الحجر

تفسير سورة الحجر

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الر ۚ تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ وَقُرْآنٍ مُبِينٍ﴾

१. अलिफ. लाम. रॉ या (अल्लाहच्या) ग्रंथाच्या आयती आहेत आणि स्पष्ट अशा कुरआनाच्या.

﴿رُبَمَا يَوَدُّ الَّذِينَ كَفَرُوا لَوْ كَانُوا مُسْلِمِينَ﴾

२. अशीही वेळ येईल जेव्हा इन्कार करणारे आपल्या ईमानधारक होण्याची इच्छा करतील.

﴿ذَرْهُمْ يَأْكُلُوا وَيَتَمَتَّعُوا وَيُلْهِهِمُ الْأَمَلُ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ﴾

३. तुम्ही त्यांना खाण्यात, लाभ उचलण्यात आणि (खोट्या) अपेक्षा बाळगण्यात मग्न असलेले सोडा. ते स्वतः लवकरच जाणून घेतील.

﴿وَمَا أَهْلَكْنَا مِنْ قَرْيَةٍ إِلَّا وَلَهَا كِتَابٌ مَعْلُومٌ﴾

४. आणि कोणत्याही वस्तीला आम्ही नष्ट केले नाही, परंतु हे की तिच्याकरिता निश्चित असे लिखित होते.

﴿مَا تَسْبِقُ مِنْ أُمَّةٍ أَجَلَهَا وَمَا يَسْتَأْخِرُونَ﴾

५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१

﴿وَقَالُوا يَا أَيُّهَا الَّذِي نُزِّلَ عَلَيْهِ الذِّكْرُ إِنَّكَ لَمَجْنُونٌ﴾

६. आणि ते म्हणाले, हे माणसा! ज्यावर कुरआन अवतरित केले गेले आहे निश्चितच तू एखादा वेडा आहे.

﴿لَوْ مَا تَأْتِينَا بِالْمَلَائِكَةِ إِنْ كُنْتَ مِنَ الصَّادِقِينَ﴾

७. जर तू अगदी सच्चा आहे तर मग आमच्याजवळ फरिश्त्यांना का नाही आणत?

﴿مَا نُنَزِّلُ الْمَلَائِكَةَ إِلَّا بِالْحَقِّ وَمَا كَانُوا إِذًا مُنْظَرِينَ﴾

८. आम्ही फरिश्त्यांना सत्यासहच अवतरित करतो. आणि अशा वेळी त्यांना सवड दिली जात नाही.

﴿إِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا الذِّكْرَ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ﴾

९. निःसंशय आम्हीच या कुरआनाला अवतरित केले आहे आणि आम्हीच त्याचे संरक्षक आहोत.

﴿وَلَقَدْ أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ فِي شِيَعِ الْأَوَّلِينَ﴾

१०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या जनसमूहांमध्येही आपले पैगंबर पाठवित राहिलो.

﴿وَمَا يَأْتِيهِمْ مِنْ رَسُولٍ إِلَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ﴾

११. आणि (तथापि) जो पैगंबरदेखील त्यांच्याजवळ आला, त्याची ते थट्टाच उडवित राहिले.

﴿كَذَٰلِكَ نَسْلُكُهُ فِي قُلُوبِ الْمُجْرِمِينَ﴾

१२. अपराधी लोकांच्या मनात आम्ही अशाच प्रकारे हेच रचत असतो.

﴿لَا يُؤْمِنُونَ بِهِ ۖ وَقَدْ خَلَتْ سُنَّةُ الْأَوَّلِينَ﴾

१३. ते याच्यावर ईमान राखत नाही आणि निःसंशय पूर्वीच्या लोकांची हीच पद्धत राहिली आहे.

﴿وَلَوْ فَتَحْنَا عَلَيْهِمْ بَابًا مِنَ السَّمَاءِ فَظَلُّوا فِيهِ يَعْرُجُونَ﴾

१४. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी आकाशात (जाण्याचा) दरवाजाही उघडून दिला आणि ते तिथे चढूही लागले.

﴿لَقَالُوا إِنَّمَا سُكِّرَتْ أَبْصَارُنَا بَلْ نَحْنُ قَوْمٌ مَسْحُورُونَ﴾

१५. तरीही हेच म्हणतील की आमची नजरबंदी केली गेली आहे, किंबहुना आमच्यावर जादूटोणा केला गेला आहे.

﴿وَلَقَدْ جَعَلْنَا فِي السَّمَاءِ بُرُوجًا وَزَيَّنَّاهَا لِلنَّاظِرِينَ﴾

१६. आणि निःसंशय, आम्ही आकाशात बुरुज (राशी) बनविले आहेत आणि पाहणाऱ्यांकरिता याला सुशोभित केले आहे.

﴿وَحَفِظْنَاهَا مِنْ كُلِّ شَيْطَانٍ رَجِيمٍ﴾

१७. आणि धिःक्कारलेल्या प्रत्येक सैतानापासून याला सुरक्षित ठेवले आहे.

﴿إِلَّا مَنِ اسْتَرَقَ السَّمْعَ فَأَتْبَعَهُ شِهَابٌ مُبِينٌ﴾

१८. तथापि, जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो, भडकत्या आगीचा निखारा त्याच्या पाठीशी लागतो.

﴿وَالْأَرْضَ مَدَدْنَاهَا وَأَلْقَيْنَا فِيهَا رَوَاسِيَ وَأَنْبَتْنَا فِيهَا مِنْ كُلِّ شَيْءٍ مَوْزُونٍ﴾

१९.
आणि जमिनीला आम्ही पसरवून दिले आहे आणि तिच्यावर पर्वत ठेवले आहेत आणि तिच्यात प्रत्येक वस्तू आम्ही निश्चित प्रमाणात उगविली आहे.

﴿وَجَعَلْنَا لَكُمْ فِيهَا مَعَايِشَ وَمَنْ لَسْتُمْ لَهُ بِرَازِقِينَ﴾

२०.
आणि तिच्यातच आम्ही तुमच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था केली आहे आणि (त्यांच्यासाठीही) ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाहीत.

﴿وَإِنْ مِنْ شَيْءٍ إِلَّا عِنْدَنَا خَزَائِنُهُ وَمَا نُنَزِّلُهُ إِلَّا بِقَدَرٍ مَعْلُومٍ﴾

२१.
आणि जेवढ्या म्हणून चीज-वस्तू आहेत, त्या सर्वांचा खजिना आमच्याजवळ आहे, आणि आम्ही प्रत्येक वस्तू तिच्या निर्धारित प्रमाणात उतरवितो.

﴿وَأَرْسَلْنَا الرِّيَاحَ لَوَاقِحَ فَأَنْزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَسْقَيْنَاكُمُوهُ وَمَا أَنْتُمْ لَهُ بِخَازِنِينَ﴾

२२.
आणि आम्ही वजनदार वाऱ्यांना पाठिवतो, मग आकाशातून पर्जन्य वृष्टी करून तुम्हाला तृप्त करतो आणि तुम्ही त्याचा संग्रह करून ठेवणारे नाहीत.

﴿وَإِنَّا لَنَحْنُ نُحْيِي وَنُمِيتُ وَنَحْنُ الْوَارِثُونَ﴾

२३. आणि आम्हीच जीवन देतो आणि मृत्युही देतो आणि (शेवटी) आम्हीच वारस आहोत.

﴿وَلَقَدْ عَلِمْنَا الْمُسْتَقْدِمِينَ مِنْكُمْ وَلَقَدْ عَلِمْنَا الْمُسْتَأْخِرِينَ﴾

२४. आणि तुमच्यापैकी पुढे जाणाऱ्यांना आणि मागे राहणाऱ्यांनाही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿وَإِنَّ رَبَّكَ هُوَ يَحْشُرُهُمْ ۚ إِنَّهُ حَكِيمٌ عَلِيمٌ﴾

२५. आणि तुमचा पालनकर्ता समस्त लोकांना एकत्रित करेल. निःसंशय तो मोठा तत्त्वदर्शी, मोठा ज्ञानी आहे.

﴿وَلَقَدْ خَلَقْنَا الْإِنْسَانَ مِنْ صَلْصَالٍ مِنْ حَمَإٍ مَسْنُونٍ﴾

२६. आणि निःसंशय, आम्ही मानवाला खनकणाऱ्या (कोरड्या) मातीपासून, जी सडलेल्या गाऱ्याची होती, निर्माण केले आहे.

﴿وَالْجَانَّ خَلَقْنَاهُ مِنْ قَبْلُ مِنْ نَارِ السَّمُومِ﴾

२७. आणि त्याच्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्निशिखेपासून निर्माण केले.

﴿وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَائِكَةِ إِنِّي خَالِقٌ بَشَرًا مِنْ صَلْصَالٍ مِنْ حَمَإٍ مَسْنُونٍ﴾

२८.
आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे.

﴿فَإِذَا سَوَّيْتُهُ وَنَفَخْتُ فِيهِ مِنْ رُوحِي فَقَعُوا لَهُ سَاجِدِينَ﴾

२९.
तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका)

﴿فَسَجَدَ الْمَلَائِكَةُ كُلُّهُمْ أَجْمَعُونَ﴾

३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला.

﴿إِلَّا إِبْلِيسَ أَبَىٰ أَنْ يَكُونَ مَعَ السَّاجِدِينَ﴾

३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला.

﴿قَالَ يَا إِبْلِيسُ مَا لَكَ أَلَّا تَكُونَ مَعَ السَّاجِدِينَ﴾

३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही?

﴿قَالَ لَمْ أَكُنْ لِأَسْجُدَ لِبَشَرٍ خَلَقْتَهُ مِنْ صَلْصَالٍ مِنْ حَمَإٍ مَسْنُونٍ﴾

३३.
तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे.

﴿قَالَ فَاخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ﴾

३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस.

﴿وَإِنَّ عَلَيْكَ اللَّعْنَةَ إِلَىٰ يَوْمِ الدِّينِ﴾

३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे.

﴿قَالَ رَبِّ فَأَنْظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ﴾

३६.
तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल.

﴿قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنْظَرِينَ﴾

३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे.

﴿إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ﴾

३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची.

﴿قَالَ رَبِّ بِمَا أَغْوَيْتَنِي لَأُزَيِّنَنَّ لَهُمْ فِي الْأَرْضِ وَلَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ﴾

३९.
(सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन.

﴿إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ﴾

४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे.

﴿قَالَ هَٰذَا صِرَاطٌ عَلَيَّ مُسْتَقِيمٌ﴾

४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे.

﴿إِنَّ عِبَادِي لَيْسَ لَكَ عَلَيْهِمْ سُلْطَانٌ إِلَّا مَنِ اتَّبَعَكَ مِنَ الْغَاوِينَ﴾

४२.
माझ्या (निवडक) दासांवर तुझा कोणताही प्रभाव पडणार नाही, मात्र जे वाट चुकलेले लोक आहेत, तेच तुझे अनुसरण करतील.

﴿وَإِنَّ جَهَنَّمَ لَمَوْعِدُهُمْ أَجْمَعِينَ﴾

४३. आणि निःसंशय, त्या सर्वांच्या वायद्याचे स्थान जहन्नम आहे.

﴿لَهَا سَبْعَةُ أَبْوَابٍ لِكُلِّ بَابٍ مِنْهُمْ جُزْءٌ مَقْسُومٌ﴾

४४. ज्याला सात दरवाजे आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांचा एक हिस्सा विभाजित आहे.

﴿إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ﴾

४५. निःसंशय, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे लोक बागांमध्ये आणि झऱ्यां (प्रवाहां) मध्ये असतील.

﴿ادْخُلُوهَا بِسَلَامٍ آمِنِينَ﴾

४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा.

﴿وَنَزَعْنَا مَا فِي صُدُورِهِمْ مِنْ غِلٍّ إِخْوَانًا عَلَىٰ سُرُرٍ مُتَقَابِلِينَ﴾

४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील.

﴿لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُمْ مِنْهَا بِمُخْرَجِينَ﴾

४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील.

﴿۞ نَبِّئْ عِبَادِي أَنِّي أَنَا الْغَفُورُ الرَّحِيمُ﴾

४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे.

﴿وَأَنَّ عَذَابِي هُوَ الْعَذَابُ الْأَلِيمُ﴾

५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे.

﴿وَنَبِّئْهُمْ عَنْ ضَيْفِ إِبْرَاهِيمَ﴾

५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा.

﴿إِذْ دَخَلُوا عَلَيْهِ فَقَالُوا سَلَامًا قَالَ إِنَّا مِنْكُمْ وَجِلُونَ﴾

५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१

﴿قَالُوا لَا تَوْجَلْ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَامٍ عَلِيمٍ﴾

५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो.

﴿قَالَ أَبَشَّرْتُمُونِي عَلَىٰ أَنْ مَسَّنِيَ الْكِبَرُ فَبِمَ تُبَشِّرُونَ﴾

५४.
इब्राहीम म्हणाले, काय या वृद्धावस्थेने स्पर्श केल्यानंतर तुम्ही मला ही शुभ वार्ता देता! ही आनंदाची बातमी तुम्ही कशी काय देत आहात?

﴿قَالُوا بَشَّرْنَاكَ بِالْحَقِّ فَلَا تَكُنْ مِنَ الْقَانِطِينَ﴾

५५. फरिश्ते म्हणाले, आम्ही तुम्हाला अगदी खरी शुभवार्ता ऐकवित आहोत. तुम्ही निराश लोकांमध्ये सामील होऊ नका.

﴿قَالَ وَمَنْ يَقْنَطُ مِنْ رَحْمَةِ رَبِّهِ إِلَّا الضَّالُّونَ﴾

५६. म्हणाले, आपल्या पालनकर्त्याच्या दया कृपेपासून केवळ ते (मार्गभ्रष्ट आणि) बहकलेले लोकच निराश होतात.

﴿قَالَ فَمَا خَطْبُكُمْ أَيُّهَا الْمُرْسَلُونَ﴾

५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे?

﴿قَالُوا إِنَّا أُرْسِلْنَا إِلَىٰ قَوْمٍ مُجْرِمِينَ﴾

५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे.

﴿إِلَّا آلَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمْ أَجْمَعِينَ﴾

५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू.

﴿إِلَّا امْرَأَتَهُ قَدَّرْنَا ۙ إِنَّهَا لَمِنَ الْغَابِرِينَ﴾

६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे.

﴿فَلَمَّا جَاءَ آلَ لُوطٍ الْمُرْسَلُونَ﴾

६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले.

﴿قَالَ إِنَّكُمْ قَوْمٌ مُنْكَرُونَ﴾

६२. तेव्हा लूत म्हणाले, तुम्ही लोक तर काहीसे अनोळखी वाटतात.

﴿قَالُوا بَلْ جِئْنَاكَ بِمَا كَانُوا فِيهِ يَمْتَرُونَ﴾

६३. ते म्हणाले, (नाही) किंबहुना आम्ही तुमच्याजवळ ती वस्तू घेऊन आलो आहोत, जिच्या बाबतीत हे लोक संशय करीत आहेत.

﴿وَأَتَيْنَاكَ بِالْحَقِّ وَإِنَّا لَصَادِقُونَ﴾

६४. आणि आम्ही तर तुझ्याजवळ (उघड) सत्य घेऊन आलो आहोत, आणि आम्ही आहोतही पुरेपुरे सच्चे!

﴿فَأَسْرِ بِأَهْلِكَ بِقِطْعٍ مِنَ اللَّيْلِ وَاتَّبِعْ أَدْبَارَهُمْ وَلَا يَلْتَفِتْ مِنْكُمْ أَحَدٌ وَامْضُوا حَيْثُ تُؤْمَرُونَ﴾

६५. आता तुम्ही आपल्या कुटुंबासह या रात्रीच्या एखाद्या भागात निघून जा.
तुम्ही स्वतः त्यांच्या मागे राहा (आणि सावधान!) तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये आणि ज्या ठिकाणी जायचा तुम्हाला आदेश दिला जात आहे, तिथे चालत जा.

﴿وَقَضَيْنَا إِلَيْهِ ذَٰلِكَ الْأَمْرَ أَنَّ دَابِرَ هَٰؤُلَاءِ مَقْطُوعٌ مُصْبِحِينَ﴾

६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील.

﴿وَجَاءَ أَهْلُ الْمَدِينَةِ يَسْتَبْشِرُونَ﴾

६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले.

﴿قَالَ إِنَّ هَٰؤُلَاءِ ضَيْفِي فَلَا تَفْضَحُونِ﴾

६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका.

﴿وَاتَّقُوا اللَّهَ وَلَا تُخْزُونِ﴾

६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका.

﴿قَالُوا أَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ الْعَالَمِينَ﴾

७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती?

﴿قَالَ هَٰؤُلَاءِ بَنَاتِي إِنْ كُنْتُمْ فَاعِلِينَ﴾

७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१

﴿لَعَمْرُكَ إِنَّهُمْ لَفِي سَكْرَتِهِمْ يَعْمَهُونَ﴾

७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते.

﴿فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُشْرِقِينَ﴾

७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले.

﴿فَجَعَلْنَا عَالِيَهَا سَافِلَهَا وَأَمْطَرْنَا عَلَيْهِمْ حِجَارَةً مِنْ سِجِّيلٍ﴾

७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला.

﴿إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِلْمُتَوَسِّمِينَ﴾

७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत.

﴿وَإِنَّهَا لَبِسَبِيلٍ مُقِيمٍ﴾

७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते.

﴿إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِلْمُؤْمِنِينَ﴾

७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे.

﴿وَإِنْ كَانَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ لَظَالِمِينَ﴾

७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते.

﴿فَانْتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُبِينٍ﴾

७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत.

﴿وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ﴾

८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले.

﴿وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ﴾

८१.
आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले.

﴿وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ﴾

८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता.

﴿فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُصْبِحِينَ﴾

८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले.

﴿فَمَا أَغْنَىٰ عَنْهُمْ مَا كَانُوا يَكْسِبُونَ﴾

८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही.

﴿وَمَا خَلَقْنَا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا إِلَّا بِالْحَقِّ ۗ وَإِنَّ السَّاعَةَ لَآتِيَةٌ ۖ فَاصْفَحِ الصَّفْحَ الْجَمِيلَ﴾

८५.
आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या.

﴿إِنَّ رَبَّكَ هُوَ الْخَلَّاقُ الْعَلِيمُ﴾

८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे.

﴿وَلَقَدْ آتَيْنَاكَ سَبْعًا مِنَ الْمَثَانِي وَالْقُرْآنَ الْعَظِيمَ﴾

८७.
निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे.

﴿لَا تَمُدَّنَّ عَيْنَيْكَ إِلَىٰ مَا مَتَّعْنَا بِهِ أَزْوَاجًا مِنْهُمْ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَاخْفِضْ جَنَاحَكَ لِلْمُؤْمِنِينَ﴾

८८.
तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे.
त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या).

﴿وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ﴾

८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे.

﴿كَمَا أَنْزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ﴾

९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला.

﴿الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ﴾

९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले.

﴿فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ﴾

९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू.

﴿عَمَّا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते.

﴿فَاصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِينَ﴾

९४.
तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या.

﴿إِنَّا كَفَيْنَاكَ الْمُسْتَهْزِئِينَ﴾

९५. तुमच्याशी ते लोक थट्टा मस्करी करतात त्यांच्या (शिक्षे) करिता आम्ही पर्याप्त आहोत.

﴿الَّذِينَ يَجْعَلُونَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ ۚ فَسَوْفَ يَعْلَمُونَ﴾

९६. जे लोक अल्लाहच्या सोबत आणखी इतर उपास्ये बनवितात, त्यांना लवकरच माहीत पडेल.

﴿وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّكَ يَضِيقُ صَدْرُكَ بِمَا يَقُولُونَ﴾

९७. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच पोहचते.

﴿فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَكُنْ مِنَ السَّاجِدِينَ﴾

९८.
तुम्ही आपल्या पालनकर्त्याची महानता आणि स्तुती प्रशंसाचे वर्णन करीत राहा आणि नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील व्हा.

﴿وَاعْبُدْ رَبَّكَ حَتَّىٰ يَأْتِيَكَ الْيَقِينُ﴾

९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: