فاطر

تفسير سورة فاطر

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الْحَمْدُ لِلَّهِ فَاطِرِ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ جَاعِلِ الْمَلَائِكَةِ رُسُلًا أُولِي أَجْنِحَةٍ مَثْنَىٰ وَثُلَاثَ وَرُبَاعَ ۚ يَزِيدُ فِي الْخَلْقِ مَا يَشَاءُ ۚ إِنَّ اللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ﴾

१.
त्या अल्लाकरिता समस्त स्तुती - प्रशंसा आहे, जो आकाशांना आणि धरतीला निर्माण करणारा आणि दोन दोन, तीन तीन आणि चार चार पंख बाळगणाऱ्या फरिश्त्यांना आपला संदेशवाहक बनविणारा आहे१ सृष्टीनिर्मितीत जे इच्छितो वाढवितो. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.

﴿مَا يَفْتَحِ اللَّهُ لِلنَّاسِ مِنْ رَحْمَةٍ فَلَا مُمْسِكَ لَهَا ۖ وَمَا يُمْسِكْ فَلَا مُرْسِلَ لَهُ مِنْ بَعْدِهِ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ﴾

२.
अल्लाह जो दया - कृपा (द्वार) लोकांकरिता उघड करील तर त्यास कोणी बंद करणारा नाही आणि ज्याच्यासाठी बंद करील तर त्यानंतर त्यास कोणी सुरू करणारा (उघडणारा) नाही आणि तोच जबरदस्त हिकमतशाली आहे.

﴿يَا أَيُّهَا النَّاسُ اذْكُرُوا نِعْمَتَ اللَّهِ عَلَيْكُمْ ۚ هَلْ مِنْ خَالِقٍ غَيْرُ اللَّهِ يَرْزُقُكُمْ مِنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ ۚ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ فَأَنَّىٰ تُؤْفَكُونَ﴾

३. लोकांनो! तुमच्यावर अल्लाहने जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा.
काय अल्लाहखेरीज दुसराही कोणी निर्माता आहे, जो तुम्हाला आकाशातून आणि जमिनीपासून रोजी (आजिविका) देत असावा? त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही कोठे उलट जात आहात?

﴿وَإِنْ يُكَذِّبُوكَ فَقَدْ كُذِّبَتْ رُسُلٌ مِنْ قَبْلِكَ ۚ وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ﴾

४.
आणि जर ते तुम्हाला खोटे ठरवितात तर तुमच्या पूर्वीचे (सर्व) पैगंबरही खोटे ठरविले गेले आहेत आणि समस्त कार्ये अल्लाहच्याचकडे परतविले जातात.

﴿يَا أَيُّهَا النَّاسُ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ ۖ فَلَا تَغُرَّنَّكُمُ الْحَيَاةُ الدُّنْيَا ۖ وَلَا يَغُرَّنَّكُمْ بِاللَّهِ الْغَرُورُ﴾

५. हे लोकांनो! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात न टाकावे आणि ना दगाबाज (सैताना) ने तुम्हाला गफलतीत मग्न ठेवावे.

﴿إِنَّ الشَّيْطَانَ لَكُمْ عَدُوٌّ فَاتَّخِذُوهُ عَدُوًّا ۚ إِنَّمَا يَدْعُو حِزْبَهُ لِيَكُونُوا مِنْ أَصْحَابِ السَّعِيرِ﴾

६.
(लक्षात ठेवा) सैतान तुमचा शत्रू आहे, तुम्ही त्याला शत्रूच जाणा, तो तर आपल्या टोळीला केवळ अशासाठी बोलवितो की ते सर्व जहन्नममध्ये जाणारे व्हावेत.

﴿الَّذِينَ كَفَرُوا لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ ۖ وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ مَغْفِرَةٌ وَأَجْرٌ كَبِيرٌ﴾

७.
जे लोक काफिर (इन्कारी) झाले, त्यांच्याकरिता सक्त अज़ाब आहे आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्यासाठी क्षमा आणि मोठा चांगला मोबदला आहे.

﴿أَفَمَنْ زُيِّنَ لَهُ سُوءُ عَمَلِهِ فَرَآهُ حَسَنًا ۖ فَإِنَّ اللَّهَ يُضِلُّ مَنْ يَشَاءُ وَيَهْدِي مَنْ يَشَاءُ ۖ فَلَا تَذْهَبْ نَفْسُكَ عَلَيْهِمْ حَسَرَاتٍ ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ بِمَا يَصْنَعُونَ﴾

८.
काय तो मनुष्य, ज्याच्याकरिता त्याची दुष्कर्मे सुशोभित केली गेली आहेत तर तो त्यां (कर्मां) ना चांगले समजतो (काय तो मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या माणसा समान आहे?) (निश्चितच) अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो मार्ग दाखवितो. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल दुःखी कष्टी होऊन आपला जीव कष्ट यातनेत टाकू नये. हे लोक जे काही करीत आहेत निःसंशय, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿وَاللَّهُ الَّذِي أَرْسَلَ الرِّيَاحَ فَتُثِيرُ سَحَابًا فَسُقْنَاهُ إِلَىٰ بَلَدٍ مَيِّتٍ فَأَحْيَيْنَا بِهِ الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ كَذَٰلِكَ النُّشُورُ﴾

९.
आणि अल्लाहच वाऱ्यांना वाढवितो, जे ढगांना उंच नेतात, मग आम्ही त्या ढगांना कोरड्या जमिनीकडे नेतो आणि त्याद्वारे त्या जमिनीला तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठणेही आहे.

﴿مَنْ كَانَ يُرِيدُ الْعِزَّةَ فَلِلَّهِ الْعِزَّةُ جَمِيعًا ۚ إِلَيْهِ يَصْعَدُ الْكَلِمُ الطَّيِّبُ وَالْعَمَلُ الصَّالِحُ يَرْفَعُهُ ۚ وَالَّذِينَ يَمْكُرُونَ السَّيِّئَاتِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ ۖ وَمَكْرُ أُولَٰئِكَ هُوَ يَبُورُ﴾

१०.
जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे.
समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल.

﴿وَاللَّهُ خَلَقَكُمْ مِنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُطْفَةٍ ثُمَّ جَعَلَكُمْ أَزْوَاجًا ۚ وَمَا تَحْمِلُ مِنْ أُنْثَىٰ وَلَا تَضَعُ إِلَّا بِعِلْمِهِ ۚ وَمَا يُعَمَّرُ مِنْ مُعَمَّرٍ وَلَا يُنْقَصُ مِنْ عُمُرِهِ إِلَّا فِي كِتَابٍ ۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرٌ﴾

११. लोक हो! अल्लाहने तुम्हाल मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग तुम्हाला जोडी (जोडपे नर-नारी) बनविले.
स्त्रियांचे गर्भ धारण करणे आणि बाळाचे जन्म घेणे, या सर्वांचे त्याला ज्ञान आहे, आणि कोणताही आयुष्यमान दीर्घायुष्य प्राप्त करीत नाही आणि ना कोणाचे आयुष्य घडते, परंतु हे सर्व एका ग्रंथात अस्तित्वात आहे. अल्लाकरिता ही गोष्ट फार सोपी आहे.

﴿وَمَا يَسْتَوِي الْبَحْرَانِ هَٰذَا عَذْبٌ فُرَاتٌ سَائِغٌ شَرَابُهُ وَهَٰذَا مِلْحٌ أُجَاجٌ ۖ وَمِنْ كُلٍّ تَأْكُلُونَ لَحْمًا طَرِيًّا وَتَسْتَخْرِجُونَ حِلْيَةً تَلْبَسُونَهَا ۖ وَتَرَى الْفُلْكَ فِيهِ مَوَاخِرَ لِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ﴾

१२. आणि दोन समुद्र समान नाहीत. हा गोड आहे, तहान भागवितो, प्यायला चांगला आणि तो दुसरा खारट आहे, कडू.
तुम्ही या दोघांपासून ताजे मांस खाता आणि ते दागिने काढता, ज्यांना तुम्ही अंगावर घालता आणि तुम्ही पाहता की मोठमोठ्या नावा, पाण्याला छेदणाऱ्या, त्या समुद्रात आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याचे आभार मानावेत.

﴿يُولِجُ اللَّيْلَ فِي النَّهَارِ وَيُولِجُ النَّهَارَ فِي اللَّيْلِ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ كُلٌّ يَجْرِي لِأَجَلٍ مُسَمًّى ۚ ذَٰلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمْ لَهُ الْمُلْكُ ۚ وَالَّذِينَ تَدْعُونَ مِنْ دُونِهِ مَا يَمْلِكُونَ مِنْ قِطْمِيرٍ﴾

१३. तो रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि सूर्य व चंद्राला त्यानेच कामास लावले आहे. प्रत्येक एका निर्धारित अवधीपावेतो चालत आहे. हाच अल्लाह होय, तुम्हा सर्वांचा पालनकर्ता.
त्याचीच राज्य सत्ता आहे, आणि ज्यांना तुम्ही त्याच्याखेरीज पुकारत आहात, ते तर खजुरीच्या बी सालपटाचेही मालक नाहीत.

﴿إِنْ تَدْعُوهُمْ لَا يَسْمَعُوا دُعَاءَكُمْ وَلَوْ سَمِعُوا مَا اسْتَجَابُوا لَكُمْ ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ يَكْفُرُونَ بِشِرْكِكُمْ ۚ وَلَا يُنَبِّئُكَ مِثْلُ خَبِيرٍ﴾

१४. जर तुम्ही त्यांना पुकाराल तर ते तुमची पुकार ऐकणारच नाहीत. आणि जर (समजा) ऐकूनही घेतील तर कबूल करणार नाहीत.
किंबहुना कयामतच्या दिवशी तुमच्या शिर्क (अनेकईश्वरउपासना ) चा साफ इन्कार करतील१ आणि तुम्हाला कोणीही अल्लाहसारखा जाणकार (वास्तवपूर्ण) खबरी देणार नाही.

﴿۞ يَا أَيُّهَا النَّاسُ أَنْتُمُ الْفُقَرَاءُ إِلَى اللَّهِ ۖ وَاللَّهُ هُوَ الْغَنِيُّ الْحَمِيدُ﴾

१५. लोक हो! तुम्ही अल्लाहचे भिकारी आहात आणि अल्लाहच निःस्पृह (गरज नसलेला) प्रशंसनीय आहे.

﴿إِنْ يَشَأْ يُذْهِبْكُمْ وَيَأْتِ بِخَلْقٍ جَدِيدٍ﴾

१६. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि एक नवी निर्मिती (सृष्टी) निर्माण करील.

﴿وَمَا ذَٰلِكَ عَلَى اللَّهِ بِعَزِيزٍ﴾

१७. आणि ही गोष्ट अल्लाहकरिता काहीच कठीण नाही.

﴿وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۚ وَإِنْ تَدْعُ مُثْقَلَةٌ إِلَىٰ حِمْلِهَا لَا يُحْمَلْ مِنْهُ شَيْءٌ وَلَوْ كَانَ ذَا قُرْبَىٰ ۗ إِنَّمَا تُنْذِرُ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ بِالْغَيْبِ وَأَقَامُوا الصَّلَاةَ ۚ وَمَنْ تَزَكَّىٰ فَإِنَّمَا يَتَزَكَّىٰ لِنَفْسِهِ ۚ وَإِلَى اللَّهِ الْمَصِيرُ﴾

१८.
आणि कोणीही ओझे उचलणारा, दुसऱ्याचे ओझे उचलणार नाही आणि जर कोणी जास्त वजनाचे ओझे बाळगणारा आपला भार उचलण्याकरिता दुसऱ्या कोणाला बोलविल तर तो त्यातून काहीच उचलू शकणार नाही, मग तो जवळचा नातेवाईक का असेना.
तुम्ही केवळ अशांनाच सावध करू शकता, जे पाहिल्याविनाच आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि नमाज नियमितपणे पढतात आणि जो पाक (स्वच्छ - शुद्ध) होईल, तो आपल्याच फायद्यासाठी पाक होईल आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे.

﴿وَمَا يَسْتَوِي الْأَعْمَىٰ وَالْبَصِيرُ﴾

१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत.

﴿وَلَا الظُّلُمَاتُ وَلَا النُّورُ﴾

२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश.

﴿وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ﴾

२१. आणि ना सावली आणि ना ऊन.

﴿وَمَا يَسْتَوِي الْأَحْيَاءُ وَلَا الْأَمْوَاتُ ۚ إِنَّ اللَّهَ يُسْمِعُ مَنْ يَشَاءُ ۖ وَمَا أَنْتَ بِمُسْمِعٍ مَنْ فِي الْقُبُورِ﴾

२२.
आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत.

﴿إِنْ أَنْتَ إِلَّا نَذِيرٌ﴾

२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात.

﴿إِنَّا أَرْسَلْنَاكَ بِالْحَقِّ بَشِيرًا وَنَذِيرًا ۚ وَإِنْ مِنْ أُمَّةٍ إِلَّا خَلَا فِيهَا نَذِيرٌ﴾

२४.
आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा.

﴿وَإِنْ يُكَذِّبُوكَ فَقَدْ كَذَّبَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ جَاءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَيِّنَاتِ وَبِالزُّبُرِ وَبِالْكِتَابِ الْمُنِيرِ﴾

२५.
आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील तर त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, त्यांच्याजवळदेखील त्यांचे पैगंबर मोजिजे (ईशचमत्कार), सहीफे (पोथी) आणि स्पष्ट ग्रंथ घेऊन आले होते.

﴿ثُمَّ أَخَذْتُ الَّذِينَ كَفَرُوا ۖ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ﴾

२६. मग मी त्या काफिरांना (सत्य-विरोधकांना) धरले, तर कशी होती माझी शिक्षा!

﴿أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ أَنْزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَخْرَجْنَا بِهِ ثَمَرَاتٍ مُخْتَلِفًا أَلْوَانُهَا ۚ وَمِنَ الْجِبَالِ جُدَدٌ بِيضٌ وَحُمْرٌ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهَا وَغَرَابِيبُ سُودٌ﴾

२७.
काय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की अल्लाहने आकाशातून पाणी अवतरित केले, मग आम्ही त्याच्याद्वारे अनेक रंगाची फळे निर्माण केली आणि पर्वतांचेही अनेक हिस्से आहेत सफेद आणि लाल की त्यांचे देखील अनेक रंग आहेत आणि गडद काळेही.

﴿وَمِنَ النَّاسِ وَالدَّوَابِّ وَالْأَنْعَامِ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهُ كَذَٰلِكَ ۗ إِنَّمَا يَخْشَى اللَّهَ مِنْ عِبَادِهِ الْعُلَمَاءُ ۗ إِنَّ اللَّهَ عَزِيزٌ غَفُورٌ﴾

२८.
आणि अशाच प्रकारे माणसांमध्ये, जनावरांमध्ये आणि चतुष्पाद प्राण्यांमध्येही काही असे आहेत ज्यांचे रंग वेगवेगळे आहेत. अल्लाहशी त्याचे तेच दास भय राखतात, जे ज्ञान बाळगतात. वास्तविक अल्लाह मोठा वर्चस्वशाली, माफ करणारा आहे.

﴿إِنَّ الَّذِينَ يَتْلُونَ كِتَابَ اللَّهِ وَأَقَامُوا الصَّلَاةَ وَأَنْفَقُوا مِمَّا رَزَقْنَاهُمْ سِرًّا وَعَلَانِيَةً يَرْجُونَ تِجَارَةً لَنْ تَبُورَ﴾

२९.
जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचे पठण (तिलावत) करतात आणि नमाज नित्य नेमाने पढतात आणि जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे त्यातून गुप्तपणे आणि उघडपणे खर्च करतात, ते अशा व्यापाराची आशा बाळगतात, जो कधीही तोट्यात राहणार नाही.

﴿لِيُوَفِّيَهُمْ أُجُورَهُمْ وَيَزِيدَهُمْ مِنْ فَضْلِهِ ۚ إِنَّهُ غَفُورٌ شَكُورٌ﴾

३०. यासाठी की त्यांना त्यांचा मोबदला पुरेपूर दिला जावा आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करावे. निःसंशय, तो मोठा माफ करणारा, गुणग्राहक आहे.

﴿وَالَّذِي أَوْحَيْنَا إِلَيْكَ مِنَ الْكِتَابِ هُوَ الْحَقُّ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ ۗ إِنَّ اللَّهَ بِعِبَادِهِ لَخَبِيرٌ بَصِيرٌ﴾

३१.
आणि हा ग्रंथ जो आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) द्वारे पाठविला आहे तो पूर्णतः सत्य आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथांचीही पुष्टी करतो. निःसंशय, अल्लाह आपल्या दासांची पूर्ण माहिती ठेवणारा, चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

﴿ثُمَّ أَوْرَثْنَا الْكِتَابَ الَّذِينَ اصْطَفَيْنَا مِنْ عِبَادِنَا ۖ فَمِنْهُمْ ظَالِمٌ لِنَفْسِهِ وَمِنْهُمْ مُقْتَصِدٌ وَمِنْهُمْ سَابِقٌ بِالْخَيْرَاتِ بِإِذْنِ اللَّهِ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَضْلُ الْكَبِيرُ﴾

३२. मग (या) ग्रंथाचा उत्तराधिकारी आम्ही त्या लोकांना बनविले, ज्यांना आम्ही आपल्या दासांमधून निवडून घेतले.
मग काही तर आपल्या प्राणांवर अत्याचार करणारे आहेत, आणि काही मध्यम दर्जाचे आहेत आणि त्यांच्यापैकी काही अल्लाहने दिलेल्या तौफिक (सुबुद्धी) ने सत्कर्मात पुढेच जात राहतात. हा फार मोठा अनुग्रह आहे.

﴿جَنَّاتُ عَدْنٍ يَدْخُلُونَهَا يُحَلَّوْنَ فِيهَا مِنْ أَسَاوِرَ مِنْ ذَهَبٍ وَلُؤْلُؤًا ۖ وَلِبَاسُهُمْ فِيهَا حَرِيرٌ﴾

३३.
सदैव काळ राहण्याच्या त्या बागा आहेत, ज्यात हे लोक प्रवेश करतील, तिथे त्यांना सोन्याची कांकणे आणि मोती (अंगावर) घातली जातील आणि तिथे त्यांची वस्त्रे रेशमाची असतील.

﴿وَقَالُوا الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي أَذْهَبَ عَنَّا الْحَزَنَ ۖ إِنَّ رَبَّنَا لَغَفُورٌ شَكُورٌ﴾

३४. आणि म्हणतील की अल्लाहचे अनंत उपकार आहेत, ज्याने आमच्यापासून दुःख दूर केले. निःसंशय, आमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि कदर जाणणारा आहे.

﴿الَّذِي أَحَلَّنَا دَارَ الْمُقَامَةِ مِنْ فَضْلِهِ لَا يَمَسُّنَا فِيهَا نَصَبٌ وَلَا يَمَسُّنَا فِيهَا لُغُوبٌ﴾

३५.
ज्याने आम्हाला आपल्या कृपेने सदैव काळ राहण्याच्या ठिकाणी उतरविले, जिथे ना आम्हाला काही कष्ट पोहोचेल आणि ना कसला थकवा जाणवेल.

﴿وَالَّذِينَ كَفَرُوا لَهُمْ نَارُ جَهَنَّمَ لَا يُقْضَىٰ عَلَيْهِمْ فَيَمُوتُوا وَلَا يُخَفَّفُ عَنْهُمْ مِنْ عَذَابِهَا ۚ كَذَٰلِكَ نَجْزِي كُلَّ كَفُورٍ﴾

३६.
आणि जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांच्यासाठी जहन्नमची आग आहे, ना तर त्यांना मृत्यु येईल की ते मरुन जावेत आणि ना जहन्नमची शिक्षाच कमी केली जाईल. आम्ही प्रत्येक काफिराला अशीच शिक्षा - यातना देतो.

﴿وَهُمْ يَصْطَرِخُونَ فِيهَا رَبَّنَا أَخْرِجْنَا نَعْمَلْ صَالِحًا غَيْرَ الَّذِي كُنَّا نَعْمَلُ ۚ أَوَلَمْ نُعَمِّرْكُمْ مَا يَتَذَكَّرُ فِيهِ مَنْ تَذَكَّرَ وَجَاءَكُمُ النَّذِيرُ ۖ فَذُوقُوا فَمَا لِلظَّالِمِينَ مِنْ نَصِيرٍ﴾

३७.
आणि ते लोक त्यात (जहन्नममध्ये) मोठमोठ्याने ओरडतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला (यातून) बाहेर काढ आम्ही चांगले कर्म करू, त्या कर्मांखेरीज, जे आम्ही करीत होतो (अल्लाह फर्माविल) की काय आम्ही तुम्हाला एवढे आयुष्य दिले नव्हते की ज्याला समजून घ्यायचे असते, तो समजू शकत होता१ आणि तुमच्याजवळ खबरदार करणाराही पोहचला होता,२ तेव्हा आता गोडी चाखा (अशा) जुलमी अत्याचारी लोकांचा कोणीही सहाय्य करणारा नाही.

﴿إِنَّ اللَّهَ عَالِمُ غَيْبِ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ إِنَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ﴾

३८. निःसंशय, अल्लाह आकाशांच्या आणि जमिनीच्या लपलेल्या वस्तूंना जाणणारा आहे. निःसंशय, तो छातीतल्या (मनातल्या) गोष्टींनाही जाणणारा आहे.

﴿هُوَ الَّذِي جَعَلَكُمْ خَلَائِفَ فِي الْأَرْضِ ۚ فَمَنْ كَفَرَ فَعَلَيْهِ كُفْرُهُ ۖ وَلَا يَزِيدُ الْكَافِرِينَ كُفْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ إِلَّا مَقْتًا ۖ وَلَا يَزِيدُ الْكَافِرِينَ كُفْرُهُمْ إِلَّا خَسَارًا﴾

३९.
तोच असा आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर बसविले, तेव्हा जो मनुष्य कुप्र (इन्कार) करील तर त्याच्या कुप्रचे ओझे त्याच्यावरच येईल आणि काफिर लोकांकरिता, त्यांचा इन्कार त्यांच्या पालनकर्त्याजवळ क्रोध वाढविण्याचेच कारण ठरतो आणि काफिरांसाठी त्यांचा इन्कार नुकसान वाढविण्याचीच सबब ठरतो.

﴿قُلْ أَرَأَيْتُمْ شُرَكَاءَكُمُ الَّذِينَ تَدْعُونَ مِنْ دُونِ اللَّهِ أَرُونِي مَاذَا خَلَقُوا مِنَ الْأَرْضِ أَمْ لَهُمْ شِرْكٌ فِي السَّمَاوَاتِ أَمْ آتَيْنَاهُمْ كِتَابًا فَهُمْ عَلَىٰ بَيِّنَتٍ مِنْهُ ۚ بَلْ إِنْ يَعِدُ الظَّالِمُونَ بَعْضُهُمْ بَعْضًا إِلَّا غُرُورًا﴾

४०.
(तुम्ही) सांगा की तुम्ही आपल्या (ठरविलेल्या) सहभागी ईश्वरांची अवस्था तर सांगा, त्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारीत असता, अर्थात मला हे सांगा की त्यांनी धरतीचा कोणता (हिस्सा) बनविला आहे किंवा त्यांचा आकाशात काही सहभाग आहे अथवा आम्ही त्यांंना एखादा ग्रंथ दिला आहे की हे त्याच्या पुराव्यावर अटळ असावेत? नव्हे, किंबहुना हे अत्याचारी एकमेकांशी केवळ फसवणुकीच्या गोष्टींचे वायदे करीत असतात.

﴿۞ إِنَّ اللَّهَ يُمْسِكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ أَنْ تَزُولَا ۚ وَلَئِنْ زَالَتَا إِنْ أَمْسَكَهُمَا مِنْ أَحَدٍ مِنْ بَعْدِهِ ۚ إِنَّهُ كَانَ حَلِيمًا غَفُورًا﴾

४१.
निःसंशय, अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला धरून ठेवले आहे की ते डगमगू नयेत आणि जर ते डगमगले तर मग अल्लाहखेरीज कोणी त्यांना धरूही शकत नाही. निःसंशय तो मोठा सहनशील, माफ करणारा आहे.

﴿وَأَقْسَمُوا بِاللَّهِ جَهْدَ أَيْمَانِهِمْ لَئِنْ جَاءَهُمْ نَذِيرٌ لَيَكُونُنَّ أَهْدَىٰ مِنْ إِحْدَى الْأُمَمِ ۖ فَلَمَّا جَاءَهُمْ نَذِيرٌ مَا زَادَهُمْ إِلَّا نُفُورًا﴾

४२.
आणि या काफिर लोकांनी मोठी दृढशपथ घेतली होती की जर त्यांच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला तर ते प्रत्येक समुदाया (उम्मत) पेक्षा जास्त मार्गदर्शन प्राप्त करणारे बनतील, मग जेव्हा त्यांच्याजवळ एक पैगंबर येऊन पोहोचला तेव्हा त्यांच्या तिरस्कारातच प्रगति झाली.

﴿اسْتِكْبَارًا فِي الْأَرْضِ وَمَكْرَ السَّيِّئِ ۚ وَلَا يَحِيقُ الْمَكْرُ السَّيِّئُ إِلَّا بِأَهْلِهِ ۚ فَهَلْ يَنْظُرُونَ إِلَّا سُنَّتَ الْأَوَّلِينَ ۚ فَلَنْ تَجِدَ لِسُنَّتِ اللَّهِ تَبْدِيلًا ۖ وَلَنْ تَجِدَ لِسُنَّتِ اللَّهِ تَحْوِيلًا﴾

४३.
जगात स्वतःला मोठा समजल्यामुळे आणि त्यांच्या वाईट प्रयत्नांमुळे आणि वाईट प्रयत्न करणाऱ्यांची शिक्षा ते प्रयत्न करणाऱ्यांनाच भोगावी लागते तर काय हे त्याच व्यवहाराच्या प्रतीक्षेत आहेत, जो पूर्वीच्या लोकांशी केला जात राहिला? तेव्हा तुम्हाला अल्लाहच्या पद्धतीत कधीही बदल आढळणार नाही आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधी बदल होत असलेला आढळणार नाही.

﴿أَوَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ وَكَانُوا أَشَدَّ مِنْهُمْ قُوَّةً ۚ وَمَا كَانَ اللَّهُ لِيُعْجِزَهُ مِنْ شَيْءٍ فِي السَّمَاوَاتِ وَلَا فِي الْأَرْضِ ۚ إِنَّهُ كَانَ عَلِيمًا قَدِيرًا﴾

४४.
काय हे लोक धरतीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेलेत, त्यांचा अंत कसा झाला. वास्तविक ते लोक यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते. आणि आकाशांमध्ये व धरतीवर अशी कोणतीही वस्तू नाही जी अल्लाहला लाचार करील. तो सर्व काही जाणणारा, मोठा सामर्थ्यशाली आहे.

﴿وَلَوْ يُؤَاخِذُ اللَّهُ النَّاسَ بِمَا كَسَبُوا مَا تَرَكَ عَلَىٰ ظَهْرِهَا مِنْ دَابَّةٍ وَلَٰكِنْ يُؤَخِّرُهُمْ إِلَىٰ أَجَلٍ مُسَمًّى ۖ فَإِذَا جَاءَ أَجَلُهُمْ فَإِنَّ اللَّهَ كَانَ بِعِبَادِهِ بَصِيرًا﴾

४५.
आणि जर अल्लाह, लोकांना त्यांच्या कर्मांमुळे त्वरित पकडीत घेऊ लागला असता तर संपूर्ण धरतीवर एक जीवदेखील सोडला नसता तथापि अल्लाह त्यांना एका निर्धारित समयापर्यंत सवड देत आहे, तर जेव्हा त्यांची ती वेळ येऊन पोहोचेल तेव्हा अल्लाह आपल्या दासांना स्वतः पाहून घेईल.

الترجمات والتفاسير لهذه السورة: