القصص

تفسير سورة القصص

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ طسم﴾

१. ता-सीन-मीम.

﴿تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ﴾

२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत.

﴿نَتْلُو عَلَيْكَ مِنْ نَبَإِ مُوسَىٰ وَفِرْعَوْنَ بِالْحَقِّ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ﴾

३. आम्ही तुमच्यासमोर मूसा आणि फिरऔनची सत्य घटना वर्णन करतो अशा लोकांकरिता, जे ईमान राखतात.

﴿إِنَّ فِرْعَوْنَ عَلَا فِي الْأَرْضِ وَجَعَلَ أَهْلَهَا شِيَعًا يَسْتَضْعِفُ طَائِفَةً مِنْهُمْ يُذَبِّحُ أَبْنَاءَهُمْ وَيَسْتَحْيِي نِسَاءَهُمْ ۚ إِنَّهُ كَانَ مِنَ الْمُفْسِدِينَ﴾

४. निःसंशय, फिरऔनने धरतीवर उत्पात (फसाद) माजिवला होता, आणि तिथल्या लोकांचा (एक एक) गट बनविला होता. त्यांच्या एका गटाला दुर्बल बनवून ठेवले होते. त्यांच्या लहान मुलांना तर मारून टाकत असे आणि मुलींना जिवंत सोडून देत असे. निःसंशय तो मोठा दुराचारी (व दुष्ट) होता.

﴿وَنُرِيدُ أَنْ نَمُنَّ عَلَى الَّذِينَ اسْتُضْعِفُوا فِي الْأَرْضِ وَنَجْعَلَهُمْ أَئِمَّةً وَنَجْعَلَهُمُ الْوَارِثِينَ﴾

५.
आणि मग आम्ही इच्छिले की त्यांच्यावर दया करावी, ज्यांना धरतीवर अतिशय दुर्बल केले गेले होते आणि आम्ही त्यांनाच प्रमुख आणि (धरतीचा) वारस बनवावे.

﴿وَنُمَكِّنَ لَهُمْ فِي الْأَرْضِ وَنُرِيَ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَجُنُودَهُمَا مِنْهُمْ مَا كَانُوا يَحْذَرُونَ﴾

६.
आणि हेही की त्यांन धरतीवर शक्ती-सामर्थ्य व सत्ताधिकार प्रदान करावा आणि फिरऔन आणि हामान व त्यांच्या सैन्यांना ते दाखवावे, ज्यापासून ते भयभीत आहेत.

﴿وَأَوْحَيْنَا إِلَىٰ أُمِّ مُوسَىٰ أَنْ أَرْضِعِيهِ ۖ فَإِذَا خِفْتِ عَلَيْهِ فَأَلْقِيهِ فِي الْيَمِّ وَلَا تَخَافِي وَلَا تَحْزَنِي ۖ إِنَّا رَادُّوهُ إِلَيْكِ وَجَاعِلُوهُ مِنَ الْمُرْسَلِينَ﴾

७.
आणि आम्ही मूसाच्या मातेला वहयी (प्रकाशना) केली की त्याला दूध पाजत राहा आणि जेव्हा तुला त्याच्याविषयी काही भय जाणवेल तेव्हा त्याला नदीत वाहवून दे आणि कसलेही भय, शोक व दुःख करू नकोस. आम्ही निःशंसय, त्याला तुझ्याकडे परतवू आणि त्याला आपल्या पैगंबरांपैकी बनविणार आहोत.

﴿فَالْتَقَطَهُ آلُ فِرْعَوْنَ لِيَكُونَ لَهُمْ عَدُوًّا وَحَزَنًا ۗ إِنَّ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَجُنُودَهُمَا كَانُوا خَاطِئِينَ﴾

८.
शेवटी फिरऔनच्या लोकांनी ते बालक उचलून घेतले, यासाठी की अखेरीस हेच बालक त्यांचे वैरी ठरले आणि त्यांच्या दुःखाचे कारण बनले. यात शंका नाही की फिरऔन आणि हामान व त्यांचे सैन्य मोठे अपराधी होते.

﴿وَقَالَتِ امْرَأَتُ فِرْعَوْنَ قُرَّتُ عَيْنٍ لِي وَلَكَ ۖ لَا تَقْتُلُوهُ عَسَىٰ أَنْ يَنْفَعَنَا أَوْ نَتَّخِذَهُ وَلَدًا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ﴾

९. आणि फिरऔनची पत्नी म्हणाली की हा तर माझ्या आणि तुमच्या नेत्रांची शितलता आहे. याची हत्या करू नका.
फार संभव आहे की हा आम्हाला काही लाभ पोहचविल किंवा आम्ही याला आपलाच पुत्र ठरवावे, आणि हे लोक अक्कलच बाळगत नव्हते.

﴿وَأَصْبَحَ فُؤَادُ أُمِّ مُوسَىٰ فَارِغًا ۖ إِنْ كَادَتْ لَتُبْدِي بِهِ لَوْلَا أَنْ رَبَطْنَا عَلَىٰ قَلْبِهَا لِتَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ﴾

१०. आणि मूसा (अलै.) च्या मातेचे हृदय व्याकुळ झाले,तर आम्ही तिच्या मनाला धीर दिला नसता.तर ती या गोष्टीची वास्तविकता अगदी स्पष्ट करण्याचा बेतात होती. हे अशासाठी की ती ईमान राखणाऱ्यांपैकी राहावी.

﴿وَقَالَتْ لِأُخْتِهِ قُصِّيهِ ۖ فَبَصُرَتْ بِهِ عَنْ جُنُبٍ وَهُمْ لَا يَشْعُرُونَ﴾

११. मूसा (अलै.) च्या मातेने त्या (बाळा) च्या बहिणीस सांगितले की तू याच्या पाठोपाठ जा, तेव्हा ती त्याला दुरुनच पाहत राहिली. आणि फिरऔनच्या लोकांना या गोष्टीची जाणीवही झाली नाही.

﴿۞ وَحَرَّمْنَا عَلَيْهِ الْمَرَاضِعَ مِنْ قَبْلُ فَقَالَتْ هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ أَهْلِ بَيْتٍ يَكْفُلُونَهُ لَكُمْ وَهُمْ لَهُ نَاصِحُونَ﴾

१२. आणि त्या (बाळा) च्या पोहचण्यापूर्वीच आम्ही मूसाकरिता दायांचे दूध हराम (निषिद्ध) केले होते.
ती (बहीण) म्हणाली की, काय मी तुम्हाला असे कुटुंब दाखवू जे या बाळाचे पालनपोषण तुमच्यासाठी करील आणि या बाळाचे हितचिंतक असेल.

﴿فَرَدَدْنَاهُ إِلَىٰ أُمِّهِ كَيْ تَقَرَّ عَيْنُهَا وَلَا تَحْزَنَ وَلِتَعْلَمَ أَنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ﴾

१३.
अशा प्रकारे आम्ही त्या बाळाला त्याच्या मातेकडे परत पोहचविले यासाठी की तिचे नेत्र शीतल राहावेत आणि ती दुःखी होऊ नये. आणि तिने जाणून घ्यावे की अल्लाहचा वायदा सच्चा आहे. परंतु अधिकांश लोक जाणत नाही.

﴿وَلَمَّا بَلَغَ أَشُدَّهُ وَاسْتَوَىٰ آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا ۚ وَكَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ﴾

१४. आणि जेव्हा मूसा (अलै.
) आपल्या तारुण्यावस्थेस पोहचले आणि पूर्णतः शक्तिशाली झाले, आम्ही त्यांना बुद्धीकौशल्य आणि ज्ञान प्रदान केले. सत्कर्म करणाऱ्यांना आम्ही अशाच प्रकारचा मोबदला देत असतो.

﴿وَدَخَلَ الْمَدِينَةَ عَلَىٰ حِينِ غَفْلَةٍ مِنْ أَهْلِهَا فَوَجَدَ فِيهَا رَجُلَيْنِ يَقْتَتِلَانِ هَٰذَا مِنْ شِيعَتِهِ وَهَٰذَا مِنْ عَدُوِّهِ ۖ فَاسْتَغَاثَهُ الَّذِي مِنْ شِيعَتِهِ عَلَى الَّذِي مِنْ عَدُوِّهِ فَوَكَزَهُ مُوسَىٰ فَقَضَىٰ عَلَيْهِ ۖ قَالَ هَٰذَا مِنْ عَمَلِ الشَّيْطَانِ ۖ إِنَّهُ عَدُوٌّ مُضِلٌّ مُبِينٌ﴾

१५. आणि (मूसा) अशा वेळी शहरात आले, जेव्हा शहरवासी झोपलेले होते. इथे दोन माणसे लढत असताना आढळले. हा एक तर त्यांच्या समूहापैकी होता आणि हा दुसरा त्यांच्या शत्रूंपैकी.
जो त्यांच्या समूहापैकी होता त्याने त्या माणसाच्या विरोधात, त्या शत्रू पक्षाचा होता त्यांच्याकडे मदत मागितली. ज्यावर मूसाने त्याला ठोसा मारला. परिणामी तो मरण पावला. मूसा म्हणाले, हे तर सैतानी कृत्य आहे निःसंशय, सैतान शत्रू आणि उघडरित्या बहकविणारा आहे.

﴿قَالَ رَبِّ إِنِّي ظَلَمْتُ نَفْسِي فَاغْفِرْ لِي فَغَفَرَ لَهُ ۚ إِنَّهُ هُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ﴾

१६. मग मूसा दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! मी तर स्वतःवरच अत्याचार करून घेतला. तू मला माफ कर. अल्लाहने त्यांना माफ केले. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दयावान आहे.

﴿قَالَ رَبِّ بِمَا أَنْعَمْتَ عَلَيَّ فَلَنْ أَكُونَ ظَهِيرًا لِلْمُجْرِمِينَ﴾

१७.
(मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! जसा तू माझ्यावर हा उपकार केला, मी देखील आता यापुढे कोणत्याही अपराध्याचा सहाय्यक बनणार नाही.

﴿فَأَصْبَحَ فِي الْمَدِينَةِ خَائِفًا يَتَرَقَّبُ فَإِذَا الَّذِي اسْتَنْصَرَهُ بِالْأَمْسِ يَسْتَصْرِخُهُ ۚ قَالَ لَهُ مُوسَىٰ إِنَّكَ لَغَوِيٌّ مُبِينٌ﴾

१८.
मग (दुसऱ्या दिवशी) सकाळी सकाळी भय राखत बातमी घेण्याच्या हेतूने शहरात गेले, तेवढ्यात तोच मनुष्य ज्याने काल त्यांच्याजवळ मदत मागितली होती, पुन्हा त्यांच्याजवळ विनंती करीत आहे. मूसा त्याला म्हणाले, निःसंशय, तू तर उघडरित्या पथभ्रष्ट आहेस.

﴿فَلَمَّا أَنْ أَرَادَ أَنْ يَبْطِشَ بِالَّذِي هُوَ عَدُوٌّ لَهُمَا قَالَ يَا مُوسَىٰ أَتُرِيدُ أَنْ تَقْتُلَنِي كَمَا قَتَلْتَ نَفْسًا بِالْأَمْسِ ۖ إِنْ تُرِيدُ إِلَّا أَنْ تَكُونَ جَبَّارًا فِي الْأَرْضِ وَمَا تُرِيدُ أَنْ تَكُونَ مِنَ الْمُصْلِحِينَ﴾

१९.
मग जेव्हा आपल्या आणि त्याच्या शत्रूला धरू इच्छिले, तो म्हणाला, हे मूसा! काय ज्या प्रकारे तुम्ही काल एका माणसाला ठार मारले, (आज) मलाही ठार करू इच्छिता? तुम्ही तर देशात जुलमी व उत्पात करणारे बनू इच्छिता आणि तुमचा हा इरादाच नाही की समजोता (समेट) करणाऱ्यांपैकी व्हावे.

﴿وَجَاءَ رَجُلٌ مِنْ أَقْصَى الْمَدِينَةِ يَسْعَىٰ قَالَ يَا مُوسَىٰ إِنَّ الْمَلَأَ يَأْتَمِرُونَ بِكَ لِيَقْتُلُوكَ فَاخْرُجْ إِنِّي لَكَ مِنَ النَّاصِحِينَ﴾

२०.
आणि शहराच्या दूरच्या किनाऱ्याकडून धावत धावत एक मनुष्य आला आणि म्हणू लागला की हे मूसा! इथले प्रमुख लोक तुमच्या वधाची सल्लामसलत करीत आहेत. यास्तव तुम्ही (फार लवकर) येथून निघून जा. मला आपला हितचिंतक माना.

﴿فَخَرَجَ مِنْهَا خَائِفًا يَتَرَقَّبُ ۖ قَالَ رَبِّ نَجِّنِي مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ﴾

२१. यास्तव मूसा भयभीत होऊन सावधपणे तेथून निघाले. म्हणाले, हे पालनकर्त्या! मला अत्याचारी समूहापासून वाचव.

﴿وَلَمَّا تَوَجَّهَ تِلْقَاءَ مَدْيَنَ قَالَ عَسَىٰ رَبِّي أَنْ يَهْدِيَنِي سَوَاءَ السَّبِيلِ﴾

२२. आणि जेव्हा मदयनकडे जाऊ लागले तेव्हा म्हणाले, माझा विश्वास आहे की माझा पालनकर्ता मला सरळ मार्ग दाखविल.

﴿وَلَمَّا وَرَدَ مَاءَ مَدْيَنَ وَجَدَ عَلَيْهِ أُمَّةً مِنَ النَّاسِ يَسْقُونَ وَوَجَدَ مِنْ دُونِهِمُ امْرَأَتَيْنِ تَذُودَانِ ۖ قَالَ مَا خَطْبُكُمَا ۖ قَالَتَا لَا نَسْقِي حَتَّىٰ يُصْدِرَ الرِّعَاءُ ۖ وَأَبُونَا شَيْخٌ كَبِيرٌ﴾

२३.
आणि मदयन येथे जेव्हा पाण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा पाहिले की लोकांचा एक समूह तिथे पाणी पाजत आहे आणि दोन स्त्रिया एका बाजूला (आपल्या जनावरांना) रोखून उभ्या असलेल्या दिसल्या.
विचारले की तुमची काय समस्या आहे? त्या म्हणाल्या की जोपर्यंत हे गुराखी परतून जात नाहीत, आम्ही तोपर्यंत पाणी पाजू शकत नाही आणि आमचे पिता फार म्हातारे आहेत.

﴿فَسَقَىٰ لَهُمَا ثُمَّ تَوَلَّىٰ إِلَى الظِّلِّ فَقَالَ رَبِّ إِنِّي لِمَا أَنْزَلْتَ إِلَيَّ مِنْ خَيْرٍ فَقِيرٌ﴾

२४.
यास्तव त्यांनी स्वतः(मुसा) त्या (जनावरां) ना पाणी पाजले, मग सावलीकडे चालत गेले आणि म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! तू जे काही मांगल्या माझ्यावर अवतरित करशील, मी त्याचा गरजवंत आहे.

﴿فَجَاءَتْهُ إِحْدَاهُمَا تَمْشِي عَلَى اسْتِحْيَاءٍ قَالَتْ إِنَّ أَبِي يَدْعُوكَ لِيَجْزِيَكَ أَجْرَ مَا سَقَيْتَ لَنَا ۚ فَلَمَّا جَاءَهُ وَقَصَّ عَلَيْهِ الْقَصَصَ قَالَ لَا تَخَفْ ۖ نَجَوْتَ مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ﴾

२५.
इतक्यात त्या दोघींपैकी एक त्यांच्याकडे लाजत लाजत आली आणि म्हणाली की माझे पिता तुम्हाला बोलवित आहेत, यासाठी की तुम्ही जे आमच्या जनावरांना पाणी पाजले आहे, त्याचा मोबदला द्यावा.
जेव्हा (हजरत मूसा) त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांना आपली सर्व कथा ऐकविली, तेव्हा ते (पिता) म्हणाले, आता भय बाळगू नका. तुम्ही अत्याचारी लोकांपासून मुक्ती प्राप्त केली.

﴿قَالَتْ إِحْدَاهُمَا يَا أَبَتِ اسْتَأْجِرْهُ ۖ إِنَّ خَيْرَ مَنِ اسْتَأْجَرْتَ الْقَوِيُّ الْأَمِينُ﴾

२६.
त्या दोघींपैकी एक म्हणाली, हे पिता! तुम्ही त्यांना मजुरीवर ठेवून घ्या, कारण त्यांना तुम्ही मजुरीवर राखाल त्यांच्यापैकी सर्वांत चांगला तो आहे जो बलवान आणि विश्वस्त असावा.

﴿قَالَ إِنِّي أُرِيدُ أَنْ أُنْكِحَكَ إِحْدَى ابْنَتَيَّ هَاتَيْنِ عَلَىٰ أَنْ تَأْجُرَنِي ثَمَانِيَ حِجَجٍ ۖ فَإِنْ أَتْمَمْتَ عَشْرًا فَمِنْ عِنْدِكَ ۖ وَمَا أُرِيدُ أَنْ أَشُقَّ عَلَيْكَ ۚ سَتَجِدُنِي إِنْ شَاءَ اللَّهُ مِنَ الصَّالِحِينَ﴾

२७.
त्या (वृद्ध पित्या) ने म्हटले की मी आपल्या या दोन मुलींपैकी एकीला तुमच्या विवाह (बंधना) मध्ये देऊ इच्छितो या (महर- स्त्रीधना) वर की तुम्ही आठ वर्षां पर्यंत माझे कामकाज करावे, मात्र जर तुम्ही दहा वर्षां पर्यंत कराल तर हे तुमच्यातर्फे उपकार म्हणून आहे. मी कधीही असे इच्छित नाही की तुमच्यावर कशाही प्रकारची कष्ट- यातना टाकावी. अल्लाहने इच्छिले तर भविष्यात तुम्ही मला एक भला माणूस पाहाल.

﴿قَالَ ذَٰلِكَ بَيْنِي وَبَيْنَكَ ۖ أَيَّمَا الْأَجَلَيْنِ قَضَيْتُ فَلَا عُدْوَانَ عَلَيَّ ۖ وَاللَّهُ عَلَىٰ مَا نَقُولُ وَكِيلٌ﴾

२८. (मूसा अलै.) म्हणाले, ठीक आहे. ही गोष्ट तर माझ्या आणि तुमच्या दरम्यान निश्चित ठरली. मी या दोन्हीं मुदतींपैकी जी मुदत पूर्ण करेन, माझ्यावर जोरजबरदस्ती होऊ नये. आम्ही हे जे काही (आपसात) बोलत आहोत, त्यावर अल्लाह (साक्षी आणि) निरीक्षक आहे.

﴿۞ فَلَمَّا قَضَىٰ مُوسَى الْأَجَلَ وَسَارَ بِأَهْلِهِ آنَسَ مِنْ جَانِبِ الطُّورِ نَارًا قَالَ لِأَهْلِهِ امْكُثُوا إِنِّي آنَسْتُ نَارًا لَعَلِّي آتِيكُمْ مِنْهَا بِخَبَرٍ أَوْ جَذْوَةٍ مِنَ النَّارِ لَعَلَّكُمْ تَصْطَلُونَ﴾

२९. जेव्हा (हजरत) मूसा (अलै.) यांनी मुदत पूर्ण केली आणि आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाले, तेव्हा तूर नावाच्या पर्वताकडे आग पाहिली. आपल्या पत्नीला म्हणाले, थांबा! मी आग पाहिली आहे.
फार संभव आहे की मी तेथून एखादी बातमी आणावी किंवा आगीचा निखारा (विस्तव) आणावा, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे.

﴿فَلَمَّا أَتَاهَا نُودِيَ مِنْ شَاطِئِ الْوَادِ الْأَيْمَنِ فِي الْبُقْعَةِ الْمُبَارَكَةِ مِنَ الشَّجَرَةِ أَنْ يَا مُوسَىٰ إِنِّي أَنَا اللَّهُ رَبُّ الْعَالَمِينَ﴾

३०.
यास्तव, जेव्हा त्या ठिकाणी पोहचले तेव्हा त्या शुभ धरतीच्या मैदानाच्या उजवीकडील झाडामधून साद घातली गेली की, हे मूसा! निःसंशय, मीच अल्लाह आहे, सर्व विश्वांचा पालनकर्ता.

﴿وَأَنْ أَلْقِ عَصَاكَ ۖ فَلَمَّا رَآهَا تَهْتَزُّ كَأَنَّهَا جَانٌّ وَلَّىٰ مُدْبِرًا وَلَمْ يُعَقِّبْ ۚ يَا مُوسَىٰ أَقْبِلْ وَلَا تَخَفْ ۖ إِنَّكَ مِنَ الْآمِنِينَ﴾

३१. आणि हे की आपली काठी खाली टाका.
मग जेव्हा तिला पाहिले, ती सापासारखी वळवळ करीत आहे तेव्हा पाठ फिरवून परतले आणि मागे वळून तोंडही दाखवले नाही. आम्ही फर्माविले, हे मूसा! पुढे या. भयभीत होऊ नका. निःसंशय, तुम्ही सर्व प्रकारे अगदी सुरक्षित आहात.

﴿اسْلُكْ يَدَكَ فِي جَيْبِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ وَاضْمُمْ إِلَيْكَ جَنَاحَكَ مِنَ الرَّهْبِ ۖ فَذَانِكَ بُرْهَانَانِ مِنْ رَبِّكَ إِلَىٰ فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ﴾

३२.
आपला हात आपल्या खिशात घाला, तो कसल्याही प्रकारच्या डागाविना पूर्ण शुभ्र चकाकणारा होऊन बाहेर निघेल आणि भय- दहशतीपासून आपला बचाव करण्याकरिता आपली भुजा आपल्याशी समेटून घ्या. हे दोन चमत्कार (मोजिजे) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहेत, फिरऔन आणि त्याच्या समूहाकडे (प्रस्तुत करण्यासाठी). निःसंशय, ते सर्वच्या सर्व अवज्ञा करणारे दुराचारी लोक आहेत.

﴿قَالَ رَبِّ إِنِّي قَتَلْتُ مِنْهُمْ نَفْسًا فَأَخَافُ أَنْ يَقْتُلُونِ﴾

३३. (मूसा अलै.) म्हणाले, हे पालनकर्त्या! मी त्यांच्या एका माणसाची हत्या केली होती. आता मला भय वाटते की तेही मला ठार करतील.

﴿وَأَخِي هَارُونُ هُوَ أَفْصَحُ مِنِّي لِسَانًا فَأَرْسِلْهُ مَعِيَ رِدْءًا يُصَدِّقُنِي ۖ إِنِّي أَخَافُ أَنْ يُكَذِّبُونِ﴾

३४. आणि माझा भाऊ हारुन माझ्यापेक्षा अधिक साफ बोलणारा आहे. तू त्याला देखील माझा सहाय्यक बनवून माझ्यासोबत पाठव, यासाठी की त्याने मला खरे मानावे. मला तर भीती वाटते की ते सर्व मला खोटे ठरवतील.

﴿قَالَ سَنَشُدُّ عَضُدَكَ بِأَخِيكَ وَنَجْعَلُ لَكُمَا سُلْطَانًا فَلَا يَصِلُونَ إِلَيْكُمَا ۚ بِآيَاتِنَا أَنْتُمَا وَمَنِ اتَّبَعَكُمَا الْغَالِبُونَ﴾

३५.
(अल्लाहने) फर्माविले, आम्ही तुमच्या बंधुद्वारे तुम्हाला मजबूत बाजू प्रदान करू आणि तुम्हा दोघांना वर्चस्वशाली करू, तेव्हा फिरऔनचे लोक तुमच्यापर्यंत पोहचूच शकणार नाहीत. आमच्या निशाण्यांमुळे तुम्ही दोघे आणि तुमचे अनुयायीच सफल ठरतील.

﴿فَلَمَّا جَاءَهُمْ مُوسَىٰ بِآيَاتِنَا بَيِّنَاتٍ قَالُوا مَا هَٰذَا إِلَّا سِحْرٌ مُفْتَرًى وَمَا سَمِعْنَا بِهَٰذَا فِي آبَائِنَا الْأَوَّلِينَ﴾

३६. यास्तव जेव्हा मूसा (अलै.
) त्यांच्याजवळ आम्ही दिलेले उघड चमत्कार (मोजिजे) घेऊन पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर केवळ बनावटी जादू आहे. आम्ही आपल्यापूर्वी होऊन गेलेल्यांच्या काळात असे कधी ऐकले नाही.

﴿وَقَالَ مُوسَىٰ رَبِّي أَعْلَمُ بِمَنْ جَاءَ بِالْهُدَىٰ مِنْ عِنْدِهِ وَمَنْ تَكُونُ لَهُ عَاقِبَةُ الدَّارِ ۖ إِنَّهُ لَا يُفْلِحُ الظَّالِمُونَ﴾

३७.
आणि (हजरत) मूसा म्हणाले, माझा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्याजवळचे मार्गदर्शन घेऊन येता। आणि ज्याच्यासाठी आखिरतचा चांगला परिणाम असतो. निःसंशय, अत्याचारी लोकांचे (कधीही) भले होणार नाही.

﴿وَقَالَ فِرْعَوْنُ يَا أَيُّهَا الْمَلَأُ مَا عَلِمْتُ لَكُمْ مِنْ إِلَٰهٍ غَيْرِي فَأَوْقِدْ لِي يَا هَامَانُ عَلَى الطِّينِ فَاجْعَلْ لِي صَرْحًا لَعَلِّي أَطَّلِعُ إِلَىٰ إِلَٰهِ مُوسَىٰ وَإِنِّي لَأَظُنُّهُ مِنَ الْكَاذِبِينَ﴾

३८. आणि फिरऔन म्हणाला, हे दरबारी लोकांनो! मी तर आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाला तुमचा उपास्य (माबूद) जाणत नाही.
ऐक, हे हामान! तू माझ्यासाठी मातीला आगीत भाजव, मग माझ्यासाठी एक महाल तयार कर, यासाठी की मूसाच्या उपास्याला डोकावून पाहावे. मी तर त्याला खोट्या लोकांपैकीच समजत आहे.

﴿وَاسْتَكْبَرَ هُوَ وَجُنُودُهُ فِي الْأَرْضِ بِغَيْرِ الْحَقِّ وَظَنُّوا أَنَّهُمْ إِلَيْنَا لَا يُرْجَعُونَ﴾

३९.
त्याने आणि त्याच्या सैन्याने नाहक देशात घमेंड केली, आणि असे समजून घेतले की आमच्याकडे परतविले जाणारच नाहीत.

﴿فَأَخَذْنَاهُ وَجُنُودَهُ فَنَبَذْنَاهُمْ فِي الْيَمِّ ۖ فَانْظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الظَّالِمِينَ﴾

४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला धरले आणि समुद्रात बुडवून टाकले. आता पाहा की त्या अत्याचारींचा अंत कसा झाला!

﴿وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَدْعُونَ إِلَى النَّارِ ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ لَا يُنْصَرُونَ﴾

४१.
आणि आम्ही त्यांना असे पेशवे बनविले की लोकांना जहन्नमकडे आमंत्रित करतील आणि कयामतच्या दिवशीही त्यांना मदत केली जाणार नाही.

﴿وَأَتْبَعْنَاهُمْ فِي هَٰذِهِ الدُّنْيَا لَعْنَةً ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ هُمْ مِنَ الْمَقْبُوحِينَ﴾

४२.
आणि आम्ही या जगात देखील त्यांच्या मागे आपली लानत (निर्भर्त्सना) लावली, आणि कयामतच्या दिवशीही ते वाईट अवस्था असणाऱ्या लोकांपैकी असतील.

﴿وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ مِنْ بَعْدِ مَا أَهْلَكْنَا الْقُرُونَ الْأُولَىٰ بَصَائِرَ لِلنَّاسِ وَهُدًى وَرَحْمَةً لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ﴾

४३.
आणि आम्ही पूर्वीच्या काळातील लोकांना नष्ट केल्यानंतर मूसाला असा ग्रंथ प्रदान केला, जो लोकांसाठी प्रमाण, आणि मार्गदर्शन व (अल्लाहची) कृपा होऊन आला होता, यासाठी की त्यांनी बोध ग्रहण करावा.

﴿وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الْغَرْبِيِّ إِذْ قَضَيْنَا إِلَىٰ مُوسَى الْأَمْرَ وَمَا كُنْتَ مِنَ الشَّاهِدِينَ﴾

४४.
आणि तूर पर्वताच्या पश्चिम दिशेकडे जेव्हा आम्ही मूसाला आदेशाची वहयी (प्रकाशना) पोहचविली होती, तेव्हा ना तुम्ही हजर होते, ना तुम्ही पाहणाऱ्यांपैकी होते.

﴿وَلَٰكِنَّا أَنْشَأْنَا قُرُونًا فَتَطَاوَلَ عَلَيْهِمُ الْعُمُرُ ۚ وَمَا كُنْتَ ثَاوِيًا فِي أَهْلِ مَدْيَنَ تَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا وَلَٰكِنَّا كُنَّا مُرْسِلِينَ﴾

४५.
परंतु आम्ही अनेक वंश निर्माण केले, ज्यांच्यावर दीर्घ कालावधी लोटला, आणि ना तुम्ही मदयनचे रहिवाशी होते की त्यांच्यासमोर आमच्या आयतींचे पठण केले असते, किंबहुना पैगंबरांना पाठविणारे आम्हीच राहिलो.

﴿وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الطُّورِ إِذْ نَادَيْنَا وَلَٰكِنْ رَحْمَةً مِنْ رَبِّكَ لِتُنْذِرَ قَوْمًا مَا أَتَاهُمْ مِنْ نَذِيرٍ مِنْ قَبْلِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ﴾

४६. आणि ना तुम्ही तूर पर्वताकडे हजर होते जेव्हा आम्ही (मूसाला) पुकारले होते.
किंबहुना ही तुमच्या पालनकर्त्यातर्फे कृपा होय, यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी खबरदार करणारा पोहचला नाही. नवल नव्हे की त्यांनी बोध प्राप्त करून घ्यावा.

﴿وَلَوْلَا أَنْ تُصِيبَهُمْ مُصِيبَةٌ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ فَيَقُولُوا رَبَّنَا لَوْلَا أَرْسَلْتَ إِلَيْنَا رَسُولًا فَنَتَّبِعَ آيَاتِكَ وَنَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ﴾

४७.
आणि जर असे नसते की त्यांना, त्यांच्या आपल्या हातांनी पुढे पाठविलेल्या कर्मांपायी एखादी कष्ट-यातना पोहचली असती, तेव्हा हे उद्‌गारले असते की आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याकडे एखादा रसूल (पैगंबर) का नाही पाठविला की आम्ही तुझ्या आयतींचे पालन केले असते आणि ईमान राखणाऱ्यांपैकी झालो असतो.

﴿فَلَمَّا جَاءَهُمُ الْحَقُّ مِنْ عِنْدِنَا قَالُوا لَوْلَا أُوتِيَ مِثْلَ مَا أُوتِيَ مُوسَىٰ ۚ أَوَلَمْ يَكْفُرُوا بِمَا أُوتِيَ مُوسَىٰ مِنْ قَبْلُ ۖ قَالُوا سِحْرَانِ تَظَاهَرَا وَقَالُوا إِنَّا بِكُلٍّ كَافِرُونَ﴾

४८.
मग जेव्हा त्यांच्याजवळ आमच्यातर्फे सत्य येऊन पोहचले, तेव्हा म्हणू लागले, का नाही दिली गेली याला तशी वस्तू जशी मूसाला दिली गेली होती.
तर काय मूसाला यापूर्वी जे काही दिले गेले होते त्याचा लोकांनी इन्कार नव्हता केला? (उघडपणे) म्हणाले होते की हे दोघे जादूगार आहेत. जे एकमेकांचे सहाय्यक आहेत आणि आम्ही तर त्या सर्वांचा इन्कार करणारे आहोत.

﴿قُلْ فَأْتُوا بِكِتَابٍ مِنْ عِنْدِ اللَّهِ هُوَ أَهْدَىٰ مِنْهُمَا أَتَّبِعْهُ إِنْ كُنْتُمْ صَادِقِينَ﴾

४९.
त्यांना सांगा की जर सच्चे असाल तर तुम्ही देखील अल्लाहकडून असा एखादा ग्रंथ घेऊन या, जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असावा. मी त्याचेच अनुसरण करेन.

﴿فَإِنْ لَمْ يَسْتَجِيبُوا لَكَ فَاعْلَمْ أَنَّمَا يَتَّبِعُونَ أَهْوَاءَهُمْ ۚ وَمَنْ أَضَلُّ مِمَّنِ اتَّبَعَ هَوَاهُ بِغَيْرِ هُدًى مِنَ اللَّهِ ۚ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ﴾

५०.
मग जर हे तुमचे म्हणणे मानत नसतील तर तुम्ही विश्वास करा की हे केवळ आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करीत आहेत.
आणि त्या माणसापेक्षा अधिक मार्गभ्रष्ट कोण आहे, जो आपल्या इच्छा आकांक्षांमागे धावत असेल, अल्लाहच्या मार्गदर्शनाविना? खात्रीने अल्लाह अत्याचारी लोकांना कदापि मार्ग दाखवित नाही.

﴿۞ وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ﴾

५१. आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी आपली वाणी पाठवित राहिलो यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा.

﴿الَّذِينَ آتَيْنَاهُمُ الْكِتَابَ مِنْ قَبْلِهِ هُمْ بِهِ يُؤْمِنُونَ﴾

५२. ज्या लोकांना आम्ही यापूर्वी ग्रंथ प्रदान केला होता, ते तर यावर ईमान राखतात.

﴿وَإِذَا يُتْلَىٰ عَلَيْهِمْ قَالُوا آمَنَّا بِهِ إِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَبِّنَا إِنَّا كُنَّا مِنْ قَبْلِهِ مُسْلِمِينَ﴾

५३.
आणि जेव्हा (त्याच्या आयती) त्यांच्यासमोर वाचून ऐकविल्या जातात तेव्हा ते असे म्हणतात की आमच्या पालनकर्त्यातर्फे हे सत्य असण्यावर आमचे ईमान (पूर्ण विश्वास) आहे. आम्ही तर याच्या पूर्वीपासून मुस्लिम आहोत.१

﴿أُولَٰئِكَ يُؤْتَوْنَ أَجْرَهُمْ مَرَّتَيْنِ بِمَا صَبَرُوا وَيَدْرَءُونَ بِالْحَسَنَةِ السَّيِّئَةَ وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنْفِقُونَ﴾

५४. हे असे लोक आहेत, ज्यांना आपल्या केलेल्या धीर-संयमाच्या बदल्यात दुप्पट मोबदला प्रदान केला जाईल. हे सत्कर्माद्वारे दुष्कर्माला दूर करतात आणि आम्ही जे यांना देऊन ठेवले आहे, त्यातून देत राहतात.

﴿وَإِذَا سَمِعُوا اللَّغْوَ أَعْرَضُوا عَنْهُ وَقَالُوا لَنَا أَعْمَالُنَا وَلَكُمْ أَعْمَالُكُمْ سَلَامٌ عَلَيْكُمْ لَا نَبْتَغِي الْجَاهِلِينَ﴾

५५.
जेव्हा व्यर्थ गोष्ट कानी पडते, तेव्हा तिच्यापासून अलिप्त होतात आणि म्हणतात की आमचे आचरण आमच्यासाठी आणि तुमचे आचरण तुमच्यासाठी, तुमच्यावर सलाम असो. आम्ही अडाणी लोकांशी वाद घालू इच्छित नाही.

﴿إِنَّكَ لَا تَهْدِي مَنْ أَحْبَبْتَ وَلَٰكِنَّ اللَّهَ يَهْدِي مَنْ يَشَاءُ ۚ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ﴾

५६. तुम्ही वाटेल त्याला ईश-मार्गदर्शन देऊ शकत नाही, किंबहुना अल्लाहच ज्याला इच्छिल त्याला मार्गदर्शन देतो. मार्गदर्शन प्राप्त लोकांना तोच चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿وَقَالُوا إِنْ نَتَّبِعِ الْهُدَىٰ مَعَكَ نُتَخَطَّفْ مِنْ أَرْضِنَا ۚ أَوَلَمْ نُمَكِّنْ لَهُمْ حَرَمًا آمِنًا يُجْبَىٰ إِلَيْهِ ثَمَرَاتُ كُلِّ شَيْءٍ رِزْقًا مِنْ لَدُنَّا وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ﴾

५७.
आणि म्हणू लागले की जर आम्ही आपल्यासोबत मार्गदर्शनाचे अनुसरण करू लागलो तर आमचे, आमच्या भूमी (देशा) तून उच्चाटन केले जाईल.
काय आम्ही त्यांना शांत व सुरिक्षत आणि आदर सन्मानपूर्ण हरममध्ये जागा नाही दिली, जिथे प्रत्येक प्रकारचे फळ आकर्षित होऊन चालत येते जे आमच्याकडून आजिविका स्वरूपात आहे? तथापि त्यांच्यापैकी अधिकांश लोक काही जाणत नाही.

﴿وَكَمْ أَهْلَكْنَا مِنْ قَرْيَةٍ بَطِرَتْ مَعِيشَتَهَا ۖ فَتِلْكَ مَسَاكِنُهُمْ لَمْ تُسْكَنْ مِنْ بَعْدِهِمْ إِلَّا قَلِيلًا ۖ وَكُنَّا نَحْنُ الْوَارِثِينَ﴾

५८. आणि आम्ही अशा अनेक वस्त्या नष्ट करून टाकल्या, ज्या आपल्या सुख विलासात उन्मत्त झाल्या होत्या. ही आहेत त्यांची निवासस्थाने जी त्यांच्यानंतर फारच कमी आबाद केली गेलीत. आणि अखेरीस आम्हीच सर्व काहीचे वारस आहोत.

﴿وَمَا كَانَ رَبُّكَ مُهْلِكَ الْقُرَىٰ حَتَّىٰ يَبْعَثَ فِي أُمِّهَا رَسُولًا يَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا ۚ وَمَا كُنَّا مُهْلِكِي الْقُرَىٰ إِلَّا وَأَهْلُهَا ظَالِمُونَ﴾

५९.
आणि तुमचा पालनकर्ता कधीही कोणा एका वस्तीलाही त्या वेळेपर्यंत नष्ट करीत नाही, जोपर्यंत त्यांच्या एखाद्या मोठ्या वस्तीत आपला एखादा पैगंबर पाठवित नाही, जो त्यांना आमच्या आयती वाचून ऐकविल आणि आम्ही वस्त्यांना अशा वेळी नष्ट करतो, जेव्हा तिथले रहिवाशी अत्याचारी व्हावेत.

﴿وَمَا أُوتِيتُمْ مِنْ شَيْءٍ فَمَتَاعُ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَزِينَتُهَا ۚ وَمَا عِنْدَ اللَّهِ خَيْرٌ وَأَبْقَىٰ ۚ أَفَلَا تَعْقِلُونَ﴾

६०. आणि तुम्हाला जे काही दिले गेले आहे, ती केवळ या जगाच्या जीवनाची सामुग्री आहे आणि त्याची शोभा सजावट आहे. मात्र अल्लाहजवळ जे आहे, ते सर्वांत उत्तम आणि बाकी राहणारे आहे. काय तुम्ही समजत नाहीत?

﴿أَفَمَنْ وَعَدْنَاهُ وَعْدًا حَسَنًا فَهُوَ لَاقِيهِ كَمَنْ مَتَّعْنَاهُ مَتَاعَ الْحَيَاةِ الدُّنْيَا ثُمَّ هُوَ يَوْمَ الْقِيَامَةِ مِنَ الْمُحْضَرِينَ﴾

६१.
काय तो मनुष्य, ज्याला आम्ही चांगला वायदा दिला आहे, ज्यास तो निश्चितपणे प्राप्त करणार आहे, त्या माणसासारखा असू शकतो, ज्याला आम्ही ऐहिक जीवनाची काही सुखे अशीच प्रदान केली, दुसऱ्यांदा शेवटी तो कयामतच्या दिवशी (जखडलेल्या अवस्थेत) हजर केला जाईल?

﴿وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنْتُمْ تَزْعُمُونَ﴾

६२.
आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना पुकारून सांगेल की तुम्ही ज्यांना आपल्या समजुतीनुसार माझा सहभागी ठरवित होते, ते कोठे आहेत?

﴿قَالَ الَّذِينَ حَقَّ عَلَيْهِمُ الْقَوْلُ رَبَّنَا هَٰؤُلَاءِ الَّذِينَ أَغْوَيْنَا أَغْوَيْنَاهُمْ كَمَا غَوَيْنَا ۖ تَبَرَّأْنَا إِلَيْكَ ۖ مَا كَانُوا إِيَّانَا يَعْبُدُونَ﴾

६३.
ज्यांच्यावर आमचे फर्मान लागू झाले, ते उत्तर देतील की, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते होत, ज्यांना आम्ही मार्गभ्रष्ट केले होते. आम्ही त्यांना अशाच प्रकारे पथभ्रष्ट केले, ज्या प्रकारे आम्ही पथभ्रष्ट झालो होतो. आम्ही तुझ्या सेवेत स्वतःला यांच्यापासून वेगळे करतो. हे आमची उपासना करीत नव्हते.

﴿وَقِيلَ ادْعُوا شُرَكَاءَكُمْ فَدَعَوْهُمْ فَلَمْ يَسْتَجِيبُوا لَهُمْ وَرَأَوُا الْعَذَابَ ۚ لَوْ أَنَّهُمْ كَانُوا يَهْتَدُونَ﴾

६४.
आणि त्यांना सांगिले जाईल की आपल्या सहभागी (ईश्वरांना) बोलवा, तेव्हा ते बोलवतील, परंतु ते त्यांना उत्तर देखील देणार नाहीत. आणि सर्व अज़ाब (अल्लाहची शिक्षा- यातना) पाहतील. या लोकांनी मार्गदर्शन प्राप्त केले असते तर बरे झाले असते!

﴿وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ مَاذَا أَجَبْتُمُ الْمُرْسَلِينَ﴾

६५. आणि त्या दिवशी त्यांना बोलावून विचारेल की तुम्ही पैगंबरांना काय उत्तर दिले होते?१

﴿فَعَمِيَتْ عَلَيْهِمُ الْأَنْبَاءُ يَوْمَئِذٍ فَهُمْ لَا يَتَسَاءَلُونَ﴾

६६. मग तर त्या दिवशी त्यांचे सगळे समाचार आंधळे होतील आणि ते एकमेकांना काही विचारणारही नाहीत.

﴿فَأَمَّا مَنْ تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَعَسَىٰ أَنْ يَكُونَ مِنَ الْمُفْلِحِينَ﴾

६७.
परंतु जो मनुष्य (अल्लाहजवळ) माफी मागून ईमान राखेल आणि सत्कर्म करीत राहील, निश्चितच तो सफलता प्राप्त करणाऱ्यांपैकी ठरेल.

﴿وَرَبُّكَ يَخْلُقُ مَا يَشَاءُ وَيَخْتَارُ ۗ مَا كَانَ لَهُمُ الْخِيَرَةُ ۚ سُبْحَانَ اللَّهِ وَتَعَالَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ﴾

६८.
आणि तुमचा पालनकर्ता जे इच्छितो, निर्माण करतो, आणि ज्याला इच्छितो, त्यांच्यामधून निवडून घेतो, कोणाला कसलाही अधिकार नाही. अल्लाहकरिताच पाकी (पवित्रता) आहे. तो अतिशय उच्च आहे त्या प्रत्येक वस्तूपासून, ज्याला लोक (अल्लाहचा) सहभागी बनवितात.

﴿وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ﴾

६९. आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही जाणतो, जे काही ते आपल्या छातीत (हृदयात) लपवितात, आणि जे काही व्यक्त करतात.

﴿وَهُوَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ لَهُ الْحَمْدُ فِي الْأُولَىٰ وَالْآخِرَةِ ۖ وَلَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾

७०. आणि तोच अल्लाह आहे, त्याच्याखेरीज उपासना करण्यायोग्य असा दुसरा कोणीही नाही. या जगात आणि आखिरतमध्ये त्याचीच प्रशंसा आहे. त्याचाच आदेश आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल.

﴿قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُمْ بِضِيَاءٍ ۖ أَفَلَا تَسْمَعُونَ﴾

७१.
सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर रात्रच रात्र आच्छादित करील तर अल्लाहखेरीज ते कोणते आराध्य दैवत आहे, जे तुमच्यावर दिवसाचा प्रकाश आणील? काय तुम्ही ऐकत नाही?

﴿قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ النَّهَارَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُمْ بِلَيْلٍ تَسْكُنُونَ فِيهِ ۖ أَفَلَا تُبْصِرُونَ﴾

७२.
त्यांना विचारा, हाही विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर दिवसच दिवस ठेवील तर अशा स्थितीतही अल्लाहखेरीज ते कोणते दैवत (माबूद) आहे जे तुमच्याजवळ रात्र आणील, ज्यात तुम्ही आराम करू शकावे. काय तुम्ही पाहत नाहीत?

﴿وَمِنْ رَحْمَتِهِ جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ لِتَسْكُنُوا فِيهِ وَلِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ﴾

७३.
आणि त्यानेच तुमच्यासाठी आपल्या दया कृपेने दिवस रात्र निर्धारित केले आहेत, यासाठी की रात्री तुम्ही आराम करू शकावे आणि दिवसा त्याच्या (पाठविलेल्या) आजिविकेचा शोध घ्यावा. हे अशासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.

﴿وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنْتُمْ تَزْعُمُونَ﴾

७४. आणि ज्या दिवशी त्यांना हाक मारून अल्लाह फर्माविल की ज्यांना तुम्ही माझा सहभागी समजत होते, ते आहेत कोठे?

﴿وَنَزَعْنَا مِنْ كُلِّ أُمَّةٍ شَهِيدًا فَقُلْنَا هَاتُوا بُرْهَانَكُمْ فَعَلِمُوا أَنَّ الْحَقَّ لِلَّهِ وَضَلَّ عَنْهُمْ مَا كَانُوا يَفْتَرُونَ﴾

७५.
आणि तुम्ही प्रत्येक जनसमुदायातून एक साक्षी वेगळा करू आणि सांगू की आपला पुरावा सादर करा, जेव्हा त्या वेळी जाणून घेतील की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे आणि जे काही असत्य ते रचत राहिले ते सर्व त्यांच्या जवळून हरवले जाईल.

﴿۞ إِنَّ قَارُونَ كَانَ مِنْ قَوْمِ مُوسَىٰ فَبَغَىٰ عَلَيْهِمْ ۖ وَآتَيْنَاهُ مِنَ الْكُنُوزِ مَا إِنَّ مَفَاتِحَهُ لَتَنُوءُ بِالْعُصْبَةِ أُولِي الْقُوَّةِ إِذْ قَالَ لَهُ قَوْمُهُ لَا تَفْرَحْ ۖ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْفَرِحِينَ﴾

७६. कारुन मूसाच्या जनसमूहापैकी होता, परंतु तो त्याच्यावर अत्याचार करू लागला होता.
आम्ही त्याला एवढा प्रचंड खजिना देऊन ठेवला होता की कित्येक शक्तिशाली लोक मोठ्या कष्टाने त्याच्या चाव्या उचलू शकत होते. एकदा त्याच्या जनसमूहाच्या लोकांनी त्याला म्हटले की दिमाख दाखवू नकोस. अल्लाह, दिमाख दाखविणाऱ्यांशी प्रेम करीत नाही.

﴿وَابْتَغِ فِيمَا آتَاكَ اللَّهُ الدَّارَ الْآخِرَةَ ۖ وَلَا تَنْسَ نَصِيبَكَ مِنَ الدُّنْيَا ۖ وَأَحْسِنْ كَمَا أَحْسَنَ اللَّهُ إِلَيْكَ ۖ وَلَا تَبْغِ الْفَسَادَ فِي الْأَرْضِ ۖ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْمُفْسِدِينَ﴾

७७.
आणि जे काही अल्लाहने तुला प्रदान केले आहे, त्यातून आखिरतच्या घराचा शोधही ठेव आणि आपला ऐहिक हिस्साही विसरू नकोस आणि ज्या प्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केला आहे, तू देखील सद्‌वर्तन कर आणि देशात उत्पात (माजविण्या) ची इच्छा धरू नकोस. निश्चितच, अल्लाह उत्पात (फसाद) माजविणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.

﴿قَالَ إِنَّمَا أُوتِيتُهُ عَلَىٰ عِلْمٍ عِنْدِي ۚ أَوَلَمْ يَعْلَمْ أَنَّ اللَّهَ قَدْ أَهْلَكَ مِنْ قَبْلِهِ مِنَ الْقُرُونِ مَنْ هُوَ أَشَدُّ مِنْهُ قُوَّةً وَأَكْثَرُ جَمْعًا ۚ وَلَا يُسْأَلُ عَنْ ذُنُوبِهِمُ الْمُجْرِمُونَ﴾

७८. कारुन म्हणाला, हे सर्व काही मला माझ्या स्वतःच्या ज्ञानामुळे दिले गेले आहे.
काय आतापर्यंत त्याला हे माहीत झाले नाही की अल्लाहने त्याच्यापूर्वी कितीतरी वस्तीवाल्यांना नष्ट करून टाकले जे त्याच्यापेक्षा जास्त बलवान आणि जास्त धनवान होते, आणि अपराध्यांना त्यांच्या अपराधांविषयी अशा वेळी विचारले जात नाही.

﴿فَخَرَجَ عَلَىٰ قَوْمِهِ فِي زِينَتِهِ ۖ قَالَ الَّذِينَ يُرِيدُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا يَا لَيْتَ لَنَا مِثْلَ مَا أُوتِيَ قَارُونُ إِنَّهُ لَذُو حَظٍّ عَظِيمٍ﴾

७९.
यास्तव (कारुन) संपूर्ण थाटामाटासह आपल्या जनसमूहाच्या जमावात निघाला, तेव्हा ऐहिक जीवनाची आसक्ती बाळगणारे म्हणाले, आम्हाला कशाही प्रकारे ते लाभले असते, जे कारुनला दिले गेले आहे, तर किती बरे झाले असते! हा तर मोठा भाग्यशाली आहे.

﴿وَقَالَ الَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ وَيْلَكُمْ ثَوَابُ اللَّهِ خَيْرٌ لِمَنْ آمَنَ وَعَمِلَ صَالِحًا وَلَا يُلَقَّاهَا إِلَّا الصَّابِرُونَ﴾

८०.
आणि विद्वान (धर्मज्ञानी) लोक त्यांना समजावू लागले की मोठ्या खेदाची गोष्ट आहे! उत्तम गोष्ट तर ती आहे जी नेकी (सत्कर्मा) च्या रूपात त्यांना लाभेल, जे अल्लाहवर ईमान राखतील आणि सत्कर्म करीत राहतील. ही गोष्ट त्यांच्याच मनात टाकली (प्रेरित केली) जाते, जे धैर्यशील आणि सहनशील असावेत.

﴿فَخَسَفْنَا بِهِ وَبِدَارِهِ الْأَرْضَ فَمَا كَانَ لَهُ مِنْ فِئَةٍ يَنْصُرُونَهُ مِنْ دُونِ اللَّهِ وَمَا كَانَ مِنَ الْمُنْتَصِرِينَ﴾

८१.
(शेवटी) आम्ही त्याला त्याच्या महालासमवेत जमिनीत धसवले आणि अल्लाहखेरीज, कोणताही समूह त्याच्या मदतीकरिता तयार झाला नाही, ना तो स्वतःला वाचविणाऱ्यांपैकी होऊ शकला.

﴿وَأَصْبَحَ الَّذِينَ تَمَنَّوْا مَكَانَهُ بِالْأَمْسِ يَقُولُونَ وَيْكَأَنَّ اللَّهَ يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَنْ يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ وَيَقْدِرُ ۖ لَوْلَا أَنْ مَنَّ اللَّهُ عَلَيْنَا لَخَسَفَ بِنَا ۖ وَيْكَأَنَّهُ لَا يُفْلِحُ الْكَافِرُونَ﴾

८२.
आणि जे लोक कालपर्यंत त्याच्या पदापर्यंत पोहचण्याची आशा करीत होते, ते आज म्हणू लागले की, काय तुम्ही पाहत नाही की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याच्यासाठी इ्‌च्छितो आजिविका (रोजी) व्यापक करतो, आणि कमी देखील. जर अल्लाहने आमच्यावर उपकार केला नसता तर आम्हालाही धसविले असते. काय पाहत नाही की कृतघ्न लोकांना सफलता कदापि प्राप्त होत नाही.

﴿تِلْكَ الدَّارُ الْآخِرَةُ نَجْعَلُهَا لِلَّذِينَ لَا يُرِيدُونَ عُلُوًّا فِي الْأَرْضِ وَلَا فَسَادًا ۚ وَالْعَاقِبَةُ لِلْمُتَّقِينَ﴾

८३.
आखिरतचे हे (भले) घर आम्ही अशाच लोकांसाठी निश्चित करतो जे धरतीवर घमेंड आणि गर्व करीत नाही, आणि ना उत्पात (फसाद) करू इच्छितात आणि अल्लाहचे भय राखून आचरण करणाऱ्यांकरिता फार चांगला मोबदला आहे.

﴿مَنْ جَاءَ بِالْحَسَنَةِ فَلَهُ خَيْرٌ مِنْهَا ۖ وَمَنْ جَاءَ بِالسَّيِّئَةِ فَلَا يُجْزَى الَّذِينَ عَمِلُوا السَّيِّئَاتِ إِلَّا مَا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

८४.
जो मनुष्य नेकी (सत्कर्म) घेऊन येईल, त्याला त्याहून अधिक चांगले लाभेल आणि जो दुष्कर्म घेऊन येईल तर अशा दुराचारी लोकांना त्यांच्या त्याच आचरणाचा मोबदला दिला जाईल, जे ते करीत होते.

﴿إِنَّ الَّذِي فَرَضَ عَلَيْكَ الْقُرْآنَ لَرَادُّكَ إِلَىٰ مَعَادٍ ۚ قُلْ رَبِّي أَعْلَمُ مَنْ جَاءَ بِالْهُدَىٰ وَمَنْ هُوَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

८५. ज्या (अल्लाह) ने तुमच्यावर कुरआन अवतरित केले आहे तो तुम्हाला दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर आणणार आहे.
सांगा, माझा पालनकर्ता त्यालाही चांगल्या प्रकारे जाणतो, त्याने मार्गदर्शन प्राप्त केले आहे, आणि त्यालाही जो उघड मार्गभ्रष्टतेत पडला आहे.

﴿وَمَا كُنْتَ تَرْجُو أَنْ يُلْقَىٰ إِلَيْكَ الْكِتَابُ إِلَّا رَحْمَةً مِنْ رَبِّكَ ۖ فَلَا تَكُونَنَّ ظَهِيرًا لِلْكَافِرِينَ﴾

८६.
आणि तुम्ही कधीही विचारही केला नव्हता की तुमच्यावर ग्रंथ अवतरित केला जाईल, परंतु हा तुमच्या पालनकर्त्याच्या दया कृपेने (अवतरित झाला) आता तुम्ही कधीही काफिरांचे सहाय्यक होऊ नये.

﴿وَلَا يَصُدُّنَّكَ عَنْ آيَاتِ اللَّهِ بَعْدَ إِذْ أُنْزِلَتْ إِلَيْكَ ۖ وَادْعُ إِلَىٰ رَبِّكَ ۖ وَلَا تَكُونَنَّ مِنَ الْمُشْرِكِينَ﴾

८७.
(लक्षात ठेवा) या काफिरांनी तुम्हाला, अल्लाहच्या आयतींचा प्रचार करण्यापासून रोखू नये, यानंतर की त्या तुमच्यावर अवतरित केल्या जाण्यात. तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे बोलवित राहा, आणि अनेकेश्वरवादी लोकांपैकी होऊ नका.

﴿وَلَا تَدْعُ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ ۘ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۚ كُلُّ شَيْءٍ هَالِكٌ إِلَّا وَجْهَهُ ۚ لَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾

८८. आणि अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या दैवताला पुकारू नका.१ अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासना करण्या योग्य नाही. प्रत्येक वस्तू नाश पावणार आहे, परंतु त्याचे मुख,२ त्याचेच शासन आहे आणि तुम्ही त्याच्याचकडे परतविले जाल.

الترجمات والتفاسير لهذه السورة: