يس

تفسير سورة يس

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ يس﴾

१. यासीन *

﴿وَالْقُرْآنِ الْحَكِيمِ﴾

२. शपथ आहे बुद्धी-कौशल्ययुक्त (आणि मजबूत) कुरआनाची.

﴿إِنَّكَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ﴾

३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.

﴿عَلَىٰ صِرَاطٍ مُسْتَقِيمٍ﴾

४. सरळ मार्गावर आहात.

﴿تَنْزِيلَ الْعَزِيزِ الرَّحِيمِ﴾

५. (हा कुरआन, अल्लाह) जबरदस्त, मोठ्या दया करणाऱ्यातर्फे अवतरित केला गेला आहे.

﴿لِتُنْذِرَ قَوْمًا مَا أُنْذِرَ آبَاؤُهُمْ فَهُمْ غَافِلُونَ﴾

६. यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्या वाडवडिलांना खबरदार केले गेले नव्हते. यास्तव ते गफलतीत पडले आहेत.

﴿لَقَدْ حَقَّ الْقَوْلُ عَلَىٰ أَكْثَرِهِمْ فَهُمْ لَا يُؤْمِنُونَ﴾

७. त्यांच्यापैकी अधिकांश लोकांबाबत ही गोष्ट साबित झाली आहे. यास्तव हे लोक ईमान राखणार नाहीत.

﴿إِنَّا جَعَلْنَا فِي أَعْنَاقِهِمْ أَغْلَالًا فَهِيَ إِلَى الْأَذْقَانِ فَهُمْ مُقْمَحُونَ﴾

८.
आम्ही त्यांच्या मानांवर तौक (जोखंड) टाकले आहे, जे त्यांच्या हनुवटीपर्यंत आहे, ज्यामुळे त्यांची डोकी वर उठलेल्या स्थितीत आहेत.

﴿وَجَعَلْنَا مِنْ بَيْنِ أَيْدِيهِمْ سَدًّا وَمِنْ خَلْفِهِمْ سَدًّا فَأَغْشَيْنَاهُمْ فَهُمْ لَا يُبْصِرُونَ﴾

९.
आणि आम्ही एक आड त्यांच्यासमोर उभा केला आणि एक आड त्यांच्या मागे उभा केला, ज्याद्वारे आम्ही त्यांना झाकून टाकले, तेव्हा ते पाहू शकत नाही.

﴿وَسَوَاءٌ عَلَيْهِمْ أَأَنْذَرْتَهُمْ أَمْ لَمْ تُنْذِرْهُمْ لَا يُؤْمِنُونَ﴾

१०. आणि त्यांच्या संदर्भात तुमचे भय दाखविणे किंवा न दाखविणे दोन्ही सारखेच आहे. हे ईमान बाळगणार नाहीत.

﴿إِنَّمَا تُنْذِرُ مَنِ اتَّبَعَ الذِّكْرَ وَخَشِيَ الرَّحْمَٰنَ بِالْغَيْبِ ۖ فَبَشِّرْهُ بِمَغْفِرَةٍ وَأَجْرٍ كَرِيمٍ﴾

११.
तुम्ही केवळ अशाच माणसाला भय दाखवू शकता, जो उपदेशाचे अनुसरण करील आणि रहमान (अल्लाह) चे न पाहता भय बाळगेल, तेव्हा तुम्ही अशा माणसाला क्षमा आणि उत्तम मोबदला दिला जाण्याची खूशखबर ऐकवा.

﴿إِنَّا نَحْنُ نُحْيِي الْمَوْتَىٰ وَنَكْتُبُ مَا قَدَّمُوا وَآثَارَهُمْ ۚ وَكُلَّ شَيْءٍ أَحْصَيْنَاهُ فِي إِمَامٍ مُبِينٍ﴾

१२.
निःसंशय, आम्ही मृतांना जिवंत करू आणि आम्ही लिहित असतो जे कर्म देखील लोक पुढे पाठवितात आणि त्यांची ती कर्मेही, जी ते मागे सोडून जातात आणि प्रत्येक गोष्टीस आम्ही एका स्पष्ट ग्रंथात संकलित करून ठेवले आहे.

﴿وَاضْرِبْ لَهُمْ مَثَلًا أَصْحَابَ الْقَرْيَةِ إِذْ جَاءَهَا الْمُرْسَلُونَ﴾

१३.
आणि तुम्ही त्यांच्यासमोर एक उदाहरण (अर्थात एका) वस्तीवाल्यांचा किस्सा (त्या काळचा) सादर करा, जेव्हा त्या वस्तीत अनेक रसूल आले.

﴿إِذْ أَرْسَلْنَا إِلَيْهِمُ اثْنَيْنِ فَكَذَّبُوهُمَا فَعَزَّزْنَا بِثَالِثٍ فَقَالُوا إِنَّا إِلَيْكُمْ مُرْسَلُونَ﴾

१४.
जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ दोन रसूल पाठविलेत, तेव्हा त्या लोकांनी (प्रथम) त्या दोघांना समर्थन दिले, तेव्हा ते तिघे म्हणाले, आम्ही तुमच्याकडे (पैगंबर बनवून) पाठविलो गेलो आहोत.

﴿قَالُوا مَا أَنْتُمْ إِلَّا بَشَرٌ مِثْلُنَا وَمَا أَنْزَلَ الرَّحْمَٰنُ مِنْ شَيْءٍ إِنْ أَنْتُمْ إِلَّا تَكْذِبُونَ﴾

१५.
ते लोक म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच साधारण मनुष्य आहात आणि रहमान (दयावान) ने कोणतीही गोष्ट अवतरित केली नाही. तुम्ही केवळ खोटे बोलता.

﴿قَالُوا رَبُّنَا يَعْلَمُ إِنَّا إِلَيْكُمْ لَمُرْسَلُونَ﴾

१६. ते रसूल म्हणाले, आमचा पालनकर्ता जाणतो की आम्हाला तुमच्याकडे रसूल बनवून पाठविले गेले आहे.

﴿وَمَا عَلَيْنَا إِلَّا الْبَلَاغُ الْمُبِينُ﴾

१७. आणि आमचे कर्तव्य तर केवळ स्पष्टपणे पोहचविणे एवढेच आहे.

﴿قَالُوا إِنَّا تَطَيَّرْنَا بِكُمْ ۖ لَئِنْ لَمْ تَنْتَهُوا لَنَرْجُمَنَّكُمْ وَلَيَمَسَّنَّكُمْ مِنَّا عَذَابٌ أَلِيمٌ﴾

१८.
ते म्हणाले की आम्ही तर तुम्हाला अभद्र समजतो आणि जर तुम्ही हे थांबविले नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी ठेचून तुमचे कामच तमाम करून टाकू आणि तुम्हाला आमच्यातर्फे सक्त शिक्षा मिळेल.

﴿قَالُوا طَائِرُكُمْ مَعَكُمْ ۚ أَئِنْ ذُكِّرْتُمْ ۚ بَلْ أَنْتُمْ قَوْمٌ مُسْرِفُونَ﴾

१९.
ते पैगंबर म्हणाले की तुमची अभद्रता तर तुमच्या सोबतीला आहे, काय तिला (अशुभ समजता) की तुम्हाला शिकवण दिली जावी, किंबहुना तुम्ही तर मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.

﴿وَجَاءَ مِنْ أَقْصَى الْمَدِينَةِ رَجُلٌ يَسْعَىٰ قَالَ يَا قَوْمِ اتَّبِعُوا الْمُرْسَلِينَ﴾

२०.
आणि एक मुष्य त्या शहराच्या शेवटच्या किनाऱ्याकडून धावत आला, तो म्हणाला, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या पैगंबरांच्या मार्गाचे अनुसरण करा.

﴿اتَّبِعُوا مَنْ لَا يَسْأَلُكُمْ أَجْرًا وَهُمْ مُهْتَدُونَ﴾

२१. अशा लोकांच्या मार्गाचे अनुसरण करा, जे तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाहीत आणि ते सत्य - मार्गावर आहेत.

﴿وَمَا لِيَ لَا أَعْبُدُ الَّذِي فَطَرَنِي وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾

२२.
आणि मला काय झाले आहे की मी त्याची उपासना न करावी, ज्याने मला निर्माण केले आणि तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.

﴿أَأَتَّخِذُ مِنْ دُونِهِ آلِهَةً إِنْ يُرِدْنِ الرَّحْمَٰنُ بِضُرٍّ لَا تُغْنِ عَنِّي شَفَاعَتُهُمْ شَيْئًا وَلَا يُنْقِذُونِ﴾

२३.
काय मी त्याला सोडून अशांना उपास्य बनवू की जर (अल्लाह) दयावान (रहमान) मला एखादे नुकसान पोहचवू इच्छिल तर त्यांची शिफारस मला काहीच फायदा पोहचवू शकणार नाही आणि ना ते मला वाचवू शकतील.

﴿إِنِّي إِذًا لَفِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

२४. मग तर मी निश्चितच उघड मार्गभ्रष्टतेत आहे.

﴿إِنِّي آمَنْتُ بِرَبِّكُمْ فَاسْمَعُونِ﴾

२५. माझे म्हणणे ऐका! मी तर (साफ मनाने) तुम्हा सर्वांच्या पालनकर्त्यावर ईमान राखले आहे.

﴿قِيلَ ادْخُلِ الْجَنَّةَ ۖ قَالَ يَا لَيْتَ قَوْمِي يَعْلَمُونَ﴾

२६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते!

﴿بِمَا غَفَرَ لِي رَبِّي وَجَعَلَنِي مِنَ الْمُكْرَمِينَ﴾

२७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१

﴿۞ وَمَا أَنْزَلْنَا عَلَىٰ قَوْمِهِ مِنْ بَعْدِهِ مِنْ جُنْدٍ مِنَ السَّمَاءِ وَمَا كُنَّا مُنْزِلِينَ﴾

२८.
आणि त्यानंतर आम्ही त्याच्या जनसमूहावर आकाशातून एखादे सैन्य अवतरित केले नाही आणि ना अशा प्रकारे आम्ही अवतरित करतो.

﴿إِنْ كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً فَإِذَا هُمْ خَامِدُونَ﴾

२९. तो तर केवळ एक भयंकर चित्कार होता, ज्यामुळे ते सर्वच्या सर्व विझून गेले.

﴿يَا حَسْرَةً عَلَى الْعِبَادِ ۚ مَا يَأْتِيهِمْ مِنْ رَسُولٍ إِلَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ﴾

३०.
(अशा) दासांबद्दल खेद! कधीही असा कोणताही रसूल (पैगंबर) त्यांच्याजवळ आला नाही, ज्याची त्यांनी थट्टा उडविली नसेल.

﴿أَلَمْ يَرَوْا كَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُمْ مِنَ الْقُرُونِ أَنَّهُمْ إِلَيْهِمْ لَا يَرْجِعُونَ﴾

३१.
काय त्यांनी नाही पाहिले की त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले की ते यांच्याकडे परतणार नाहीत.

﴿وَإِنْ كُلٌّ لَمَّا جَمِيعٌ لَدَيْنَا مُحْضَرُونَ﴾

३२. प्रत्येक जनसमूह एकत्रित होऊन आमच्या समोर हजर केला जाईल.

﴿وَآيَةٌ لَهُمُ الْأَرْضُ الْمَيْتَةُ أَحْيَيْنَاهَا وَأَخْرَجْنَا مِنْهَا حَبًّا فَمِنْهُ يَأْكُلُونَ﴾

३३.
आणि त्यांच्यासाठी एक निशाणी मृत (कोरडी) जमीन आहे जिला आम्ही जिवंत केले आणि तिच्यातून अन्न (धान्य) काढले ज्यातून ते खातात.

﴿وَجَعَلْنَا فِيهَا جَنَّاتٍ مِنْ نَخِيلٍ وَأَعْنَابٍ وَفَجَّرْنَا فِيهَا مِنَ الْعُيُونِ﴾

३४.
आणि आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि ज्यांच्यात झरे देखील प्रवाहित केले.

﴿لِيَأْكُلُوا مِنْ ثَمَرِهِ وَمَا عَمِلَتْهُ أَيْدِيهِمْ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ﴾

३५.
यासाठी की (लोकांनी) तिची फळे खावीत आणि त्यांच्या हातांनी ते बनविले नाही, मग ते कृतज्ञता का नाही व्यक्त करीत?

﴿سُبْحَانَ الَّذِي خَلَقَ الْأَزْوَاجَ كُلَّهَا مِمَّا تُنْبِتُ الْأَرْضُ وَمِنْ أَنْفُسِهِمْ وَمِمَّا لَا يَعْلَمُونَ﴾

३६.
तो (अल्लाह) मोठा पवित्र आहे, ज्याने प्रत्येक वस्तूच्या जोड्या निर्माण केल्या, मग त्या जमिनीतून उगविलेल्या वस्तू असोत, किंवा यांचे स्वतःचे (अस्तित्व) असो, मग त्या (वस्तू) असोत, ज्यांना हे जाणतही नाहीत.

﴿وَآيَةٌ لَهُمُ اللَّيْلُ نَسْلَخُ مِنْهُ النَّهَارَ فَإِذَا هُمْ مُظْلِمُونَ﴾

३७.
आणि त्यांच्यासाठी एक निशाणी रात्र आहे, जिच्यातून आम्ही दिवसाला ओढून घेतो, तेव्हा ते अचानक अंधारात राहतात.

﴿وَالشَّمْسُ تَجْرِي لِمُسْتَقَرٍّ لَهَا ۚ ذَٰلِكَ تَقْدِيرُ الْعَزِيزِ الْعَلِيمِ﴾

३८. आणि सूर्याकरिता जे निर्धारित मार्ग आहेत, तो त्यावरच चालत राहतो.१ हे आहे निर्धारित केलेले जबरदस्त ज्ञानी (अल्लाह) चे.

﴿وَالْقَمَرَ قَدَّرْنَاهُ مَنَازِلَ حَتَّىٰ عَادَ كَالْعُرْجُونِ الْقَدِيمِ﴾

३९. आणि चंद्राच्या आम्ही मजली निर्धारित केलेल्या आहेत. येथेपर्यंत की तो पुनश्च जुन्या फांदीसारखा होतो.

﴿لَا الشَّمْسُ يَنْبَغِي لَهَا أَنْ تُدْرِكَ الْقَمَرَ وَلَا اللَّيْلُ سَابِقُ النَّهَارِ ۚ وَكُلٌّ فِي فَلَكٍ يَسْبَحُونَ﴾

४०.
ना सूर्याच्या आवाक्यात आहे की चंद्राला जाऊन धरावे आणि ना रात्र, दिवसाच्या पुढे जाणारी आहे आणि सर्वच्या सर्व आकाशात तरंगत फिरतात.

﴿وَآيَةٌ لَهُمْ أَنَّا حَمَلْنَا ذُرِّيَّتَهُمْ فِي الْفُلْكِ الْمَشْحُونِ﴾

४१. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी (ही देखील) आहे की आम्ही त्यांच्या संततीला भरलेल्या नौकेत स्वार केले.

﴿وَخَلَقْنَا لَهُمْ مِنْ مِثْلِهِ مَا يَرْكَبُونَ﴾

४२. आणि यांच्यासाठी त्यासारख्याच इतर वस्तू निर्माण केल्या, ज्यांच्यावर ते स्वार होतात.

﴿وَإِنْ نَشَأْ نُغْرِقْهُمْ فَلَا صَرِيخَ لَهُمْ وَلَا هُمْ يُنْقَذُونَ﴾

४३.
आणि जर आम्ही इच्छिले असते तर त्यांना बुडवून टाकले असते, मग ना कोणी त्यांची मदत करणारा असता आणि ना ते वाचवले गेले असते.

﴿إِلَّا رَحْمَةً مِنَّا وَمَتَاعًا إِلَىٰ حِينٍ﴾

४४. परंतु आम्ही आपल्यातर्फे दया - कृपा करतो आणि एका ठराविक मुदतीपर्यंत त्यांना लाभ देत आहोत.

﴿وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّقُوا مَا بَيْنَ أَيْدِيكُمْ وَمَا خَلْفَكُمْ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ﴾

४५.
आणि त्यांना जेव्हा (कधी) सांगितले जाते की पुढच्या - मागच्या (दुष्कर्मां) पासून अलिप्त राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.

﴿وَمَا تَأْتِيهِمْ مِنْ آيَةٍ مِنْ آيَاتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ﴾

४६.
आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याकडून अशी एखादी निशाणी येत नाही जिच्यापासून हे तोंड फिरवित नसावेत.

﴿وَإِذَا قِيلَ لَهُمْ أَنْفِقُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا أَنُطْعِمُ مَنْ لَوْ يَشَاءُ اللَّهُ أَطْعَمَهُ إِنْ أَنْتُمْ إِلَّا فِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

४७.
आणि त्यांना जेव्हा सांगितले जाते की अल्लाहने जे दिले आहे, त्यातून काही खर्च करा, तेव्हा हे काफिर, ईमान राखणाऱ्यांना उत्तर देतात की आम्ही त्यांना का खाऊ घालावे, ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच खाऊ - पिऊ घातले असते? तुम्ही तर आहातच उघड मार्गभ्रष्टतेत.

﴿وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِنْ كُنْتُمْ صَادِقِينَ﴾

४८. आणि ते म्हणतात, हा वायदा (कयामतची धमकी) केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा.

﴿مَا يَنْظُرُونَ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً تَأْخُذُهُمْ وَهُمْ يَخِصِّمُونَ﴾

४९. त्यांना केवळ एका भयंकर चित्काराची प्रतीक्षा आहे, जो त्यांना येऊन धरेल आणि हे आपसात लढत - भांडतच असतील.

﴿فَلَا يَسْتَطِيعُونَ تَوْصِيَةً وَلَا إِلَىٰ أَهْلِهِمْ يَرْجِعُونَ﴾

५०. त्यावेळी हे ना वसीयत (मृत्युपत्र) करू शकतील आणि ना - आपल्या कुटुंबाकडे परतू शकतील.

﴿وَنُفِخَ فِي الصُّورِ فَإِذَا هُمْ مِنَ الْأَجْدَاثِ إِلَىٰ رَبِّهِمْ يَنْسِلُونَ﴾

५१. आणि सूर (शंख) फुंकला जाताच सर्वच्या सर्व आपल्या कबरीमधून आपल्या पालनकर्त्याकडे (जलद गतीने) चालू लागतील.

﴿قَالُوا يَا وَيْلَنَا مَنْ بَعَثَنَا مِنْ مَرْقَدِنَا ۜ ۗ هَٰذَا مَا وَعَدَ الرَّحْمَٰنُ وَصَدَقَ الْمُرْسَلُونَ﴾

५२.
म्हणतील, अरेरे! आम्हाला आमच्या आरामच्या जागेतून कोणी उठविले? हेच आहे ते, ज्याचा वायदा रहमान (दयावान) ने केला होता, आणि पैगंबरांनी खरे खरे सांगितले होते.

﴿إِنْ كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً فَإِذَا هُمْ جَمِيعٌ لَدَيْنَا مُحْضَرُونَ﴾

५३. असे नव्हे, परंतु एक भयंकर गर्जना की अचानक सर्वच्या सर्व जमा होऊन आमच्या समोर हजर केले जातील.

﴿فَالْيَوْمَ لَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَلَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

५४.
तेव्हा आज कोणत्याही माणसावर किंचितही अत्याचार केला जाणार नाही आणि तुम्हाला त्याच कर्मांचा मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते.

﴿إِنَّ أَصْحَابَ الْجَنَّةِ الْيَوْمَ فِي شُغُلٍ فَاكِهُونَ﴾

५५. निःसंशय, जन्नतवाले लोक आजच्या दिवशी आपल्या (मनोरंजन) कार्यात व्यस्त आणि आनंदित आहेत.

﴿هُمْ وَأَزْوَاجُهُمْ فِي ظِلَالٍ عَلَى الْأَرَائِكِ مُتَّكِئُونَ﴾

५६. ते आणि त्यांच्या पत्न्या सावलीत आसनांवर तक्के लावून बसले असतील.

﴿لَهُمْ فِيهَا فَاكِهَةٌ وَلَهُمْ مَا يَدَّعُونَ﴾

५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील.

﴿سَلَامٌ قَوْلًا مِنْ رَبٍّ رَحِيمٍ﴾

५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल.

﴿وَامْتَازُوا الْيَوْمَ أَيُّهَا الْمُجْرِمُونَ﴾

५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा.

﴿۞ أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَا بَنِي آدَمَ أَنْ لَا تَعْبُدُوا الشَّيْطَانَ ۖ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُبِينٌ﴾

६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे.

﴿وَأَنِ اعْبُدُونِي ۚ هَٰذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ﴾

६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे.

﴿وَلَقَدْ أَضَلَّ مِنْكُمْ جِبِلًّا كَثِيرًا ۖ أَفَلَمْ تَكُونُوا تَعْقِلُونَ﴾

६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१

﴿هَٰذِهِ جَهَنَّمُ الَّتِي كُنْتُمْ تُوعَدُونَ﴾

६३. हीच ती जहन्नम आहे, जिचा वायदा तुम्हाला दिला जात होता.

﴿اصْلَوْهَا الْيَوْمَ بِمَا كُنْتُمْ تَكْفُرُونَ﴾

६४. आपल्या कुप्र (इन्कारा) चा मोबदला प्राप्त करण्याकरिता आज तिच्यात दाखल व्हा.

﴿الْيَوْمَ نَخْتِمُ عَلَىٰ أَفْوَاهِهِمْ وَتُكَلِّمُنَا أَيْدِيهِمْ وَتَشْهَدُ أَرْجُلُهُمْ بِمَا كَانُوا يَكْسِبُونَ﴾

६५.
आम्ही आज त्यांच्या तोंडावर मोहर लावून देऊ आणि त्यांचे हात आमच्याशी बोलतील आणि त्यांचे पाय साक्ष देतील, त्यांच्या त्या कर्मांची, जे ते करीत होते.

﴿وَلَوْ نَشَاءُ لَطَمَسْنَا عَلَىٰ أَعْيُنِهِمْ فَاسْتَبَقُوا الصِّرَاطَ فَأَنَّىٰ يُبْصِرُونَ﴾

६६.
आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांचे डोळे आंधळे करून टाकले असते, मग हे मार्गाकडे धावत गेले असते, मग त्यांना कशा प्रकारे दिसून आले असते?

﴿وَلَوْ نَشَاءُ لَمَسَخْنَاهُمْ عَلَىٰ مَكَانَتِهِمْ فَمَا اسْتَطَاعُوا مُضِيًّا وَلَا يَرْجِعُونَ﴾

६७. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांच्या जागेवरच त्यांचे चेहरे बिघडवून (विकृत करून) टाकले असते. मग ना ते हिंडू फिरू शकले असते आणि ना परतू शकले असते.

﴿وَمَنْ نُعَمِّرْهُ نُنَكِّسْهُ فِي الْخَلْقِ ۖ أَفَلَا يَعْقِلُونَ﴾

६८.
आणि आम्ही ज्याला वृद्ध करतो, त्याला जन्माच्या वेळेच्या अवस्थेकडे दुसऱ्यांदा परतवितो, मग काय हे तरीही समजून घेत नाही?

﴿وَمَا عَلَّمْنَاهُ الشِّعْرَ وَمَا يَنْبَغِي لَهُ ۚ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ وَقُرْآنٌ مُبِينٌ﴾

६९. आणि ना तर आम्ही या पैगंबरास काव्य (कविता) शिकविले, आणि ना हा त्यास योग्य आहे. हा तर केवळ बोध उपदेश आणि स्पष्ट कुरआन आहे.

﴿لِيُنْذِرَ مَنْ كَانَ حَيًّا وَيَحِقَّ الْقَوْلُ عَلَى الْكَافِرِينَ﴾

७०. यासाठी की त्याने प्रत्येक माणसाला सावध करावे, जो जिवंत आहे आणि सत्य (प्रमाण) प्रस्थापित व्हावे.

﴿أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا خَلَقْنَا لَهُمْ مِمَّا عَمِلَتْ أَيْدِينَا أَنْعَامًا فَهُمْ لَهَا مَالِكُونَ﴾

७१.
काय ते नाही पाहात की आम्ही आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंपैकी, त्याच्यासाठी चतुष्पाद (गुरे-ढोरे) ही निर्माण केले ज्यांचे हे मालक बनले आहेत.

﴿وَذَلَّلْنَاهَا لَهُمْ فَمِنْهَا رَكُوبُهُمْ وَمِنْهَا يَأْكُلُونَ﴾

७२.
आणि त्यां (पशूं) ना आम्ही त्यांच्या अधीन केले आहे, ज्यांच्यापैकी काही तर त्यांची वाहने आहेत आणि काहीं (चे मांस) खातात.

﴿وَلَهُمْ فِيهَا مَنَافِعُ وَمَشَارِبُ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ﴾

७३.
आणि त्यांना त्यांच्यापासून इतरही अनेक फायदे आहेत, आणि पिण्याच्या वस्तू काय तरीही हे कृतज्ञता दर्शवित नाही?

﴿وَاتَّخَذُوا مِنْ دُونِ اللَّهِ آلِهَةً لَعَلَّهُمْ يُنْصَرُونَ﴾

७४. आणि ते अल्लाहखेरीज दुसऱ्यांनाही उपास्य बनवितात (या आशेने) की त्यांची मदत केली जावी.

﴿لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَهُمْ وَهُمْ لَهُمْ جُنْدٌ مُحْضَرُونَ﴾

७५.
(वास्तविक) त्यांना मदत करण्याचे ते सामर्थ्य बाळगत नाहीत, तथापि हे (अनेकेश्वरवादी) त्यांचे सैन्य या नात्याने हजर आहेत.

﴿فَلَا يَحْزُنْكَ قَوْلُهُمْ ۘ إِنَّا نَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ﴾

७६.
यास्तव त्यांच्या गोष्टी (बोलण्या) ने दुःखी कष्टी न व्हावे आम्ही त्यांच्या लपलेल्या व उघड सर्वच गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.

﴿أَوَلَمْ يَرَ الْإِنْسَانُ أَنَّا خَلَقْنَاهُ مِنْ نُطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُبِينٌ﴾

७७.
काय माणसाला एवढेही माहीत नाही की आम्ही त्याला विर्यापासून निर्माण केले आहे, तरीही तो उघड भांडखोर बनून बसला.

﴿وَضَرَبَ لَنَا مَثَلًا وَنَسِيَ خَلْقَهُ ۖ قَالَ مَنْ يُحْيِي الْعِظَامَ وَهِيَ رَمِيمٌ﴾

७८.
आणि त्याने आमच्यासाठी उदाहरणे सांगितली आणि आपल्या (मूळ) उत्पत्तीला विसरला, म्हणाला की या सडल्या कुजल्या हाडांना कोण (पुन्हा) जिवंत करू शकतो?

﴿قُلْ يُحْيِيهَا الَّذِي أَنْشَأَهَا أَوَّلَ مَرَّةٍ ۖ وَهُوَ بِكُلِّ خَلْقٍ عَلِيمٌ﴾

७९.
सांगा की त्यांना तो जिवंत करील, ज्याने त्यांना पहिल्यांदा निर्माण केले, जो सर्व प्रकारची उत्पत्ती चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.

﴿الَّذِي جَعَلَ لَكُمْ مِنَ الشَّجَرِ الْأَخْضَرِ نَارًا فَإِذَا أَنْتُمْ مِنْهُ تُوقِدُونَ﴾

८०. तोच होय, ज्याने तुमच्यासाठी हिरव्या वृक्षापासून आग निर्माण केली, ज्याद्वारे तुम्ही आग प्रज्वलित करता.

﴿أَوَلَيْسَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِقَادِرٍ عَلَىٰ أَنْ يَخْلُقَ مِثْلَهُمْ ۚ بَلَىٰ وَهُوَ الْخَلَّاقُ الْعَلِيمُ﴾

८१.
ज्याने आकाशांना आणि धरतीला निर्माण केले आहे, काय तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्यास समर्थ नाही? निश्चितच समर्थ आहे आणि तोच निर्माण करणारा, जाणणारा आहे.

﴿إِنَّمَا أَمْرُهُ إِذَا أَرَادَ شَيْئًا أَنْ يَقُولَ لَهُ كُنْ فَيَكُونُ﴾

८२.
जेव्हा तो एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा त्याचे एवढे म्हणणे (पुरेसे) आहे की घडून ये, ती गोष्ट तत्काळ घडून येते.

﴿فَسُبْحَانَ الَّذِي بِيَدِهِ مَلَكُوتُ كُلِّ شَيْءٍ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾

८३.
मोठा पवित्र आहे तो अल्लाह, ज्याच्या हाती प्रत्येक गोष्टीचा सत्ताधिकार आहे आणि ज्याच्याकडे तुम्ही सर्व परतविले जाल.

الترجمات والتفاسير لهذه السورة: