غافر

تفسير سورة غافر

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ حم﴾

१. हा. मीम

﴿تَنْزِيلُ الْكِتَابِ مِنَ اللَّهِ الْعَزِيزِ الْعَلِيمِ﴾

२. या ग्रंथाचे अवतरित करणे, त्या अल्लाहतर्फे आहे जो वर्चस्वशाली आणि ज्ञान बाळगणारा आहे.

﴿غَافِرِ الذَّنْبِ وَقَابِلِ التَّوْبِ شَدِيدِ الْعِقَابِ ذِي الطَّوْلِ ۖ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ إِلَيْهِ الْمَصِيرُ﴾

३.
अपराधांना माफ करणारा आणि तौबा (क्षमा -यातना) कबूल करणारा, कठोर शिक्षा - यातना देणारा, उपकार (कृपा) आणि सामर्थ्य बाळगणारा, ज्याच्याखेरीज कोणी उपास्य नाही, त्याच्याचकडे परतावयाचे आहे.

﴿مَا يُجَادِلُ فِي آيَاتِ اللَّهِ إِلَّا الَّذِينَ كَفَرُوا فَلَا يَغْرُرْكَ تَقَلُّبُهُمْ فِي الْبِلَادِ﴾

४.
अल्लाहच्या आयतींमध्ये तेच लोक वाद घालतात, जे काफिर आहेत तेव्हा त्या लोकांचे शहरांमध्ये हिंडणे फिरणे तुम्हाला धोक्यात न टाकावे.

﴿كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَالْأَحْزَابُ مِنْ بَعْدِهِمْ ۖ وَهَمَّتْ كُلُّ أُمَّةٍ بِرَسُولِهِمْ لِيَأْخُذُوهُ ۖ وَجَادَلُوا بِالْبَاطِلِ لِيُدْحِضُوا بِهِ الْحَقَّ فَأَخَذْتُهُمْ ۖ فَكَيْفَ كَانَ عِقَابِ﴾

५.
त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि त्यांच्या नंतरच्या इतर जनसमूहांनी देखील खोटे ठरविले होते आणि प्रत्येक जनसमुदायाने आपल्या पैगंबराला बंदिस्त बनविण्याचा इरादा केला आणि असत्याद्वआरे हटवादीपणा केला, यासाठी की त्याद्वारे सत्याला नष्ट करून टाकावे, तेव्हा मी त्यांना पकडीत घेतले, तर बघा कशी होती माझी शिक्षा!

﴿وَكَذَٰلِكَ حَقَّتْ كَلِمَتُ رَبِّكَ عَلَى الَّذِينَ كَفَرُوا أَنَّهُمْ أَصْحَابُ النَّارِ﴾

६. आणि या प्रकारे तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लोकांवरही लागू झाले. ज्यांनी कुप्र (इन्कार) केला की ते जहन्नमी आहेत.

﴿الَّذِينَ يَحْمِلُونَ الْعَرْشَ وَمَنْ حَوْلَهُ يُسَبِّحُونَ بِحَمْدِ رَبِّهِمْ وَيُؤْمِنُونَ بِهِ وَيَسْتَغْفِرُونَ لِلَّذِينَ آمَنُوا رَبَّنَا وَسِعْتَ كُلَّ شَيْءٍ رَحْمَةً وَعِلْمًا فَاغْفِرْ لِلَّذِينَ تَابُوا وَاتَّبَعُوا سَبِيلَكَ وَقِهِمْ عَذَابَ الْجَحِيمِ﴾

७.
अर्श (अल्लाहच्या सिंहासना) ला उचलून धरणारे आणि त्याच्याभोवती असणारे फरिश्ते आपल्या पालनकर्त्याच्या पवित्रतेचे गुणगान, प्रशंसेसह करतात आणि त्याच्यावर ईमान राखतात आणि ईमान राखणाऱ्यांसाठी क्षमा - याचनेची प्रार्थना करतात, (म्हणतात) की हे आमच्या स्वामी व पालनकर्त्या! तू प्रत्येक गोष्टीला आपल्या दया आणि ज्ञानाने घेरून ठेवले आहे, तेव्हा तू त्यांना माफ कर, जे माफी मागतील आणि तुझ्या मार्गाचे अनुसरण करतील, आणि तू त्यांना जहन्नमच्या शिक्षा - यातनेपासूनही सुरक्षित ठेव.

﴿رَبَّنَا وَأَدْخِلْهُمْ جَنَّاتِ عَدْنٍ الَّتِي وَعَدْتَهُمْ وَمَنْ صَلَحَ مِنْ آبَائِهِمْ وَأَزْوَاجِهِمْ وَذُرِّيَّاتِهِمْ ۚ إِنَّكَ أَنْتَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ﴾

८.
हे आमच्या पालनकर्त्या! तू त्यांना सदैवकाळ राहणाऱ्या जन्नतींमध्ये मध्ये दाखल कर, ज्यांचा तू त्यांना वायदा दिला आहेस, आणि त्यांच्या वाडवडील आणि पत्न्या आणि संततीपैकी (ही) त्या सर्वांना जे नेक सदाचारी आहेत. निःसंशय, तू जबरदस्त व हिकमतशाली आहे.

﴿وَقِهِمُ السَّيِّئَاتِ ۚ وَمَنْ تَقِ السَّيِّئَاتِ يَوْمَئِذٍ فَقَدْ رَحِمْتَهُ ۚ وَذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ﴾

९.
आणि त्यांना कुकर्मांपासूनही सुरक्षित ठेव (खरी गोष्ट अशी की) त्या दिवशी ज्याला तू दुष्कर्मापासून वाचवून घेतले, त्याच्यावर तू निश्चितच दया - कृपा केलीस आणि सर्वांत मोठी सफलता हीच आहे.

﴿إِنَّ الَّذِينَ كَفَرُوا يُنَادَوْنَ لَمَقْتُ اللَّهِ أَكْبَرُ مِنْ مَقْتِكُمْ أَنْفُسَكُمْ إِذْ تُدْعَوْنَ إِلَى الْإِيمَانِ فَتَكْفُرُونَ﴾

१०.
निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, त्यांना मोठ्या आवाजाने सांगितले जाईल की निश्चितच अल्लाहचे तुमच्यावर नाराज होणे त्याहून फार जास्त आहे, जे तुम्ही नाराज होत होते आपल्या मनाने, जेव्हा तुम्हाला ईमानाकडे बोलविले जात होते, मग तुम्ही कुप्र (इन्कार) करू लागत असत.

﴿قَالُوا رَبَّنَا أَمَتَّنَا اثْنَتَيْنِ وَأَحْيَيْتَنَا اثْنَتَيْنِ فَاعْتَرَفْنَا بِذُنُوبِنَا فَهَلْ إِلَىٰ خُرُوجٍ مِنْ سَبِيلٍ﴾

११.
(ते) म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला दुसऱ्यांदा मृत्यु दिला आणि दुसऱ्यांदाच जिवंत केले, आता आम्ही आपले अपराध कबूल करतो. तर काय आता एखादा मार्ग बाहेर पडण्याचाही आहे?

﴿ذَٰلِكُمْ بِأَنَّهُ إِذَا دُعِيَ اللَّهُ وَحْدَهُ كَفَرْتُمْ ۖ وَإِنْ يُشْرَكْ بِهِ تُؤْمِنُوا ۚ فَالْحُكْمُ لِلَّهِ الْعَلِيِّ الْكَبِيرِ﴾

१२.
ही शिक्षा तुम्हाला एवढ्यासाठी आहे की जेव्हा केवळ एकमेव अल्लाहकडे बोलाविले जात असे, तेव्हा तुम्ही इन्कार करीत आणि जर त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करून घेतले जात असे, तेव्हा तुम्ही मान्य करून घेत,१ तेव्हा आता फैसला, सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचाच आहे.

﴿هُوَ الَّذِي يُرِيكُمْ آيَاتِهِ وَيُنَزِّلُ لَكُمْ مِنَ السَّمَاءِ رِزْقًا ۚ وَمَا يَتَذَكَّرُ إِلَّا مَنْ يُنِيبُ﴾

१३. तोच होय जो तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवितो, आणि तुमच्यासाठी आकाशातून रोजी (आजिविका) अवतरित करतो. बोध केवळ तेच ग्रहण करतात, जे (अल्लाहकडे) झुकतात.

﴿فَادْعُوا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ﴾

१४. तुम्ही अल्लाहला पुकारत राहा, त्याच्यासाठी दीन (धर्मा) ला निखालस करून, मग ते काफिरांना कितीही अप्रिय वाटो!

﴿رَفِيعُ الدَّرَجَاتِ ذُو الْعَرْشِ يُلْقِي الرُّوحَ مِنْ أَمْرِهِ عَلَىٰ مَنْ يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ لِيُنْذِرَ يَوْمَ التَّلَاقِ﴾

१५. अति उच्च दर्जा बाळगणारा अर्श (ईशसिंहासना) चा स्वामी.
तो आपल्या दासांपैकी ज्याच्यावर इच्छितो, वहयी (प्रकाशना) अवतरित करतो, यासाठी की त्याने भेटीच्या दिवशापासून खबरदार करावे.

﴿يَوْمَ هُمْ بَارِزُونَ ۖ لَا يَخْفَىٰ عَلَى اللَّهِ مِنْهُمْ شَيْءٌ ۚ لِمَنِ الْمُلْكُ الْيَوْمَ ۖ لِلَّهِ الْوَاحِدِ الْقَهَّارِ﴾

१६. ज्या दिवशी सर्व लोक जाहीर होतील, त्यांची कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपून राहणार नाही. आज कोणाचे राज्य आहे? केवळ एकमेवआणि जबरदस्त अशा अल्लाहचे!

﴿الْيَوْمَ تُجْزَىٰ كُلُّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ ۚ لَا ظُلْمَ الْيَوْمَ ۚ إِنَّ اللَّهَ سَرِيعُ الْحِسَابِ﴾

१७. आज प्रत्येक जीवाला त्याच्या कृत-कर्माचा मोबदला दिला जाईल, आज (कशाही प्रकारचा) अत्याचार नाही. निःसंशय, अल्लाह लवकरच हिशोब घेणार आहे.

﴿وَأَنْذِرْهُمْ يَوْمَ الْآزِفَةِ إِذِ الْقُلُوبُ لَدَى الْحَنَاجِرِ كَاظِمِينَ ۚ مَا لِلظَّالِمِينَ مِنْ حَمِيمٍ وَلَا شَفِيعٍ يُطَاعُ﴾

१८.
आणि त्यांना फार जवळ येणाऱ्या (कयामत) विषयी सावध करा, जेव्हा हृदये गळ्यापर्यर्ंत पोहचतील आणि सर्व शांत राहतील, अत्याचारींचा ना कोणी मित्र असेल आणि ना शिफारस करणारा की ज्याचे म्हणणे मान्य केले जावे.

﴿يَعْلَمُ خَائِنَةَ الْأَعْيُنِ وَمَا تُخْفِي الصُّدُورُ﴾

१९. तो डोळ्यांच्या बेईमानीला आणि छाती (हृदया) च्या लपलेल्या गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.१

﴿وَاللَّهُ يَقْضِي بِالْحَقِّ ۖ وَالَّذِينَ يَدْعُونَ مِنْ دُونِهِ لَا يَقْضُونَ بِشَيْءٍ ۗ إِنَّ اللَّهَ هُوَ السَّمِيعُ الْبَصِيرُ﴾

२०.
आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अगदी उचित फैसला करेल, आणि त्याच्याखेरीज ज्यांना ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणत्याही गोष्टीचा फैसला करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

﴿۞ أَوَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ كَانُوا مِنْ قَبْلِهِمْ ۚ كَانُوا هُمْ أَشَدَّ مِنْهُمْ قُوَّةً وَآثَارًا فِي الْأَرْضِ فَأَخَذَهُمُ اللَّهُ بِذُنُوبِهِمْ وَمَا كَانَ لَهُمْ مِنَ اللَّهِ مِنْ وَاقٍ﴾

२१.
काय हे लोक जमिनीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेले त्यांचा परिणाम (अंत) कसा झाला.
ते शक्ती आणि सामर्थ्य आणि धरतीवर आपली स्मरके सोडून जाण्याच्या आधारावर यांच्या तुलनेत खूप जास्त होते, तरीही अल्लाहने त्यांना त्यांच्या अपराधांपायी धरले आणि असा कोणी होऊन गेला नाही ज्याने त्यांना अल्लाहच्या शिक्षा - यातनांपासून वाचवून घेतले असते.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ كَانَتْ تَأْتِيهِمْ رُسُلُهُمْ بِالْبَيِّنَاتِ فَكَفَرُوا فَأَخَذَهُمُ اللَّهُ ۚ إِنَّهُ قَوِيٌّ شَدِيدُ الْعِقَابِ﴾

२२.
हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर चमत्कार (मोजिजे) घेऊन येत होते, तेव्हा ते इन्कार करीत असत, मग अल्लाह त्यांना पकडीत घेत असे. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि सक्त शिक्षा - यातना देणारा आहे.

﴿وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَىٰ بِآيَاتِنَا وَسُلْطَانٍ مُبِينٍ﴾

२३. आणि आम्ही मूसा (अलै.) ला आपल्या आयती (निशाण्या) आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले.

﴿إِلَىٰ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَقَارُونَ فَقَالُوا سَاحِرٌ كَذَّابٌ﴾

२४. फिरऔन आणि हामान आणि कारूनकडे, तेव्हा ते म्हणाले की (हा तर) जादूगार आणि खोटारडा आहे.

﴿فَلَمَّا جَاءَهُمْ بِالْحَقِّ مِنْ عِنْدِنَا قَالُوا اقْتُلُوا أَبْنَاءَ الَّذِينَ آمَنُوا مَعَهُ وَاسْتَحْيُوا نِسَاءَهُمْ ۚ وَمَا كَيْدُ الْكَافِرِينَ إِلَّا فِي ضَلَالٍ﴾

२५. तर जेव्हा त्यांच्याजवळ मूसा (अलै.
) आमच्यातर्फे सत्य (धर्म) घेऊन आले, तेव्हा ते म्हणाले की याच्यासोबत जे ईमान राखणारे आहेत, त्यांच्या पुत्रांना ठार मारून टाका आणि कन्यांना जिवंत ठेवा, आणि काफिरांचे जे निमित्त आहे ते मार्गभ्रष्टतेवरच आहे.

﴿وَقَالَ فِرْعَوْنُ ذَرُونِي أَقْتُلْ مُوسَىٰ وَلْيَدْعُ رَبَّهُ ۖ إِنِّي أَخَافُ أَنْ يُبَدِّلَ دِينَكُمْ أَوْ أَنْ يُظْهِرَ فِي الْأَرْضِ الْفَسَادَ﴾

२६. आणि फिरऔन म्हणाला की मला सोडा की मी मूसाला मारून टाकावे आणि त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारावे.
मला तर ही भीती वाटते की याने कदाचित तुमचा दीन (धर्म) बदलून न टाकावा किंवा देशात एखादा फार मोठा उत्पात (फसाद) निर्माण न करावा.

﴿وَقَالَ مُوسَىٰ إِنِّي عُذْتُ بِرَبِّي وَرَبِّكُمْ مِنْ كُلِّ مُتَكَبِّرٍ لَا يُؤْمِنُ بِيَوْمِ الْحِسَابِ﴾

२७. आणि मूसा (अलै.
) म्हणाले की मी आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो, त्या प्रत्येक घर्मेडी माणसाच्या (उपद्रवा) पासून जो (कर्मांच्या) हिशोबाच्या दिवसावर ईमान राखत नाही.

﴿وَقَالَ رَجُلٌ مُؤْمِنٌ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَكْتُمُ إِيمَانَهُ أَتَقْتُلُونَ رَجُلًا أَنْ يَقُولَ رَبِّيَ اللَّهُ وَقَدْ جَاءَكُمْ بِالْبَيِّنَاتِ مِنْ رَبِّكُمْ ۖ وَإِنْ يَكُ كَاذِبًا فَعَلَيْهِ كَذِبُهُ ۖ وَإِنْ يَكُ صَادِقًا يُصِبْكُمْ بَعْضُ الَّذِي يَعِدُكُمْ ۖ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي مَنْ هُوَ مُسْرِفٌ كَذَّابٌ﴾

२८.
आणि एका ईमान राखणाऱ्या माणसाने जो फिरऔनच्या कुटुंबियांपैकी होता, आणि आपले ईमान लपवून होता, म्हणाला की काय तुम्ही एका माणसाला केवळ या गोष्टीबद्दल ठार करू इच्छिता की तो म्हणतो की माझा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे आणि तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, जर तो खोटा आहे, तर त्याच्या खोटेपणाचे संकट त्याच्यावरच आहे आणि जर तो सच्चा आहे तर तो ज्या (शिक्षा - यातनां) चा वायदा तुम्हाला देत आहे, त्यापैकी एक ना एक तुमच्यावर (नक्कीच) येऊन कोसळेल. अल्लाह, अशा लोकांना मार्ग दाखवित नाही जे मर्यादा ओलांडणारे आणि खोटारडे असावेत.

﴿يَا قَوْمِ لَكُمُ الْمُلْكُ الْيَوْمَ ظَاهِرِينَ فِي الْأَرْضِ فَمَنْ يَنْصُرُنَا مِنْ بَأْسِ اللَّهِ إِنْ جَاءَنَا ۚ قَالَ فِرْعَوْنُ مَا أُرِيكُمْ إِلَّا مَا أَرَىٰ وَمَا أَهْدِيكُمْ إِلَّا سَبِيلَ الرَّشَادِ﴾

२९.
हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आज तर राज्य तुमचे आहे की तुम्ही या धरतीवर वर्चस्वशाली आहात, परंतु जर अल्लाहचा अज़ाब (प्रकोप) आमच्यावर झाला तर कोण आमची मदत करेल? फिरऔन म्हणाला की मी तर तुम्हाला तोच सल्ला देत आहे, जे स्वतः पाहत आहे आणि मी तर तुम्हाला भलाईचाच मार्ग दाखवित आहे.

﴿وَقَالَ الَّذِي آمَنَ يَا قَوْمِ إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ مِثْلَ يَوْمِ الْأَحْزَابِ﴾

३०.
आणि तो ईमान राखणारा म्हणाला की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मला तर हे भय जाणवते की कदाचित तुमच्यावरही तसाच दिवस (अज़ाब) न यावा, जसा दुसऱ्या जनसमूहांवर आला.

﴿مِثْلَ دَأْبِ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَالَّذِينَ مِنْ بَعْدِهِمْ ۚ وَمَا اللَّهُ يُرِيدُ ظُلْمًا لِلْعِبَادِ﴾

३१.
जशी नूहच्या जनसमूहाची आणि आद व समूद आणि त्यांच्यानंतरच्या समुदायांची (अवस्था झाली) आणि अल्लाह आपल्या दासांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करू इच्छित नाही.

﴿وَيَا قَوْمِ إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ يَوْمَ التَّنَادِ﴾

३२. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मला तर तुमच्याविषयी पुकारल्या जाण्याच्या दिवसाचेही भय आहे.

﴿يَوْمَ تُوَلُّونَ مُدْبِرِينَ مَا لَكُمْ مِنَ اللَّهِ مِنْ عَاصِمٍ ۗ وَمَنْ يُضْلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِنْ هَادٍ﴾

३३. ज्या दिवशी पाठ फिरवून परताल.
तुम्हाला अल्लाहपासून वाचविणारा कोणीही नसेल आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही.

﴿وَلَقَدْ جَاءَكُمْ يُوسُفُ مِنْ قَبْلُ بِالْبَيِّنَاتِ فَمَا زِلْتُمْ فِي شَكٍّ مِمَّا جَاءَكُمْ بِهِ ۖ حَتَّىٰ إِذَا هَلَكَ قُلْتُمْ لَنْ يَبْعَثَ اللَّهُ مِنْ بَعْدِهِ رَسُولًا ۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ اللَّهُ مَنْ هُوَ مُسْرِفٌ مُرْتَابٌ﴾

३४. आणि त्यापूर्वी तुमच्याजवळ यूसुफ निशाण्या घेऊन आले.
तरीही तुम्ही त्यांनी आणलेल्या निशाण्यांबाबत शंका संशय करीतच राहिले, येथपर्यंत की जेव्हा त्यांचा मृत्यु झाला, तेव्हा तुम्ही म्हणू लागले की त्यांच्यानंतर तर अल्लाह एखादा पैगंबर पाठविणारच नाही.
अशा प्रकारे अल्लाह त्या प्रत्येक माणसाला पथभ्रष्ट करतो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि शंका - संशय करणारा असावा.

﴿الَّذِينَ يُجَادِلُونَ فِي آيَاتِ اللَّهِ بِغَيْرِ سُلْطَانٍ أَتَاهُمْ ۖ كَبُرَ مَقْتًا عِنْدَ اللَّهِ وَعِنْدَ الَّذِينَ آمَنُوا ۚ كَذَٰلِكَ يَطْبَعُ اللَّهُ عَلَىٰ كُلِّ قَلْبِ مُتَكَبِّرٍ جَبَّارٍ﴾

३५.
जे कसल्याही पुराव्याविना, जो त्यांच्याजवळ आला असेल, अल्लाहच्या आयतींबाबत वाद घालतात, ही गोष्टी अल्लाह आणि ईमान राखणाऱ्यांच्या नजीक फार नाराजीची गोष्टी आहे, अशा प्रकारे अल्लाह, प्रत्येक घमेंडी, अवज्ञाकारी माणसाच्या हृदयावर मोहर लावतो.

﴿وَقَالَ فِرْعَوْنُ يَا هَامَانُ ابْنِ لِي صَرْحًا لَعَلِّي أَبْلُغُ الْأَسْبَابَ﴾

३६. आणि फिरऔन म्हणाले, हे हामान! माझ्यासाठी एक उंच महाल बनव, कदाचित मी त्या दरवाज्यांपर्यर्ंत पोहोचावे.

﴿أَسْبَابَ السَّمَاوَاتِ فَأَطَّلِعَ إِلَىٰ إِلَٰهِ مُوسَىٰ وَإِنِّي لَأَظُنُّهُ كَاذِبًا ۚ وَكَذَٰلِكَ زُيِّنَ لِفِرْعَوْنَ سُوءُ عَمَلِهِ وَصُدَّ عَنِ السَّبِيلِ ۚ وَمَا كَيْدُ فِرْعَوْنَ إِلَّا فِي تَبَابٍ﴾

३७.
जे आकाशाचे दरवाजे आहेत आणि मूसाच्या उपास्या (ईश्वरा) ला डोकावून पाहावे आणि माझी तर पूर्ण खात्री आहे की तो खोटारडा आहे आणि अशा प्रकारे फिरऔनची वाईट कृत्ये त्याच्या नजरेत भली चांगली दाखविली गेलीत आणि त्याला सन्मार्गापासून रोखले गेले आणि फिरौनचे (प्रत्येक) कट-कारस्थान विनाशातच राहिले.

﴿وَقَالَ الَّذِي آمَنَ يَا قَوْمِ اتَّبِعُونِ أَهْدِكُمْ سَبِيلَ الرَّشَادِ﴾

३८.
आणि तो ईमान राखणारा मनुष्य म्हणाला की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही (सर्व) माझे अनुसरण करा मी नेकीच्या मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करेन.

﴿يَا قَوْمِ إِنَّمَا هَٰذِهِ الْحَيَاةُ الدُّنْيَا مَتَاعٌ وَإِنَّ الْآخِرَةَ هِيَ دَارُ الْقَرَارِ﴾

३९. हे माझ्या समुदायाच्या लोकांनो! या जगाचे हे जीवन नाश पावणारी सामुग्री आहे. (विश्वास करा की शांती) आणि कायमस्वरूपी घर तर आखिरतच आहे.

﴿مَنْ عَمِلَ سَيِّئَةً فَلَا يُجْزَىٰ إِلَّا مِثْلَهَا ۖ وَمَنْ عَمِلَ صَالِحًا مِنْ ذَكَرٍ أَوْ أُنْثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ فَأُولَٰئِكَ يَدْخُلُونَ الْجَنَّةَ يُرْزَقُونَ فِيهَا بِغَيْرِ حِسَابٍ﴾

४०.
ज्याने अपराध (दुष्कर्म केला आहे, त्याला तर तेवढाच मोबदला मिळेल आणि ज्याने नेकी (सत्कर्म) केले आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो ईमान राखणाराही असेल तर असे लोक१ जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिथे अगणित रोजी (आजिविका) प्राप्त करतील.

﴿۞ وَيَا قَوْمِ مَا لِي أَدْعُوكُمْ إِلَى النَّجَاةِ وَتَدْعُونَنِي إِلَى النَّارِ﴾

४१.
आणि हे माझ्या जमातीच्या लोकांनो! हे काय की मी तुम्हाला मुक्तीकडे बोलावित आहे आणि तुम्ही, मला जहन्नमकडे बोलावित आहात.

﴿تَدْعُونَنِي لِأَكْفُرَ بِاللَّهِ وَأُشْرِكَ بِهِ مَا لَيْسَ لِي بِهِ عِلْمٌ وَأَنَا أَدْعُوكُمْ إِلَى الْعَزِيزِ الْغَفَّارِ﴾

४२.
तुम्ही मला या गोष्टीचे आमंत्रण देत आहात की मी अल्लाहचा इन्कार करावा आणि (दुसऱ्याला) त्याचा सहभागी करावे, ज्याचे मला कसलेही ज्ञान नाही, आणि मी तुम्हाला वर्चस्वशाली, माफ करणाऱ्या (अल्लाह) कडे बोलावित आहे.

﴿لَا جَرَمَ أَنَّمَا تَدْعُونَنِي إِلَيْهِ لَيْسَ لَهُ دَعْوَةٌ فِي الدُّنْيَا وَلَا فِي الْآخِرَةِ وَأَنَّ مَرَدَّنَا إِلَى اللَّهِ وَأَنَّ الْمُسْرِفِينَ هُمْ أَصْحَابُ النَّارِ﴾

४३.
हे अगदी निश्चित की तुम्ही मला ज्याच्याकडे बोलावित आहात, तो ना तर या जगात पुकारण्यायोग्य आहे आणि ना आखिरतमध्ये आणि हे देखील अगदी निश्चित की आम्हा सर्वांचे परतणे अल्लाहच्याकडे आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करणारे निश्चितच जहन्नमी आहेत.

﴿فَسَتَذْكُرُونَ مَا أَقُولُ لَكُمْ ۚ وَأُفَوِّضُ أَمْرِي إِلَى اللَّهِ ۚ إِنَّ اللَّهَ بَصِيرٌ بِالْعِبَادِ﴾

४४.
तेव्हा भविष्यात तुम्ही माझ्या गोष्टींची (बोलण्याची) आठवण कराल, मी आपला मामला अल्लाहच्या हवाली करतो, निःसंशय, अल्लाह आपल्या दासांना पाहणारा आहे.

﴿فَوَقَاهُ اللَّهُ سَيِّئَاتِ مَا مَكَرُوا ۖ وَحَاقَ بِآلِ فِرْعَوْنَ سُوءُ الْعَذَابِ﴾

४५.
तेव्हा अल्लाहने त्याला त्या सर्व वाईट गोष्टीपासून सुरक्षित ठेवले ज्या, त्या लोकांनी योजिल्या होत्या आणि फिरऔनच्या अनुयायींवर मोठ्या वाईट प्रकारचा अज़ाब कोसळला.

﴿النَّارُ يُعْرَضُونَ عَلَيْهَا غُدُوًّا وَعَشِيًّا ۖ وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ أَدْخِلُوا آلَ فِرْعَوْنَ أَشَدَّ الْعَذَابِ﴾

४६.
आग आहे जिच्यासमोर हे प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ आणले जातात, आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल (आदेश दिला जाईल की) फिरऔनच्या अनुयायींना अतिशय कठोर शिक्षा - यातनेत टाका.

﴿وَإِذْ يَتَحَاجُّونَ فِي النَّارِ فَيَقُولُ الضُّعَفَاءُ لِلَّذِينَ اسْتَكْبَرُوا إِنَّا كُنَّا لَكُمْ تَبَعًا فَهَلْ أَنْتُمْ مُغْنُونَ عَنَّا نَصِيبًا مِنَ النَّارِ﴾

४७.
आणि जेव्हा ते जहन्नममध्ये एकमेकांशी भांडतील, तेव्हा कमजोर लोक, मोठ्या लोकांना (ज्यांच्या ताब्यात हे होते) म्हणतील की, आम्ही तर तुमचे अनुयायी होतो, तर काय आता तुम्ही आमच्यापासून या आगीचा एखादा हिस्सा हटवू शकता?

﴿قَالَ الَّذِينَ اسْتَكْبَرُوا إِنَّا كُلٌّ فِيهَا إِنَّ اللَّهَ قَدْ حَكَمَ بَيْنَ الْعِبَادِ﴾

४८. ते मोठे लोक उत्तर देतील की आम्ही तर सर्व याच आगीत आहोत. अल्लाहने आपल्या दासांच्या दरम्यान फैसला केलेला आहे.

﴿وَقَالَ الَّذِينَ فِي النَّارِ لِخَزَنَةِ جَهَنَّمَ ادْعُوا رَبَّكُمْ يُخَفِّفْ عَنَّا يَوْمًا مِنَ الْعَذَابِ﴾

४९.
आणि सर्व जहन्नमी लोक (एकत्र होऊन) जहन्नमच्या रक्षकांना सांगतील की तुम्हीच आपल्या पालनकर्त्यास दुआ (प्रार्थना) करा की त्याने कोणा एका दिवशी आमच्या शिक्षेत कमी करावी.

﴿قَالُوا أَوَلَمْ تَكُ تَأْتِيكُمْ رُسُلُكُمْ بِالْبَيِّنَاتِ ۖ قَالُوا بَلَىٰ ۚ قَالُوا فَادْعُوا ۗ وَمَا دُعَاءُ الْكَافِرِينَ إِلَّا فِي ضَلَالٍ﴾

५०. ते उत्तर देतील की काय तुमच्याजवळ तुमचे पैगंबर चमत्कार (मोजिजे) घेऊन आले नव्हते.
ते म्हणतील, का नाही? त्यावर ते म्हणतील, मग तुम्हीच दुआ - प्रार्थना करा आणि काफिर लोकांची दुआ (प्रार्थना) अगदी (निष्प्रभ आणि) व्यर्थ आहे!

﴿إِنَّا لَنَنْصُرُ رُسُلَنَا وَالَّذِينَ آمَنُوا فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَيَوْمَ يَقُومُ الْأَشْهَادُ﴾

५१.
निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांची आणि ईमान राखणाऱ्यांची या जगाच्या जीवनातही मदत करू आणि त्या दिवशीही, जेव्हा साक्ष देणारे उभे राहतील.

﴿يَوْمَ لَا يَنْفَعُ الظَّالِمِينَ مَعْذِرَتُهُمْ ۖ وَلَهُمُ اللَّعْنَةُ وَلَهُمْ سُوءُ الدَّارِ﴾

५२.
ज्या दिवशी अत्याचारी लोकांची लाचारी काहीच फायदा देणार नाही आणि त्यांच्यासाठी धिःक्कार असेल आणि त्यांच्यासाठी वाईट घर असेल.

﴿وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْهُدَىٰ وَأَوْرَثْنَا بَنِي إِسْرَائِيلَ الْكِتَابَ﴾

५३. आणि आम्ही मूसाला मार्गदर्शन प्रदान केले आणि इस्राईलच्या संततीला या ग्रंथाचा उत्तराधिकारी बनविले.

﴿هُدًى وَذِكْرَىٰ لِأُولِي الْأَلْبَابِ﴾

५४. की बुद्धिमानांकरिता तो, मार्गदर्शन आणि बोध होता.

﴿فَاصْبِرْ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَاسْتَغْفِرْ لِذَنْبِكَ وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ بِالْعَشِيِّ وَالْإِبْكَارِ﴾

५५.
तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा अगदी सच्चा आहे, तुम्ही आपल्या अपराधांची क्षमा मागत राहा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान व स्तुती - प्रशंसा करीत राहा.

﴿إِنَّ الَّذِينَ يُجَادِلُونَ فِي آيَاتِ اللَّهِ بِغَيْرِ سُلْطَانٍ أَتَاهُمْ ۙ إِنْ فِي صُدُورِهِمْ إِلَّا كِبْرٌ مَا هُمْ بِبَالِغِيهِ ۚ فَاسْتَعِذْ بِاللَّهِ ۖ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْبَصِيرُ﴾

५६.
निःसंशय, जे लोक आपल्याजवळ कोणतेही प्रमाण नसतानाही अल्लाहच्या आयतींबाबत वाद घालतात, त्यांच्या मनात अहंकाराशिवाय दुसरे काही नाही, जे या मोठेपणापर्यंत पोहचवणार नाहीत तेव्हा तुम्ही अल्लाहचे शरण मागत राहा. निःसंशय, तो पूर्णपणे ऐकणारा आणि सर्वाधिक पाहणारा आहे.

﴿لَخَلْقُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ أَكْبَرُ مِنْ خَلْقِ النَّاسِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾

५७.
आकाशांची आणि धरतीची निर्मिती निश्चितच मानवांच्या निर्मितीपेक्षा फार मोठे काम आहे, परंतु (ही गोष्ट वेगळी की) बहुतेक लोक हे जाणत नाहीत.

﴿وَمَا يَسْتَوِي الْأَعْمَىٰ وَالْبَصِيرُ وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَلَا الْمُسِيءُ ۚ قَلِيلًا مَا تَتَذَكَّرُونَ﴾

५८.
आणि आंधळा व डोळस दोघे समान नाही, ना ते लोक, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, दुष्कर्म करणाऱ्यांच्या (समान आहेत) तुम्ही (फारच) कमी बोध ग्रहण करीत आहात.

﴿إِنَّ السَّاعَةَ لَآتِيَةٌ لَا رَيْبَ فِيهَا وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يُؤْمِنُونَ﴾

५९. कयामत खात्रीने आणि निःसंशय येणार आहे, तथापि (ही गोष्ट वेगळी की) अधिकांश लोक ईमान राखत नाहीत.

﴿وَقَالَ رَبُّكُمُ ادْعُونِي أَسْتَجِبْ لَكُمْ ۚ إِنَّ الَّذِينَ يَسْتَكْبِرُونَ عَنْ عِبَادَتِي سَيَدْخُلُونَ جَهَنَّمَ دَاخِرِينَ﴾

६०.
आणि तुमच्या पालनकर्त्याचा आदेश (लागू झालेला आहे) की मला दुआ (प्रार्थना) करा, मी तुमच्या दुआ (प्रार्थना) ना कबूल करेन, निःसंशय जे लोक माझ्या उपासनेशी घमेंड करतात, ते लवकरच अपमानित होऊन जहन्नममध्ये दाखल होतील.

﴿اللَّهُ الَّذِي جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ لِتَسْكُنُوا فِيهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا ۚ إِنَّ اللَّهَ لَذُو فَضْلٍ عَلَى النَّاسِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَشْكُرُونَ﴾

६१. अल्लाहने तुमच्यासाठी रात्र बनविली आहे की तुम्ही तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला, दाखविणारा बनविले. निःसंशय अल्लाह लोकांवर उपकार (कृपा) आणि दया करणारा आहे, परंतु अधिकांश लोक कृतज्ञता व्यक्त करीत नाही.

﴿ذَٰلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمْ خَالِقُ كُلِّ شَيْءٍ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ فَأَنَّىٰ تُؤْفَكُونَ﴾

६२. हाच अल्लाह आहे तुम्हा सर्वांचा पालनपोषण करणारा.
प्रत्येक वस्तूंचा रचयिता, त्याच्याखेरीज कोणीही सच्चा उपास्य (माबूद) नाही, मग तुम्ही कोणत्या बाजूला भटकविले जात आहात?

﴿كَذَٰلِكَ يُؤْفَكُ الَّذِينَ كَانُوا بِآيَاتِ اللَّهِ يَجْحَدُونَ﴾

६३. त्याच प्रकारे ते लोक देखील बहकाविले जात राहिले, जे अल्लाहच्या आयतींचा इन्कार करीत होते.

﴿اللَّهُ الَّذِي جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ قَرَارًا وَالسَّمَاءَ بِنَاءً وَصَوَّرَكُمْ فَأَحْسَنَ صُوَرَكُمْ وَرَزَقَكُمْ مِنَ الطَّيِّبَاتِ ۚ ذَٰلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمْ ۖ فَتَبَارَكَ اللَّهُ رَبُّ الْعَالَمِينَ﴾

६४.
तो अल्लाह होय, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला राहण्याचे ठिकाण आणि आकाशाला छत बनविले आणि तुम्हाला रूप दिले आणि खूप चांगले बनविले आणि तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या वस्तू खाण्यासाठी दिल्यात. तोच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे. तेव्हा मोठा शुभ आहे अल्लाह, जो समस्त विश्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे.

﴿هُوَ الْحَيُّ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَادْعُوهُ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ ۗ الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ﴾

६५.
तो जिवंत आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही विशुद्ध मनाने त्याचीच उपासना करीत त्याला पुकारा, सर्व प्रशंसा अल्लाह करीताच आहे, जो समस्त विश्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे.

﴿۞ قُلْ إِنِّي نُهِيتُ أَنْ أَعْبُدَ الَّذِينَ تَدْعُونَ مِنْ دُونِ اللَّهِ لَمَّا جَاءَنِيَ الْبَيِّنَاتُ مِنْ رَبِّي وَأُمِرْتُ أَنْ أُسْلِمَ لِرَبِّ الْعَالَمِينَ﴾

६६.
(तुम्ही) सांगा की मला त्यांची उपासना करण्यापासून रोखले गेले आहे, ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारत आहात१ या कारणास्तव की माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्याचे स्पष्ट पुरावे येऊन पोहोचले आहेत. मला हा आदेश दिला गेला आहे की मी समस्त विश्वांच्या पालनकर्त्याच्या हुकुमाअधीन व्हावे.

﴿هُوَ الَّذِي خَلَقَكُمْ مِنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ يُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِتَبْلُغُوا أَشُدَّكُمْ ثُمَّ لِتَكُونُوا شُيُوخًا ۚ وَمِنْكُمْ مَنْ يُتَوَفَّىٰ مِنْ قَبْلُ ۖ وَلِتَبْلُغُوا أَجَلًا مُسَمًّى وَلَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ﴾

६७.
तोच होय, ज्याने तुम्हाला मातीपासून, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या (जमलेल्या) गोळ्यापासून निर्माण केले, मग तुम्हाला अर्भकाच्या स्वरूपात बाहेर काढले, मग तो तुम्हाला वाढीस लावतो की तुम्ही आपल्या पूर्ण शक्ती - सामर्थ्यास पोहोचावे, मग म्हातारे व्हावे आणि तुमच्यापैकी काहींचा याच्या आधीच मृत्यु होतो (आणि तो तुम्हाला सोडून देतो यासाठी की तुम्ही निर्धारित आयुपर्यर्ंत पोहोचावे आणि यासाठी की तुम्ही विचार - चिंतन करावे.

﴿هُوَ الَّذِي يُحْيِي وَيُمِيتُ ۖ فَإِذَا قَضَىٰ أَمْرًا فَإِنَّمَا يَقُولُ لَهُ كُنْ فَيَكُونُ﴾

६८.
तोच होय, जो जीवन आणि मृत्यु देतो, मग जेव्हा तो एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यास फक्त एवढेच म्हणतो ‘घडून ये’ आणि ते घडून येते.

﴿أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ يُجَادِلُونَ فِي آيَاتِ اللَّهِ أَنَّىٰ يُصْرَفُونَ﴾

६९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे अल्लाहच्या आयतींसदर्भात वाद घालतात. त्यांना कोठे परतविले जात आहे?

﴿الَّذِينَ كَذَّبُوا بِالْكِتَابِ وَبِمَا أَرْسَلْنَا بِهِ رُسُلَنَا ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ﴾

७०.
ज्या लोकांनी ग्रंथाला खोटे ठरविले आणि त्यालाही जो आम्ही आपल्या पैगंबरांसोबत पाठविला, त्यांना फार लवकर वस्तुस्थितीचे ज्ञान होईल.

﴿إِذِ الْأَغْلَالُ فِي أَعْنَاقِهِمْ وَالسَّلَاسِلُ يُسْحَبُونَ﴾

७१. जेव्हा त्यांच्या गळ्यांमध्ये जोखड (तौक) असतील आणि शंखला असतील, फरफटत ओढून नेले जातील.

﴿فِي الْحَمِيمِ ثُمَّ فِي النَّارِ يُسْجَرُونَ﴾

७२. उकळत्या पाण्यात आणि मग जहन्नमच्या आगीत जाळले जातील.

﴿ثُمَّ قِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنْتُمْ تُشْرِكُونَ﴾

७३. मग त्यांना विचारले जाईल की ज्यांना तुम्ही (अल्लाहचे) सहभागी ठरवित होते, ते आहेत कोठे?

﴿مِنْ دُونِ اللَّهِ ۖ قَالُوا ضَلُّوا عَنَّا بَلْ لَمْ نَكُنْ نَدْعُو مِنْ قَبْلُ شَيْئًا ۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ اللَّهُ الْكَافِرِينَ﴾

७४.
जे अल्लाहखेरीज होते, ते म्हणतील की ते आमच्याकडून हरवलेत किंबहुना आम्ही तर यापूर्वी कोणालाही पुकारत नव्हतो. अल्लाह काफिर (इन्कारी) लोकांना अशाच प्रकारे मार्गभ्रष्ट करतो.

﴿ذَٰلِكُمْ بِمَا كُنْتُمْ تَفْرَحُونَ فِي الْأَرْضِ بِغَيْرِ الْحَقِّ وَبِمَا كُنْتُمْ تَمْرَحُونَ﴾

७५. हे अशासाठी की तुम्ही जमिनीवर नाहक तोरा मिरवित होते, आणि (व्यर्थ) डौल दाखवित फिरत होते.

﴿ادْخُلُوا أَبْوَابَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا ۖ فَبِئْسَ مَثْوَى الْمُتَكَبِّرِينَ﴾

७६.
(आता या) जहन्नमध्ये नेहमी नेहमी राहण्याकरिता (त्याच्या) दरवाज्यांमध्ये दाखल व्हा, केवढे वाईट ठिकाण आहे अहंकार करणाऱ्यांकरिता.

﴿فَاصْبِرْ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ ۚ فَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِلَيْنَا يُرْجَعُونَ﴾

७७. तेव्हा तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा पूर्णतः सच्चा आहे.
आम्ही त्यांना जो वायदा देऊन ठेवला आहे, त्यापैकी काही आम्ही तुम्हाला दाखवून द्यावे किंवा त्या आधी तुम्हाला मृत्यु द्यावा, त्यांचे परतविले जाणे तर आमच्याचकडे आहे.

﴿وَلَقَدْ أَرْسَلْنَا رُسُلًا مِنْ قَبْلِكَ مِنْهُمْ مَنْ قَصَصْنَا عَلَيْكَ وَمِنْهُمْ مَنْ لَمْ نَقْصُصْ عَلَيْكَ ۗ وَمَا كَانَ لِرَسُولٍ أَنْ يَأْتِيَ بِآيَةٍ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ ۚ فَإِذَا جَاءَ أَمْرُ اللَّهِ قُضِيَ بِالْحَقِّ وَخَسِرَ هُنَالِكَ الْمُبْطِلُونَ﴾

७८.
निःसंशय, आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, ज्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले आहेत.
आणि त्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले नाहीत आणि कोणा पैगंबराच्या (अवाक्यात हे) नव्हते की एखादा चमत्कार (मोजिजा) अल्लाहच्या अनुमतीविना आणू शकला असता, मग ज्या वेळी अल्लाहचा आदेश येईल, सत्यासह फैसला केला जाईल आणि त्या वेळी असत्याचे पुजारी नुकसानातच राहतील.

﴿اللَّهُ الَّذِي جَعَلَ لَكُمُ الْأَنْعَامَ لِتَرْكَبُوا مِنْهَا وَمِنْهَا تَأْكُلُونَ﴾

७९.
अल्लाह तो आहे ज्याने तुमच्यासाठी चतुष्पाद जनावरे (गुरे) निर्माण केलीत, ज्यांच्यापैकी काहींवर तुम्ही स्वार होता आणि काहींना तुम्ही खातात.

﴿وَلَكُمْ فِيهَا مَنَافِعُ وَلِتَبْلُغُوا عَلَيْهَا حَاجَةً فِي صُدُورِكُمْ وَعَلَيْهَا وَعَلَى الْفُلْكِ تُحْمَلُونَ﴾

८०.
आणि इतरही तुमच्यासाठी त्यांच्यात अनेक फायदे आहेत, यासाठी की आपल्या मनात लपलेल्या गरजांना, त्यांच्यावर स्वार होऊन तुम्ही पूर्ण करून घ्यावे आणि ज्या जनावरांवर आणि नौकांवर तुम्ही स्वार केले जाता.

﴿وَيُرِيكُمْ آيَاتِهِ فَأَيَّ آيَاتِ اللَّهِ تُنْكِرُونَ﴾

८१.
आणि अल्लाह तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवित आहे, तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कोणकोणत्या निशाण्यांचा इन्कार करीत राहाल?

﴿أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ ۚ كَانُوا أَكْثَرَ مِنْهُمْ وَأَشَدَّ قُوَّةً وَآثَارًا فِي الْأَرْضِ فَمَا أَغْنَىٰ عَنْهُمْ مَا كَانُوا يَكْسِبُونَ﴾

८२.
किंवा त्यांनी धरतीवर हिंडून फिरून आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची परिणति नाही पाहिली, जे संख्येत यांच्यापेक्षा जास्त होते, शक्ती - सामर्थ्यात सक्त आणि धरतीत त्यांनी अनेक अवशेष मागे सोडले होते. (परंतु) त्यांच्या केलेल्या कार्यांनी त्यांना किंचितही लाभ पोहचविला नाही.

﴿فَلَمَّا جَاءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَيِّنَاتِ فَرِحُوا بِمَا عِنْدَهُمْ مِنَ الْعِلْمِ وَحَاقَ بِهِمْ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ﴾

८३.
तर जेव्हा जेव्हा त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा हे आपल्याजवळ असलेल्या ज्ञानावर घमेंड दाखवू लागले. शेवटी ज्या गोष्टीची थट्टा उडवित होते, तीच त्यांच्यावर उलटली.

﴿فَلَمَّا رَأَوْا بَأْسَنَا قَالُوا آمَنَّا بِاللَّهِ وَحْدَهُ وَكَفَرْنَا بِمَا كُنَّا بِهِ مُشْرِكِينَ﴾

८४.
मग आमची शिक्षा-यातना पाहताच म्हणू लागले की एकमेव अल्लाहवर आम्ही ईमान राखले आणि ज्यांना ज्यांना आम्ही त्याचा सहभागी ठरवित होतो, आम्ही त्या सर्वांचा इन्कार केला.

﴿فَلَمْ يَكُ يَنْفَعُهُمْ إِيمَانُهُمْ لَمَّا رَأَوْا بَأْسَنَا ۖ سُنَّتَ اللَّهِ الَّتِي قَدْ خَلَتْ فِي عِبَادِهِ ۖ وَخَسِرَ هُنَالِكَ الْكَافِرُونَ﴾

८५.
परंतु आमच्या शिक्षा - यातनेला पाहून घेतल्यानंतर त्यांच्या ईमान राखण्याने त्यांना लाभ दिला नाही, अल्लाहने आपला हाच नियम निर्धारित केलेला आहे, जो त्याच्या दासांमध्ये सतत चालत आला आहे आणि त्या ठिकाणी काफिर दुर्दशाग्रस्त (आणि दुर्बल) झाले.

الترجمات والتفاسير لهذه السورة: