الطلاق

تفسير سورة الطلاق

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ يَا أَيُّهَا النَّبِيُّ إِذَا طَلَّقْتُمُ النِّسَاءَ فَطَلِّقُوهُنَّ لِعِدَّتِهِنَّ وَأَحْصُوا الْعِدَّةَ ۖ وَاتَّقُوا اللَّهَ رَبَّكُمْ ۖ لَا تُخْرِجُوهُنَّ مِنْ بُيُوتِهِنَّ وَلَا يَخْرُجْنَ إِلَّا أَنْ يَأْتِينَ بِفَاحِشَةٍ مُبَيِّنَةٍ ۚ وَتِلْكَ حُدُودُ اللَّهِ ۚ وَمَنْ يَتَعَدَّ حُدُودَ اللَّهِ فَقَدْ ظَلَمَ نَفْسَهُ ۚ لَا تَدْرِي لَعَلَّ اللَّهَ يُحْدِثُ بَعْدَ ذَٰلِكَ أَمْرًا﴾

१.
हे पैगंबर! (आपल्या जनसमुदायाच्या लोकांना सांगा) जेव्हा तुम्ही आपल्या पत्न्यांना तलाक देऊ इच्छित असाल तर त्यांच्या इद्दत (ची मुदत सुरू होत) असताना तलाक द्या आणि इद्दतची गणना करा, आणि अल्लाहचे, जो तुमचा पालनकर्ता आहे.
भय बाळगत राहा, ना तुम्ही त्यांना त्यांच्या घरांमधून बाहेर काढावे आणि ना त्यांनी (स्वतः) निघावे, मात्र ही गोष्ट वेगळी की त्यांनी उघडपणे दुष्कर्म करून बसावे.
या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत, आणि जो मनुष्य अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करील त्याने खात्रीने आपल्या स्वतःवर अत्याचार केला, तुम्ही नाही जाणत की कदाचित त्यानंतर अल्लाहने एखादी नवी गोष्ट (स्थिती) निर्माण करावी.१

﴿فَإِذَا بَلَغْنَ أَجَلَهُنَّ فَأَمْسِكُوهُنَّ بِمَعْرُوفٍ أَوْ فَارِقُوهُنَّ بِمَعْرُوفٍ وَأَشْهِدُوا ذَوَيْ عَدْلٍ مِنْكُمْ وَأَقِيمُوا الشَّهَادَةَ لِلَّهِ ۚ ذَٰلِكُمْ يُوعَظُ بِهِ مَنْ كَانَ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ ۚ وَمَنْ يَتَّقِ اللَّهَ يَجْعَلْ لَهُ مَخْرَجًا﴾

२.
तर जेव्हा या (स्त्रिया) आपला अवधी पूर्ण करण्याप्रत पोहचतील तेव्हा त्यांना रीतसर आपल्या विवाहबंधनात राहू द्या किंवा नियमानुसार त्यांना विभक्त करा, १ आणि आपसात दोन न्याय करणाऱ्या माणसांना साक्षी बनवून घ्या, आणि अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी यथायोग्य साक्ष द्या, हेच ते, ज्याची शिकवण त्यांना दिली जात आहे, जे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असतील, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगतो अल्लाह त्याच्यासाठी सुटकेचा मार्ग काढतो.

﴿وَيَرْزُقْهُ مِنْ حَيْثُ لَا يَحْتَسِبُ ۚ وَمَنْ يَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ فَهُوَ حَسْبُهُ ۚ إِنَّ اللَّهَ بَالِغُ أَمْرِهِ ۚ قَدْ جَعَلَ اللَّهُ لِكُلِّ شَيْءٍ قَدْرًا﴾

३.
आणि त्याला अशा ठिकाणाहून रोजी (आजिविका) उपलब्ध करून देतो ज्याची त्याला कल्पनाही नसेल आणि जो मनुष्य अल्लाहवर भरवसा करील, अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा असेल. अल्लाह आपले कार्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने प्रत्येक गोष्टीचे एक अनुमान निर्धारित केलेले आहे.

﴿وَاللَّائِي يَئِسْنَ مِنَ الْمَحِيضِ مِنْ نِسَائِكُمْ إِنِ ارْتَبْتُمْ فَعِدَّتُهُنَّ ثَلَاثَةُ أَشْهُرٍ وَاللَّائِي لَمْ يَحِضْنَ ۚ وَأُولَاتُ الْأَحْمَالِ أَجَلُهُنَّ أَنْ يَضَعْنَ حَمْلَهُنَّ ۚ وَمَنْ يَتَّقِ اللَّهَ يَجْعَلْ لَهُ مِنْ أَمْرِهِ يُسْرًا﴾

४.
तुमच्या स्त्रियांपैकी ज्या स्त्रिया मासिक पाळीबाबत निराश झाल्या असतील, जर तुम्हाला शंका असेल तर त्यांची इद्दत तीन महीने आहे, आणि त्यांचीदेखील, ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झालेली नसेल, आणि गर्भवती स्त्रियांची इद्दत त्यांची प्रस्तुती होणे आहे आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याच्या प्रत्येक कामात सहजता निर्माण करील.

﴿ذَٰلِكَ أَمْرُ اللَّهِ أَنْزَلَهُ إِلَيْكُمْ ۚ وَمَنْ يَتَّقِ اللَّهَ يُكَفِّرْ عَنْهُ سَيِّئَاتِهِ وَيُعْظِمْ لَهُ أَجْرًا﴾

५.
हा अल्लाहचा आदेश आहे, जो त्याने तुमच्याकडे अवतरित केला आहे, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याचे अपराध मिटविल आणि त्याला फार महान मोबदला प्रदान करील.

﴿أَسْكِنُوهُنَّ مِنْ حَيْثُ سَكَنْتُمْ مِنْ وُجْدِكُمْ وَلَا تُضَارُّوهُنَّ لِتُضَيِّقُوا عَلَيْهِنَّ ۚ وَإِنْ كُنَّ أُولَاتِ حَمْلٍ فَأَنْفِقُوا عَلَيْهِنَّ حَتَّىٰ يَضَعْنَ حَمْلَهُنَّ ۚ فَإِنْ أَرْضَعْنَ لَكُمْ فَآتُوهُنَّ أُجُورَهُنَّ ۖ وَأْتَمِرُوا بَيْنَكُمْ بِمَعْرُوفٍ ۖ وَإِنْ تَعَاسَرْتُمْ فَسَتُرْضِعُ لَهُ أُخْرَىٰ﴾

६.
तुम्ही आपल्या सामर्थ्यानुसार जिथे राहात असाल तिथे त्या (घटस्फोटित) स्त्रियांना ठेवा, आणि त्यांना सतविण्याकरिता कष्ट यातना देऊ नका, आणि जर त्या गर्भवती असतील तर त्या प्रसूत होई पर्यंत त्यांना खर्च देत राहा, मग जर तुमच्या सांगण्यावरून त्याच दूध पाजतील तर तुम्ही त्यांना त्यांचे पारश्रमिक देऊन टाका, आणि आपसात चांगल्या प्रकारे सल्लामसलत करून घेत जा आणि जर तुम्ही आपसात तणाव राखाल तर त्याच्या (पित्याच्या) सांगण्यावरून दुसरी स्त्री दूध पाजेल.

﴿لِيُنْفِقْ ذُو سَعَةٍ مِنْ سَعَتِهِ ۖ وَمَنْ قُدِرَ عَلَيْهِ رِزْقُهُ فَلْيُنْفِقْ مِمَّا آتَاهُ اللَّهُ ۚ لَا يُكَلِّفُ اللَّهُ نَفْسًا إِلَّا مَا آتَاهَا ۚ سَيَجْعَلُ اللَّهُ بَعْدَ عُسْرٍ يُسْرًا﴾

७.
धनवानाने आपल्या धन (सामर्थ्या) नुसार खर्च केला पाहिजे, आणि ज्याची जीविका (रोजी) त्याच्यासाठी कमी केली गेली असेल तर अल्लाहने जे काही त्याला देऊन ठेवले आहे, त्यातून त्याने (आपल्या सामर्थ्यानुसार) द्यावे, कोणत्याही माणसावर अल्लाह ओझे ठेवत नाही, परंतु इतकेच जेवढे सामर्थ्य त्याला दिले गेले आहे. अल्लाह गरीबीनंतर धन देखील प्रदान करेल.

﴿وَكَأَيِّنْ مِنْ قَرْيَةٍ عَتَتْ عَنْ أَمْرِ رَبِّهَا وَرُسُلِهِ فَحَاسَبْنَاهَا حِسَابًا شَدِيدًا وَعَذَّبْنَاهَا عَذَابًا نُكْرًا﴾

८.
आणि अनेक वस्ती (वाल्यां) नी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा केली तेव्हा आम्ही देखील त्यांचा सक्त हिशोब घेतला आणि न पाहिलेला (कठोर) अज़ाब त्यांच्यावर टाकला.

﴿فَذَاقَتْ وَبَالَ أَمْرِهَا وَكَانَ عَاقِبَةُ أَمْرِهَا خُسْرًا﴾

९. तेव्हा त्यांनी आपल्या कृत-कर्मांचा स्वाद चाखून घेतला आणि परिणामस्वरुपी त्यांचे नुकसान झाले.

﴿أَعَدَّ اللَّهُ لَهُمْ عَذَابًا شَدِيدًا ۖ فَاتَّقُوا اللَّهَ يَا أُولِي الْأَلْبَابِ الَّذِينَ آمَنُوا ۚ قَدْ أَنْزَلَ اللَّهُ إِلَيْكُمْ ذِكْرًا﴾

१०.
त्यांच्यासाठी अल्लाहने फार कठोर शिक्षा - यातना तयार करून ठेवली आहे, तेव्हा हे बुद्धिमान ईमानधारकांनो, अल्लाहचे भय राखा, निःसंशय, अल्लाहने तुमच्याकडे बोध - उपदेश पाठविला आहे.

﴿رَسُولًا يَتْلُو عَلَيْكُمْ آيَاتِ اللَّهِ مُبَيِّنَاتٍ لِيُخْرِجَ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ مِنَ الظُّلُمَاتِ إِلَى النُّورِ ۚ وَمَنْ يُؤْمِنْ بِاللَّهِ وَيَعْمَلْ صَالِحًا يُدْخِلْهُ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ۖ قَدْ أَحْسَنَ اللَّهُ لَهُ رِزْقًا﴾

११.
(अर्थात) पैगंबर, जो तुम्हाला अल्लाहचे स्पष्ट आदेश वाचून ऐकवितो, यासाठी की त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, त्यांना अंधाराकडून उजेडाकडे आणावे आणि जो मनुष्य अल्लाहवर ईमान राखेल आणि सत्कर्म करेल, अल्लाह त्याला अशा जन्नतमध्ये दाखल करेल, जिच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील. निःसंशय, अल्लाहने त्याला सर्वांत उत्तम रोजी (जीविका) देऊन ठेवली आहे.

﴿اللَّهُ الَّذِي خَلَقَ سَبْعَ سَمَاوَاتٍ وَمِنَ الْأَرْضِ مِثْلَهُنَّ يَتَنَزَّلُ الْأَمْرُ بَيْنَهُنَّ لِتَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ وَأَنَّ اللَّهَ قَدْ أَحَاطَ بِكُلِّ شَيْءٍ عِلْمًا﴾

१२. अल्लाह तो आहे, ज्याने सात आकाश बनविले आणि त्याचप्रमाणे जमीन देखील.
१ त्याचा आदेश त्यांच्या दरम्यान अवतरित होतो, यासाठी की तुम्ही जाणून घ्यावे की अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे, आणि अल्लाहने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: