محمد

تفسير سورة محمد

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الَّذِينَ كَفَرُوا وَصَدُّوا عَنْ سَبِيلِ اللَّهِ أَضَلَّ أَعْمَالَهُمْ﴾

१.
ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले, अल्लाहने त्यांची कर्मे निष्फळ करून टाकलीत.

﴿وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَآمَنُوا بِمَا نُزِّلَ عَلَىٰ مُحَمَّدٍ وَهُوَ الْحَقُّ مِنْ رَبِّهِمْ ۙ كَفَّرَ عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ وَأَصْلَحَ بَالَهُمْ﴾

२.
आणि ज्या लोकांनी ईमान राखलेत आणि सत्कर्मे केलीत आणि त्यावरही विश्वास राखला जो मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) वर अवतरित केला गेला आहे आणि वस्तुतः त्यांच्या पालनकर्त्यातर्फे सत्य (धर्म) देखील तोच आहे. अल्लाहने त्याचे अपराध मिटविले आणि त्यांच्या अवस्थेत सुधारणा केली.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّ الَّذِينَ كَفَرُوا اتَّبَعُوا الْبَاطِلَ وَأَنَّ الَّذِينَ آمَنُوا اتَّبَعُوا الْحَقَّ مِنْ رَبِّهِمْ ۚ كَذَٰلِكَ يَضْرِبُ اللَّهُ لِلنَّاسِ أَمْثَالَهُمْ﴾

३.
हे अशासाठी की काफिर (इन्कारी) लोकांनी असत्याचे अनुसरण केले आणि ईमान राखणाऱ्यांनी त्या सत्य (धर्मा) चे अनुसरण केले, जो त्यांच्या पालनकर्त्यातर्फे आहे. अल्लाह लोकांना त्यांची स्थिती अशा प्रकारे दर्शवितो.

﴿فَإِذَا لَقِيتُمُ الَّذِينَ كَفَرُوا فَضَرْبَ الرِّقَابِ حَتَّىٰ إِذَا أَثْخَنْتُمُوهُمْ فَشُدُّوا الْوَثَاقَ فَإِمَّا مَنًّا بَعْدُ وَإِمَّا فِدَاءً حَتَّىٰ تَضَعَ الْحَرْبُ أَوْزَارَهَا ۚ ذَٰلِكَ وَلَوْ يَشَاءُ اللَّهُ لَانْتَصَرَ مِنْهُمْ وَلَٰكِنْ لِيَبْلُوَ بَعْضَكُمْ بِبَعْضٍ ۗ وَالَّذِينَ قُتِلُوا فِي سَبِيلِ اللَّهِ فَلَنْ يُضِلَّ أَعْمَالَهُمْ﴾

४.
तर जेव्हा काफिरांशी तुमचा सामना होईल, तेव्हा त्याच्या मानांवर वार करा येथे पर्यर्ंत की जेव्हा त्यांना खूप चांगल्या प्रकारे ठेचून काढाल, तर आता खूप मजबूत कारागृहात कैद करा (मग तुम्हाला अधिकार आहे की) उपकार करून कैदेतून मुक्त करा किंवा काही अर्थदंड (फिदिया) घेऊन, जोपर्यंत युद्ध (करणारे) आपले शस्त्र खाली ठेवतील.
हाच आदेश आहे आणि जर अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच त्यांचा सूड घेतला असता, परंतु (तो असे इच्छितो) की तुमच्यापैकी एकाची परीक्षा दुसऱ्याकडून घ्यावी आणि जे लोक अल्लाहच्या मार्गात शहीद केले जातात, अल्लाह त्यांची कर्मे कधीही वाया जाऊ देणार नाही.

﴿سَيَهْدِيهِمْ وَيُصْلِحُ بَالَهُمْ﴾

५. तो त्यांना मार्गदर्शन करील आणि त्यांच्या अवस्थेत सुधारणा करील.

﴿وَيُدْخِلُهُمُ الْجَنَّةَ عَرَّفَهَا لَهُمْ﴾

६. आणि त्यांना त्या जन्नतमध्ये दाखल करील, जिचा परिचय त्यांना करून दिला गेला आहे.

﴿يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِنْ تَنْصُرُوا اللَّهَ يَنْصُرْكُمْ وَيُثَبِّتْ أَقْدَامَكُمْ﴾

७.
हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही अल्लाह (च्या धर्मा) ची मदत कराल, तर तो तुमची मदत करेल आणि तुमचे पाय मजबूत (स्थिर) राखेल.

﴿وَالَّذِينَ كَفَرُوا فَتَعْسًا لَهُمْ وَأَضَلَّ أَعْمَالَهُمْ﴾

८. आणि जे लोक काफिर (इन्कारी) झालेत, त्यांचा सर्वनाश असो, अल्लाहने त्यांची कर्मे निष्फळ केली.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ كَرِهُوا مَا أَنْزَلَ اللَّهُ فَأَحْبَطَ أَعْمَالَهُمْ﴾

९.
हे अशासाठी की अल्लाहने अवतरित केलेल्या गोष्टीपासून नाराज झाले, तेव्हा अल्लाहने देखील त्यांची कर्मे वाया घालवलीत.

﴿۞ أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ ۚ دَمَّرَ اللَّهُ عَلَيْهِمْ ۖ وَلِلْكَافِرِينَ أَمْثَالُهَا﴾

१०.
काय त्या लोकांनी जमिनीवर हिंडून फिरून या गोष्टीचे निरीक्षण नाही केले की त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय परिणीती झाली? अल्लाहने त्यांना नष्ट करून टाकले आणि काफिरांसाठी अशीच शिक्षा आहे.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّ اللَّهَ مَوْلَى الَّذِينَ آمَنُوا وَأَنَّ الْكَافِرِينَ لَا مَوْلَىٰ لَهُمْ﴾

११.
ते यासाठी की ईमान राखणाऱ्यांचा संरक्षक स्वतः अल्लाह आहे, आणि यासाठी की काफिर लोकांचा कोणीही संरक्षक नाही.

﴿إِنَّ اللَّهَ يُدْخِلُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ ۖ وَالَّذِينَ كَفَرُوا يَتَمَتَّعُونَ وَيَأْكُلُونَ كَمَا تَأْكُلُ الْأَنْعَامُ وَالنَّارُ مَثْوًى لَهُمْ﴾

१२.
ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत, त्यांना अल्लाह निश्चितपणे अशा बागांमध्ये दाखल करील, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत आणि जे लोक काफिर (इन्कारी) झालेत, ते (केवळ या जगाचाच) लाभ घेत आहेत आणि जनावरांसारखे खात आहेत. त्यांचे (खरे) ठिकाण जहन्नम आहे.

﴿وَكَأَيِّنْ مِنْ قَرْيَةٍ هِيَ أَشَدُّ قُوَّةً مِنْ قَرْيَتِكَ الَّتِي أَخْرَجَتْكَ أَهْلَكْنَاهُمْ فَلَا نَاصِرَ لَهُمْ﴾

१३.
आणि आम्ही कित्येक वस्त्यांना, ज्या शक्ती-सामर्थ्यात तुमच्या या वस्तीपेक्षा अधिक होत्या, जिच्यातून तुम्हाला बाहेर काढले गेले. आम्ही त्यांना नष्ट करून टाकले, ज्यांची मदत करणारा कोणीही नव्हता.

﴿أَفَمَنْ كَانَ عَلَىٰ بَيِّنَةٍ مِنْ رَبِّهِ كَمَنْ زُيِّنَ لَهُ سُوءُ عَمَلِهِ وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ﴾

१४.
काय ते लोक, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणावर असावेत त्या माणसासारखे असू शकतात, ज्याच्यासाठी त्याची दुष्कर्मे चांगली (सुशोभित) बनविली गेली असावी. आणि तो आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करत असावा?

﴿مَثَلُ الْجَنَّةِ الَّتِي وُعِدَ الْمُتَّقُونَ ۖ فِيهَا أَنْهَارٌ مِنْ مَاءٍ غَيْرِ آسِنٍ وَأَنْهَارٌ مِنْ لَبَنٍ لَمْ يَتَغَيَّرْ طَعْمُهُ وَأَنْهَارٌ مِنْ خَمْرٍ لَذَّةٍ لِلشَّارِبِينَ وَأَنْهَارٌ مِنْ عَسَلٍ مُصَفًّى ۖ وَلَهُمْ فِيهَا مِنْ كُلِّ الثَّمَرَاتِ وَمَغْفِرَةٌ مِنْ رَبِّهِمْ ۖ كَمَنْ هُوَ خَالِدٌ فِي النَّارِ وَسُقُوا مَاءً حَمِيمًا فَقَطَّعَ أَمْعَاءَهُمْ﴾

१५.
त्या जन्नतचे वैशिष्ट्य, जिचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्या लोकांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्यात (शीतल) जलप्रवाह वाहत आहेत, ज्यांना दुर्गंध नाही आणि दुधाच्या नद्या आहेत, ज्यांचा स्वाद बदलणार नाही. आणि मद्याचे प्रवाह आहेत.
ज्यांच्यात पिणाऱ्यांकरिता खूप स्वाद आहे आणि स्रच्छ निर्भेळ मधाचे प्रवाह आहेत, आणि त्यांच्यासाठी तिथे प्रत्येक प्रकारचे मेवे (फळ) आहेत, आणि त्यांच्या पालनकर्त्यातर्फे क्षमा आहे, काय हे त्या लोकांसमान आहेत, जे नेहमी आगीत राहणारे आहेत आणि ज्यांना खूप गरम उकळते पाणी पाजले जाईल, जे त्यांच्या आतडींचे तुकडे तुकडे करील.

﴿وَمِنْهُمْ مَنْ يَسْتَمِعُ إِلَيْكَ حَتَّىٰ إِذَا خَرَجُوا مِنْ عِنْدِكَ قَالُوا لِلَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ مَاذَا قَالَ آنِفًا ۚ أُولَٰئِكَ الَّذِينَ طَبَعَ اللَّهُ عَلَىٰ قُلُوبِهِمْ وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ﴾

१६.
आणि त्यांच्यापैकी काही (असेही आहेत की) जे तुमच्याकडे कान लावतात येथेपर्यंत की जेव्हा तुमच्या जवळून जातात, तेव्हा ज्ञान बाळगणाऱ्यांना (सुस्ती आणि बावळटपणे) विचारतात की त्याने (पैगंबराने) आता एवढ्यात काय सांगितले होते? हेच लोक होत, ज्यांच्या हृदयांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि ते आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करतात.

﴿وَالَّذِينَ اهْتَدَوْا زَادَهُمْ هُدًى وَآتَاهُمْ تَقْوَاهُمْ﴾

१७.
आणि ज्या लोकांनी सन्मार्ग प्राप्त करून घेतला आहे, अल्लाहने त्यांच्या मार्गदर्शनात आणखी वाढ केली आहे, आणि त्यांना त्यांचा सदाचार प्रदान केला आहे.

﴿فَهَلْ يَنْظُرُونَ إِلَّا السَّاعَةَ أَنْ تَأْتِيَهُمْ بَغْتَةً ۖ فَقَدْ جَاءَ أَشْرَاطُهَا ۚ فَأَنَّىٰ لَهُمْ إِذَا جَاءَتْهُمْ ذِكْرَاهُمْ﴾

१८. तर काय हे लोक कयामतची प्रतीक्षा करीत आहेत की ती त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहचावी.
निःसंशय, तिची लक्षणे तर जाहीर झाली आहेत, मग जेव्हा कयामत त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल, तेव्हा त्यांच्यासाठी बोध प्राप्त करण्याची संधी कोठे बाकी राहील?

﴿فَاعْلَمْ أَنَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا اللَّهُ وَاسْتَغْفِرْ لِذَنْبِكَ وَلِلْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ مُتَقَلَّبَكُمْ وَمَثْوَاكُمْ﴾

१९.
तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही खात्री बाळगा की अल्लाहखेरीज दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही, आणि आपल्या अपराधांची माफी मागत राहा आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांकरिता व ईमान राखणाऱ्या स्त्रियांकरिताही१ अल्लाह तुमच्या येण्या-जाण्याच्या व निवासाच्या ठिकाणास चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿وَيَقُولُ الَّذِينَ آمَنُوا لَوْلَا نُزِّلَتْ سُورَةٌ ۖ فَإِذَا أُنْزِلَتْ سُورَةٌ مُحْكَمَةٌ وَذُكِرَ فِيهَا الْقِتَالُ ۙ رَأَيْتَ الَّذِينَ فِي قُلُوبِهِمْ مَرَضٌ يَنْظُرُونَ إِلَيْكَ نَظَرَ الْمَغْشِيِّ عَلَيْهِ مِنَ الْمَوْتِ ۖ فَأَوْلَىٰ لَهُمْ﴾

२०.
आणि ज्यांनी ईमान राखले ते म्हणतात की एखादी सूरह (अध्याय) का नाही अवतरित केली गेली, मग जेव्हा एखादी स्पष्ट अर्थाची सूरह अवतरित केली जाते आणि तिच्यात जिहादचा उल्लेख केला जातो, तेव्हा तुम्ही पाहता की ज्यांच्या मनात रोग आहे, ते तुमच्याकडे अशा प्रकारे पाहतात जसे तो मनुष्य पाहतो, जो मृत्युने मूर्छित झाला असेल. तेव्हा फार चांगले होते त्यांच्याकरिता.

﴿طَاعَةٌ وَقَوْلٌ مَعْرُوفٌ ۚ فَإِذَا عَزَمَ الْأَمْرُ فَلَوْ صَدَقُوا اللَّهَ لَكَانَ خَيْرًا لَهُمْ﴾

२१.
आज्ञापालन करणे आणि भल्या चांगल्या गोष्टी बोलणे मग जेव्हा कार्य निर्धारित होईल, तेव्हा जर ते अल्लाहशी सचोटीने राहतील तर त्यांच्यासाठी भलाई आहे.

﴿فَهَلْ عَسَيْتُمْ إِنْ تَوَلَّيْتُمْ أَنْ تُفْسِدُوا فِي الْأَرْضِ وَتُقَطِّعُوا أَرْحَامَكُمْ﴾

२२.
आणि तुमच्याकडून तेही दूर (असंभव) नाही की जर तुम्हाला राज्य लाभेल, तर तुम्ही धरतीवर उत्पात (फसाद) निर्माण कराल आणि नाते संबंध तोडाल.

﴿أُولَٰئِكَ الَّذِينَ لَعَنَهُمُ اللَّهُ فَأَصَمَّهُمْ وَأَعْمَىٰ أَبْصَارَهُمْ﴾

२३.
हेच ते लोक होत, ज्यांचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि (अल्लाहने) ज्यांची श्रवण शक्ती आणि डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेतला आहे.

﴿أَفَلَا يَتَدَبَّرُونَ الْقُرْآنَ أَمْ عَلَىٰ قُلُوبٍ أَقْفَالُهَا﴾

२४. काय हे लोक कुरआनावर विचार चिंतन नाही करीत किंवा त्यांच्या हृदयांवर कुलुपे लावली गेली आहेत?

﴿إِنَّ الَّذِينَ ارْتَدُّوا عَلَىٰ أَدْبَارِهِمْ مِنْ بَعْدِ مَا تَبَيَّنَ لَهُمُ الْهُدَى ۙ الشَّيْطَانُ سَوَّلَ لَهُمْ وَأَمْلَىٰ لَهُمْ﴾

२५.
ज्या लोकांनी मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतरही आपली पाठ फिरवली तर निःसंशय, सैतानाने त्यांच्याकरिता (त्यांच्या कर्मांना) सुशोभित केले आहे आणि त्यांना ढील (सवड) देऊन ठेवली आहे.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَالُوا لِلَّذِينَ كَرِهُوا مَا نَزَّلَ اللَّهُ سَنُطِيعُكُمْ فِي بَعْضِ الْأَمْرِ ۖ وَاللَّهُ يَعْلَمُ إِسْرَارَهُمْ﴾

२६.
हे अशासाठी की, त्यांनी त्या लोकांना, ज्यांनी अल्लाहने अवतरित केलेल्या (वहयी)ला नापसंत केले, हे सांगितले की आम्हीही निकट भविष्यात काही कामांमध्ये तुमचे म्हणणे मान्य करून आणि अल्लाह त्यांच्या रहस्यभेदांना चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿فَكَيْفَ إِذَا تَوَفَّتْهُمُ الْمَلَائِكَةُ يَضْرِبُونَ وُجُوهَهُمْ وَأَدْبَارَهُمْ﴾

२७.
तेव्हा त्यांची कशी दुरावस्था होईल, जेव्हा फरिश्ते त्यांचे प्राण काढताना त्यांच्या तोंडावर आणि कंबरेवर मारतील.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّهُمُ اتَّبَعُوا مَا أَسْخَطَ اللَّهَ وَكَرِهُوا رِضْوَانَهُ فَأَحْبَطَ أَعْمَالَهُمْ﴾

२८.
हे या कारणास्तव की यांनी त्या मार्गाचे अनुसरण केले, ज्यामुळे (त्यांनी) अल्लाहला नाराज केले आणि त्यांनी त्याच्या प्रसन्नतेला वाईट जाणले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या कर्मांना निष्फळ केले.

﴿أَمْ حَسِبَ الَّذِينَ فِي قُلُوبِهِمْ مَرَضٌ أَنْ لَنْ يُخْرِجَ اللَّهُ أَضْغَانَهُمْ﴾

२९.
काय त्या लोकांनी, ज्यांच्या मनात रोग (विकृती) आहे, असे समजून घेतले आहे की अल्लाह त्यांचे कपट जाहीर करणारच नाही.

﴿وَلَوْ نَشَاءُ لَأَرَيْنَاكَهُمْ فَلَعَرَفْتَهُمْ بِسِيمَاهُمْ ۚ وَلَتَعْرِفَنَّهُمْ فِي لَحْنِ الْقَوْلِ ۚ وَاللَّهُ يَعْلَمُ أَعْمَالَكُمْ﴾

३०.
आणि जर आम्ही इच्छिले असते तर तुम्हाला, त्या सर्वांना दाखविले असते तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवरूनच त्यांना ओळखले असते, आणि निःसंशय, तुम्ही त्यांना त्यांच्या संभाषण शैलीवरून ओळखाल, तुमची समस्त कर्मे अल्लाह जाणून आहे.

﴿وَلَنَبْلُوَنَّكُمْ حَتَّىٰ نَعْلَمَ الْمُجَاهِدِينَ مِنْكُمْ وَالصَّابِرِينَ وَنَبْلُوَ أَخْبَارَكُمْ﴾

३१.
आणि निःसंशय आम्ही तुमची कसोटी घेऊ यासाठी की तुमच्यापैकी जिहाद करणाऱ्यांना आणि धैर्य-संयम राखणाऱ्यांना पाहावे, आणि तुमच्या अवस्थांचीही जाच पडताळ करून घ्यावी.

﴿إِنَّ الَّذِينَ كَفَرُوا وَصَدُّوا عَنْ سَبِيلِ اللَّهِ وَشَاقُّوا الرَّسُولَ مِنْ بَعْدِ مَا تَبَيَّنَ لَهُمُ الْهُدَىٰ لَنْ يَضُرُّوا اللَّهَ شَيْئًا وَسَيُحْبِطُ أَعْمَالَهُمْ﴾

३२.
निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखले आणि पैगंबराचा विरोध केला यानंतर की त्यांच्यासाठी मार्गदर्शन स्पष्ट झाले, हे कधीही अल्लाहला कसलेही नुकसान पोहचविणार नाहीत. अल्लाह लवकरच त्यांच्या कर्मांना नष्ट करून टाकील.

﴿۞ يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا أَطِيعُوا اللَّهَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ وَلَا تُبْطِلُوا أَعْمَالَكُمْ﴾

३३. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे आज्ञापालन करा आणि पैगंबरांचे आज्ञापालन करा आणि आपली कर्मे वाया घालवू नका.

﴿إِنَّ الَّذِينَ كَفَرُوا وَصَدُّوا عَنْ سَبِيلِ اللَّهِ ثُمَّ مَاتُوا وَهُمْ كُفَّارٌ فَلَنْ يَغْفِرَ اللَّهُ لَهُمْ﴾

३४.
निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून (दुसऱ्यांना) रोखले, मग कुप्रच्या अवस्थेतच मरण पावले (विश्वास राखा की) अल्लाह त्या लोकांना कधीही माफ करणार नाही.

﴿فَلَا تَهِنُوا وَتَدْعُوا إِلَى السَّلْمِ وَأَنْتُمُ الْأَعْلَوْنَ وَاللَّهُ مَعَكُمْ وَلَنْ يَتِرَكُمْ أَعْمَالَكُمْ﴾

३५.
तेव्हा तुम्ही कमजोर बनून तह (समजोता) ची विनंती करण्याच्या स्तरावर येऊ नका, जेव्हा की तुम्हीच (विजयी आणि) वर्चस्वशाली राहाल,१ आणि अल्लाह तुमच्या सोबतीला आहे (आपल्या ज्ञानाद्वारे) अशक्य आहे की तो तुमची कर्मे वाया घालविल.

﴿إِنَّمَا الْحَيَاةُ الدُّنْيَا لَعِبٌ وَلَهْوٌ ۚ وَإِنْ تُؤْمِنُوا وَتَتَّقُوا يُؤْتِكُمْ أُجُورَكُمْ وَلَا يَسْأَلْكُمْ أَمْوَالَكُمْ﴾

३६.
वस्तुतः या जगाचे जीवन तर खेळ तमाशा आहे आणि जर तुम्ही ईमान राखाल आणि अल्लाहचे भय (तकवा) अंगीकाराल, तर अल्लाह तुम्हाला तुमच्या कर्मांचा मोबदला प्रदान करील आणि तो तुमच्याकडून तुमची धन-दौलत मागत नाही.

﴿إِنْ يَسْأَلْكُمُوهَا فَيُحْفِكُمْ تَبْخَلُوا وَيُخْرِجْ أَضْغَانَكُمْ﴾

३७.
जर तो तुमच्याकडून तुमचे धन मागेल आणि बलपूर्वक मागेल तर तुम्ही त्याच्याशी कंजूसपणा करू लागाल आणि तो तुमचा व्यंग- दोष जाहीर करेल.

﴿هَا أَنْتُمْ هَٰؤُلَاءِ تُدْعَوْنَ لِتُنْفِقُوا فِي سَبِيلِ اللَّهِ فَمِنْكُمْ مَنْ يَبْخَلُ ۖ وَمَنْ يَبْخَلْ فَإِنَّمَا يَبْخَلُ عَنْ نَفْسِهِ ۚ وَاللَّهُ الْغَنِيُّ وَأَنْتُمُ الْفُقَرَاءُ ۚ وَإِنْ تَتَوَلَّوْا يَسْتَبْدِلْ قَوْمًا غَيْرَكُمْ ثُمَّ لَا يَكُونُوا أَمْثَالَكُمْ﴾

३८.
खबरदार! तुम्ही ते लोक आहात की अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यासाठी बोलविले जातात, तेव्हा तुमच्यापैकी काही जण कंजूसपणा करू लागतात आणि जो कंजूसपणा करतो, तो निःसंशय स्वतःशीच कंजूसपणा करतो.
सर्वश्रेष्ठ अल्लाह निःस्पृह आहे आणि तुम्ही गरजवंत आहात, आणि जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर तो तुमच्या जागी, तुमच्याखेरीज दुसऱ्या लोकांना आणिल जे मग तुमच्यासारखे नसतील.

الترجمات والتفاسير لهذه السورة: