الترجمة الماراتية
ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ ص ۚ وَالْقُرْآنِ ذِي الذِّكْرِ﴾
१. साद, या बोध उपदेशपूर्ण कुरआनाची शपथ.
﴿بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي عِزَّةٍ وَشِقَاقٍ﴾
२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१
﴿كَمْ أَهْلَكْنَا مِنْ قَبْلِهِمْ مِنْ قَرْنٍ فَنَادَوْا وَلَاتَ حِينَ مَنَاصٍ﴾
३.
आम्ही याच्यापूर्वीही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले, त्यांनी प्रत्येक प्रकारे आरडाओरड केली, परंतु ती वेळ सुटकेची नव्हती.
﴿وَعَجِبُوا أَنْ جَاءَهُمْ مُنْذِرٌ مِنْهُمْ ۖ وَقَالَ الْكَافِرُونَ هَٰذَا سَاحِرٌ كَذَّابٌ﴾
४.
आणि काफिर लोकांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकीच एक खबरदार करणारा आला आणि म्हणू लागले की हा जादूगार आणि खोटारडा आहे.
﴿أَجَعَلَ الْآلِهَةَ إِلَٰهًا وَاحِدًا ۖ إِنَّ هَٰذَا لَشَيْءٌ عُجَابٌ﴾
५. काय याने एवढ्या साऱ्या आराध्य दैवतांना एकच दैवत (माबूद) बनवून टाकले, खरोखर ही मोठा विचित्र गोष्ट आहे!
﴿وَانْطَلَقَ الْمَلَأُ مِنْهُمْ أَنِ امْشُوا وَاصْبِرُوا عَلَىٰ آلِهَتِكُمْ ۖ إِنَّ هَٰذَا لَشَيْءٌ يُرَادُ﴾
६. त्यांचे सरदार (प्रमुख) असे बोलत निघून जाऊ लागले, जा, आपल्या दैवतांवर मजबूत (अटळ) राहा. निःसंशय, या गोष्टीत काहीतरी उद्दिष्ट (स्वार्थ) आहे.
﴿مَا سَمِعْنَا بِهَٰذَا فِي الْمِلَّةِ الْآخِرَةِ إِنْ هَٰذَا إِلَّا اخْتِلَاقٌ﴾
७. आम्ही तर ही गोष्ट प्राचीन धर्मांमध्येही ऐकली नाही काही नाही, ही केवळ मनाने रचलेली गोष्टी आहे.
﴿أَأُنْزِلَ عَلَيْهِ الذِّكْرُ مِنْ بَيْنِنَا ۚ بَلْ هُمْ فِي شَكٍّ مِنْ ذِكْرِي ۖ بَلْ لَمَّا يَذُوقُوا عَذَابِ﴾
८.
काय आम्ही सर्वांपैकी त्याच्यावरच (अल्लाहची) वहयी अवतरित केली गेली? वस्तुतः हे लोक माझ्या वहयी (प्रकाशना) बाबत संशयग्रस्त आहेत,१ किंबहुना (खरेतर) त्यांनी माझ्या शिक्षा यातनेची गोडी अद्याप चाखलीच नाही.
﴿أَمْ عِنْدَهُمْ خَزَائِنُ رَحْمَةِ رَبِّكَ الْعَزِيزِ الْوَهَّابِ﴾
९. काय त्यांच्याजवळ, तुमच्या वर्चस्वशाली, भरपूर प्रदान करणाऱ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजीने आहेत?
﴿أَمْ لَهُمْ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ۖ فَلْيَرْتَقُوا فِي الْأَسْبَابِ﴾
१०.
किंवा आकाश आणि धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या प्रत्येक गोष्टीचे राज्य त्यांचेच आहे, असे आहे तर दोऱ्या ताणून (आकाशात) चढून जावे.
﴿جُنْدٌ مَا هُنَالِكَ مَهْزُومٌ مِنَ الْأَحْزَابِ﴾
११. हेदेखील (विशाल) सैन्यांपैकी पराभूत (लहानसे) सैन्य आहे.
﴿كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَعَادٌ وَفِرْعَوْنُ ذُو الْأَوْتَادِ﴾
१२. त्यांच्या पूर्वीही नूहचा जनसमूह आणि आदचा जनसमूह आणि खिळे (मेखां) वाल्या फिरऔनने खोटे ठरविले होते.
﴿وَثَمُودُ وَقَوْمُ لُوطٍ وَأَصْحَابُ الْأَيْكَةِ ۚ أُولَٰئِكَ الْأَحْزَابُ﴾
१३. आणि समूद व लूत जनसमूहाने आणि वनात राहणाऱ्यांनीही, हीच विशाल सैन्ये होती.
﴿إِنْ كُلٌّ إِلَّا كَذَّبَ الرُّسُلَ فَحَقَّ عِقَابِ﴾
१४.
यांच्यापैकी एक देखील असा नव्हता, ज्याने पैगंबरांना खोटे ठरविले नसेल, तेव्हा माझा अज़ाब त्यांच्यावर लागू झाला.
﴿وَمَا يَنْظُرُ هَٰؤُلَاءِ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً مَا لَهَا مِنْ فَوَاقٍ﴾
१५. आणि त्यांना केवळ एका तीव्र (भयंकर) चित्काराची प्रतीक्षा आहे, ज्यात कसलाही अडथळा (आणि विलंब) नाही.
﴿وَقَالُوا رَبَّنَا عَجِّلْ لَنَا قِطَّنَا قَبْلَ يَوْمِ الْحِسَابِ﴾
१६. आणि (ते) म्हणाले की हे आमच्या पालनकर्त्या! आमचा वाटा तू आम्हाला हिशोबाच्या दिवसापूर्वीच प्रदान कर.
﴿اصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَاذْكُرْ عَبْدَنَا دَاوُودَ ذَا الْأَيْدِ ۖ إِنَّهُ أَوَّابٌ﴾
१७.
तुम्ही त्यांच्या बोलण्यावर सहनशीलता राखा आणि आमचे दास दाऊदचे स्मरण करा जो मोठा शक्तिशाली होता, निःसंशय, तो (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा होता.
﴿إِنَّا سَخَّرْنَا الْجِبَالَ مَعَهُ يُسَبِّحْنَ بِالْعَشِيِّ وَالْإِشْرَاقِ﴾
१८.
आम्ही पर्वतांना त्यांच्या अधीन केले (ताब्यात दिले) होते की त्याच्यासोबत सकाळ संध्याकाळ अल्लाहच्या पवित्रतेचा जाप (तस्बीह) करावा.
﴿وَالطَّيْرَ مَحْشُورَةً ۖ كُلٌّ لَهُ أَوَّابٌ﴾
१९. आणि (उडणाऱ्या) पक्षांनाही एकत्र होऊन सर्वच्या सर्व त्याच्या अधीन होते.
﴿وَشَدَدْنَا مُلْكَهُ وَآتَيْنَاهُ الْحِكْمَةَ وَفَصْلَ الْخِطَابِ﴾
२०.
आम्ही त्याचे राज्य मजबूत केले होते आणि त्याला हिकमत (बुद्धिकौशल्य) प्रदान केले होते आणि गोष्टीचा फैसला (सुचविला होता.)
﴿۞ وَهَلْ أَتَاكَ نَبَأُ الْخَصْمِ إِذْ تَسَوَّرُوا الْمِحْرَابَ﴾
२१.
आणि काय तुम्हाला भांडण करणाऱ्यांची खबर पोहोचली, जेव्हा ते भिंत ओलांडून मेहराबमध्ये (उपासनेच्या ठिकाणी) आले.
﴿إِذْ دَخَلُوا عَلَىٰ دَاوُودَ فَفَزِعَ مِنْهُمْ ۖ قَالُوا لَا تَخَفْ ۖ خَصْمَانِ بَغَىٰ بَعْضُنَا عَلَىٰ بَعْضٍ فَاحْكُمْ بَيْنَنَا بِالْحَقِّ وَلَا تُشْطِطْ وَاهْدِنَا إِلَىٰ سَوَاءِ الصِّرَاطِ﴾
२२. जेव्हा ते दाऊदजवळ पोहोचले, तेव्हा ते यांना पाहून घाबरले. ते म्हणाले, भिऊ नका, आमचा आपसातील तंटा आहे.
आमच्यापैकी एकाने दुसऱ्यावर अत्याचार केला आहे, तेव्हा तुम्ही आमच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसला करावा आणि अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा.
﴿إِنَّ هَٰذَا أَخِي لَهُ تِسْعٌ وَتِسْعُونَ نَعْجَةً وَلِيَ نَعْجَةٌ وَاحِدَةٌ فَقَالَ أَكْفِلْنِيهَا وَعَزَّنِي فِي الْخِطَابِ﴾
२३. (ऐका!) हा माझा भाऊ आहे. याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत. आणि माझ्याजवळ एकच आहे. परंतु हा मला म्हणतो की तुझी ती एक देखील मला देऊन टाक आणि माझ्यावर बोलण्यात मोठा सक्त मामला (व्यवहार) करतो.
﴿قَالَ لَقَدْ ظَلَمَكَ بِسُؤَالِ نَعْجَتِكَ إِلَىٰ نِعَاجِهِ ۖ وَإِنَّ كَثِيرًا مِنَ الْخُلَطَاءِ لَيَبْغِي بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَقَلِيلٌ مَا هُمْ ۗ وَظَنَّ دَاوُودُ أَنَّمَا فَتَنَّاهُ فَاسْتَغْفَرَ رَبَّهُ وَخَرَّ رَاكِعًا وَأَنَابَ ۩﴾
२४.
(दाऊद) म्हणाले, त्याचे आपल्या मेंढ्यांसोबत तुझी एक मेंढी सामील करून घेण्याचा प्रश्न निश्चितच तुझ्यावर अत्याचार आहे.
आणि अधिकांश भागीदार आणि सहभागी (असेच असतात की) एकमेकांवर जुलूम अत्याचार आणि अन्याय करतात, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले, तथापि असे लोक फारच कमी आहेत आणि दाऊद (अलै.
) यांनी जाणुन घेतले की आम्ही त्यांची परीक्षा घेतली आहे, मग तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) जवळ तौबा (क्षमा याचना) करू लागले आणि मोठ्या विनम्रतेने खाली पडले (सजद्यात गेले) आणि (पूर्णपणे) रुजू झाले.
﴿فَغَفَرْنَا لَهُ ذَٰلِكَ ۖ وَإِنَّ لَهُ عِنْدَنَا لَزُلْفَىٰ وَحُسْنَ مَآبٍ﴾
२५. तेव्हा आम्ही देखील त्यांची ही (चूक) माफ केली. निःसंशय, ते आमच्याजवळ मोठे उच्च स्थान राखणारे आणि सर्वांत चांगले ठिकाण बाळगणारे आहेत.
﴿يَا دَاوُودُ إِنَّا جَعَلْنَاكَ خَلِيفَةً فِي الْأَرْضِ فَاحْكُمْ بَيْنَ النَّاسِ بِالْحَقِّ وَلَا تَتَّبِعِ الْهَوَىٰ فَيُضِلَّكَ عَنْ سَبِيلِ اللَّهِ ۚ إِنَّ الَّذِينَ يَضِلُّونَ عَنْ سَبِيلِ اللَّهِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ بِمَا نَسُوا يَوْمَ الْحِسَابِ﴾
२६.
हे दाऊद! आम्ही तुम्हाला धरतीवर खलीफा बनविले, तेव्हा तुम्ही लोकांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका, अन्यथा ती तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटविल. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात, त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. अशासाठी की त्यांनी हिशोबाच्या दिवसाचा विसर पाडला आहे.
﴿وَمَا خَلَقْنَا السَّمَاءَ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا بَاطِلًا ۚ ذَٰلِكَ ظَنُّ الَّذِينَ كَفَرُوا ۚ فَوَيْلٌ لِلَّذِينَ كَفَرُوا مِنَ النَّارِ﴾
२७.
आणि आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना (अस्तित्वांना) व्यर्थ (आणि अकारण) निर्माण नाही केले. ही शंका तर काफिर (इन्कारी) लोकांची आहे, तेव्हा काफिरांकरिता आगीचा विनाश आहे.
﴿أَمْ نَجْعَلُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ كَالْمُفْسِدِينَ فِي الْأَرْضِ أَمْ نَجْعَلُ الْمُتَّقِينَ كَالْفُجَّارِ﴾
२८.
काय आम्ही त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केली त्या लोकांसमान ठरवू जे (रोज) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित राहिले, किंवा नेक सदाचारी लोकांना दुराचाऱ्यांसारखं बनवू?
﴿كِتَابٌ أَنْزَلْنَاهُ إِلَيْكَ مُبَارَكٌ لِيَدَّبَّرُوا آيَاتِهِ وَلِيَتَذَكَّرَ أُولُو الْأَلْبَابِ﴾
२९.
हा मोठा शुभग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्याकडे अशासाठी अवतरित केला आहे की लोकांनी याच्या आयतींवर विचार चिंतन करावे आणि बुद्धी राखणाऱ्यांनी यापासून बोध ग्रहण करावा.
﴿وَوَهَبْنَا لِدَاوُودَ سُلَيْمَانَ ۚ نِعْمَ الْعَبْدُ ۖ إِنَّهُ أَوَّابٌ﴾
३०. आणि आम्ही दाऊदला सुलैमान (नावाचा पुत्र) प्रदान केला. जो मोठा उत्तम दास होता आणि (अल्लाहकडे) खूप रुजू करणारा होता.
﴿إِذْ عُرِضَ عَلَيْهِ بِالْعَشِيِّ الصَّافِنَاتُ الْجِيَادُ﴾
३१. जेव्हा त्यांच्यासमोर संध्याकाळी वेगात चालणारे खास घोडे सादर केले गेले.
﴿فَقَالَ إِنِّي أَحْبَبْتُ حُبَّ الْخَيْرِ عَنْ ذِكْرِ رَبِّي حَتَّىٰ تَوَارَتْ بِالْحِجَابِ﴾
३२.
तेव्हा म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या स्मरणावर या घोड्याच्या प्रेमाला प्राधान्य दिले, येथेपर्यंत की सूर्य बुडाला.
﴿رُدُّوهَا عَلَيَّ ۖ فَطَفِقَ مَسْحًا بِالسُّوقِ وَالْأَعْنَاقِ﴾
३३. या घोड्यांना पुन्हा माझ्यासमोर आणा, मग पोटऱ्यांवर आणि मानांवर हात फिरवू लागले.
﴿وَلَقَدْ فَتَنَّا سُلَيْمَانَ وَأَلْقَيْنَا عَلَىٰ كُرْسِيِّهِ جَسَدًا ثُمَّ أَنَابَ﴾
३४.
आणि आम्ही सुलेमानची कसोटी घेतली आणि त्यांच्या सिंहासनावर एक धड (मृत शरीर) टाकून दिले, मग ते ध्यानमग्न झाले.
﴿قَالَ رَبِّ اغْفِرْ لِي وَهَبْ لِي مُلْكًا لَا يَنْبَغِي لِأَحَدٍ مِنْ بَعْدِي ۖ إِنَّكَ أَنْتَ الْوَهَّابُ﴾
३५.
म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या मला क्षमा कर आणि मला असे राज्य प्रदान कर, जे माझ्याखेरीज कोणत्याही (माणसास) पात्र नसावे. तू फार मोठा दाता आहेस.
﴿فَسَخَّرْنَا لَهُ الرِّيحَ تَجْرِي بِأَمْرِهِ رُخَاءً حَيْثُ أَصَابَ﴾
३६. तेव्हा आम्ही हवेला त्यांच्या अधीन केले. ती त्यांच्या आदेशानं, जिकडे ते इच्छित, नरमीने पोहचवू देत असे.
﴿وَالشَّيَاطِينَ كُلَّ بَنَّاءٍ وَغَوَّاصٍ﴾
३७.
आणि (शक्तिशाली) जिन्नांना देखील, त्यांच्या अधीन (ताबे) केले होते आणि प्रत्येक घर बनविणाऱ्याला आणि पाणबुड्याला.
﴿وَآخَرِينَ مُقَرَّنِينَ فِي الْأَصْفَادِ﴾
३८. आणि इतर (जिन्नांना) देखील, जे शृंखलांनी जखडलेले राहत.
﴿هَٰذَا عَطَاؤُنَا فَامْنُنْ أَوْ أَمْسِكْ بِغَيْرِ حِسَابٍ﴾
३९. हा आहे आमचा अनुग्रह, आता तुम्ही उपकार करा किंवा रोखून ठेवा, काही हिशोब नाही.
﴿وَإِنَّ لَهُ عِنْدَنَا لَزُلْفَىٰ وَحُسْنَ مَآبٍ﴾
४०. आणि त्यांच्यासाठी आमच्याजवळ मोठी निकटता आहे, आणि फार चांगले ठिकाण आहैे.
﴿وَاذْكُرْ عَبْدَنَا أَيُّوبَ إِذْ نَادَىٰ رَبَّهُ أَنِّي مَسَّنِيَ الشَّيْطَانُ بِنُصْبٍ وَعَذَابٍ﴾
४१.
आणि आमचे दास अय्यूबचीही चर्चा करा, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला सैतानाने दुःख - यातना पोहचविली आहे.
﴿ارْكُضْ بِرِجْلِكَ ۖ هَٰذَا مُغْتَسَلٌ بَارِدٌ وَشَرَابٌ﴾
४२. आपला पाय जमिनीवर मारा. हे आंघोळीचे थंड आणि पिण्याचे पाणी आहे.
﴿وَوَهَبْنَا لَهُ أَهْلَهُ وَمِثْلَهُمْ مَعَهُمْ رَحْمَةً مِنَّا وَذِكْرَىٰ لِأُولِي الْأَلْبَابِ﴾
४३.
आणि आम्ही त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब प्रदान केले, किंबहुना तेवढेच आणखीही त्यासोबत आपल्या खास कृपेने, आणि बुद्धिमानांकरिता बोधप्राप्तीसाठी.
﴿وَخُذْ بِيَدِكَ ضِغْثًا فَاضْرِبْ بِهِ وَلَا تَحْنَثْ ۗ إِنَّا وَجَدْنَاهُ صَابِرًا ۚ نِعْمَ الْعَبْدُ ۖ إِنَّهُ أَوَّابٌ﴾
४४. आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.१ खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा.
﴿وَاذْكُرْ عِبَادَنَا إِبْرَاهِيمَ وَإِسْحَاقَ وَيَعْقُوبَ أُولِي الْأَيْدِي وَالْأَبْصَارِ﴾
४५. आणि आमचे दास इब्राहीम, इसहाक आणि याकूब यांचीही (लोकांमध्ये) चर्चा करा जे हात आणि डोळे राखणारे होते.
﴿إِنَّا أَخْلَصْنَاهُمْ بِخَالِصَةٍ ذِكْرَى الدَّارِ﴾
४६. आम्ही त्यांना एक विशेष गोष्ट अर्थात आखिरतच्या स्मरणासोबत खासरित्या संबंधित करून घेतले होते.
﴿وَإِنَّهُمْ عِنْدَنَا لَمِنَ الْمُصْطَفَيْنَ الْأَخْيَارِ﴾
४७. आणि हे सर्व आमच्याजवळ निवडक आणि सर्वाधिक चांगल्या लोकांपैकी होते.
﴿وَاذْكُرْ إِسْمَاعِيلَ وَالْيَسَعَ وَذَا الْكِفْلِ ۖ وَكُلٌّ مِنَ الْأَخْيَارِ﴾
४८. आणि इस्माईल, यसअ आणि जुलकिफ्ल यांचेही वर्णन करा. हे सर्व नेक लोक होते.
﴿هَٰذَا ذِكْرٌ ۚ وَإِنَّ لِلْمُتَّقِينَ لَحُسْنَ مَآبٍ﴾
४९. हा उपदेश आहे आणि विश्वास करा की नेक सदाचारी लोकांसाठी सर्वांत उत्तम स्थान आहे.
﴿جَنَّاتِ عَدْنٍ مُفَتَّحَةً لَهُمُ الْأَبْوَابُ﴾
५०. अर्थात सदैव काळ राहणारी जन्नत, ज्यांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत.
﴿مُتَّكِئِينَ فِيهَا يَدْعُونَ فِيهَا بِفَاكِهَةٍ كَثِيرَةٍ وَشَرَابٍ﴾
५१. ज्यांच्यात ते (मोठ्या चैनीने) तक्के लावून बसले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे मेवे (फळे) आणि अनेक प्रकारची पेये मागत असतील.
﴿۞ وَعِنْدَهُمْ قَاصِرَاتُ الطَّرْفِ أَتْرَابٌ﴾
५२. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या समवयस्क हूर (पऱ्या) असतील.
﴿هَٰذَا مَا تُوعَدُونَ لِيَوْمِ الْحِسَابِ﴾
५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता.
﴿إِنَّ هَٰذَا لَرِزْقُنَا مَا لَهُ مِنْ نَفَادٍ﴾
५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही.
﴿هَٰذَا ۚ وَإِنَّ لِلطَّاغِينَ لَشَرَّ مَآبٍ﴾
५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे.
﴿جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا فَبِئْسَ الْمِهَادُ﴾
५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे.
﴿هَٰذَا فَلْيَذُوقُوهُ حَمِيمٌ وَغَسَّاقٌ﴾
५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू.
﴿وَآخَرُ مِنْ شَكْلِهِ أَزْوَاجٌ﴾
५८. आणि काही इतर प्रकारच्या शिक्षा.
﴿هَٰذَا فَوْجٌ مُقْتَحِمٌ مَعَكُمْ ۖ لَا مَرْحَبًا بِهِمْ ۚ إِنَّهُمْ صَالُو النَّارِ﴾
५९. हा एक समुदाय आहे, जो तुमच्यासोबत (आगीत) जाणार आहे. त्यांच्यासाठी कसलीही स्वागत नाही. हेच जहन्नममध्ये जाणार आहेत.
﴿قَالُوا بَلْ أَنْتُمْ لَا مَرْحَبًا بِكُمْ ۖ أَنْتُمْ قَدَّمْتُمُوهُ لَنَا ۖ فَبِئْسَ الْقَرَارُ﴾
६०. (ते) म्हणतील की, किंबहुना तुम्हीच ते आहात ज्यांच्यासाठी कसलेही स्वागत नाही. तुम्हीच तर यास आधीपासूनच आमच्यासमोर आणून ठेवले होते. तेव्हा राहण्याचे मोठे वाईट स्थान आहे.
﴿قَالُوا رَبَّنَا مَنْ قَدَّمَ لَنَا هَٰذَا فَزِدْهُ عَذَابًا ضِعْفًا فِي النَّارِ﴾
६१.
(ते) म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! ज्याने ती (कुप्रची प्रथा) आमच्यासाठी सर्वांत प्रथम सुरू केली असेल, त्याच्यासाठी जहन्नमची शिक्षा दुप्पट कर.
﴿وَقَالُوا مَا لَنَا لَا نَرَىٰ رِجَالًا كُنَّا نَعُدُّهُمْ مِنَ الْأَشْرَارِ﴾
६२.
आणि (जहन्नमवासी) म्हणतील की, हे काय! आम्हाला ते लोक दिसून येत नाहीत, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो.
﴿أَتَّخَذْنَاهُمْ سِخْرِيًّا أَمْ زَاغَتْ عَنْهُمُ الْأَبْصَارُ﴾
६३. काय आम्हीच त्यांना थट्टा-मस्करी बनवून ठेवले होते की आमचे डोळे त्यांच्यापासून बहकून गेले आहेत.
﴿إِنَّ ذَٰلِكَ لَحَقٌّ تَخَاصُمُ أَهْلِ النَّارِ﴾
६४. निःसंशय, जहन्नमवाल्यांचे हे भांडण अवश्य होईल.
﴿قُلْ إِنَّمَا أَنَا مُنْذِرٌ ۖ وَمَا مِنْ إِلَٰهٍ إِلَّا اللَّهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ﴾
६५. सांगा की मी तर केवळ एक खबरदार करणारा आहे आणि एकमेव जबरदस्त अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही.
﴿رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا الْعَزِيزُ الْغَفَّارُ﴾
६६.
जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे.
﴿قُلْ هُوَ نَبَأٌ عَظِيمٌ﴾
६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे.
﴿أَنْتُمْ عَنْهُ مُعْرِضُونَ﴾
६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात.
﴿مَا كَانَ لِيَ مِنْ عِلْمٍ بِالْمَلَإِ الْأَعْلَىٰ إِذْ يَخْتَصِمُونَ﴾
६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते.
﴿إِنْ يُوحَىٰ إِلَيَّ إِلَّا أَنَّمَا أَنَا نَذِيرٌ مُبِينٌ﴾
७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे.
﴿إِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَائِكَةِ إِنِّي خَالِقٌ بَشَرًا مِنْ طِينٍ﴾
७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे.
﴿فَإِذَا سَوَّيْتُهُ وَنَفَخْتُ فِيهِ مِنْ رُوحِي فَقَعُوا لَهُ سَاجِدِينَ﴾
७२.
तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका)
﴿فَسَجَدَ الْمَلَائِكَةُ كُلُّهُمْ أَجْمَعُونَ﴾
७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.
﴿إِلَّا إِبْلِيسَ اسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ الْكَافِرِينَ﴾
७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता.
﴿قَالَ يَا إِبْلِيسُ مَا مَنَعَكَ أَنْ تَسْجُدَ لِمَا خَلَقْتُ بِيَدَيَّ ۖ أَسْتَكْبَرْتَ أَمْ كُنْتَ مِنَ الْعَالِينَ﴾
७५.
(अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस?
﴿قَالَ أَنَا خَيْرٌ مِنْهُ ۖ خَلَقْتَنِي مِنْ نَارٍ وَخَلَقْتَهُ مِنْ طِينٍ﴾
७६.
(त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले.
﴿قَالَ فَاخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ﴾
७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला.
﴿وَإِنَّ عَلَيْكَ لَعْنَتِي إِلَىٰ يَوْمِ الدِّينِ﴾
७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे.
﴿قَالَ رَبِّ فَأَنْظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ﴾
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील.
﴿قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنْظَرِينَ﴾
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस.
﴿إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ﴾
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत .
﴿قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ﴾
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन.
﴿إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ﴾
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील.
﴿قَالَ فَالْحَقُّ وَالْحَقَّ أَقُولُ﴾
८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.
﴿لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنْكَ وَمِمَّنْ تَبِعَكَ مِنْهُمْ أَجْمَعِينَ﴾
८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन.
﴿قُلْ مَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ وَمَا أَنَا مِنَ الْمُتَكَلِّفِينَ﴾
८६. सांगा की मी याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही आणि आणि मी बनावट करणाऱ्यांपैकी नाही.
﴿إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِلْعَالَمِينَ﴾
८७. हा तर सर्व जगवाल्यांकरिता परिपूर्ण उपदेश आणि स्मरण आहे.
﴿وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُ بَعْدَ حِينٍ﴾
८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल.
الترجمات والتفاسير لهذه السورة:
- سورة ص : الترجمة الأمهرية አማርኛ - الأمهرية
- سورة ص : اللغة العربية - المختصر في تفسير القرآن الكريم العربية - العربية
- سورة ص : اللغة العربية - التفسير الميسر العربية - العربية
- سورة ص : اللغة العربية - معاني الكلمات العربية - العربية
- سورة ص : الترجمة الأسامية অসমীয়া - الأسامية
- سورة ص : الترجمة الأذرية Azərbaycanca / آذربايجان - الأذرية
- سورة ص : الترجمة البنغالية বাংলা - البنغالية
- سورة ص : الترجمة البوسنية للمختصر في تفسير القرآن الكريم Bosanski - البوسنية
- سورة ص : الترجمة البوسنية - كوركت Bosanski - البوسنية
- سورة ص : الترجمة البوسنية - ميهانوفيتش Bosanski - البوسنية
- سورة ص : الترجمة الألمانية - بوبنهايم Deutsch - الألمانية
- سورة ص : الترجمة الألمانية - أبو رضا Deutsch - الألمانية
- سورة ص : الترجمة الإنجليزية - صحيح انترناشونال English - الإنجليزية
- سورة ص : الترجمة الإنجليزية - هلالي-خان English - الإنجليزية
- سورة ص : الترجمة الإسبانية Español - الإسبانية
- سورة ص : الترجمة الإسبانية - المنتدى الإسلامي Español - الإسبانية
- سورة ص : الترجمة الإسبانية (أمريكا اللاتينية) - المنتدى الإسلامي Español - الإسبانية
- سورة ص : الترجمة الفارسية للمختصر في تفسير القرآن الكريم فارسی - الفارسية
- سورة ص : الترجمة الفارسية - دار الإسلام فارسی - الفارسية
- سورة ص : الترجمة الفارسية - حسين تاجي فارسی - الفارسية
- سورة ص : الترجمة الفرنسية - المنتدى الإسلامي Français - الفرنسية
- سورة ص : الترجمة الفرنسية للمختصر في تفسير القرآن الكريم Français - الفرنسية
- سورة ص : الترجمة الغوجراتية ગુજરાતી - الغوجراتية
- سورة ص : الترجمة الهوساوية هَوُسَ - الهوساوية
- سورة ص : الترجمة الهندية हिन्दी - الهندية
- سورة ص : الترجمة الإندونيسية للمختصر في تفسير القرآن الكريم Bahasa Indonesia - الأندونيسية
- سورة ص : الترجمة الإندونيسية - شركة سابق Bahasa Indonesia - الأندونيسية
- سورة ص : الترجمة الإندونيسية - المجمع Bahasa Indonesia - الأندونيسية
- سورة ص : الترجمة الإندونيسية - وزارة الشؤون الإسلامية Bahasa Indonesia - الأندونيسية
- سورة ص : الترجمة الإيطالية للمختصر في تفسير القرآن الكريم Italiano - الإيطالية
- سورة ص : الترجمة الإيطالية Italiano - الإيطالية
- سورة ص : الترجمة اليابانية 日本語 - اليابانية
- سورة ص : الترجمة الكازاخية - مجمع الملك فهد Қазақша - الكازاخية
- سورة ص : الترجمة الكازاخية - جمعية خليفة ألطاي Қазақша - الكازاخية
- سورة ص : الترجمة الخميرية ភាសាខ្មែរ - الخميرية
- سورة ص : الترجمة الكورية 한국어 - الكورية
- سورة ص : الترجمة الكردية Kurdî / كوردی - الكردية
- سورة ص : الترجمة المليبارية മലയാളം - المليبارية
- سورة ص : الترجمة الماراتية मराठी - الماراتية
- سورة ص : الترجمة النيبالية नेपाली - النيبالية
- سورة ص : الترجمة الأورومية Oromoo - الأورومية
- سورة ص : الترجمة البشتوية پښتو - البشتوية
- سورة ص : الترجمة البرتغالية Português - البرتغالية
- سورة ص : الترجمة السنهالية සිංහල - السنهالية
- سورة ص : الترجمة الصومالية Soomaaliga - الصومالية
- سورة ص : الترجمة الألبانية Shqip - الألبانية
- سورة ص : الترجمة التاميلية தமிழ் - التاميلية
- سورة ص : الترجمة التلجوية తెలుగు - التلجوية
- سورة ص : الترجمة الطاجيكية - عارفي Тоҷикӣ - الطاجيكية
- سورة ص : الترجمة الطاجيكية Тоҷикӣ - الطاجيكية
- سورة ص : الترجمة التايلاندية ไทย / Phasa Thai - التايلاندية
- سورة ص : الترجمة الفلبينية (تجالوج) للمختصر في تفسير القرآن الكريم Tagalog - الفلبينية (تجالوج)
- سورة ص : الترجمة الفلبينية (تجالوج) Tagalog - الفلبينية (تجالوج)
- سورة ص : الترجمة التركية للمختصر في تفسير القرآن الكريم Türkçe - التركية
- سورة ص : الترجمة التركية - مركز رواد الترجمة Türkçe - التركية
- سورة ص : الترجمة التركية - شعبان بريتش Türkçe - التركية
- سورة ص : الترجمة التركية - مجمع الملك فهد Türkçe - التركية
- سورة ص : الترجمة الأويغورية Uyƣurqə / ئۇيغۇرچە - الأويغورية
- سورة ص : الترجمة الأوكرانية Українська - الأوكرانية
- سورة ص : الترجمة الأردية اردو - الأردية
- سورة ص : الترجمة الأوزبكية - علاء الدين منصور Ўзбек - الأوزبكية
- سورة ص : الترجمة الأوزبكية - محمد صادق Ўзбек - الأوزبكية
- سورة ص : الترجمة الفيتنامية للمختصر في تفسير القرآن الكريم Vèneto - الفيتنامية
- سورة ص : الترجمة الفيتنامية Vèneto - الفيتنامية
- سورة ص : الترجمة اليورباوية Yorùbá - اليوروبا
- سورة ص : الترجمة الصينية 中文 - الصينية