الكهف

تفسير سورة الكهف

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي أَنْزَلَ عَلَىٰ عَبْدِهِ الْكِتَابَ وَلَمْ يَجْعَلْ لَهُ عِوَجًا ۜ﴾

१.
सर्व स्तुती-प्रशंसा त्या अल्लाहकरिताच आहे, ज्याने आपल्या दासावर हा कुरआन अवतरित केला आणि त्यात कसलीही उणीव बाकी राहू दिली नाही.

﴿قَيِّمًا لِيُنْذِرَ بَأْسًا شَدِيدًا مِنْ لَدُنْهُ وَيُبَشِّرَ الْمُؤْمِنِينَ الَّذِينَ يَعْمَلُونَ الصَّالِحَاتِ أَنَّ لَهُمْ أَجْرًا حَسَنًا﴾

२.
किंबहुना सर्व काही यथायोग्य राखले यासाठी की आपल्याजवळच्या सक्त शिक्षेपासून सचेत करावे आणि ईमान राखणाऱ्यांना आणि सत्कर्म करणाऱ्यांना खूशखबरी ऐकवावी की त्यांच्याकरिता उत्तम मोबदला आहे.

﴿مَاكِثِينَ فِيهِ أَبَدًا﴾

३. ज्यात ते नेहमी नेहमी राहतील.

﴿وَيُنْذِرَ الَّذِينَ قَالُوا اتَّخَذَ اللَّهُ وَلَدًا﴾

४. आणि त्या लोकांनाही भय दाखवावे जे म्हणतात की अल्लाह संतती बाळगतो.

﴿مَا لَهُمْ بِهِ مِنْ عِلْمٍ وَلَا لِآبَائِهِمْ ۚ كَبُرَتْ كَلِمَةً تَخْرُجُ مِنْ أَفْوَاهِهِمْ ۚ إِنْ يَقُولُونَ إِلَّا كَذِبًا﴾

५. वास्तविकत ना त्यांना स्वतःला याचे ज्ञान आहे, ना त्यांच्या थोर बुजूर्ग लोकांना. हा आरोप मोठा वाईट आहे, जो त्यांच्या तोंडून निघत आहे, ते केवळ खोटे बोलत आहेत.

﴿فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ إِنْ لَمْ يُؤْمِنُوا بِهَٰذَا الْحَدِيثِ أَسَفًا﴾

६.
मग जर या लोकांनी या गोष्टीवर ईमान राखले नाही तर काय तुम्ही त्यांच्या मागे याच दुःखात आपल्या जीवाचा नाश करून घ्याल?

﴿إِنَّا جَعَلْنَا مَا عَلَى الْأَرْضِ زِينَةً لَهَا لِنَبْلُوَهُمْ أَيُّهُمْ أَحْسَنُ عَمَلًا﴾

७.
धरतीवर जे काही आहे, ते आम्ही धरतीच्या शोभा-सजावटीसाठी बनविले आहे की आम्ही त्यांची कसोटी घ्यावी की त्यांच्यापैकी कोण सत्कर्म करणारा आहे.

﴿وَإِنَّا لَجَاعِلُونَ مَا عَلَيْهَا صَعِيدًا جُرُزًا﴾

८. आणि या धरतीवर जे काही आहे, आम्ही त्याला एक सपाट मैदान करून टाकणार आहोत.

﴿أَمْ حَسِبْتَ أَنَّ أَصْحَابَ الْكَهْفِ وَالرَّقِيمِ كَانُوا مِنْ آيَاتِنَا عَجَبًا﴾

९.
काय तुम्ही आपल्या मते गुफा आणि शिलालेखवाल्यांना आमच्या निशाण्यांपैकी एखादी मोठी नवलपूर्ण निशाणी समजत आहात?

﴿إِذْ أَوَى الْفِتْيَةُ إِلَى الْكَهْفِ فَقَالُوا رَبَّنَا آتِنَا مِنْ لَدُنْكَ رَحْمَةً وَهَيِّئْ لَنَا مِنْ أَمْرِنَا رَشَدًا﴾

१०.
त्या तरुणांनी जेव्हा गुफेत आश्रय घेतला तेव्हा दुआ-प्रार्थना केली की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपल्या जवळून दया- कृपा प्रदान कर आणि आमच्या कार्यात आमच्यासाठी मार्ग सोपा कर.

﴿فَضَرَبْنَا عَلَىٰ آذَانِهِمْ فِي الْكَهْفِ سِنِينَ عَدَدًا﴾

११. मग आम्ही त्यांच्या कानांवर अनेक वर्षांपर्यंत त्याच गुफेत पडदे टाकले.

﴿ثُمَّ بَعَثْنَاهُمْ لِنَعْلَمَ أَيُّ الْحِزْبَيْنِ أَحْصَىٰ لِمَا لَبِثُوا أَمَدًا﴾

१२.
मग आम्ही त्यांना उठवून उभे केले की आम्ही हे जाणून घ्यावे की दोन्ही गटांपैकी या मोठ्या मुदतीला, जी त्यांनी पार पाडली, कोणी जास्त स्मरणात राखले?

﴿نَحْنُ نَقُصُّ عَلَيْكَ نَبَأَهُمْ بِالْحَقِّ ۚ إِنَّهُمْ فِتْيَةٌ آمَنُوا بِرَبِّهِمْ وَزِدْنَاهُمْ هُدًى﴾

१३.
आम्ही त्यांची खरी कहाणी तुमच्यासमोर वर्णन करीत आहोत, या काही तरुणांनी१ आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली.

﴿وَرَبَطْنَا عَلَىٰ قُلُوبِهِمْ إِذْ قَامُوا فَقَالُوا رَبُّنَا رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ لَنْ نَدْعُوَ مِنْ دُونِهِ إِلَٰهًا ۖ لَقَدْ قُلْنَا إِذًا شَطَطًا﴾

१४.
आणि आम्ही त्यांची मने मजबूत केली होती जेव्हा ते उठून उभे राहिले आणि म्हणू लागले की आमचा पालनकर्ता तोच आहे, जो आकाशांचा आणि धरतीचा पालनकर्ता आहे, हे असंभव आहे की आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या उपास्याला पुकारावे जर असे केले तर आम्ही मोठी अनुचित गोष्ट बोललो.

﴿هَٰؤُلَاءِ قَوْمُنَا اتَّخَذُوا مِنْ دُونِهِ آلِهَةً ۖ لَوْلَا يَأْتُونَ عَلَيْهِمْ بِسُلْطَانٍ بَيِّنٍ ۖ فَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَىٰ عَلَى اللَّهِ كَذِبًا﴾

१५.
हा आहे आमचा जनसमूह, ज्याने अल्लाहखेरीज दुसरी उपास्ये बनवून ठेवली आहेत त्यांच्या वर्चस्वाचा एखादा स्पष्ट पुरावा का नाही सादर करत? अल्लाहशी खोट्या गोष्टीचा संबंध जोडणाऱ्यापेक्षा अधिक अत्याचारी कोण आहे?

﴿وَإِذِ اعْتَزَلْتُمُوهُمْ وَمَا يَعْبُدُونَ إِلَّا اللَّهَ فَأْوُوا إِلَى الْكَهْفِ يَنْشُرْ لَكُمْ رَبُّكُمْ مِنْ رَحْمَتِهِ وَيُهَيِّئْ لَكُمْ مِنْ أَمْرِكُمْ مِرْفَقًا﴾

१६.
आणि ज्याअर्थी तुम्ही त्यांच्यापासून आणि अल्लाहखेरीज त्यांच्या इतर उपास्यांपासून वेगळे झाला आहात तर आता एखाद्या गुफेत जाऊन बसा, तुमचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्यावर आपली दया-कृपा करेल आणि तुमच्या कार्यात सहज सुलभता निर्माण करील.

﴿۞ وَتَرَى الشَّمْسَ إِذَا طَلَعَتْ تَزَاوَرُ عَنْ كَهْفِهِمْ ذَاتَ الْيَمِينِ وَإِذَا غَرَبَتْ تَقْرِضُهُمْ ذَاتَ الشِّمَالِ وَهُمْ فِي فَجْوَةٍ مِنْهُ ۚ ذَٰلِكَ مِنْ آيَاتِ اللَّهِ ۗ مَنْ يَهْدِ اللَّهُ فَهُوَ الْمُهْتَدِ ۖ وَمَنْ يُضْلِلْ فَلَنْ تَجِدَ لَهُ وَلِيًّا مُرْشِدًا﴾

१७.
आणि तुम्ही पाहाल की सूर्योदय होताना सूर्य त्यांच्या गुफेच्या उजव्या बाजूला झुकतो आणि अस्तास जाताना त्यांच्या डाव्या बाजूला गुफेचा भाग सोडून मावळतो आणि ते त्या गुफेच्या प्रशस्त स्थानात आहेत.
हे अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहे, अल्लाह ज्याला मार्गदर्शन करील, तो सत्य मार्गावर आहे आणि ज्याला पथभ्रष्ट करील तर अशक्य आहे की तुम्हाला त्याचा कोणी मित्र आणि मार्ग दाखविणारा दिसून यावा.

﴿وَتَحْسَبُهُمْ أَيْقَاظًا وَهُمْ رُقُودٌ ۚ وَنُقَلِّبُهُمْ ذَاتَ الْيَمِينِ وَذَاتَ الشِّمَالِ ۖ وَكَلْبُهُمْ بَاسِطٌ ذِرَاعَيْهِ بِالْوَصِيدِ ۚ لَوِ اطَّلَعْتَ عَلَيْهِمْ لَوَلَّيْتَ مِنْهُمْ فِرَارًا وَلَمُلِئْتَ مِنْهُمْ رُعْبًا﴾

१८.
आणि तुम्ही विचार कराल की ते जागत आहेत वस्तुतः ते झोपत होते, आणि आम्ही स्वतः त्याची उजवी डावी कुशी बदलत राहिलो. त्यांचा कुत्रादेखील गुफेच्या तोंडाशी हात पसरलेल्या अवस्थेत होता.
जर तुम्ही आत डोकावून पाहू इच्छिले असते तर नक्कीच उलट पावलांनी पळ काढला असता आणि त्यांच्या भय-दहशतीने तुम्ही भारुन गेले असते.

﴿وَكَذَٰلِكَ بَعَثْنَاهُمْ لِيَتَسَاءَلُوا بَيْنَهُمْ ۚ قَالَ قَائِلٌ مِنْهُمْ كَمْ لَبِثْتُمْ ۖ قَالُوا لَبِثْنَا يَوْمًا أَوْ بَعْضَ يَوْمٍ ۚ قَالُوا رَبُّكُمْ أَعْلَمُ بِمَا لَبِثْتُمْ فَابْعَثُوا أَحَدَكُمْ بِوَرِقِكُمْ هَٰذِهِ إِلَى الْمَدِينَةِ فَلْيَنْظُرْ أَيُّهَا أَزْكَىٰ طَعَامًا فَلْيَأْتِكُمْ بِرِزْقٍ مِنْهُ وَلْيَتَلَطَّفْ وَلَا يُشْعِرَنَّ بِكُمْ أَحَدًا﴾

१९. आणि त्याच प्रकारे आम्ही त्यांना जागे करून उठविले की आपसात विचारपूस करावी.
त्यांच्यापैकी एका बोलणाऱ्याने विचारले की तुम्ही (इथे) किती काळ राहातील त्यांनी उत्तर दिले, एक दिवस किंवा एका दिवसापेक्षाही कमी. म्हणू लागले, की तुमच्या वास्तव्याचे पूर्ण ज्ञान अल्लाहलाच आहे. आता तुम्ही आपल्यापैकी एखाद्यालाही चांदीची (नाणी) देऊन शहरात पाठवा.
त्याने चांगल्याप्रकारे पाहून घ्यावे की शहरात कोणते भोजन स्वच्छ शुद्ध आहे, मग त्यातूनच तुमच्या भोजनासाठी आणावे आणि त्याने खूप सावधगिरी आणि नरमीने वागावे आणि कोणालाही तुमची खबर होऊ देऊ नये.

﴿إِنَّهُمْ إِنْ يَظْهَرُوا عَلَيْكُمْ يَرْجُمُوكُمْ أَوْ يُعِيدُوكُمْ فِي مِلَّتِهِمْ وَلَنْ تُفْلِحُوا إِذًا أَبَدًا﴾

२०.
जर हे (काफिर) तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करून घेतील तर तुम्हाला दगडांनी मारून टाकतील किंवा पुन्हा तुम्हाला आपल्या धर्मात परत घेतील, तर मग तुम्ही कधीही सफल होऊ शकणार नाहीत.

﴿وَكَذَٰلِكَ أَعْثَرْنَا عَلَيْهِمْ لِيَعْلَمُوا أَنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَأَنَّ السَّاعَةَ لَا رَيْبَ فِيهَا إِذْ يَتَنَازَعُونَ بَيْنَهُمْ أَمْرَهُمْ ۖ فَقَالُوا ابْنُوا عَلَيْهِمْ بُنْيَانًا ۖ رَبُّهُمْ أَعْلَمُ بِهِمْ ۚ قَالَ الَّذِينَ غَلَبُوا عَلَىٰ أَمْرِهِمْ لَنَتَّخِذَنَّ عَلَيْهِمْ مَسْجِدًا﴾

२१.
आणि आम्ही अशा प्रकारे लोकांना त्यांच्या अवस्थेशी अवगत केले की त्यांनी हे जाणून घ्यावे की अल्लाहचा वायदा पूर्णतः सच्चा आहे.
आणि कयामत येण्याबाबत काहीच शंका नाही जेव्हा ते आपल्या बोलण्यात आपसात मतभेद करीत होते, म्हणू लागले की गुफेवर एक इमारत बनवून घ्या.
त्यांचा पालनकर्ताच त्यांच्या अवस्थेला अधिक जाणणारा आहे, ज्या लोकांनी त्यांच्या बाबतीत वर्चस्व प्राप्त केले, ते म्हणू लागले की आम्ही तर यांच्याजवळ पास मस्जिद बनवू.

﴿سَيَقُولُونَ ثَلَاثَةٌ رَابِعُهُمْ كَلْبُهُمْ وَيَقُولُونَ خَمْسَةٌ سَادِسُهُمْ كَلْبُهُمْ رَجْمًا بِالْغَيْبِ ۖ وَيَقُولُونَ سَبْعَةٌ وَثَامِنُهُمْ كَلْبُهُمْ ۚ قُلْ رَبِّي أَعْلَمُ بِعِدَّتِهِمْ مَا يَعْلَمُهُمْ إِلَّا قَلِيلٌ ۗ فَلَا تُمَارِ فِيهِمْ إِلَّا مِرَاءً ظَاهِرًا وَلَا تَسْتَفْتِ فِيهِمْ مِنْهُمْ أَحَدًا﴾

२२.
काही लोक म्हणतील की गुफेत तीन जण होते आणि चौथा त्यांचा कुत्रा होता, काही म्हणतील की ते पाच होते, सहावा त्यांचा कुत्रा होता. अपरोक्ष (ग़ैब) विषयी (चिन्ह पाहिल्याविना) अनुमानाने दगड मारणे. काही म्हणतील की ते सात आहेत आठवा त्यांचा कुत्रा आहे. (तुम्ही) सांगा की माझा पालनकर्ता, त्यांची संख्या चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
त्यांना फार थोडेच लोक जाणतात, मग तुम्हीही त्या लोकांविषयी केवळ संक्षिप्त बोलत जा, आणि त्यांच्यापैकी कोणाशी त्यांच्याविषयी विचारपूसही करू नका.

﴿وَلَا تَقُولَنَّ لِشَيْءٍ إِنِّي فَاعِلٌ ذَٰلِكَ غَدًا﴾

२३. आणि कधीही एखाद्या कामाबद्दल असे बोलू नका की मी हे काम उद्या करेन.

﴿إِلَّا أَنْ يَشَاءَ اللَّهُ ۚ وَاذْكُرْ رَبَّكَ إِذَا نَسِيتَ وَقُلْ عَسَىٰ أَنْ يَهْدِيَنِ رَبِّي لِأَقْرَبَ مِنْ هَٰذَا رَشَدًا﴾

२४.
परंतु त्यासोबतच ‘इन्शा अल्लाह’ (अल्लाहने इच्छिले तर) जरूर म्हणा आणि जेव्हा देखील विसर पडेल आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) चे स्मरण करत जा आणि हे म्हणत राहा की मला पूर्ण आशा आहे की माझा पालनकर्ता याहून जास्त मार्गदर्शनाच्या जवळच्या गोष्टीचे मार्गदर्शन करेल.

﴿وَلَبِثُوا فِي كَهْفِهِمْ ثَلَاثَ مِائَةٍ سِنِينَ وَازْدَادُوا تِسْعًا﴾

२५. आणि ते लोक आपल्या गुफेत तीनशे वर्षापर्यंत राहिले, आणि नऊ वर्षे त्यांनी अधिक काढली.

﴿قُلِ اللَّهُ أَعْلَمُ بِمَا لَبِثُوا ۖ لَهُ غَيْبُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ أَبْصِرْ بِهِ وَأَسْمِعْ ۚ مَا لَهُمْ مِنْ دُونِهِ مِنْ وَلِيٍّ وَلَا يُشْرِكُ فِي حُكْمِهِ أَحَدًا﴾

२६. तुम्ही सांगा, अल्लाहलाच त्यांच्या वास्तव्यकाळाचे चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. आकाशांचे आणि धरतीचे परोक्ष ज्ञान केवळ त्यालाच आहे.
तो किती चांगला पाहणारा ऐकणारा आहे! अल्लाहखेरीज कोणीही त्यांची मदत करणारा नाही आणि अल्लाह आपला आदेश लागू करण्यात कोणालाही सहभागी बनवित नाही.

﴿وَاتْلُ مَا أُوحِيَ إِلَيْكَ مِنْ كِتَابِ رَبِّكَ ۖ لَا مُبَدِّلَ لِكَلِمَاتِهِ وَلَنْ تَجِدَ مِنْ دُونِهِ مُلْتَحَدًا﴾

२७. आणि तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे जो ग्रंथ अवतरित केला गेला आहे, त्याचे पठण करीत राहा. त्याचे फर्मान कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला त्याच्याखेरीज कदापि एखादे आश्रयस्थान लाभणार नाही.

﴿وَاصْبِرْ نَفْسَكَ مَعَ الَّذِينَ يَدْعُونَ رَبَّهُمْ بِالْغَدَاةِ وَالْعَشِيِّ يُرِيدُونَ وَجْهَهُ ۖ وَلَا تَعْدُ عَيْنَاكَ عَنْهُمْ تُرِيدُ زِينَةَ الْحَيَاةِ الدُّنْيَا ۖ وَلَا تُطِعْ مَنْ أَغْفَلْنَا قَلْبَهُ عَنْ ذِكْرِنَا وَاتَّبَعَ هَوَاهُ وَكَانَ أَمْرُهُ فُرُطًا﴾

२८.
आणि स्वतःला अशाच लोकांच्या सोबत राखत जा, जे आपल्या पालनकर्त्याला सकाळ संध्याकाळ पुकारतात आणि त्याच्याच मुखा (अनुग्रहा) ची अभिलाषा करतात.
खबरदार! तुमची दृष्टी त्यांच्यावरून हटता कामा नये की ऐहिक जीवनाच्या शोभा-सजावटीच्या प्रयत्नात मग्न व्हावे (पाहा) त्याचे म्हणणे मान्य करू नका, ज्याच्या हृदयाला आम्ही आपल्या आठवणीपासून गाफील ठेवले आहे आणि जो इच्छा-आकांक्षांच्या मागे धावत आहे आणि ज्याच्या कर्माने मर्यादा पार केली आहे.

﴿وَقُلِ الْحَقُّ مِنْ رَبِّكُمْ ۖ فَمَنْ شَاءَ فَلْيُؤْمِنْ وَمَنْ شَاءَ فَلْيَكْفُرْ ۚ إِنَّا أَعْتَدْنَا لِلظَّالِمِينَ نَارًا أَحَاطَ بِهِمْ سُرَادِقُهَا ۚ وَإِنْ يَسْتَغِيثُوا يُغَاثُوا بِمَاءٍ كَالْمُهْلِ يَشْوِي الْوُجُوهَ ۚ بِئْسَ الشَّرَابُ وَسَاءَتْ مُرْتَفَقًا﴾

२९. आणि ऐलान करा की हे परिपूर्ण सत्य (कुरआन) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहे. आता ज्याची इच्छा होईल त्याने ईमान राखावे आणि ज्याची इच्छा होईल त्याने इन्कार करावा. अत्याचारी लोकांकरिता आम्ही ती आग तयार करून ठेवली आहे, जिच्या (आगीच्या) कनाती त्यांना घेरून टाकतील.
जर ते गाऱ्हाणे मांडतील तर त्यांची मदत त्या पाण्याने केली जाईल, जे तेलाच्या गाळासारखे असेल, जे चेहरा भाजून टाकील मोठे वाईट पाणी आहे आणि मोठे वाईट विश्रांतीस्थान (जहन्नम) आहे.

﴿إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ إِنَّا لَا نُضِيعُ أَجْرَ مَنْ أَحْسَنَ عَمَلًا﴾

३०.
निःसंशय ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले तर आम्ही एखाद्या सर्त्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही.

﴿أُولَٰئِكَ لَهُمْ جَنَّاتُ عَدْنٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهِمُ الْأَنْهَارُ يُحَلَّوْنَ فِيهَا مِنْ أَسَاوِرَ مِنْ ذَهَبٍ وَيَلْبَسُونَ ثِيَابًا خُضْرًا مِنْ سُنْدُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُتَّكِئِينَ فِيهَا عَلَى الْأَرَائِكِ ۚ نِعْمَ الثَّوَابُ وَحَسُنَتْ مُرْتَفَقًا﴾

३१. त्यांच्यासाठी नेहमी नेहमी असणारी जन्नत आहे. तिच्याखाली नद्या वाहत असतील. तिथे यांना सुवर्ण कांकण घातले जाईल. आणि हिरव्या रंगाचे तलम व जाड रेशमाचे कपडे घालतील त्या ठिकाणी सिंहासनावर तक्के लावून बसतील. किती चांगला मोबदला आहे आणि किती चांगले आराम करण्याचे घर आहे.

﴿۞ وَاضْرِبْ لَهُمْ مَثَلًا رَجُلَيْنِ جَعَلْنَا لِأَحَدِهِمَا جَنَّتَيْنِ مِنْ أَعْنَابٍ وَحَفَفْنَاهُمَا بِنَخْلٍ وَجَعَلْنَا بَيْنَهُمَا زَرْعًا﴾

३२.
आणि त्यांना त्या दोन माणसांचे उदाहरणही ऐकवा ज्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा देऊन ठेवल्या होत्या, ज्यांना खजुरीच्या वृक्षांनी आम्ही घेरून ठेवले होते आणि दोघांच्या दरम्यान शेती निर्माण केली होती.

﴿كِلْتَا الْجَنَّتَيْنِ آتَتْ أُكُلَهَا وَلَمْ تَظْلِمْ مِنْهُ شَيْئًا ۚ وَفَجَّرْنَا خِلَالَهُمَا نَهَرًا﴾

३३.
दोन्ही बागांनी आपली फळे भरपूर दिलीत आणि त्या काहीच कमतरता केली नाही आणि आम्ही त्या बागांच्या दरम्यान प्रवाह जारी केला होता.

﴿وَكَانَ لَهُ ثَمَرٌ فَقَالَ لِصَاحِبِهِ وَهُوَ يُحَاوِرُهُ أَنَا أَكْثَرُ مِنْكَ مَالًا وَأَعَزُّ نَفَرًا﴾

३४. आणि (अशा प्रकारे) त्याच्याजवळ फळे होती.
एक दिवस बोलता बोलता तो आपल्या साथीदाराला म्हणाला की मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि जत्थ्यातही अधिक प्रतिष्ठीत आहे.

﴿وَدَخَلَ جَنَّتَهُ وَهُوَ ظَالِمٌ لِنَفْسِهِ قَالَ مَا أَظُنُّ أَنْ تَبِيدَ هَٰذِهِ أَبَدًا﴾

३५.
आणि तो आपल्या बागेत गेला आणि आपल्या जीवावर जुलूम करणारा होता, म्हणाला, मला नाही वाटत ही बाग कधी बरबाद होऊ शकेल.

﴿وَمَا أَظُنُّ السَّاعَةَ قَائِمَةً وَلَئِنْ رُدِدْتُ إِلَىٰ رَبِّي لَأَجِدَنَّ خَيْرًا مِنْهَا مُنْقَلَبًا﴾

३६.
आणि ना मी कयामतचे प्रस्थापित होण्यास मानतो आणि जर हे मानूनही घेतली की मी आपल्या पालनकर्त्याकडे परतविलो गेलो तर खात्रीने (ते परतीचे ठिकाण) मला याहून जास्त चांगले आढळेल.

﴿قَالَ لَهُ صَاحِبُهُ وَهُوَ يُحَاوِرُهُ أَكَفَرْتَ بِالَّذِي خَلَقَكَ مِنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُطْفَةٍ ثُمَّ سَوَّاكَ رَجُلًا﴾

३७.
त्याचा साथीदार त्याच्याशी बोलताना म्हणाला, काय तू त्या (अल्लाह) ला नाही मानत, ज्याने तुला मातीपासून निर्माण केले, नंतर वीर्यापासून, मग तुला पूर्ण मानव (पुरुष) घडविले.

﴿لَٰكِنَّا هُوَ اللَّهُ رَبِّي وَلَا أُشْرِكُ بِرَبِّي أَحَدًا﴾

३८.
परंतु मी (तर पूर्ण श्रद्धा राखतो की) तोच अल्लाह माझा स्वामी व पालनकर्ता आहे, मी आपल्या पालनकर्त्यासोबत कोणालाही सहभागी ठरविणार नाही.

﴿وَلَوْلَا إِذْ دَخَلْتَ جَنَّتَكَ قُلْتَ مَا شَاءَ اللَّهُ لَا قُوَّةَ إِلَّا بِاللَّهِ ۚ إِنْ تَرَنِ أَنَا أَقَلَّ مِنْكَ مَالًا وَوَلَدًا﴾

३९. आणि तू आपल्या बागेत जाण्याच्या वेळी असे का नाही म्हणाला की अल्लाहने जे इच्छिले ते होईल. कोणतेही शक्ती-सामर्थ्य नाही परंतु अल्लाहच्या मदतीने, जरी तू मला धन आणि संततीत कमतरता असलेला पाहात आहेस.

﴿فَعَسَىٰ رَبِّي أَنْ يُؤْتِيَنِ خَيْرًا مِنْ جَنَّتِكَ وَيُرْسِلَ عَلَيْهَا حُسْبَانًا مِنَ السَّمَاءِ فَتُصْبِحَ صَعِيدًا زَلَقًا﴾

४०.
परंतु फार शक्य आहे की माझा पालनकर्ता मला तुझ्या या बागेपेक्षा उत्तम प्रदान करील आणि या (तुझ्या बागे) वर आसमानी संकट पाठविल तर ही सपाट आणि निसटणारे मैदान बनेल.

﴿أَوْ يُصْبِحَ مَاؤُهَا غَوْرًا فَلَنْ تَسْتَطِيعَ لَهُ طَلَبًا﴾

४१. किंवाच हिचे पाणी खाली उतरले आणि तुझ्या आवाक्यात न राहावे की तू ते शोधून आणावे.

﴿وَأُحِيطَ بِثَمَرِهِ فَأَصْبَحَ يُقَلِّبُ كَفَّيْهِ عَلَىٰ مَا أَنْفَقَ فِيهَا وَهِيَ خَاوِيَةٌ عَلَىٰ عُرُوشِهَا وَيَقُولُ يَا لَيْتَنِي لَمْ أُشْرِكْ بِرَبِّي أَحَدًا﴾

४२.
आणि त्याची (सर्व) फळे घेरली गेलीत मग तो आपल्या या खर्चाबद्दल, जो त्याने बागेवर केला होता, आपले हात मळू लागला, आणि ती बाग छप्परासमेत तोंडघशी पडली होती आणि (तो मनुष्य) म्हणत होता की अरेरे! मी आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्या कुणाला भागीदार बनविले नसते.

﴿وَلَمْ تَكُنْ لَهُ فِئَةٌ يَنْصُرُونَهُ مِنْ دُونِ اللَّهِ وَمَا كَانَ مُنْتَصِرًا﴾

४३.
त्याच्या हक्कात कोणताही समूह उठून उभा राहिला नाही की अल्लाहपासून त्याचा काही बचाव करू शकला असता आणि ना तो स्वतःही सूड घेणारा बनू शकला.

﴿هُنَالِكَ الْوَلَايَةُ لِلَّهِ الْحَقِّ ۚ هُوَ خَيْرٌ ثَوَابًا وَخَيْرٌ عُقْبًا﴾

४४. इथूनच (सिद्ध होते) की समस्त अधिकार त्याच अल्लाहकरिता आहेत. तो मोबदला प्रदान करण्याच्या व परिणामाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे.

﴿وَاضْرِبْ لَهُمْ مَثَلَ الْحَيَاةِ الدُّنْيَا كَمَاءٍ أَنْزَلْنَاهُ مِنَ السَّمَاءِ فَاخْتَلَطَ بِهِ نَبَاتُ الْأَرْضِ فَأَصْبَحَ هَشِيمًا تَذْرُوهُ الرِّيَاحُ ۗ وَكَانَ اللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ مُقْتَدِرًا﴾

४५.
आणि त्यांना या जगाच्या जीवनाचे उदाहरणही सांगा, जणू पाणी जे आम्ही आकाशातून अवतरित करतो त्याद्वआरे जमिनीची पैदावार मिळतीजुळती असते, मग शेवटी ती चूरेचूर होते, जिला वारे उडवित नेत फिरतात आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

﴿الْمَالُ وَالْبَنُونَ زِينَةُ الْحَيَاةِ الدُّنْيَا ۖ وَالْبَاقِيَاتُ الصَّالِحَاتُ خَيْرٌ عِنْدَ رَبِّكَ ثَوَابًا وَخَيْرٌ أَمَلًا﴾

४६.
धन-संपत्ती आणि संतती तर या जगाच्या जीवनाची शोभा आहे परंतु सदैव टिकून राहणारे सत्कर्म (नेकी) तुमच्या पालनकर्त्याजवळ मोबदल्याच्या दृष्टीने आणि (भविष्याच्या) चांगल्या आशेसाठी फार उत्तम आहे.

﴿وَيَوْمَ نُسَيِّرُ الْجِبَالَ وَتَرَى الْأَرْضَ بَارِزَةً وَحَشَرْنَاهُمْ فَلَمْ نُغَادِرْ مِنْهُمْ أَحَدًا﴾

४७.
आणि ज्या दिवशी आम्ही पर्वतांना चालवू आणि जमिनीला तुम्ही आवरण नसलेल्या स्थितीत पाहाल, आणि समस्त लोकांना आम्ही एकत्र करू तेव्हा त्यांच्यापैकी कोणालाही बाकी सोडणार नाही.

﴿وَعُرِضُوا عَلَىٰ رَبِّكَ صَفًّا لَقَدْ جِئْتُمُونَا كَمَا خَلَقْنَاكُمْ أَوَّلَ مَرَّةٍ ۚ بَلْ زَعَمْتُمْ أَلَّنْ نَجْعَلَ لَكُمْ مَوْعِدًا﴾

४८. आणि सर्वच्या सर्व तुमच्या पालनकर्त्यासमोर रांगारांगांनी हजर केले जातील.
निःसंशय तुम्ही आमच्यासमोर त्याच प्रकारे आले, ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले होते. परंतु तुम्ही मात्र आशा भ्रमात राहिले की आम्ही कधी तुमच्यासाठी एखादा वायद्याचा दिवस निश्चित करणार नाही.

﴿وَوُضِعَ الْكِتَابُ فَتَرَى الْمُجْرِمِينَ مُشْفِقِينَ مِمَّا فِيهِ وَيَقُولُونَ يَا وَيْلَتَنَا مَالِ هَٰذَا الْكِتَابِ لَا يُغَادِرُ صَغِيرَةً وَلَا كَبِيرَةً إِلَّا أَحْصَاهَا ۚ وَوَجَدُوا مَا عَمِلُوا حَاضِرًا ۗ وَلَا يَظْلِمُ رَبُّكَ أَحَدًا﴾

४९.
आणि कर्म-लेख समोर ठेवले जातील, मग तुम्ही पाहाल की अपराधी त्यांच्या कर्मलेखापासून भयभीत होतील आणि म्हणतही असतील की अरेरे! आमचा विनाश! हा कसा लेख आहे, ज्याने कोणताही लहान-मोठा (गुन्हा) घेरल्याविना सोडले नाही, आणि त्यांनी जे कर्म केले होते, ते सर्व काही त्यांना दिसून येईल आणि तुमचा पालनकर्ता कोणावरही अत्याचार व अन्याय करणार नाही.

﴿وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ كَانَ مِنَ الْجِنِّ فَفَسَقَ عَنْ أَمْرِ رَبِّهِ ۗ أَفَتَتَّخِذُونَهُ وَذُرِّيَّتَهُ أَوْلِيَاءَ مِنْ دُونِي وَهُمْ لَكُمْ عَدُوٌّ ۚ بِئْسَ لِلظَّالِمِينَ بَدَلًا﴾

५०.
आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली.
काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे.

﴿۞ مَا أَشْهَدْتُهُمْ خَلْقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَلَا خَلْقَ أَنْفُسِهِمْ وَمَا كُنْتُ مُتَّخِذَ الْمُضِلِّينَ عَضُدًا﴾

५१.
मी त्यांना आकाशांच्या आणि जमिनीच्या निर्मितीप्रसंगी हजर ठेवले नव्हते आणि ना स्वतः त्याच्या निर्मितीत आणि मी मार्गभ्रष्ट करणाऱ्यांना आपला सहाय्यक बनविणाराही नाही.

﴿وَيَوْمَ يَقُولُ نَادُوا شُرَكَائِيَ الَّذِينَ زَعَمْتُمْ فَدَعَوْهُمْ فَلَمْ يَسْتَجِيبُوا لَهُمْ وَجَعَلْنَا بَيْنَهُمْ مَوْبِقًا﴾

५२.
आणि ज्या दिवशी तो म्हणेल की तुमच्या मते माझे जे साथीदार होते त्यांना हाक मारा, हे हाक मारतील, परंतु त्यांच्यापैकी कोणीही उत्तर देणार नाही आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचे साधन निर्माण करू.

﴿وَرَأَى الْمُجْرِمُونَ النَّارَ فَظَنُّوا أَنَّهُمْ مُوَاقِعُوهَا وَلَمْ يَجِدُوا عَنْهَا مَصْرِفًا﴾

५३.
आणि अपराधी लोक जहन्नमला पाहून समजून घेतील की ते यातच जाणार आहेत, परंतु तिच्यापासून बचावाचे स्थान त्यांना कोठेही आढळणार नाही.

﴿وَلَقَدْ صَرَّفْنَا فِي هَٰذَا الْقُرْآنِ لِلنَّاسِ مِنْ كُلِّ مَثَلٍ ۚ وَكَانَ الْإِنْسَانُ أَكْثَرَ شَيْءٍ جَدَلًا﴾

५४.
आणि आम्ही या कुरआनात प्रत्येक प्रकारची सर्व उदाहरणे लोकांसाठी सांगितली आहेत, परंतु समस्त वस्तूंपेक्षा जास्त भांडखोर मनुष्य आहे.

﴿وَمَا مَنَعَ النَّاسَ أَنْ يُؤْمِنُوا إِذْ جَاءَهُمُ الْهُدَىٰ وَيَسْتَغْفِرُوا رَبَّهُمْ إِلَّا أَنْ تَأْتِيَهُمْ سُنَّةُ الْأَوَّلِينَ أَوْ يَأْتِيَهُمُ الْعَذَابُ قُبُلًا﴾

५५.
आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर, त्यांना ईमान राखण्यापासून आणि आपल्या पालनकर्त्याजवळ क्षमा-याचना करण्यापासून केवळ याच गोष्टीने रोखले की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांसारखा व्यवहार त्यांच्याशीही केला जावा किंवा त्यांच्यासमोर शिक्षा –यातना (अज़ाब) उघड स्वरूपात यावी.

﴿وَمَا نُرْسِلُ الْمُرْسَلِينَ إِلَّا مُبَشِّرِينَ وَمُنْذِرِينَ ۚ وَيُجَادِلُ الَّذِينَ كَفَرُوا بِالْبَاطِلِ لِيُدْحِضُوا بِهِ الْحَقَّ ۖ وَاتَّخَذُوا آيَاتِي وَمَا أُنْذِرُوا هُزُوًا﴾

५६. आणि आम्ही तर आपल्या पैगंबरांना केवळ अशासाठी पाठवितो की त्यांनी शुभ-समाचार द्यावा आणि लोकांना सचेत करावे. इन्कारी लोक असत्याला पुरावा बनवून विवाद घालू इच्छितात की याद्वारे सत्य डळमळीत करावे. ते माझ्या आयतींची आणि ज्या गोष्टीचे भय दाखविले जावे तिची थट्टा उडवितात.

﴿وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنْ ذُكِّرَ بِآيَاتِ رَبِّهِ فَأَعْرَضَ عَنْهَا وَنَسِيَ مَا قَدَّمَتْ يَدَاهُ ۚ إِنَّا جَعَلْنَا عَلَىٰ قُلُوبِهِمْ أَكِنَّةً أَنْ يَفْقَهُوهُ وَفِي آذَانِهِمْ وَقْرًا ۖ وَإِنْ تَدْعُهُمْ إِلَى الْهُدَىٰ فَلَنْ يَهْتَدُوا إِذًا أَبَدًا﴾

५७.
आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण आहे, ज्याला त्याच्या पालनकर्त्याच्या आयतींद्वारे उपदेश केला जावा तरीही त्याने तोंड फिरवून राहावे आणि जे काही त्याच्या हातांनी पुढे पाठविले आहे, ते विसरून जावे. निःसंशय, आम्ही त्यांच्या हृदयांवर ते समजण्यापासून पडदे टाकून ठेवले आहेत, आणि त्यांच्या कानात बधीरता. तुम्ही त्यांना मार्गदर्शनाकडे कितीही बोलवा, परंतु मार्गदर्शन त्यांना कधीही लाभणार नाही.

﴿وَرَبُّكَ الْغَفُورُ ذُو الرَّحْمَةِ ۖ لَوْ يُؤَاخِذُهُمْ بِمَا كَسَبُوا لَعَجَّلَ لَهُمُ الْعَذَابَ ۚ بَلْ لَهُمْ مَوْعِدٌ لَنْ يَجِدُوا مِنْ دُونِهِ مَوْئِلًا﴾

५८. आणि तुमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
तो जर त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देण्यासाठी धरू इच्छिल तर निश्चितच त्यांना त्वरित शिक्षा देईल, परंतु त्यांच्यासाठी एक वायद्याची वेळ निर्धारीत आहे, ज्यापासून पळ काढण्याचे स्थान त्यांना कधीही लाभणार नाही.

﴿وَتِلْكَ الْقُرَىٰ أَهْلَكْنَاهُمْ لَمَّا ظَلَمُوا وَجَعَلْنَا لِمَهْلِكِهِمْ مَوْعِدًا﴾

५९.
आणि या त्या वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही त्यांच्या अत्याचारापायी नष्ट करून टाकले आणि त्यांच्या विनाशाची एक वेळ आम्ही निश्चित करून ठेवली होती.

﴿وَإِذْ قَالَ مُوسَىٰ لِفَتَاهُ لَا أَبْرَحُ حَتَّىٰ أَبْلُغَ مَجْمَعَ الْبَحْرَيْنِ أَوْ أَمْضِيَ حُقُبًا﴾

६०.
आणि जेव्हा मूसा आपल्या तरुणाला म्हणाले की मी तर चालतच राहीन येथेपर्यंत की दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पोहोचेन, मग त्यासाठी मला वर्षानुवर्षे का चालावे लागेना.

﴿فَلَمَّا بَلَغَا مَجْمَعَ بَيْنِهِمَا نَسِيَا حُوتَهُمَا فَاتَّخَذَ سَبِيلَهُ فِي الْبَحْرِ سَرَبًا﴾

६१.
जेव्हा ते दोघे त्या ठिकाणी पोहोचले, जे दोन नद्यांचे संगमस्थान होते, तिथे आपली मासळी विसरले, जिने नदीत भुयारासारखा आपला मार्ग बनवून घेतला.

﴿فَلَمَّا جَاوَزَا قَالَ لِفَتَاهُ آتِنَا غَدَاءَنَا لَقَدْ لَقِينَا مِنْ سَفَرِنَا هَٰذَا نَصَبًا﴾

६२. जेव्हा ते दोघे तिथून निघून पुढे गेले तेव्हा मूसा आपल्या तरुणाला म्हणाले, आणा आमचा नाश्ता द्या. आम्हाला तर या प्रवासात खूपच त्रास घ्यावा लागला.

﴿قَالَ أَرَأَيْتَ إِذْ أَوَيْنَا إِلَى الصَّخْرَةِ فَإِنِّي نَسِيتُ الْحُوتَ وَمَا أَنْسَانِيهُ إِلَّا الشَّيْطَانُ أَنْ أَذْكُرَهُ ۚ وَاتَّخَذَ سَبِيلَهُ فِي الْبَحْرِ عَجَبًا﴾

६३.
(त्याने) उत्तर दिले की, काय तुम्ही पाहिले नाही? जेव्हा आम्ही दगडाला टेका लावून आराम करीत होतो, तिथेच मी ती मासळी विसरलो, वस्तुतः सैतानाने मला विसर पाडला की तुमच्याजवळ या गोष्टीची चर्चा करावी. त्या मासळीने मोठ्या चमत्कारिकरित्या नदीत आपला मार्ग बनवून घेतला.

﴿قَالَ ذَٰلِكَ مَا كُنَّا نَبْغِ ۚ فَارْتَدَّا عَلَىٰ آثَارِهِمَا قَصَصًا﴾

६४.
(मूसा) म्हणाले, हेच ते ठिकाण होते, ज्याच्या शोधात आम्ही होतो तेव्हा ते तिथूनच आपल्या पद-चिन्हांना शोधत परत फिरले.

﴿فَوَجَدَا عَبْدًا مِنْ عِبَادِنَا آتَيْنَاهُ رَحْمَةً مِنْ عِنْدِنَا وَعَلَّمْنَاهُ مِنْ لَدُنَّا عِلْمًا﴾

६५.
मग त्यांना आमच्या दासांपैकी एक दास भेटला, ज्याला आम्ही आपल्या जवळून विशेष दया-कृपा प्रदान केली होती आणि त्याला आपल्या जवळून खास ज्ञानही शिकविले होते.

﴿قَالَ لَهُ مُوسَىٰ هَلْ أَتَّبِعُكَ عَلَىٰ أَنْ تُعَلِّمَنِ مِمَّا عُلِّمْتَ رُشْدًا﴾

६६. मूसा त्याला म्हणाले, आपण मला आज्ञा पाळेल की आपण मला ते सत्य ज्ञान शिकवावे, जे आपणास शिकविले गेले आहे.

﴿قَالَ إِنَّكَ لَنْ تَسْتَطِيعَ مَعِيَ صَبْرًا﴾

६७. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत धीर-संयम राखू शकत नाही.

﴿وَكَيْفَ تَصْبِرُ عَلَىٰ مَا لَمْ تُحِطْ بِهِ خُبْرًا﴾

६८. आणि ज्या गोष्टीला तुम्ही आपल्या ज्ञानकक्षेत घेतले नसेल त्यावर धीर-संयम कसे राखू शकता?

﴿قَالَ سَتَجِدُنِي إِنْ شَاءَ اللَّهُ صَابِرًا وَلَا أَعْصِي لَكَ أَمْرًا﴾

६९.
मूसाने उत्तर दिले की अल्लाहने इच्छिल्यास मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळून येईल आणि कोणत्याही बाबतीत तुमची अवज्ञा करणार नाही.

﴿قَالَ فَإِنِ اتَّبَعْتَنِي فَلَا تَسْأَلْنِي عَنْ شَيْءٍ حَتَّىٰ أُحْدِثَ لَكَ مِنْهُ ذِكْرًا﴾

७०.
(तो) म्हणाला, जर तुम्ही माझ्यासोबतच चालण्याचा आग्रह धरता तर लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीबाबत मला काही विचारु नका जोपर्यंत मी स्वतः त्याबाबत न सांगावे.

﴿فَانْطَلَقَا حَتَّىٰ إِذَا رَكِبَا فِي السَّفِينَةِ خَرَقَهَا ۖ قَالَ أَخَرَقْتَهَا لِتُغْرِقَ أَهْلَهَا لَقَدْ جِئْتَ شَيْئًا إِمْرًا﴾

७१. मग ते दोघे तेथून निघाले, येथेपर्यंत की एका नौकेत बसले (खिज्रने) नौकेच्या फळ्या तोडल्या.
(मूसा) म्हणाले, काय तुम्ही नौका तोडत आहात की नौकेत बसलेल्यांना बुडवून टाकावे? तुम्ही तर हे मोठे अनुचित काम केले.

﴿قَالَ أَلَمْ أَقُلْ إِنَّكَ لَنْ تَسْتَطِيعَ مَعِيَ صَبْرًا﴾

७२. (ख्रिजने) उत्तर दिले की मी आधीच तुम्हाला बोललो होतो की तुम्ही माझ्यासोबत राहून धीर-संयम राखू शकणार नाही.

﴿قَالَ لَا تُؤَاخِذْنِي بِمَا نَسِيتُ وَلَا تُرْهِقْنِي مِنْ أَمْرِي عُسْرًا﴾

७३. (मूसा) म्हणाले की माझ्या या चुकीबद्दल मला धरू नका आणि माझ्या बाबतीत सक्तीने वागू नका.

﴿فَانْطَلَقَا حَتَّىٰ إِذَا لَقِيَا غُلَامًا فَقَتَلَهُ قَالَ أَقَتَلْتَ نَفْسًا زَكِيَّةً بِغَيْرِ نَفْسٍ لَقَدْ جِئْتَ شَيْئًا نُكْرًا﴾

७४. मग दोघे निघाले, येथेपर्यंत की त्यांना एक बालक दिसले, (खिज्रने) त्या बालकाला मारून टाकले. (मूसा) म्हणाले की, तुम्ही तर एका निरपराधाचा जीव घेतला. वास्तविक त्याने कोणाची हत्या केली नव्हती. निःसंशय, तुम्ही हे मोठे वाईट कृत्य केले.

﴿۞ قَالَ أَلَمْ أَقُلْ لَكَ إِنَّكَ لَنْ تَسْتَطِيعَ مَعِيَ صَبْرًا﴾

७५. ते म्हणाले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही माझ्यासोबत राहून कधीही धीर-संयम राखू शकत नाही.

﴿قَالَ إِنْ سَأَلْتُكَ عَنْ شَيْءٍ بَعْدَهَا فَلَا تُصَاحِبْنِي ۖ قَدْ بَلَغْتَ مِنْ لَدُنِّي عُذْرًا﴾

७६.
(मूसा यांनी) उत्तर दिले, आता जर यानंतर मी तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत काही विचारले तर बेलाशक तुम्ही मला आपल्यासोबत ठेवू नका, निःसंशय, माझ्यातर्फे तुम्ही सबबीस पोहचला आहात.

﴿فَانْطَلَقَا حَتَّىٰ إِذَا أَتَيَا أَهْلَ قَرْيَةٍ اسْتَطْعَمَا أَهْلَهَا فَأَبَوْا أَنْ يُضَيِّفُوهُمَا فَوَجَدَا فِيهَا جِدَارًا يُرِيدُ أَنْ يَنْقَضَّ فَأَقَامَهُ ۖ قَالَ لَوْ شِئْتَ لَاتَّخَذْتَ عَلَيْهِ أَجْرًا﴾

७७. पुन्हा दोघे निघाले, एका गावाच्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याजवळ जेवण मागितले. त्यांनी त्यांचा पाहुणचार करण्यास नकार दिला.
दोघांना त्या ठिकाणी एक भिंत आढळली, जी कोसळण्याच्या बेतात होती, त्याने तिला सरळ केले (मूसा) म्हणाले, जर तुम्ही इच्छिले असते तर या (कामा) बद्दल मजुरी घेतली असती.

﴿قَالَ هَٰذَا فِرَاقُ بَيْنِي وَبَيْنِكَ ۚ سَأُنَبِّئُكَ بِتَأْوِيلِ مَا لَمْ تَسْتَطِعْ عَلَيْهِ صَبْرًا﴾

७८.
तो म्हणाला, आता मात्र माझ्या आणि तुझ्या दरम्यान वेगळे होण्याची वेळ आली आहे, तेव्हा मी तुला त्या गोष्टींची हकीकत सांगतो, ज्यावर तुम्ही धीर-संयम राखू शकले नाही.

﴿أَمَّا السَّفِينَةُ فَكَانَتْ لِمَسَاكِينَ يَعْمَلُونَ فِي الْبَحْرِ فَأَرَدْتُ أَنْ أَعِيبَهَا وَكَانَ وَرَاءَهُمْ مَلِكٌ يَأْخُذُ كُلَّ سَفِينَةٍ غَصْبًا﴾

७९. ती नौका काही काही गरीब लोकांची होती, जे नदीत काम करीत असत.
मी तिच्यात काही तोडफोड करण्याचे ठरविले कारण पुढच्या इलाक्यात एक राजा होता, जो प्रत्येक चांगली नौका जबरदस्तीने (आपल्या ताब्यात) घेत असे.

﴿وَأَمَّا الْغُلَامُ فَكَانَ أَبَوَاهُ مُؤْمِنَيْنِ فَخَشِينَا أَنْ يُرْهِقَهُمَا طُغْيَانًا وَكُفْرًا﴾

८०. आणि त्या तरुणाचे आई-बाप ईमान राखणारे होते. आम्हाला ही भीती वाटली की कदाचित हा त्यांना आपल्या बंडखोरी आणि अधार्मिकतेने लाचार व व्याकूळ न करून टाको.

﴿فَأَرَدْنَا أَنْ يُبْدِلَهُمَا رَبُّهُمَا خَيْرًا مِنْهُ زَكَاةً وَأَقْرَبَ رُحْمًا﴾

८१.
म्हणून आम्ही इच्छिले की त्यांना त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) त्याच्याऐवजी त्याहून उत्तम पवित्र आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आणि आवडता पुत्र प्रदान करो.

﴿وَأَمَّا الْجِدَارُ فَكَانَ لِغُلَامَيْنِ يَتِيمَيْنِ فِي الْمَدِينَةِ وَكَانَ تَحْتَهُ كَنْزٌ لَهُمَا وَكَانَ أَبُوهُمَا صَالِحًا فَأَرَادَ رَبُّكَ أَنْ يَبْلُغَا أَشُدَّهُمَا وَيَسْتَخْرِجَا كَنْزَهُمَا رَحْمَةً مِنْ رَبِّكَ ۚ وَمَا فَعَلْتُهُ عَنْ أَمْرِي ۚ ذَٰلِكَ تَأْوِيلُ مَا لَمْ تَسْطِعْ عَلَيْهِ صَبْرًا﴾

८२.
आणि भिंतीचा किस्सा असा की त्या शहरात दोन अनाथ मुले आहेत, ज्यांचा खजिना (धन) त्यांच्या त्या भिंतीखाली गाडलेला आहे. त्यांचे पिता मोठे नेक सदाचारी होते.
तेव्हा तुमचा पालनकर्ता इच्छित होता की या दोन्ही अनाथ मुलांनी आपल्या तरुण वयास पोहोचून आपला हा खजिना, तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेने आणि मेहरबानीने काढून घ्यावा. मी स्वतःच्या इराद्याने (आणि इच्छेने) कोणतेही काम केले नाही. ही हकीकत होती त्या घटनांची ज्यांच्याबाबत तुम्ही धीर-संयम राखू शकले नाहीत.

﴿وَيَسْأَلُونَكَ عَنْ ذِي الْقَرْنَيْنِ ۖ قُلْ سَأَتْلُو عَلَيْكُمْ مِنْهُ ذِكْرًا﴾

८३.
आणि तुम्हाला जुल्करनैनच्या घटनेविषयी हे लोक विचारतात, (तुम्ही) सांगा की मी त्यांचा थोडासा वृत्तांत तुम्हाला वाचून ऐकवितो.

﴿إِنَّا مَكَّنَّا لَهُ فِي الْأَرْضِ وَآتَيْنَاهُ مِنْ كُلِّ شَيْءٍ سَبَبًا﴾

८४.
आम्ही धरतीवर त्याला शक्ती-सामर्थ्य प्रदान केले होते, आणि त्याला प्रत्येक गोष्टीची साधनेही प्रदान केली होती.

﴿فَأَتْبَعَ سَبَبًا﴾

८५. तो एका मार्गामागे लागला.

﴿حَتَّىٰ إِذَا بَلَغَ مَغْرِبَ الشَّمْسِ وَجَدَهَا تَغْرُبُ فِي عَيْنٍ حَمِئَةٍ وَوَجَدَ عِنْدَهَا قَوْمًا ۗ قُلْنَا يَا ذَا الْقَرْنَيْنِ إِمَّا أَنْ تُعَذِّبَ وَإِمَّا أَنْ تَتَّخِذَ فِيهِمْ حُسْنًا﴾

८६.
येथेपर्यंत की सूर्यास्ताच्या ठिकाणापर्यंत पोहोचला आणि त्याला (सूर्याला) एका दलदलीच्या प्रवाहात बुडताना पाहिले आणि त्या प्रवाहाच्या ठिकाणावर एक जनसमूहही आढळला. आम्ही सांगितले, हे जुल्करनैन! तू त्यांना शिक्षा दे किंवा त्यांच्या बाबतीत एखादा चांगला मार्ग काढ.

﴿قَالَ أَمَّا مَنْ ظَلَمَ فَسَوْفَ نُعَذِّبُهُ ثُمَّ يُرَدُّ إِلَىٰ رَبِّهِ فَيُعَذِّبُهُ عَذَابًا نُكْرًا﴾

८७. तो म्हणाला, जो अत्याचार करेल, त्याला तर आम्हीही आता शिक्षा देऊ. मग तो आपल्या पालनकर्त्याकडे परतविला जाईल आणि तो त्याला सक्त सजा-यातना देईल.

﴿وَأَمَّا مَنْ آمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَلَهُ جَزَاءً الْحُسْنَىٰ ۖ وَسَنَقُولُ لَهُ مِنْ أَمْرِنَا يُسْرًا﴾

८८.
परंतु जो ईमान राखेल आणि सत्कर्म करेल तर त्याच्याकरिता मोबदल्यात भलाई आहे आणि त्याला आपल्या कामातही सोपेपणाचा आदेश देऊ.

﴿ثُمَّ أَتْبَعَ سَبَبًا﴾

८९. मग तो दुसऱ्या एका मार्गास लागला.

﴿حَتَّىٰ إِذَا بَلَغَ مَطْلِعَ الشَّمْسِ وَجَدَهَا تَطْلُعُ عَلَىٰ قَوْمٍ لَمْ نَجْعَلْ لَهُمْ مِنْ دُونِهَا سِتْرًا﴾

९०.
येथेपर्यंत की जेव्हा तो सूर्योदयाच्या ठिकाणापर्यंत पोहोचला तेव्हा सूर्याला एका अशा जनसमूहावर उगवताना पाहिले की त्यांच्याकरिता आम्ही त्यापासून कोणताही आडपडदा राखला नाही.

﴿كَذَٰلِكَ وَقَدْ أَحَطْنَا بِمَا لَدَيْهِ خُبْرًا﴾

९१. घटना अशीच आहे, आम्ही त्याच्या जवळपासच्या समस्त खबरी घेरून ठेवल्या आहेत.१

﴿ثُمَّ أَتْبَعَ سَبَبًا﴾

९२. मग तो दुसऱ्या एका मार्गाकडे निघाला.

﴿حَتَّىٰ إِذَا بَلَغَ بَيْنَ السَّدَّيْنِ وَجَدَ مِنْ دُونِهِمَا قَوْمًا لَا يَكَادُونَ يَفْقَهُونَ قَوْلًا﴾

९३.
येथेपर्यंत की जेव्हा दोन भिंतींच्या दरम्यान पोहोचला, त्या दोघींच्या पलीकडे अशी जमात आढळली, जी गोष्ट समजून घेण्याच्या जवळही नव्हती.

﴿قَالُوا يَا ذَا الْقَرْنَيْنِ إِنَّ يَأْجُوجَ وَمَأْجُوجَ مُفْسِدُونَ فِي الْأَرْضِ فَهَلْ نَجْعَلُ لَكَ خَرْجًا عَلَىٰ أَنْ تَجْعَلَ بَيْنَنَا وَبَيْنَهُمْ سَدًّا﴾

९४. (त्यांनी) सांगितले हे जुल्करनैन! याजूज आणि माजूज या देशात मोठा उपद्रव व उत्पात पसरवित आहे.
तर काय आम्ही तुमच्याकरिता काही धन जमा करून द्यावे (या अटीवर की) तुम्ही आमच्या आणि त्यांच्या दरम्यान एखादी भिंत बनवावी.

﴿قَالَ مَا مَكَّنِّي فِيهِ رَبِّي خَيْرٌ فَأَعِينُونِي بِقُوَّةٍ أَجْعَلْ بَيْنَكُمْ وَبَيْنَهُمْ رَدْمًا﴾

९५. त्याने उत्तर दिले की माझ्याजवळ, माझ्या पालनकर्त्याने जे प्रदान केले आहे, तेच उत्तम आहे. तुम्ही फक्त आपली शक्ती आणि सामर्थ्याने माझी मदत करा. तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान मी भक्कम भिंत बनवून देतो.

﴿آتُونِي زُبَرَ الْحَدِيدِ ۖ حَتَّىٰ إِذَا سَاوَىٰ بَيْنَ الصَّدَفَيْنِ قَالَ انْفُخُوا ۖ حَتَّىٰ إِذَا جَعَلَهُ نَارًا قَالَ آتُونِي أُفْرِغْ عَلَيْهِ قِطْرًا﴾

९६.
मला लोखंडाची चादर आणून द्या, येथेपर्यंत की जेव्हा त्या दोन पर्वतांच्या दरम्यान भिंत उभारून दिली तेव्हा आदेश दिला की फूंक मारा (अर्थात प्रखर आग प्रज्वलित करा) त्या वेळेपर्यंत की लोखंडाच्या या चादरींना अगदी आग करून टाकले, तेव्हा सांगितले, माझ्याजवळ आणा, याच्यावर वितळलेले तांबे टाकतो.

﴿فَمَا اسْطَاعُوا أَنْ يَظْهَرُوهُ وَمَا اسْتَطَاعُوا لَهُ نَقْبًا﴾

९७. मग ना तर त्यांच्यात त्या भिंतीवर चढण्यचाची शक्ती होती आणि ना तिच्यात एखादे छिद्र करू शकत होते.

﴿قَالَ هَٰذَا رَحْمَةٌ مِنْ رَبِّي ۖ فَإِذَا جَاءَ وَعْدُ رَبِّي جَعَلَهُ دَكَّاءَ ۖ وَكَانَ وَعْدُ رَبِّي حَقًّا﴾

९८.
सांगितले की ही केवळ माझ्या पालनकर्त्याची दया-कृपा आहे, परंतु जेव्हा माझ्या पालनकर्त्याचा वायदा (आदेश) येईल तेव्हा त्याचे तुकडे तुकडे करून टाकेल. निःसंशय, माझ्या पालनकर्त्याचा वायदा सच्चा आहे.

﴿۞ وَتَرَكْنَا بَعْضَهُمْ يَوْمَئِذٍ يَمُوجُ فِي بَعْضٍ ۖ وَنُفِخَ فِي الصُّورِ فَجَمَعْنَاهُمْ جَمْعًا﴾

९९.
आणि त्या दिवशी आम्ही त्यांना आपसात एकमेकांशी मिसळत असताना सोडून देऊ आणि सूर (शंख) फूंकला जाईल, मग सर्वांना आम्ही एकाच वेळी जमा करू.

﴿وَعَرَضْنَا جَهَنَّمَ يَوْمَئِذٍ لِلْكَافِرِينَ عَرْضًا﴾

१००. आणि त्या दिवशी आम्ही जहन्नमला (देखील) काफिरांच्या समोर आणून उभी करू.

﴿الَّذِينَ كَانَتْ أَعْيُنُهُمْ فِي غِطَاءٍ عَنْ ذِكْرِي وَكَانُوا لَا يَسْتَطِيعُونَ سَمْعًا﴾

१०१. ज्यांचे डोळे माझ्या स्मरणापासून पडद्यात होते आणि (सत्य) ऐकूही शकत नव्हते.

﴿أَفَحَسِبَ الَّذِينَ كَفَرُوا أَنْ يَتَّخِذُوا عِبَادِي مِنْ دُونِي أَوْلِيَاءَ ۚ إِنَّا أَعْتَدْنَا جَهَنَّمَ لِلْكَافِرِينَ نُزُلًا﴾

१०२.
काय काफिर हा विचार करून बसले आहेत की माझ्याशिवाय ते माझ्या दासांना आपला समर्थक बनवून घेतील? (ऐका) आम्ही तर त्या काफिरांच्या पाहुणचारासाठी जहन्नम तयार करून ठेवली आहे.

﴿قُلْ هَلْ نُنَبِّئُكُمْ بِالْأَخْسَرِينَ أَعْمَالًا﴾

१०३. सांगा की (तुम्ही सांगत असाल) तर मी सांगतो की आपल्या कर्मांमुळे सर्वांत जास्त नुकसान उचलणारा कोण आहे?

﴿الَّذِينَ ضَلَّ سَعْيُهُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَهُمْ يَحْسَبُونَ أَنَّهُمْ يُحْسِنُونَ صُنْعًا﴾

१०४.
ते लोक आहेत, ज्यांचे ऐहिक जीवनाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले, आणि ते याच भ्रमात राहिले की ते फार चांगले काम करीत आहेत.

﴿أُولَٰئِكَ الَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِ رَبِّهِمْ وَلِقَائِهِ فَحَبِطَتْ أَعْمَالُهُمْ فَلَا نُقِيمُ لَهُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ وَزْنًا﴾

१०५.
हेच ते लोक होते, ज्यांनी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या आयतींशी आणि त्याच्याशी भेट होण्याचा इन्कार केला, यास्तव त्यांची सर्व कर्मे वाया गेलीत. मग कयामतच्या दिवशी आम्ही त्यांचा कसलाही भार निश्चित करणार नाही.

﴿ذَٰلِكَ جَزَاؤُهُمْ جَهَنَّمُ بِمَا كَفَرُوا وَاتَّخَذُوا آيَاتِي وَرُسُلِي هُزُوًا﴾

१०६.
वस्तुतः त्यांचा मोबदला जहन्नम आहे, कारण त्यांनी इन्कार केला आणि माझ्या आयतींची आणि माझ्या पैगंबरांची थट्टा उडविली.

﴿إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ كَانَتْ لَهُمْ جَنَّاتُ الْفِرْدَوْسِ نُزُلًا﴾

१०७.
ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, निश्चितच त्यांच्यासाठी फिर्दोस१ (जन्नतमधील सर्वोच्च स्थान) च्या बागांमध्ये स्वागत आहे.

﴿خَالِدِينَ فِيهَا لَا يَبْغُونَ عَنْهَا حِوَلًا﴾

१०८. जिथे ते नेहमी राहतील, जे स्थान बदलण्याचा कधीही त्यांचा इरादा होणार नाही.

﴿قُلْ لَوْ كَانَ الْبَحْرُ مِدَادًا لِكَلِمَاتِ رَبِّي لَنَفِدَ الْبَحْرُ قَبْلَ أَنْ تَنْفَدَ كَلِمَاتُ رَبِّي وَلَوْ جِئْنَا بِمِثْلِهِ مَدَدًا﴾

१०९.
सांगा की जर माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी (प्रशंसा व गुणगान) लिहिण्याकरिता समुद्र शाई बनला तर तोही माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी संपण्यापूर्वीच संपून जाईल, मग वाटल्यास आम्ही त्यासारखाच दुसरा (समुद्र) त्याच्या मदतीकरिता घेऊन यावे.

﴿قُلْ إِنَّمَا أَنَا بَشَرٌ مِثْلُكُمْ يُوحَىٰ إِلَيَّ أَنَّمَا إِلَٰهُكُمْ إِلَٰهٌ وَاحِدٌ ۖ فَمَنْ كَانَ يَرْجُو لِقَاءَ رَبِّهِ فَلْيَعْمَلْ عَمَلًا صَالِحًا وَلَا يُشْرِكْ بِعِبَادَةِ رَبِّهِ أَحَدًا﴾

११०.
तुम्ही सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे (होय)माझ्याकडे वह्यी(प्रकाशना)केली जाते की सर्वांचा उपास्य केवळ एकच उपास्य आहे, तर ज्याला देखील आपल्या पालनकर्त्याशी भेटण्याची आशा असेल, त्याने सत्कर्म करीत राहिले पाहिजे, आणि आपल्या पालनकर्त्याच्या भक्ती-उपासनेत१ दुसऱ्या कोणालाही सहभागी करू नये.

الترجمات والتفاسير لهذه السورة: