جَمِيعٌ مُنْتَصِرٌ﴾

४४. काय हे असे म्हणतात की आम्ही वर्चस्वशाली होणारे लोक आहोत?

﴿سَيُهْزَمُ الْجَمْعُ وَيُوَلُّونَ الدُّبُرَ﴾

४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील.

﴿بَلِ السَّاعَةُ مَوْعِدُهُمْ وَالسَّاعَةُ أَدْهَىٰ وَأَمَرُّ﴾

४६. किंबहुना कयामतची वेळ, त्यांच्या वायद्याची वेळ आहे आणि कयामत अतिशय कठीण आणि मोठी कटू बाब आहे.

﴿إِنَّ الْمُجْرِمِينَ فِي ضَلَالٍ وَسُعُرٍ﴾

४७. निःसंशय, अपराधी लोक मार्गभ्रष्टतेत आणि यातनेत आहेत.

﴿يَوْمَ يُسْحَبُونَ فِي النَّارِ عَلَىٰ وُجُوهِهِمْ ذُوقُوا مَسَّ سَقَرَ﴾

४८.
ज्या दिवशी ते तोंडघशी पाडून आगीत फरफटत नेले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) जहन्नमच्या आगीच्या स्पर्शाची गोडी चाखा.

﴿إِنَّا كُلَّ شَيْءٍ خَلَقْنَاهُ بِقَدَرٍ﴾

४९. निःसंशय, आम्ही प्रत्येक गोष्ट एका (निर्धारित) अनुमानावर निर्माण केली आहे.

﴿وَمَا أَمْرُنَا إِلَّا وَاحِدَةٌ كَلَمْحٍ بِالْبَصَرِ﴾

५०. आणि आमचा आदेश केवळ एकदा (चा एक शब्द) च असतो, जसे पापणीचे लवणे.

﴿وَلَقَدْ أَهْلَكْنَا أَشْيَاعَكُمْ فَهَلْ مِنْ مُدَّكِرٍ﴾

५१. आणि आम्ही तुमच्यासारख्या कित्येकांना नष्ट करून टाकले आहे, तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

﴿وَكُلُّ شَيْءٍ فَعَلُوهُ فِي الزُّبُرِ﴾

५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे.

﴿وَكُلُّ صَغِيرٍ وَكَبِيرٍ مُسْتَطَرٌ﴾

५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे.

﴿إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَنَهَرٍ﴾

५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील.

﴿فِي مَقْعَدِ صِدْقٍ عِنْدَ مَلِيكٍ مُقْتَدِرٍ﴾

५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ.

الترجمات والتفاسير لهذه السورة: