يوسف

تفسير سورة يوسف

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الر ۚ تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ﴾

१. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत.

﴿إِنَّا أَنْزَلْنَاهُ قُرْآنًا عَرَبِيًّا لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ﴾

२. निःसंशय, आम्ही हे अरबी कुरआन अवतरीत केले आहे, यासाठी की तुम्ही समजू शकावे.

﴿نَحْنُ نَقُصُّ عَلَيْكَ أَحْسَنَ الْقَصَصِ بِمَا أَوْحَيْنَا إِلَيْكَ هَٰذَا الْقُرْآنَ وَإِنْ كُنْتَ مِنْ قَبْلِهِ لَمِنَ الْغَافِلِينَ﴾

३.
आम्ही तुमच्यासमोर सर्वांत उत्तम निवेदन प्रस्तुत करतो, या कारणास्तव की आम्ही आपल्याकडे हा कुरआन वहयी (अवतरित संदेशा) द्वारे उतरविला आहे आणि निःसंशय याच्यापूर्वी तुम्ही न जाणणाऱ्यांपैकी होते.१

﴿إِذْ قَالَ يُوسُفُ لِأَبِيهِ يَا أَبَتِ إِنِّي رَأَيْتُ أَحَدَ عَشَرَ كَوْكَبًا وَالشَّمْسَ وَالْقَمَرَ رَأَيْتُهُمْ لِي سَاجِدِينَ﴾

४.
जेव्हा यूसुफ आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! मी अकरा ताऱ्यांना आणि सूर्य-चंद्राला पाहिले की ते सर्व मला सजदा करीत आहेत.

﴿قَالَ يَا بُنَيَّ لَا تَقْصُصْ رُؤْيَاكَ عَلَىٰ إِخْوَتِكَ فَيَكِيدُوا لَكَ كَيْدًا ۖ إِنَّ الشَّيْطَانَ لِلْإِنْسَانِ عَدُوٌّ مُبِينٌ﴾

५.
(याकूब) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आपल्या या स्वप्नाची चर्चा आपल्या भावांजवळ करू नकोस, असे न व्हावे की त्यांनी तुझ्याशी काही कपट करावे. सैतान तर मानवाचा उघड शत्रू आहे.

﴿وَكَذَٰلِكَ يَجْتَبِيكَ رَبُّكَ وَيُعَلِّمُكَ مِنْ تَأْوِيلِ الْأَحَادِيثِ وَيُتِمُّ نِعْمَتَهُ عَلَيْكَ وَعَلَىٰ آلِ يَعْقُوبَ كَمَا أَتَمَّهَا عَلَىٰ أَبَوَيْكَ مِنْ قَبْلُ إِبْرَاهِيمَ وَإِسْحَاقَ ۚ إِنَّ رَبَّكَ عَلِيمٌ حَكِيمٌ﴾

६.
आणि अशा प्रकारे तुमचा पालनकर्ता तुमची निवड करेल आणि तुम्हाला घटना व मामल्याचा खुलासा (अर्थात स्वप्नफल) सांगण्याची शिकवण देईल आणि आपली कृपा-देणगी तुम्हाला पूर्णतः प्रदान करील, आणि याकूबच्या परिवारालाही, जशी त्याने यापूर्वी तुमच्या दोन पूर्वजांना अर्थात इब्राहीम आणि इसहाकलाही भरपूर कृपा-देणगी प्रदान केली. निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाही आहे.

﴿۞ لَقَدْ كَانَ فِي يُوسُفَ وَإِخْوَتِهِ آيَاتٌ لِلسَّائِلِينَ﴾

७. निःसंशय, यूसुफ आणि त्याच्या भावांमध्ये विचारणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.

﴿إِذْ قَالُوا لَيُوسُفُ وَأَخُوهُ أَحَبُّ إِلَىٰ أَبِينَا مِنَّا وَنَحْنُ عُصْبَةٌ إِنَّ أَبَانَا لَفِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

८.
जेव्हा यूसुफचे भाऊ म्हणाले, यूसुफ आणि त्याचा भाऊ आमच्या पित्याला आमच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत, वास्तविक आम्ही लोक एक शक्तिशाली जमात आहोत. निश्चितच आमचे पिता स्पष्ट चूक करीत आहेत.

﴿اقْتُلُوا يُوسُفَ أَوِ اطْرَحُوهُ أَرْضًا يَخْلُ لَكُمْ وَجْهُ أَبِيكُمْ وَتَكُونُوا مِنْ بَعْدِهِ قَوْمًا صَالِحِينَ﴾

९.
यूसुफची हत्या करून टाका किंवा त्याला एखाद्या (अज्ञात) स्थळी पोहचवा, यासाठी की तुमच्या पित्याचे ध्यान तुमच्याकडे व्हावे. त्यानंतर तुम्ही नेक सदाचारी व्हा.

﴿قَالَ قَائِلٌ مِنْهُمْ لَا تَقْتُلُوا يُوسُفَ وَأَلْقُوهُ فِي غَيَابَتِ الْجُبِّ يَلْتَقِطْهُ بَعْضُ السَّيَّارَةِ إِنْ كُنْتُمْ فَاعِلِينَ﴾

१०.
त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, यूसुफची हत्या करू नका, किंबहुना त्याला एखाद्या ओसाड विहिरीच्या तळाशी टाकून द्या, यासाठी की त्याला एखाद्या प्रवाशी काफिल्याने उचलून न्यावे. जर तुम्हाला काही करायचेच आहे तर असेच करा.

﴿قَالُوا يَا أَبَانَا مَا لَكَ لَا تَأْمَنَّا عَلَىٰ يُوسُفَ وَإِنَّا لَهُ لَنَاصِحُونَ﴾

११.
ते म्हणाले, हे पिता! शेवटी तुम्ही यूसुफच्या बाबतीत आमच्यावर विश्वास का नाही ठेवत, आम्ही तर त्याचे हितचिंतक आहोत.

﴿أَرْسِلْهُ مَعَنَا غَدًا يَرْتَعْ وَيَلْعَبْ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ﴾

१२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने खूप खावे प्यावे आणि खेळावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो.

﴿قَالَ إِنِّي لَيَحْزُنُنِي أَنْ تَذْهَبُوا بِهِ وَأَخَافُ أَنْ يَأْكُلَهُ الذِّئْبُ وَأَنْتُمْ عَنْهُ غَافِلُونَ﴾

१३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील.

﴿قَالُوا لَئِنْ أَكَلَهُ الذِّئْبُ وَنَحْنُ عُصْبَةٌ إِنَّا إِذًا لَخَاسِرُونَ﴾

१४.
त्यांनी उत्तर दिले, आमच्यासारख्या मोठ्या शक्तिशाली समूहाच्या उपस्थितीत जर त्याला लांडगा खाऊन टाकील तर आम्ही अगदी निकामी ठरू.

﴿فَلَمَّا ذَهَبُوا بِهِ وَأَجْمَعُوا أَنْ يَجْعَلُوهُ فِي غَيَابَتِ الْجُبِّ ۚ وَأَوْحَيْنَا إِلَيْهِ لَتُنَبِّئَنَّهُمْ بِأَمْرِهِمْ هَٰذَا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ﴾

१५.
मग जेव्हा त्याला घेऊन निघाले आणि सर्वांनी मिळून दृढनिश्चय केला की त्याला ओसाड व खूप खोल अशा विहिरीच्या तळाशी फेकून द्यावे.
आम्ही यूसुफकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली की निःसंशय (आता ती वेळ येत आहे) की तुम्ही त्यांना या गोष्टीची खबर अशा स्थितीत सांगाल की ते जाणतही नसतील.

﴿وَجَاءُوا أَبَاهُمْ عِشَاءً يَبْكُونَ﴾

१६. आणि रात्री (इशा) च्या वेळेस (ते सर्व) आपल्या पित्याजवळ रडत रडत पोहोचले.

﴿قَالُوا يَا أَبَانَا إِنَّا ذَهَبْنَا نَسْتَبِقُ وَتَرَكْنَا يُوسُفَ عِنْدَ مَتَاعِنَا فَأَكَلَهُ الذِّئْبُ ۖ وَمَا أَنْتَ بِمُؤْمِنٍ لَنَا وَلَوْ كُنَّا صَادِقِينَ﴾

१७.
आणि म्हणू लागले की प्रिय पिता! आम्ही आपसात धावण्याच्या शर्यतीत लागलो, आणि यूसुफला आमच्या सामानाजवळ सोडले तेव्हा लांडग्याने त्याला खाऊन टाकले. तुम्ही तर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, मग आम्ही पुरेपूर सच्चे असलो तरी.

﴿وَجَاءُوا عَلَىٰ قَمِيصِهِ بِدَمٍ كَذِبٍ ۚ قَالَ بَلْ سَوَّلَتْ لَكُمْ أَنْفُسُكُمْ أَمْرًا ۖ فَصَبْرٌ جَمِيلٌ ۖ وَاللَّهُ الْمُسْتَعَانُ عَلَىٰ مَا تَصِفُونَ﴾

१८. आणि यूसुफचा सदरा खोट्या रक्ताने भिजवून आणला.
(पिता) म्हणाले, (असे नाही घडले) किंबहुना तुम्ही आपल्या मनाने एक गोष्ट रचली आहे, आता सबुरी करणेच उत्तम आहे आणि तुमच्या मनगढत गोष्टींवर अल्लाहशीच मदतीची प्रार्थना (दुआ) आहे.

﴿وَجَاءَتْ سَيَّارَةٌ فَأَرْسَلُوا وَارِدَهُمْ فَأَدْلَىٰ دَلْوَهُ ۖ قَالَ يَا بُشْرَىٰ هَٰذَا غُلَامٌ ۚ وَأَسَرُّوهُ بِضَاعَةً ۚ وَاللَّهُ عَلِيمٌ بِمَا يَعْمَلُونَ﴾

१९.
आणि एक प्रवासी काफिला आला आणि त्यांनी आपल्या पाणी आणणाऱ्याला पाठविले, त्याने आपला डोल (बादली) विहीरीत टाकला, उद्‌गारला, वाहवा! काय आनंदाची गोष्ट आहे! हा तर एक बालक आहे. त्यांनी त्याला व्यापार-सामुग्री समजून लपविले आणि जे काही ते करीत होते, अल्लाह चांगले जाणून होता.

﴿وَشَرَوْهُ بِثَمَنٍ بَخْسٍ دَرَاهِمَ مَعْدُودَةٍ وَكَانُوا فِيهِ مِنَ الزَّاهِدِينَ﴾

२०. आणि त्यांनी त्याला फारच थोड्या किंमतीत (अर्थात) काही मोजक्या दिरमांवर विकून टाकले. ते तर यूसुफच्या बाबतीत अधिक रुचिहीन होते.

﴿وَقَالَ الَّذِي اشْتَرَاهُ مِنْ مِصْرَ لِامْرَأَتِهِ أَكْرِمِي مَثْوَاهُ عَسَىٰ أَنْ يَنْفَعَنَا أَوْ نَتَّخِذَهُ وَلَدًا ۚ وَكَذَٰلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِي الْأَرْضِ وَلِنُعَلِّمَهُ مِنْ تَأْوِيلِ الْأَحَادِيثِ ۚ وَاللَّهُ غَالِبٌ عَلَىٰ أَمْرِهِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾

२१.
आणि मिस्र देशाच्या लोकांपैकी, ज्याने त्याला खरेदी केले होते, तो आपल्या पत्नीस म्हणाला की याला आदर-सन्मानपूर्वक ठेवा. संभवतः हा आम्हाला लाभ पोहचवील किंवा आम्ही याला आपला पुत्रच बनवून घेऊ.
अशा प्रकारे आम्ही (मिस्रच्या) धरतीवर यूसुफचे पाय स्थिर केले, यासाठी की आम्ही त्याला स्वप्नाचा खुलासा सांगण्याचे काही ज्ञान शिकवावे अल्लाह आपल्या इराद्याला पूर्ण करण्याचे सामर्थ्य राखतो, परंतु अधिकांश लोक अनभिज्ञ असतात.

﴿وَلَمَّا بَلَغَ أَشُدَّهُ آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا ۚ وَكَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ﴾

२२.
आणि जेव्हा (यूसुफ) पूर्ण तारुण्यावस्थेस पोहोचले, आम्ही त्यांना फैसला करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला देतो.

﴿وَرَاوَدَتْهُ الَّتِي هُوَ فِي بَيْتِهَا عَنْ نَفْسِهِ وَغَلَّقَتِ الْأَبْوَابَ وَقَالَتْ هَيْتَ لَكَ ۚ قَالَ مَعَاذَ اللَّهِ ۖ إِنَّهُ رَبِّي أَحْسَنَ مَثْوَايَ ۖ إِنَّهُ لَا يُفْلِحُ الظَّالِمُونَ﴾

२३.
आणि त्या स्त्रीने, जिच्या घरी यूसुफ होते, यूसुफला फुसलावणे सुरू केले, जेणेकरून त्याने आपल्या मनावर ताबा ठेवणे सोडून द्यावे आणि दार बंद करून ती म्हणू लागली, या (जवळ) या. (यूसुफ) म्हणाले, अल्लाह रक्षण करो! तो माझा पालनकर्ता आहे. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहे. निश्चितच अन्याय करणाऱ्यांचे कदापि भले होत नाही.

﴿وَلَقَدْ هَمَّتْ بِهِ ۖ وَهَمَّ بِهَا لَوْلَا أَنْ رَأَىٰ بُرْهَانَ رَبِّهِ ۚ كَذَٰلِكَ لِنَصْرِفَ عَنْهُ السُّوءَ وَالْفَحْشَاءَ ۚ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُخْلَصِينَ﴾

२४.
आणि त्या स्त्रीने यूसुफची इच्छा धरली आणि यूसुफनेही तिची इच्छा धरली असती जर त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे प्रमाण पाहून घेतले नसते. असेच घडले, यासाठी की आम्ही यूसुफपासून दुष्कर्म आणि निर्लज्जता दूर करावी. निःसंशय ते आमच्या निवडक दासांपैकी होते.

﴿وَاسْتَبَقَا الْبَابَ وَقَدَّتْ قَمِيصَهُ مِنْ دُبُرٍ وَأَلْفَيَا سَيِّدَهَا لَدَى الْبَابِ ۚ قَالَتْ مَا جَزَاءُ مَنْ أَرَادَ بِأَهْلِكَ سُوءًا إِلَّا أَنْ يُسْجَنَ أَوْ عَذَابٌ أَلِيمٌ﴾

२५. आणि दोघेजण दाराकडे धावले.
त्या स्त्रीने यूसुफचे वस्त्र (सदरा) मागच्या बाजूने ओढून फाडले आणि त्या स्त्रीचा पती दोघांना दाराशीच मिळाला, तेव्हा ती म्हणू लागली की जो मनुष्य तुमच्या पत्नीशी वाईट इच्छा धरेल, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला कैदी बनविले जावे किंवा दुसरी एखादी कठोर शिक्षा दिली जावी.

﴿قَالَ هِيَ رَاوَدَتْنِي عَنْ نَفْسِي ۚ وَشَهِدَ شَاهِدٌ مِنْ أَهْلِهَا إِنْ كَانَ قَمِيصُهُ قُدَّ مِنْ قُبُلٍ فَصَدَقَتْ وَهُوَ مِنَ الْكَاذِبِينَ﴾

२६.
(यूसुफ) म्हणाले, ही स्त्रीच मला फूस लावून (माझ्या मनोकामनाच्या रक्षणात बेपर्वा करू) इच्छित होती आणि स्त्रीच्या समाजाच्या एका माणसाने साक्ष दिली की जर त्याचा सदरा पुढच्या बाजूने फाटला असेल तर स्त्री (आपल्या कथनात) खरी आहे आणि यूसुफ खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे.

﴿وَإِنْ كَانَ قَمِيصُهُ قُدَّ مِنْ دُبُرٍ فَكَذَبَتْ وَهُوَ مِنَ الصَّادِقِينَ﴾

२७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे, तर स्त्री खोटी आहे आणि यूसुफ खऱ्यांपैकी आहे.

﴿فَلَمَّا رَأَىٰ قَمِيصَهُ قُدَّ مِنْ دُبُرٍ قَالَ إِنَّهُ مِنْ كَيْدِكُنَّ ۖ إِنَّ كَيْدَكُنَّ عَظِيمٌ﴾

२८.
तर पतीने जेव्हा पाहिले की सदरा मागच्या बाजूने फाटला आहे, तेव्हा स्पष्ट सांगितले की ही तर तुम्हा स्त्रियांची चाल आहे. निःसंशय तुमचे डावपेच मोठे भारी आहेत.

﴿يُوسُفُ أَعْرِضْ عَنْ هَٰذَا ۚ وَاسْتَغْفِرِي لِذَنْبِكِ ۖ إِنَّكِ كُنْتِ مِنَ الْخَاطِئِينَ﴾

२९. यूसुफ, आता या गोष्टीला दृष्टीआड करा आणि (हे स्त्री!) आपल्या अपराधांची क्षमा माग. निःसंशय तू अपराध्यांपैकी आहेस.

﴿۞ وَقَالَ نِسْوَةٌ فِي الْمَدِينَةِ امْرَأَتُ الْعَزِيزِ تُرَاوِدُ فَتَاهَا عَنْ نَفْسِهِ ۖ قَدْ شَغَفَهَا حُبًّا ۖ إِنَّا لَنَرَاهَا فِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

३०.
आणि मग शहरातल्या स्त्रियांमध्ये चर्चा होऊ लागली की अजीजची पत्नी आपल्या (तरुण) गुलामाला आपली गरज पूर्ण करण्यासाठी बहकविण्यात व फुसलाविण्यात लागलेली असते. तिच्या मनात यूसुफचे प्रेम (ठाण मांडून) बसले आहे. आमच्या मते तर ती उघड चूक करीत आहे.

﴿فَلَمَّا سَمِعَتْ بِمَكْرِهِنَّ أَرْسَلَتْ إِلَيْهِنَّ وَأَعْتَدَتْ لَهُنَّ مُتَّكَأً وَآتَتْ كُلَّ وَاحِدَةٍ مِنْهُنَّ سِكِّينًا وَقَالَتِ اخْرُجْ عَلَيْهِنَّ ۖ فَلَمَّا رَأَيْنَهُ أَكْبَرْنَهُ وَقَطَّعْنَ أَيْدِيَهُنَّ وَقُلْنَ حَاشَ لِلَّهِ مَا هَٰذَا بَشَرًا إِنْ هَٰذَا إِلَّا مَلَكٌ كَرِيمٌ﴾

३१.
तिने जेव्हा त्यांची ही कुत्सित निंदा ऐकली, तेव्हा त्यांना (भोजनासाठी) आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी एका सभेचा इतमामही केला आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला एक एक चाकू दिला आणि म्हणाली, हे यूसुफ! यांच्या समोर या.
त्या स्त्रियांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा खूप मोठे जाणले आणि (नकळत) आपले हात कापून घेतले आणि त्या उद्‌गारल्या, पाकी (पवित्रता) अल्लाहकरिता आहे. ऱ मनुष्य कदापि नाही. हा तर खात्रीने कोणी फार मोठा फरिश्ता आहे.

﴿قَالَتْ فَذَٰلِكُنَّ الَّذِي لُمْتُنَّنِي فِيهِ ۖ وَلَقَدْ رَاوَدْتُهُ عَنْ نَفْسِهِ فَاسْتَعْصَمَ ۖ وَلَئِنْ لَمْ يَفْعَلْ مَا آمُرُهُ لَيُسْجَنَنَّ وَلَيَكُونًا مِنَ الصَّاغِرِينَ﴾

३२. (त्या वेळी मिस्रच्या अजीजची पत्नी) म्हणाली, हाच तो, ज्याच्याविषयी तुम्ही मला बरे-वाईट बोलत होत्या.
मी सर्व प्रकारे याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करू इच्छिले, परंतु हा निष्कलंक राहिला आणि जे काही मी याला सांगत आहे, जर ते हा करणार नाही तर निश्चितच याला कैदी बनविले जाईल आणि खात्रीने हा मोठा अपमानित होईल.

﴿قَالَ رَبِّ السِّجْنُ أَحَبُّ إِلَيَّ مِمَّا يَدْعُونَنِي إِلَيْهِ ۖ وَإِلَّا تَصْرِفْ عَنِّي كَيْدَهُنَّ أَصْبُ إِلَيْهِنَّ وَأَكُنْ مِنَ الْجَاهِلِينَ﴾

३३.
यूसुफ म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! ज्या गोष्टीकडे या स्त्रिया मला बोलावित आहेत, त्यापेक्षा कारागृह मला जास्त प्रिय आहे.
जर तू यांचे कपट (मोहजाल) माझ्यापासून दूर केले नाहीस तर मी यांच्याकडे आकर्षित होईन आणि अगदी मूर्खांमध्ये सामील होईन.

﴿فَاسْتَجَابَ لَهُ رَبُّهُ فَصَرَفَ عَنْهُ كَيْدَهُنَّ ۚ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ﴾

३४.
त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या कपटापासून यूसुफला वाचविले. निःसंशय तो ऐकणारा आणि जाणणारा आहे.

﴿ثُمَّ بَدَا لَهُمْ مِنْ بَعْدِ مَا رَأَوُا الْآيَاتِ لَيَسْجُنُنَّهُ حَتَّىٰ حِينٍ﴾

३५. मग त्या सर्व निशाण्यांना पाहून घेतल्यावर त्यांना हेच भले वाटले की यूसुफला काही काळ कारागृहात ठेवावे.

﴿وَدَخَلَ مَعَهُ السِّجْنَ فَتَيَانِ ۖ قَالَ أَحَدُهُمَا إِنِّي أَرَانِي أَعْصِرُ خَمْرًا ۖ وَقَالَ الْآخَرُ إِنِّي أَرَانِي أَحْمِلُ فَوْقَ رَأْسِي خُبْزًا تَأْكُلُ الطَّيْرُ مِنْهُ ۖ نَبِّئْنَا بِتَأْوِيلِهِ ۖ إِنَّا نَرَاكَ مِنَ الْمُحْسِنِينَ﴾

३६. आणि त्यांच्यासोबत इतर दोन तरुण कारागृहात आले.
त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, मी स्वप्नात स्वतःला दारु गाळताना पाहिले आहे, आणि दुसरा म्हणाला, मी स्वप्नात काय पाहतो की मी आपल्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत, ज्यांना पक्षी खात आहेत. तुम्ही याचा अर्थ (खुलासा) आम्हाला सांगावा. आम्हाला तर तुम्ही गुणवान दिसता.

﴿قَالَ لَا يَأْتِيكُمَا طَعَامٌ تُرْزَقَانِهِ إِلَّا نَبَّأْتُكُمَا بِتَأْوِيلِهِ قَبْلَ أَنْ يَأْتِيَكُمَا ۚ ذَٰلِكُمَا مِمَّا عَلَّمَنِي رَبِّي ۚ إِنِّي تَرَكْتُ مِلَّةَ قَوْمٍ لَا يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَهُمْ بِالْآخِرَةِ هُمْ كَافِرُونَ﴾

३७.
(यूसुफ) म्हणाले, तुम्हाला जे भोजन दिले जाते, ते तुमच्याजवळ पोहचण्यापूर्वीच मी तुम्हाला त्याचा खुलासा सांगेने, हे सर्व काही त्या ज्ञानामुळे आहे जे मला माझ्या पालनकर्त्याने शिकविले आहे. मी त्या लोकांचा दीन (धर्म) सोडला आहे, जे अल्लाहवर ईमान राखत नाही आणि आखिरतलाही मान्य करीत नाही.

﴿وَاتَّبَعْتُ مِلَّةَ آبَائِي إِبْرَاهِيمَ وَإِسْحَاقَ وَيَعْقُوبَ ۚ مَا كَانَ لَنَا أَنْ نُشْرِكَ بِاللَّهِ مِنْ شَيْءٍ ۚ ذَٰلِكَ مِنْ فَضْلِ اللَّهِ عَلَيْنَا وَعَلَى النَّاسِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَشْكُرُونَ﴾

३८. मी आपल्या पित्या आणि पूर्वजांच्या (धर्मा) चा अनुयायी आहे. अर्थात इसहाक आणि याकूब (च्या दीन) चा. आम्हाला हे कधीही मान्य नाही की आम्ही अल्लाहसोबत अन्य एखाद्याला सहभागी ठरवावे. आमच्यावर आणि इतर सर्व लोकांवर अल्लाहची ही विशेष कृपा आहे. परंतु अधिकांश लोक कृतघ्न असतात.

﴿يَا صَاحِبَيِ السِّجْنِ أَأَرْبَابٌ مُتَفَرِّقُونَ خَيْرٌ أَمِ اللَّهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ﴾

३९.
हे माझ्या कारागृहातील साथीदारांनो! काय अनेक प्रकारची अनेक उपास्ये चांगली आहेत की एक जबरदस्त शक्तिशाली अल्लाह चांगला?

﴿مَا تَعْبُدُونَ مِنْ دُونِهِ إِلَّا أَسْمَاءً سَمَّيْتُمُوهَا أَنْتُمْ وَآبَاؤُكُمْ مَا أَنْزَلَ اللَّهُ بِهَا مِنْ سُلْطَانٍ ۚ إِنِ الْحُكْمُ إِلَّا لِلَّهِ ۚ أَمَرَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ ۚ ذَٰلِكَ الدِّينُ الْقَيِّمُ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾

४०.
त्याच्याखेरीज ज्यांची उपासना तुम्ही करीत आहात ते सर्व नावापुरतेच आहेत, ज्यांना तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी मनाने रचून घेतले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहने यांचा कोणताही पुरावा अवतरित केला नाही. फैसला देणे अल्लाहचेच काम आहे. त्याचा आदेश आहे की तुम्ही सर्व त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती- उपासना करू नका. हाच सत्य धर्म आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

﴿يَا صَاحِبَيِ السِّجْنِ أَمَّا أَحَدُكُمَا فَيَسْقِي رَبَّهُ خَمْرًا ۖ وَأَمَّا الْآخَرُ فَيُصْلَبُ فَتَأْكُلُ الطَّيْرُ مِنْ رَأْسِهِ ۚ قُضِيَ الْأَمْرُ الَّذِي فِيهِ تَسْتَفْتِيَانِ﴾

४१.
हे कारागृहातील माझ्या साथीदारांनो! तुम्हा दोघांपैकी एक तर आपल्या स्वामीला मद्य पाजण्यासाठी नियुक्त केला जाईल, परंतु दुसऱ्याला फासावर लटकविले जाईल आणि पक्षी त्याचे डोके टोच मारून मारून खातील. तुम्ही दोघे ज्याविषयी विचारत होते त्याचा फैसला झाला.

﴿وَقَالَ لِلَّذِي ظَنَّ أَنَّهُ نَاجٍ مِنْهُمَا اذْكُرْنِي عِنْدَ رَبِّكَ فَأَنْسَاهُ الشَّيْطَانُ ذِكْرَ رَبِّهِ فَلَبِثَ فِي السِّجْنِ بِضْعَ سِنِينَ﴾

४२.
आणि ज्याच्याविषयी यूसुफची कल्पना होती की दोघांपैकी ज्याला सुटका मिळेल, त्याला म्हणाले, आपल्या राजाजवळ माझीही चर्चा कर. मग सैतानाने त्याला राजाजवळ बोलण्याचा विसर पाडला आणि यूसुफला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले.

﴿وَقَالَ الْمَلِكُ إِنِّي أَرَىٰ سَبْعَ بَقَرَاتٍ سِمَانٍ يَأْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَسَبْعَ سُنْبُلَاتٍ خُضْرٍ وَأُخَرَ يَابِسَاتٍ ۖ يَا أَيُّهَا الْمَلَأُ أَفْتُونِي فِي رُؤْيَايَ إِنْ كُنْتُمْ لِلرُّؤْيَا تَعْبُرُونَ﴾

४३.
आणि राजाने सांगितले, मी स्वप्न पाहिले की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात हिरवी कणसे आहेत तर दुसरी सात कणसे अगदी सुकलेली. हे दरबारी लोकांनो! माझ्या या स्वप्नाचा खुलासा सांगा, जर तुम्ही स्वप्नफल सांगू शकत असाल.

﴿قَالُوا أَضْغَاثُ أَحْلَامٍ ۖ وَمَا نَحْنُ بِتَأْوِيلِ الْأَحْلَامِ بِعَالِمِينَ﴾

४४.
दरबारी लोकांनी उत्तर दिले, ही तर विसकटलेल्या (विचारांची) स्वप्ने आहेत आणि अशा प्रकारच्या व्यग्रचित्त स्वप्नांचा खुलासा आम्ही जाणत नाही.

﴿وَقَالَ الَّذِي نَجَا مِنْهُمَا وَادَّكَرَ بَعْدَ أُمَّةٍ أَنَا أُنَبِّئُكُمْ بِتَأْوِيلِهِ فَأَرْسِلُونِ﴾

४५.
आणि त्या कैद्यांपैकी सुटका झालेल्याला अकस्मात आठवण झाली, आणि तो म्हणू लागला, मी तुम्हाला याचा खुलासा येऊन सांगतो. मला जाण्याची परवानगी द्यावी.

﴿يُوسُفُ أَيُّهَا الصِّدِّيقُ أَفْتِنَا فِي سَبْعِ بَقَرَاتٍ سِمَانٍ يَأْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَسَبْعِ سُنْبُلَاتٍ خُضْرٍ وَأُخَرَ يَابِسَاتٍ لَعَلِّي أَرْجِعُ إِلَى النَّاسِ لَعَلَّهُمْ يَعْلَمُونَ﴾

४६.
हे यूसुफ! हे अगदी सच्चे यूसुफ! तुम्ही आम्हाला या स्वप्नाचा खुलासा सांगा की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात अगदी हिरवी कणसे आहेत आणि दुसरी सात कणसे अगदी सुकलेली आहेत. यासाठी की मी परत जाऊन त्या लोकांना सांगावे की त्या सर्वांनी जाणून घ्यावे.

﴿قَالَ تَزْرَعُونَ سَبْعَ سِنِينَ دَأَبًا فَمَا حَصَدْتُمْ فَذَرُوهُ فِي سُنْبُلِهِ إِلَّا قَلِيلًا مِمَّا تَأْكُلُونَ﴾

४७.
(यूसुफ यांनी) उत्तर दिले की तुम्ही सतत सात वर्षे सवयीनुसार धान्य पेरा आणि (पीक आल्यावर) त्याची कापणी करून कणसांसमेत राहू द्या. आपल्या खाण्यासाठी थोड्या संख्येशिवाय.

﴿ثُمَّ يَأْتِي مِنْ بَعْدِ ذَٰلِكَ سَبْعٌ شِدَادٌ يَأْكُلْنَ مَا قَدَّمْتُمْ لَهُنَّ إِلَّا قَلِيلًا مِمَّا تُحْصِنُونَ﴾

४८.
त्यानंतरची सात वर्षे मोठ्या दुष्काळाची येतील ती ते धान्य खाऊन टाकतील जे तुम्ही त्यांच्यासाठी जमा करून ठेवले होते. त्याशिवाय जे थोडेसे तुम्ही रोखून ठेवाल.

﴿ثُمَّ يَأْتِي مِنْ بَعْدِ ذَٰلِكَ عَامٌ فِيهِ يُغَاثُ النَّاسُ وَفِيهِ يَعْصِرُونَ﴾

४९. मग याच्यानंतर जे वर्ष येईल, त्यात लोकांसाठी खूप पाऊस पडेल आणि त्यात ते (द्राक्षाचा रसदेखील) खूप गाळतील.

﴿وَقَالَ الْمَلِكُ ائْتُونِي بِهِ ۖ فَلَمَّا جَاءَهُ الرَّسُولُ قَالَ ارْجِعْ إِلَىٰ رَبِّكَ فَاسْأَلْهُ مَا بَالُ النِّسْوَةِ اللَّاتِي قَطَّعْنَ أَيْدِيَهُنَّ ۚ إِنَّ رَبِّي بِكَيْدِهِنَّ عَلِيمٌ﴾

५०. आणि राजा म्हणाला, त्याला (यूसुफला) माझ्याजवळ आणा.
जेव्हा संदेश पोहचविणारा यूसुफजवळ पोहोचला तेव्हा यूसुफ म्हणाले, आपल्या राजाकडे परत जा आणि त्यांना विचारा की त्या स्त्रियांची खरी कहाणी काय आहे, ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. त्यांचे कपट चांगल्या प्रकारे जाणणारा माझा पालनकर्ताच आहे.

﴿قَالَ مَا خَطْبُكُنَّ إِذْ رَاوَدْتُنَّ يُوسُفَ عَنْ نَفْسِهِ ۚ قُلْنَ حَاشَ لِلَّهِ مَا عَلِمْنَا عَلَيْهِ مِنْ سُوءٍ ۚ قَالَتِ امْرَأَتُ الْعَزِيزِ الْآنَ حَصْحَصَ الْحَقُّ أَنَا رَاوَدْتُهُ عَنْ نَفْسِهِ وَإِنَّهُ لَمِنَ الصَّادِقِينَ﴾

५१.
(राजाने) विचारले, हे स्त्रियांनो! त्या वेळची खरी कहाणी काय आहे, जेव्हा तुम्ही कपट करून यूसुफला त्याच्या मनापासून बहकवू इच्छित होत्या? त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की (अल्लाह जाणतो) आम्ही यूसुफमध्ये कोणातही वाईट गुण पाहिला नाही, मग तर अजीजची पत्नीही उद्‌गारली, आता तर सत्य उघडकीस आलेच आहे.
मीच त्याला बहकविणयाचा प्रयत्न केला होता त्याच्या मनापासून (विचलित करण्याचा) आणि निःसंशय तो खऱ्या लोकांपैकी आहे.

﴿ذَٰلِكَ لِيَعْلَمَ أَنِّي لَمْ أَخُنْهُ بِالْغَيْبِ وَأَنَّ اللَّهَ لَا يَهْدِي كَيْدَ الْخَائِنِينَ﴾

५२.
हे या कारणास्तव की (अजीज) ला माहीत व्हावे की मी त्याच्याशी विश्वासघात केला नाही आणि हेही की अल्लाह कपट करणाऱ्यांचा डाव सफल होऊ देत नाही.

﴿۞ وَمَا أُبَرِّئُ نَفْسِي ۚ إِنَّ النَّفْسَ لَأَمَّارَةٌ بِالسُّوءِ إِلَّا مَا رَحِمَ رَبِّي ۚ إِنَّ رَبِّي غَفُورٌ رَحِيمٌ﴾

५३.
आणि मी आपल्या मनाच्या पावित्र्याचे वर्णन करीत नाही, निःसंशय, मन तर वाईट गोष्टीचीच प्रेरणार देणारे आहे, परंतु हे की माझा पालनकर्ताच आपली दया- कृपा करील. निश्चितच माझा पालनकर्ता माफ करणारा, दया करणारा आहे.

﴿وَقَالَ الْمَلِكُ ائْتُونِي بِهِ أَسْتَخْلِصْهُ لِنَفْسِي ۖ فَلَمَّا كَلَّمَهُ قَالَ إِنَّكَ الْيَوْمَ لَدَيْنَا مَكِينٌ أَمِينٌ﴾

५४. आणि बादशहा म्हणाला, त्याला माझ्या समोर आणा की मी त्याला आपल्या व्यक्तिगत कामांकरिता नेमून घ्यावे.
मग जेव्हा त्याच्याशी वार्तालाप करू लागला, तेव्हा म्हणाला, तुम्ही आजपासून आमचे येथे सन्मानित आणि विश्वसनीय (अमानतदार) आहात.

﴿قَالَ اجْعَلْنِي عَلَىٰ خَزَائِنِ الْأَرْضِ ۖ إِنِّي حَفِيظٌ عَلِيمٌ﴾

५५. (यूसुफ) म्हणाले, तुम्ही मला देशाच्या खजीन्यावर नियुक्त करा. मी संरक्षक आणि जाणकार आहे.

﴿وَكَذَٰلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِي الْأَرْضِ يَتَبَوَّأُ مِنْهَا حَيْثُ يَشَاءُ ۚ نُصِيبُ بِرَحْمَتِنَا مَنْ نَشَاءُ ۖ وَلَا نُضِيعُ أَجْرَ الْمُحْسِنِينَ﴾

५६. आणि अशा प्रकारे आम्ही यूसुफला देशाचा सूत्रधार बनविले की त्याने वाटेल तिथे राहावे.
आम्ही ज्याला इच्छितो, त्याच्यापर्यंत आपली दया- कृपा पोहचवितो, आणि आम्ही सत्कर्म करणाऱ्यांच्या आचरणाचे फळ वाया जाऊ देत नाही.

﴿وَلَأَجْرُ الْآخِرَةِ خَيْرٌ لِلَّذِينَ آمَنُوا وَكَانُوا يَتَّقُونَ﴾

५७. आणि निःसंशय ईमान राखणाऱ्यांचा आणि दुराचारापासून दूर राहणाऱ्यांचा आखिरतचा मोबदला कितीतरी चांगला आहे.

﴿وَجَاءَ إِخْوَةُ يُوسُفَ فَدَخَلُوا عَلَيْهِ فَعَرَفَهُمْ وَهُمْ لَهُ مُنْكِرُونَ﴾

५८.
आणि यूसुफचे भाऊ आले आणि यूसुफजवळ गेले तेव्हा यूसुफने त्यांना ओळखून घेतले, परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.

﴿وَلَمَّا جَهَّزَهُمْ بِجَهَازِهِمْ قَالَ ائْتُونِي بِأَخٍ لَكُمْ مِنْ أَبِيكُمْ ۚ أَلَا تَرَوْنَ أَنِّي أُوفِي الْكَيْلَ وَأَنَا خَيْرُ الْمُنْزِلِينَ﴾

५९.
आणि जेव्हा त्यांचे सामान तयार केले गेले तेव्हा यूसुफ म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ आपल्या त्या भावाला आणा, जो तुमच्या पित्यापासून आहे, काय तुम्ही नाही पाहिले की मी मापही पुरेपूर देतो आणि अतिथीचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करणाऱ्यांपैकी आहे.

﴿فَإِنْ لَمْ تَأْتُونِي بِهِ فَلَا كَيْلَ لَكُمْ عِنْدِي وَلَا تَقْرَبُونِ﴾

६०.
परंतु जर तुम्ही त्याला माझ्याजवळ आणले नाही तर माझ्याकडून तुम्हाला कसलेही माप मिळणार नाही, किंबहुना तुम्ही माझ्याजवळही येऊ शकणार नाहीत.

﴿قَالُوا سَنُرَاوِدُ عَنْهُ أَبَاهُ وَإِنَّا لَفَاعِلُونَ﴾

६१. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याच्या पित्याशी या संदर्भात गोडीगुलाबीने बोलून पूर्ण प्रयत्न करू.

﴿وَقَالَ لِفِتْيَانِهِ اجْعَلُوا بِضَاعَتَهُمْ فِي رِحَالِهِمْ لَعَلَّهُمْ يَعْرِفُونَهَا إِذَا انْقَلَبُوا إِلَىٰ أَهْلِهِمْ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ﴾

६२.
आणि आपल्या सेवकांना सांगितले की त्यांचा माल (धन) त्यांच्याच पोत्यांमध्ये ठेवून द्या की जेव्हा परतून आपल्या कुटुंबात जातील तेव्हा आपले धन ओळखून घेतील, फार शक्य आहे की ते पुन्हा येतील.

﴿فَلَمَّا رَجَعُوا إِلَىٰ أَبِيهِمْ قَالُوا يَا أَبَانَا مُنِعَ مِنَّا الْكَيْلُ فَأَرْسِلْ مَعَنَا أَخَانَا نَكْتَلْ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ﴾

६३.
जेव्हा ते लोक परतून आपल्या पित्याजवळ गेले तेव्हा म्हणू लागले, आम्हाला तर धान्य देण्यावर प्रतिबंध घातला गेला. आता तुम्ही आमच्यासोबत भावाला पाठवा की आम्ही माप भरून आणावे. आम्ही त्याच्या रक्षणाची हमी देतो.

﴿قَالَ هَلْ آمَنُكُمْ عَلَيْهِ إِلَّا كَمَا أَمِنْتُكُمْ عَلَىٰ أَخِيهِ مِنْ قَبْلُ ۖ فَاللَّهُ خَيْرٌ حَافِظًا ۖ وَهُوَ أَرْحَمُ الرَّاحِمِينَ﴾

६४.
(याकूब) म्हणाले, काय मी याच्या बाबतीत तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू जसा यापूर्वी याच्या भावाबाबत विश्वास ठेवला? सर्वश्रेष्ठ अल्लाहच सर्वांत उत्तम संरक्षक आहे आणि तो समस्त कृपावानांमध्ये जास्त कृपावान आहे.

﴿وَلَمَّا فَتَحُوا مَتَاعَهُمْ وَجَدُوا بِضَاعَتَهُمْ رُدَّتْ إِلَيْهِمْ ۖ قَالُوا يَا أَبَانَا مَا نَبْغِي ۖ هَٰذِهِ بِضَاعَتُنَا رُدَّتْ إِلَيْنَا ۖ وَنَمِيرُ أَهْلَنَا وَنَحْفَظُ أَخَانَا وَنَزْدَادُ كَيْلَ بَعِيرٍ ۖ ذَٰلِكَ كَيْلٌ يَسِيرٌ﴾

६५. आणि जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा त्यात त्यांना आपली रक्कम आढळली, जी त्यांना परत केली गेली होती.
म्हणाले, हे पिता! आम्हाला आणखी काय पाहिजे? ही आमची रक्कम आम्हाला परत केली गेली आहे आणि आम्ही आपल्या कुटुंबाकरिता धान्य आणून देऊ आणि आपल्या भावाचे रक्षण करू आणि एक उंटाचे माप जास्त आणू. हे माप तर जास्त सोपे आहे.

﴿قَالَ لَنْ أُرْسِلَهُ مَعَكُمْ حَتَّىٰ تُؤْتُونِ مَوْثِقًا مِنَ اللَّهِ لَتَأْتُنَّنِي بِهِ إِلَّا أَنْ يُحَاطَ بِكُمْ ۖ فَلَمَّا آتَوْهُ مَوْثِقَهُمْ قَالَ اللَّهُ عَلَىٰ مَا نَقُولُ وَكِيلٌ﴾

६६.
(याकूब) म्हणाले, मी तर त्याला तुमच्यासोबत कधीही पाठविणार नाही, जोपर्यंत तुम्ही अल्लाहला मध्यस्थी ठेवून मला वचन द्याल की तुम्ही त्याला माझ्याजवळ पोचवाल, याखेरीज की तुम्ही सर्व कैदी बनविले जाल. जेव्हा त्यांनी पक्के वचन दिले तेव्हा ते म्हणाले की आम्ही जे काही बोलत आहोत, अल्लाह त्याचा संरक्षक आहे.

﴿وَقَالَ يَا بَنِيَّ لَا تَدْخُلُوا مِنْ بَابٍ وَاحِدٍ وَادْخُلُوا مِنْ أَبْوَابٍ مُتَفَرِّقَةٍ ۖ وَمَا أُغْنِي عَنْكُمْ مِنَ اللَّهِ مِنْ شَيْءٍ ۖ إِنِ الْحُكْمُ إِلَّا لِلَّهِ ۖ عَلَيْهِ تَوَكَّلْتُ ۖ وَعَلَيْهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُتَوَكِّلُونَ﴾

६७.
आणि (याकूब) म्हणाले, हे माझ्या मुलांनो! तुम्ही सर्व एकाच दारातून प्रवेश करू नका, किंबहुना अनेक दारांमधून वेगवेगळे होऊन प्रवेश करा. मी अल्लाहतर्फे आलेल्या कोणत्याही गोष्टीला तुमच्या वरून टाळू शकत नाही.
आदेश केवळ अल्लाहचाच चालतो, माझा संपूर्ण विश्वास त्याच्यावरच आहे आणि प्रत्येक भरोसा ठेवणाऱ्याने त्याच्यावरच भरोसा ठेवला पाहिजे.

﴿وَلَمَّا دَخَلُوا مِنْ حَيْثُ أَمَرَهُمْ أَبُوهُمْ مَا كَانَ يُغْنِي عَنْهُمْ مِنَ اللَّهِ مِنْ شَيْءٍ إِلَّا حَاجَةً فِي نَفْسِ يَعْقُوبَ قَضَاهَا ۚ وَإِنَّهُ لَذُو عِلْمٍ لِمَا عَلَّمْنَاهُ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾

६८.
आणि जेव्हा ते त्याच मार्गांनी, ज्यांचा आदेश त्यांच्या पित्याने दिला होता, गेले, काहीच नव्हते की अल्लाहने जी गोष्ट निश्चित केली आहे, तिच्यापासून ते त्यांना किंचितही वाचवतील. तथापि याकूबच्या मनात एक विचार आला, जो त्याने पूर्ण केला. निःसंशय ते आम्ही शिकविलेल्या त्या ज्ञानाने संपन्न होते, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

﴿وَلَمَّا دَخَلُوا عَلَىٰ يُوسُفَ آوَىٰ إِلَيْهِ أَخَاهُ ۖ قَالَ إِنِّي أَنَا أَخُوكَ فَلَا تَبْتَئِسْ بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

६९.
आणि ते सर्व यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा यूसुफने आपल्या भावाला आपल्याजवळ बसविले आणि म्हटले, मी तुझा भाऊ (यूसुफ) आहे, आतापावेतो हे जे काही करत राहिले, त्याबद्दल दुःख करू नकोस.

﴿فَلَمَّا جَهَّزَهُمْ بِجَهَازِهِمْ جَعَلَ السِّقَايَةَ فِي رَحْلِ أَخِيهِ ثُمَّ أَذَّنَ مُؤَذِّنٌ أَيَّتُهَا الْعِيرُ إِنَّكُمْ لَسَارِقُونَ﴾

७०.
मग जेव्हा त्यांचे सामान (धान्याने भरून) तयार केले तेव्हा आपल्या भावाच्या सामानात आपला पाणी पिण्याचा प्याला ठेवून दिला, मग एका ऐलान करणाऱ्याने ऐलान केले, हे काफिलावाल्यांनो! तुम्ही लोक तर चोर आहात!

﴿قَالُوا وَأَقْبَلُوا عَلَيْهِمْ مَاذَا تَفْقِدُونَ﴾

७१. त्यांनी त्याच्याकडे तोंड फिरवून म्हटले, तुमची कोणती वस्तू हरवली आहे?

﴿قَالُوا نَفْقِدُ صُوَاعَ الْمَلِكِ وَلِمَنْ جَاءَ بِهِ حِمْلُ بَعِيرٍ وَأَنَا بِهِ زَعِيمٌ﴾

७२. उत्तर दिले की शाही प्याला हरवला आहे, जो तो घेऊन येईल त्याला एक उंटाचे ओझे इतके धान्य मिळेल. या वचनाची मी हमी देतो.

﴿قَالُوا تَاللَّهِ لَقَدْ عَلِمْتُمْ مَا جِئْنَا لِنُفْسِدَ فِي الْأَرْضِ وَمَا كُنَّا سَارِقِينَ﴾

७३.
ते म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही देशात उपद्रव निर्माण करण्यासाठी आलो नाहीत आणि ना आम्ही चोर आहोत.

﴿قَالُوا فَمَا جَزَاؤُهُ إِنْ كُنْتُمْ كَاذِبِينَ﴾

७४. ते म्हणाले, बरे चोरीची काय शिक्षा आहे जर तुम्ही खोटे ठराल.

﴿قَالُوا جَزَاؤُهُ مَنْ وُجِدَ فِي رَحْلِهِ فَهُوَ جَزَاؤُهُ ۚ كَذَٰلِكَ نَجْزِي الظَّالِمِينَ﴾

७५. उत्तर दिले, याची शिक्षा हीच की ज्याच्या सामान्यात तो प्याला आढळून येईल तोच त्याच्या बदली आहे. आम्ही तर अत्याचारींना हीच शिक्षा देत असतो.

﴿فَبَدَأَ بِأَوْعِيَتِهِمْ قَبْلَ وِعَاءِ أَخِيهِ ثُمَّ اسْتَخْرَجَهَا مِنْ وِعَاءِ أَخِيهِ ۚ كَذَٰلِكَ كِدْنَا لِيُوسُفَ ۖ مَا كَانَ لِيَأْخُذَ أَخَاهُ فِي دِينِ الْمَلِكِ إِلَّا أَنْ يَشَاءَ اللَّهُ ۚ نَرْفَعُ دَرَجَاتٍ مَنْ نَشَاءُ ۗ وَفَوْقَ كُلِّ ذِي عِلْمٍ عَلِيمٌ﴾

७६.
मग (यूसुफ) ने आपल्या भावाचे सामान तपासण्यापूर्वी दुसऱ्यांचे सामान तपासायला सुरुवात केली, मग त्याने पिण्याचा प्याला आपल्या भावाच्या सामानातून काढला. आम्ही यूसुफकरिता अशा प्रकारे ही योजना बनविली. त्या बादशहाच्या कायद्यानुसार तो आपल्या भावाला (रोखून) ठेवू शकत नव्हता, परंतु हे की अल्लाहला मंजूर असेल. आम्ही ज्याला इच्छितो त्याचा दर्जा बुलंद करतो. प्रत्येक ज्ञान राखणाऱ्यावर (मोठेपणात) एक मोठा ज्ञानी अस्तित्वात आहे.

﴿۞ قَالُوا إِنْ يَسْرِقْ فَقَدْ سَرَقَ أَخٌ لَهُ مِنْ قَبْلُ ۚ فَأَسَرَّهَا يُوسُفُ فِي نَفْسِهِ وَلَمْ يُبْدِهَا لَهُمْ ۚ قَالَ أَنْتُمْ شَرٌّ مَكَانًا ۖ وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا تَصِفُونَ﴾

७७. ते म्हणाले, जर याने चोरी केली आहे तर (नवलाची गोष्ट नव्हे) याच्या भावानेही यापूर्वी चोरी केली आहे.
यूसुफने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली आणि त्यांच्यासमोर अगदी जाहीर केले नाही, म्हटले की तुम्ही वाईट ठिकाणी आहात आणि जे काही तुम्ही सांगत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿قَالُوا يَا أَيُّهَا الْعَزِيزُ إِنَّ لَهُ أَبًا شَيْخًا كَبِيرًا فَخُذْ أَحَدَنَا مَكَانَهُ ۖ إِنَّا نَرَاكَ مِنَ الْمُحْسِنِينَ﴾

७८. ते म्हणाले, हे मिस्र देशाचा सर्वाधिकार राखणारे! याचे पिता अतिशय वृद्ध मनुष्य आहेत. तुम्ही याच्याऐवजी आमच्यापैकी एखाद्याला ठेवून घ्या. आम्ही असे पाहतो की तुम्ही मोठे सज्जन मनुष्य आहात.

﴿قَالَ مَعَاذَ اللَّهِ أَنْ نَأْخُذَ إِلَّا مَنْ وَجَدْنَا مَتَاعَنَا عِنْدَهُ إِنَّا إِذًا لَظَالِمُونَ﴾

७९.
(यूसुफ) म्हणाले की आम्हाला ज्याच्याजवळ आमची वस्तू आढळून आली आहे त्याला सोडून दुसऱ्यांना बंदी बनविण्यापासून अल्लाहचे शरण इच्छितो. असे केल्याने निश्चितच आम्ही अन्याय करणाऱ्यांपैकी ठरू.

﴿فَلَمَّا اسْتَيْأَسُوا مِنْهُ خَلَصُوا نَجِيًّا ۖ قَالَ كَبِيرُهُمْ أَلَمْ تَعْلَمُوا أَنَّ أَبَاكُمْ قَدْ أَخَذَ عَلَيْكُمْ مَوْثِقًا مِنَ اللَّهِ وَمِنْ قَبْلُ مَا فَرَّطْتُمْ فِي يُوسُفَ ۖ فَلَنْ أَبْرَحَ الْأَرْضَ حَتَّىٰ يَأْذَنَ لِي أَبِي أَوْ يَحْكُمَ اللَّهُ لِي ۖ وَهُوَ خَيْرُ الْحَاكِمِينَ﴾

८०. जेव्हा हे, यूसुफकडून निराश झाले, तेव्हा एकांतात बसून सल्लामसलत करू लागले.
त्यांच्यापैकी जो सर्वांत मोठा होता तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या पित्याने तुमच्याकडून अल्लाहला मध्यस्थी ठेवून पक्के वचन घेतले आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही यूसुफविषयी अपराध केलेला आहे.
आता मी तर भूमीतून पाय काढणार नाही, जोपर्यंत पिता स्वतः मला अनुमती देत नाहीत किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाह माझ्या या समस्येचा फैसला करील. तोच सर्वोत्तम शासक आहे.

﴿ارْجِعُوا إِلَىٰ أَبِيكُمْ فَقُولُوا يَا أَبَانَا إِنَّ ابْنَكَ سَرَقَ وَمَا شَهِدْنَا إِلَّا بِمَا عَلِمْنَا وَمَا كُنَّا لِلْغَيْبِ حَافِظِينَ﴾

८१.
तुम्ही सर्व पित्याच्या सेवेत परत जा आणि सांगा की हे पिता! तुमच्या पुत्राने चोरी केली आणि आम्ही तीच साक्ष दिली, जी आम्ही जाणत होतो. आम्ही काही परोक्ष (गैब) चे रक्षण करणारे तर नव्हतो.

﴿وَاسْأَلِ الْقَرْيَةَ الَّتِي كُنَّا فِيهَا وَالْعِيرَ الَّتِي أَقْبَلْنَا فِيهَا ۖ وَإِنَّا لَصَادِقُونَ﴾

८२.
आणि तुम्ही त्या शहराच्या लोकांना विचारा, जिथे आम्ही होतो आणि त्या प्रवाशांनाही विचारा ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहोत आणि निःसंशय आम्ही पूर्णपणे सच्चे आहोत.

﴿قَالَ بَلْ سَوَّلَتْ لَكُمْ أَنْفُسُكُمْ أَمْرًا ۖ فَصَبْرٌ جَمِيلٌ ۖ عَسَى اللَّهُ أَنْ يَأْتِيَنِي بِهِمْ جَمِيعًا ۚ إِنَّهُ هُوَ الْعَلِيمُ الْحَكِيمُ﴾

८३.
(याकूब) म्हणाले, असे नाही, किंबहुना तुम्ही आपल्यातर्फे एक गोष्ट रचून घेतली, तेव्हा आता संयम राखणेच उत्तम आहे. संभवतः सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या सर्वांना माझ्याजवळ पोहचविल. तोच ज्ञानी आणि हिकमतशाली आहे.

﴿وَتَوَلَّىٰ عَنْهُمْ وَقَالَ يَا أَسَفَىٰ عَلَىٰ يُوسُفَ وَابْيَضَّتْ عَيْنَاهُ مِنَ الْحُزْنِ فَهُوَ كَظِيمٌ﴾

८४.
आणि मग (याकूबने) त्यांच्याकडून तोंड फिरवून घेतले आणि म्हटले, अरेरे, यूसुफ! त्यांचे डोळे दुःखातिरेकाने पांढरे झाले होते आणि ते या दुःखाला सहन करीत होते.

﴿قَالُوا تَاللَّهِ تَفْتَأُ تَذْكُرُ يُوسُفَ حَتَّىٰ تَكُونَ حَرَضًا أَوْ تَكُونَ مِنَ الْهَالِكِينَ﴾

८५.
(पुत्र) म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही नेहमी यूसुफच्या आठवणीत भान हरपून राहाल येथेपर्यंत की अगदी गळून जाल किंवा मरण पावाल.

﴿قَالَ إِنَّمَا أَشْكُو بَثِّي وَحُزْنِي إِلَى اللَّهِ وَأَعْلَمُ مِنَ اللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ﴾

८६. (याकूब) म्हणाले, मी तर आपल्या संकट आणि दुःखाचे गाऱ्हाणे अल्लाहजवळ मांडत आहे. मला अल्लाहतर्फे त्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे, ज्यांच्याबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात.

﴿يَا بَنِيَّ اذْهَبُوا فَتَحَسَّسُوا مِنْ يُوسُفَ وَأَخِيهِ وَلَا تَيْأَسُوا مِنْ رَوْحِ اللَّهِ ۖ إِنَّهُ لَا يَيْأَسُ مِنْ رَوْحِ اللَّهِ إِلَّا الْقَوْمُ الْكَافِرُونَ﴾

८७.
माझ्या प्रिय पुत्रांनो! तुम्ही जा आणि यूसुफ आणि त्याच्या भावाचा चांगल्या प्रकारे शोध घ्या आणि अल्लाहच्या दयेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाहच्या दया-कृपेपासून तेच लोक निराश होतात जे काफिर (इन्कारी) असतात.

﴿فَلَمَّا دَخَلُوا عَلَيْهِ قَالُوا يَا أَيُّهَا الْعَزِيزُ مَسَّنَا وَأَهْلَنَا الضُّرُّ وَجِئْنَا بِبِضَاعَةٍ مُزْجَاةٍ فَأَوْفِ لَنَا الْكَيْلَ وَتَصَدَّقْ عَلَيْنَا ۖ إِنَّ اللَّهَ يَجْزِي الْمُتَصَدِّقِينَ﴾

८८.
मग जेव्हा हे लोक यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा म्हणू लागले की हे अजीज! आम्ही आणि आमचे कुटुंब अतिशय अडचणीत आहे, आम्ही थोडीशी तुच्छ पुंजी आणली आहे, परंतु तुम्ही आम्हाला धान्याचे पूर्ण माप देऊन टाका आणि आम्हाला दान म्हणून द्या. निश्चितच अल्लाह दान देणाऱ्यांना चांगला मोबदला देतो.

﴿قَالَ هَلْ عَلِمْتُمْ مَا فَعَلْتُمْ بِيُوسُفَ وَأَخِيهِ إِذْ أَنْتُمْ جَاهِلُونَ﴾

८९.
(यूसुफ) म्हणाले, तुमच्या ध्यानात तरी आहे का की तुम्ही यूसुफ आणि त्याच्या भावाशी आपल्या नादानपणात काय काय केले?

﴿قَالُوا أَإِنَّكَ لَأَنْتَ يُوسُفُ ۖ قَالَ أَنَا يُوسُفُ وَهَٰذَا أَخِي ۖ قَدْ مَنَّ اللَّهُ عَلَيْنَا ۖ إِنَّهُ مَنْ يَتَّقِ وَيَصْبِرْ فَإِنَّ اللَّهَ لَا يُضِيعُ أَجْرَ الْمُحْسِنِينَ﴾

९०. ते म्हणाले, काय (खरोखर) तूच यूसुफ आहेस? उत्तर दिले, होय! मीच तो यूसुफ आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहने आमच्यावर दया आणि कृपा केली.
खरी गोष्ट अशी की जो कोणी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहील आणि धीर-संयम राखील तर अल्लाह एखाद्या सत्कर्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही.

﴿قَالُوا تَاللَّهِ لَقَدْ آثَرَكَ اللَّهُ عَلَيْنَا وَإِنْ كُنَّا لَخَاطِئِينَ﴾

९१.
ते म्हणाले, अल्लाहची शपथ! अल्लाहने तुला आमच्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि हेही सत्य आहे की आम्ही अपराधी आहोत.

﴿قَالَ لَا تَثْرِيبَ عَلَيْكُمُ الْيَوْمَ ۖ يَغْفِرُ اللَّهُ لَكُمْ ۖ وَهُوَ أَرْحَمُ الرَّاحِمِينَ﴾

९२.
उत्तर दिले, आज तुमच्यावर कसलाही आरोप नाही, अल्लाह तुम्हाला माफ करो, तो तर समस्त दया करणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा दया करणारा आहे.

﴿اذْهَبُوا بِقَمِيصِي هَٰذَا فَأَلْقُوهُ عَلَىٰ وَجْهِ أَبِي يَأْتِ بَصِيرًا وَأْتُونِي بِأَهْلِكُمْ أَجْمَعِينَ﴾

९३.
माझा हा सदरा तुम्ही घेऊन जा आणि तो माझ्या पित्याच्या तोंडावर टाका की (ज्यामुळे) ते पाहू लागतील आणि येतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याजवळ घेऊन या.

﴿وَلَمَّا فَصَلَتِ الْعِيرُ قَالَ أَبُوهُمْ إِنِّي لَأَجِدُ رِيحَ يُوسُفَ ۖ لَوْلَا أَنْ تُفَنِّدُونِ﴾

९४.
आणि जेव्हा हा काफिला (मायदेशी) निघाला, तेव्हा त्यांचे पिता (याकूब) म्हणाले, मला यूसुफचा सुगंध येत आहे, जर तुम्ही मला मूर्ख समजत नसाल.

﴿قَالُوا تَاللَّهِ إِنَّكَ لَفِي ضَلَالِكَ الْقَدِيمِ﴾

९५. (पुत्र) म्हणू लागले की अल्लाहची शपथ! तुम्ही तर अजूनही आपल्या त्याच जुन्या चुकीवर कायम आहात!

﴿فَلَمَّا أَنْ جَاءَ الْبَشِيرُ أَلْقَاهُ عَلَىٰ وَجْهِهِ فَارْتَدَّ بَصِيرًا ۖ قَالَ أَلَمْ أَقُلْ لَكُمْ إِنِّي أَعْلَمُ مِنَ اللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ﴾

९६.
जेव्हा शुभ समाचार देणाऱ्याने पोहोचून त्यांच्या तोंडावर तो सदरा टाकला, त्याच क्षणी त्यांना पुनश्च दिसू लागले. म्हणाले की, काय मी तुम्हाला सांगत नव्हतो की मी अल्लाहतर्फे त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही नाही जाणत.

﴿قَالُوا يَا أَبَانَا اسْتَغْفِرْ لَنَا ذُنُوبَنَا إِنَّا كُنَّا خَاطِئِينَ﴾

९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची दुआ) करा. निःसंशय आम्ही अपराधी आहोत.

﴿قَالَ سَوْفَ أَسْتَغْفِرُ لَكُمْ رَبِّي ۖ إِنَّهُ هُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ﴾

९८. म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच तुमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याजवळ माफीची दुआ-प्रार्थना करेन. निश्चितच तो मोठा क्षमाशील, आणि अतिशय दयावान आहे.

﴿فَلَمَّا دَخَلُوا عَلَىٰ يُوسُفَ آوَىٰ إِلَيْهِ أَبَوَيْهِ وَقَالَ ادْخُلُوا مِصْرَ إِنْ شَاءَ اللَّهُ آمِنِينَ﴾

९९.
जेव्हा हा समस्त परिवार यूसुफजवळ पोहोचला, तेव्हा यूसुफने आपल्या माता-पित्यास आपल्याजवळ जागा दिली आणि म्हटले, अल्लाहने इच्छिल्यास तुम्ही सर्व मिस्र देशात सुख-शांतीपूर्वक राहाल.

﴿وَرَفَعَ أَبَوَيْهِ عَلَى الْعَرْشِ وَخَرُّوا لَهُ سُجَّدًا ۖ وَقَالَ يَا أَبَتِ هَٰذَا تَأْوِيلُ رُؤْيَايَ مِنْ قَبْلُ قَدْ جَعَلَهَا رَبِّي حَقًّا ۖ وَقَدْ أَحْسَنَ بِي إِذْ أَخْرَجَنِي مِنَ السِّجْنِ وَجَاءَ بِكُمْ مِنَ الْبَدْوِ مِنْ بَعْدِ أَنْ نَزَغَ الشَّيْطَانُ بَيْنِي وَبَيْنَ إِخْوَتِي ۚ إِنَّ رَبِّي لَطِيفٌ لِمَا يَشَاءُ ۚ إِنَّهُ هُوَ الْعَلِيمُ الْحَكِيمُ﴾

१००.
आणि आपल्या सिंहासनावर आपल्या माता-पित्यास उच्चस्थानी बसविले आणि सर्व त्याच्यासमोर सजद्यात पडले१ आणि सर्व म्हणाले, हे पिता! हा माझ्या पहिल्या स्वप्नाचा खुलासा आहे, माझ्या पालनकर्त्याने तो पूर्ण करून दाखविला.
त्याने माझ्यावर फार मोठा उपकार केला, की जेव्हा मला कैदखान्यातून बाहेर काढले आणि तुम्ही लोकांना वाळवंटातून येथे आणले त्या मतभेदानंतर, जो सैतानाने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान निर्माण केला होता. माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो, त्याच्यासाठी उत्तम उपाययोजना करतो. निःसंशय तो मोठा जाणणारा, हिकमत बाळगणारा आहे.

﴿۞ رَبِّ قَدْ آتَيْتَنِي مِنَ الْمُلْكِ وَعَلَّمْتَنِي مِنْ تَأْوِيلِ الْأَحَادِيثِ ۚ فَاطِرَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ أَنْتَ وَلِيِّي فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۖ تَوَفَّنِي مُسْلِمًا وَأَلْحِقْنِي بِالصَّالِحِينَ﴾

१०१.
हे माझ्या पालनकर्त्या! तू मला राज्य (सत्ताधिकार) प्रदान केला आणि मला स्वप्नांचा अर्थ लावण्याचे ज्ञान दिले. हे आकाशांचा व धरतीचा निर्माणकर्ता! तूच या जगात आणि आखिरतमध्ये माझा मित्र आणि मदत करणारा आहेस. तू मला इस्लामच्या अवस्थेत मृत्यु दे आणि मला नेकी करणाऱ्यांमध्ये सामील कर.

﴿ذَٰلِكَ مِنْ أَنْبَاءِ الْغَيْبِ نُوحِيهِ إِلَيْكَ ۖ وَمَا كُنْتَ لَدَيْهِمْ إِذْ أَجْمَعُوا أَمْرَهُمْ وَهُمْ يَمْكُرُونَ﴾

१०२.
हे परोक्षा (गैब) च्या खबरींपैकी आहे, जे आम्ही तुमच्याकडे वहयी करीत आहोत आणि तुम्ही त्यांच्याजवळ नव्हते जेव्हा त्यांनी आपला बेत पक्का करून घेतला होता आणि ते कपट कारस्थान करू लागले होते.

﴿وَمَا أَكْثَرُ النَّاسِ وَلَوْ حَرَصْتَ بِمُؤْمِنِينَ﴾

१०३. तुम्ही कितीही इच्छा धरा, पण अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.

﴿وَمَا تَسْأَلُهُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۚ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِلْعَالَمِينَ﴾

१०४. आणि तुम्ही त्यांच्याकडून याबद्दल काही मजूरी मागत नाही, हा तर समस्त विश्वाकरिता बोध-उपदेश आहे.

﴿وَكَأَيِّنْ مِنْ آيَةٍ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ يَمُرُّونَ عَلَيْهَا وَهُمْ عَنْهَا مُعْرِضُونَ﴾

१०५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत अनेक निशाण्या आहेत, ज्यांच्यापासून हे लोक तोंड फिरवून निघून जातात.

﴿وَمَا يُؤْمِنُ أَكْثَرُهُمْ بِاللَّهِ إِلَّا وَهُمْ مُشْرِكُونَ﴾

१०६. आणि त्यांच्यापैकी बहुतेक लोक अल्लाहवर ईमान राखत असतानाही शिर्क करणारे आहेत.१

﴿أَفَأَمِنُوا أَنْ تَأْتِيَهُمْ غَاشِيَةٌ مِنْ عَذَابِ اللَّهِ أَوْ تَأْتِيَهُمُ السَّاعَةُ بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ﴾

१०७.
काय ते या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की त्यांच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा-यातनांपैकी एखादी सर्वसामान्य शिक्षा यावी किंवा त्यांच्यावर अचानक कयामत येऊन कोसळावी आणि ते गाफील असावेत.

﴿قُلْ هَٰذِهِ سَبِيلِي أَدْعُو إِلَى اللَّهِ ۚ عَلَىٰ بَصِيرَةٍ أَنَا وَمَنِ اتَّبَعَنِي ۖ وَسُبْحَانَ اللَّهِ وَمَا أَنَا مِنَ الْمُشْرِكِينَ﴾

१०८. (तुम्ही) सांगा, माझा हाच मार्ग आहे.
मी आणि माझे अनुयायी अल्लाहकडे बोलावित आहेत पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह १ आणि अल्लाह पवित्र आहे आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.

﴿وَمَا أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ إِلَّا رِجَالًا نُوحِي إِلَيْهِمْ مِنْ أَهْلِ الْقُرَىٰ ۗ أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ ۗ وَلَدَارُ الْآخِرَةِ خَيْرٌ لِلَّذِينَ اتَّقَوْا ۗ أَفَلَا تَعْقِلُونَ﴾

१०९.
आणि तुमच्यापूर्वी आम्ही वस्तीवाल्यांमध्ये जेवढेदेखील पैगंबर पाठविले ते सर्व पुरुषच होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) उतरवित राहिली काय धरतीवर या लोकांनी हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा कसा परिणाम (अंत) झाला? निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्या व त्याचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्या लोकांकरिता आखिरतचे घर फार उत्तम आहे. काय तरीही तुम्ही ध्यानी घेत नाही?

﴿حَتَّىٰ إِذَا اسْتَيْأَسَ الرُّسُلُ وَظَنُّوا أَنَّهُمْ قَدْ كُذِبُوا جَاءَهُمْ نَصْرُنَا فَنُجِّيَ مَنْ نَشَاءُ ۖ وَلَا يُرَدُّ بَأْسُنَا عَنِ الْقَوْمِ الْمُجْرِمِينَ﴾

११०.
येथेपर्यंत की जेव्हा पैगंबर निराश होऊ लागले आणि उम्मत (जनसमुदाया) चे लोक असे समजू लागले की त्यांना खोटे सांगितले गेले, त्वरित त्यांच्यापर्यंत आमची मदत येऊन पोहोचली. आम्ही ज्याला इच्छिले त्याला सुटका प्रदान केली. खरी गोष्ट अशी की आमचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टाळला जात नाही.

﴿لَقَدْ كَانَ فِي قَصَصِهِمْ عِبْرَةٌ لِأُولِي الْأَلْبَابِ ۗ مَا كَانَ حَدِيثًا يُفْتَرَىٰ وَلَٰكِنْ تَصْدِيقَ الَّذِي بَيْنَ يَدَيْهِ وَتَفْصِيلَ كُلِّ شَيْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ﴾

१११. यांच्या कहाण्यां (वृत्तांता) मध्ये बुद्धिमानांकरिता निश्चितच बोध आणि तंबी आहे.
हा कुरआन काही खोट्या रचलेल्या गोष्टी नाही, किंबहुना हे सत्य-समर्थन आहे त्या ग्रंथांचे जे याच्या पूर्वीचे आहेत, आणि प्रत्येक गोष्टीचे सविस्तर वर्णन आणि मार्गदर्शन व दया-कृपा आहे ईमान राखणाऱ्यांकरिता.

الترجمات والتفاسير لهذه السورة: